Holi Wishes In Marathi होळी हा एक रंगीबेरंगी उत्सव आहे ज्यात प्रत्येक धर्माचे लोक संपूर्ण उत्साह आणि आनंदाने साजरा करतात. होळी हा रंगांचा एक भव्य सण आहे जो दरवर्षी हिंदु धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूत येतो आणि हा दिवाळीसारखा सर्वात आनंदोत्सव आहे. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या काळात संपूर्ण निसर्ग आणि वातावरण खूपच सुंदर आणि रंगीबेरंगी दिसत असते.
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! Holi Wishes In Marathi
Holi Images In Marathi
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगबिरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका, वृक्ष तोडून होळी साजरी करू नका, नैसर्गिक रंगांचाच वापर करा, प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका, रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सुरक्षेचं भान राखू शुद्ध रंग उधळू माखू रसायन, घाण नको मळी रे आज वर्षाची होळी आली रे राग-द्वेष ,मतभेद विसरू प्रेम, शांती चहुकडे पसरू होळी ईडापीडा दु:ख जाळी रे आज वर्षाची होळी आली रे होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगांमध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी, ‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी, ‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी, ‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी, ‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी, ‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी, ‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू अन् कचरा हटवू निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा… होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात वाहून जाते श्वासाचे पाणी तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो कारण भिजत राहतात त्या आठवणी होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी होळीच्या रंगीत शुभेच्छा !!