दादा कोंडके यांची संपूर्ण माहिती Dada Kondke Information in Marathi

Dada Kondke Information in Marathi दादा कोंडके एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता होते. ते मराठी चित्रपट सृष्टीतल्या नामांकित व्यक्तींपैकी एक होते, जे चित्रपटांमधील दुहेरी कलाकारांच्या संवादासाठी प्रसिद्ध होते. त्याचे कुटुंबातील सदस्य बॉम्बे डायिंगचे गिरणी कामगार होते. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली.

Dada Kondke Information In Marathi

दादा कोंडके यांची संपूर्ण माहिती Dada Kondke Information in Marathi

जन्म :

दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी 8 ऑगस्ट, 1932 रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी झाला. म्हणून या पुत्ररत्नाचे कृष्णा नाव ठेवण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या.

शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखले जात असे. ही बिरुदावली नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली.

बालपण :

दादांचे बालपण नायगावच्या मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. अपना बाजार मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले.

सोडावॉटर बाटल्या, नायगाव परिसरात बॅंडवाले दादा ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले.

प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या ‘खणखणपूरचा राजा’ ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते.

चित्रपट कारकीर्द :

हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी  मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या ‘विच्छा माझी पुरी करा’ ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. 1500 च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली.

आशा भोसले ‘विच्छा’ चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके 56 रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर डोक्यावर घ्यायचे.

1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या सोंगाड्या- 1971 ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते.

1972 साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला.

असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

1975 मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या कामाक्षी प्रॉडक्शन ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे 16 चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी 4 हिंदी व 1 गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

1971 ते 97 या 26 वर्षांच्या कालखंडात, दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत होते. या कालखंडात दादांच्या चित्रपटांवर ना हिंदी सिनेमांचा परिणाम झाला ना दूरचित्रवाणीच्या आगमनाचा! आकर्षक गाणी, उडत्या चाली व धमाल संवाद यांसोबतच दादांनी त्या काळच्या प्रचलित धारणांनुसार जो अनाकर्षक नायक उभा केला, तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, साधाभोळा पण बोलण्यात फटकळ असा हा नायक सर्वार्थांनी वेगळा होता, म्हणूनही त्याला खऱ्या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता.

दादांच्या चित्रपटांमुळे पूर्णत: डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपटनिर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरण प्रणालीपासून सर्वच यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वत:चे वेगळेपण दाखवले होते.

त्यांची स्वत:ची कामाक्षी नावाची चित्रपट-वितरण संस्था व ‘सदिच्छा’ नावाची चित्रपट निर्मितिसंस्था होती. उषा चव्हाण या नायिकेबरोबर त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या चित्रपटांत आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम-लक्ष्मण, पार्श्व गायनासाठी महेंद्र कपूर यांचा आवाज आदी घटकही तितकेच लोकप्रिय ठरले.

राजकीय कारकीर्द :

अनेकांना आक्षेपार्ह वाटण्याच्या द्वि-अर्थी शब्द असणाऱ्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडके यांना मदत केली. कोंडके यांना पाठिंबा देण्याचे ठाकरे यांचे औचित्य म्हणजे ते एक मराठी माणूस होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्मामुळे दादा कोंडके प्रभावित झाले.

ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या राजकीय पक्षाच्या शिवसेनेची मुळे उभारण्यासाठी महाराष्ट्र दौरा केला होता. कोंडके हे अतिशय सक्रिय शिव सैनिक होते आणि त्यांची लोकप्रियता आणि जनतेला प्रभावित करण्यासाठी अग्निमय भाषणे करण्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील बर्‍याच भागात त्याचा परिणाम झाला.

प्रसिद्ध चित्रपट :

1072 – एकटा जीव सदाशिव, 1973 – आंधळा मारतो डोळा, 1975 – पांडू हवालदार, 1976 – तुमचं आमचं जमलं, 1977 – राम राम गंगाराम, 1978 – बोटं लावीन तेथे गुदगुल्या, 1980 – ह्योच नवरा पाहिजे, 1987 – आली अंगावर, 1988 – मुका घ्या मुका, 1990 -पळवा पळवी, 1992- येऊ का घरात, 1994 – सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. 1981 साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसऱ्या बॅनरखाली केला.

दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ :

दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापली गेलेली “दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन” ही संस्था दरवर्षी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा’ भरवते.

दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ निर्माते अतीफ, सहनिर्माते हेमंत अणावकर आणि दिग्दर्शक आर. विराज यांनी ‘वाजलाच पाहिजे : गेम की शिणेमा’ हा चित्रपट काढला आहे. एकटा जीव नावाचे एक वेगळेच नाटक सुनंदा साठे यांनी लिहिले आहे, त्याची संहिता त्यांच्या ‘नाट्यद्वय’ या पुस्तकात समाविष्ट आहे.

मृत्यू :

धडा यांचा मृत्यू 14 मार्च, 1998 रोजी पहाटे 3.30 ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते. पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे ह्या होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.

त्यांच्या मृत्यूनंतर ही त्यांची संपत्तीच्या वाटाघाटी वरून वाद उत्पन्न झाले. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख, गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा  :-