समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Sant Ramdas Information In Marathi

Sant Ramdas Information In Marathi संत रामदास हे संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लेखनही त्यांनी केले आहे. त्यांचा जन्म २४ मार्च १६०८ रोजी जालना जिल्ह्यातील जांब येथे झाला आहे. त्यांनी दासबोध व मनाचे श्लोक ही रचना केलेली आहे आणि त्यांचे प्रसिद्ध वचन म्हणजे ‘जय जय रघुवीर समर्थ’ हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर तसेच आईचे नाव राणूबाई सूर्याजीपंत ठोसर आहे.

Sant Ramdas Information In Marathi

समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Sant Ramdas Information In Marathi

रामदास स्वामींचे  बालपण:

स्वामी समर्थ रामदास यांचा जन्म श्रीक्षेत्र जांब समर्थ या गावी श्री राम नवमीच्या दिवशी म्हणजेच शुद्ध नवमीस रामजन्माच्या शुभमुहूर्तावर झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवळ्याचा तसेच एक लोहाराचा होता.

नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. त्यांनी अनुभवाने व निरीक्षण आणि सर्व गोष्टी शिकून घेतल्या नारायण एकदा लपून बसला असता, कोणालाही सापडेनासा झाला. अखेर एकदा काय करीत होतास असे विचारल्यावर, “आई चिंता करतो विश्वाची” असे त्याने उत्तर दिले होते.

या मुलाला संसारात अडकविले तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारतांच तो एकून नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल पाण्यात उडी मारली.

पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीत दीर्घ तपश्चर्या केली व वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ बारा वर्ष तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला, असे मानले जाते. नाशिक मध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते १६२१ ते १६३३  बारा वर्षे राहिले.

आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकड्यांवरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण आहे. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत दोन तास गायत्रीमंत्राचा तर चार तास “श्री राम जय राम जय जय राम” या त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्राचा जप करीत रामदासांनी राम नामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे. त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

भारत भ्रमण केले :

स्वामी समर्थांनी आपली तपश्‍चर्या संपल्यानंतर बारा वर्ष भारत भ्रमण केले. तीर्थयात्रा केल्या. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे ते फिरत फिरत हिमालयात गेले. त्यांना प्रभू राम दर्शन झाले. आत्मसाक्षात्कार झाला भारत-भ्रमण करीत असता, श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या धुरंधर स्थिती संबंधित दोघांची चर्चा झाली हरगोविंदसिंग बरोबर एक हजार सैनिक असायचे त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले.

समर्थांनी हरगोविंद यांना विचारले, आपण धर्मगुरू हात या दोन दोन तलवारी आपण का वागवता? ते मग गुरु हरगोविंद म्हणाले एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्री यांच्या रक्षणासाठी समर्थांनी पुन्हा आश्चर्य वाटले आणि हा सारा फौजफाटा त्यावर हरगोविंद म्हणाले धर्म रक्षण करणारे हे सैन्य आहे सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, की केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहीजे. “समान-शिले-व्यसनेषु सख्यान” या न्यायाने दोघांत सख्य झाले आणि तेव्हापासून समर्थ रामदास आपल्याकडे शस्त्र ठेवू लागले.

मारुती मंदिरची स्थापना:

समर्थ रामदासांनी मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली. मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत होते. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतीचे मंदिरे याच परिसरात आहेत.

साहित्य :

समर्थ रामदासांनी समाजाविषयी अपार तळमळ इथून विपुल वाडःमय निर्मिती केलेली आहे. रोखठोक विचार साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये आहेत. दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके भीमरूपी स्तोत्र अनेक आरत्या उदाहरणार्थ सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची…. गणपतीची आरती. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा…. शंकराची आरती कांही पदे त्यांनी इत्यादी त्यांच्या लेखन कृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्या यांनी घराघरात स्थान मिळवले आहेत.

युगे अठ्ठावीस विठू विटेवरी उभा आहे… संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. त्यांचा अर्थ नामदेवांच्या काळात देवाच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले. अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरत्या जनमानसाच्या स्मृतीतून नाहीशा झाल्या. समर्थांनी हे वाढवायचे पुनरुज्जीवन केले आपण ज्या विविध आरत्या म्हणतो त्यापैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना, तेथील पुजाऱ्याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची गणपतीची आरती केली.

तसेच तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी तिचे दर्शन घेतांना समर्थांना दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी… ही आरती स्फुरली सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी….. ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो. समर्थांनी शंकराची आरती लिहिली त्याची कथा मोठी गमतीशीर आहे.

तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले ते खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथळेश्वरला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीस मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती. त्या दिवशी स्वामींनी मुद्दाम मंदिरात झोपायचे ठरवले ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण समर्थ जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला असता. तर काय समर्थ भगवान ईश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. त्यांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या.

“तुम्हाला आमची माहिती समर्थ रामदास विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

1 thought on “समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Sant Ramdas Information In Marathi”

  1. या सर्व माहिती कारणे धन्यवाद। समर्थ रामदासांच्या पत्नि विषयी काही माहिती उपलब्ध आहे काय। असल्यास कृपया सांगावे।

Comments are closed.