डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची संपूर्ण माहिती Dr. Narendra Dabholkar Information in Marathi

Dr. Narendra Dabholkar Information in Marathi डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1989 मध्ये स्थापन करण्यात आली. नरेंद्र दाभोलकर हे एक मराठी बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळखले जातात.या समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले व समाजातील अंधश्रद्धेवर टीका केली.

Dr. Narendra Dabholkar Information In Marathi

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची संपूर्ण माहिती Dr. Narendra Dabholkar Information in Marathi

जन्म :

नरेंद्र दाभोलकरांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. त्यांचे वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे आहेत.

शिक्षण :

नरेंद्र दाभोलकर यांचे माध्यमिक शिक्षण हे साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू होते. कबड्डी वर त्यांनी एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही लिहिले आहे.

कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. 1970 मध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांची पत्नी शैला दाभोलकरसुध्दा त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यात होती.

त्यांचा मुलगा हमीद दाभोलकर हे डॉक्टर आणि त्यांच्या ‘प्रश्न मनाचे’ या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.  या दोघांनीही काळ्या जादू, जादूटोणा यासारख्या गोष्टी अंधश्रद्धेच्या पलीकडे मानसिक रोग म्हणून पाहण्याचा सल्ला दिला.  त्याची मुलगी मुक्ता व्यवसायाने वकील आहे.

सामाजिक कार्य :

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक अनेक कार्य पार पडली आहेत. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधनाचे करण्याची कार्य केले.

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे म्हणून बऱ्याच वर्ष त्यांनी कार्य केलेले आहे. या संदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय काम ते करत होते.

समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक-पाणवठा’ या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या 1982 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य सुरू केले.

पण नंतर 1989 मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्वतंत्र स्थापना केली व साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

प्रदूषण समस्यांचे निवारण :

नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा विरुद्ध तर कार्य केले आहे. दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे गणेश विसर्जन आणि ध्वनी प्रदूषणानंतर होणारे जलप्रदूषण विरोधात त्यांची दुसरी मोहीम होती.  गणेश विसर्जनासाठी नदीऐवजी टाक्यांचा पर्याय त्यांनी सुचविला होता.

जो आता महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरपालिकेने स्वीकारला आहे.  त्याच वेळी, दिवाळीच्या वेळी ते आणि त्यांचे कामगार खेड्यात, गावे आणि शहरातील शाळांकडे जात असत आणि विद्यार्थ्यांना असे वचन देण्यास भाग पाडत असत की, फटाके वाजवण्याऐवजी पैसे वाचवतील आणि सामाजिक संस्थांना देणगी देतील.

अशाप्रकारे, त्यांनी आतापर्यंत धुराच्या उडण्यापासून लाखो रुपये वाचविले आहेत. शिक्षणातील प्राथमिक स्तरावरून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. तसेच राज्यातील सर्पमित्रांना एकत्रित करून सर्प विषासाठी एक सहकारी संस्था स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.  पण त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.

जाती व्यवस्थेचा विरोध :

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रधान सचिव माधव बावगे म्हणतात, “भारतीय राज्यघटना कोणत्याही शास्त्राप्रमाणे वाचली पाहिजे”. हा त्यांचा आग्रह होता. जातीय निर्मूलनासाठी त्यांनी जातीय आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मते, जात ही एक अंधश्रद्धा आहे. त्यांनी कधीही पूजा, धर्म किंवा धार्मिक सणांना विरोध केला नाही. त्यातील मूळचा अमानुषपणा आणि अवैज्ञानिकपणा यांचा त्यांनी विरोध केला.

महाराष्ट्रात जात पंचायतीच्या दहशतीमुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने विचारला. त्याचे विरोधक खासकरुन त्यांना हिंदुविरोधी मानू लागले असले तरी बालयोगी विठ्ठलिंग महाराज अक्कलकोट, ‘पेटफडु’ अस्लंबाबा किंवा अनुराधाताई असोत की गुलाबबाबा किंवा नागपूरची निर्मला माता असो.

जिकडे तिकडे दडपण,अंधश्रधा दिसली असेल तेथे पोहोचले.  त्यांना डॉ. श्रीराम लागू, नीळू फुले, सदाशिव आम्रपूकरार, विजय तेंडुलकर आणि अच्युत गोडबोले यांच्यासारख्या कलाकारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला.

साहित्य :

  • अंधश्रद्धा विनाषय राजहंस प्रकाशन.
  • असे कसे झाले भोंदू ? मनोविकास प्रकाशन.
  • ज्यांचा त्यांचा प्रश्न अंधश्रद्धा या विषयावरील नाटक.
  • झपाटले ते जाणतेपण : संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
  • ठरलं डोळस ….व्हायचं मनोविकास प्रकाशन.
  • तिमिरातुनी…. तेजाकडे राजहंस प्रकाशन.
  • दाभोळकरांच्या 10 भाषणाची सीडी.
  • प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे डीव्हीडी निर्माते मॅग्नम कंपनी.
  • प्रश्न मनाचे… सहलेखक डॉक्टर हमीद दाभोलकर राजहंस प्रकाशन.
  • भ्रम आणि निरास राजहंस प्रकाशन मती भानामती राजहंस प्रकाशन.
  • विचार तर कराल? राजहंस प्रकाशन.
  • श्रद्धा-अंधश्रद्धा राजहंस प्रकाशन 2002.

संस्था :

नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध महाराष्ट्र अंनिस लोक रंगमंचाच्या कार्यकर्त्यांनी सदनशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याचा माध्यमातून ठिकाणी हा निश्चित करण्यात आलेला आहे.

या रिंग नाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इमानदार यांनी घेतल्या. त्या कार्यशाळांचे आणि रिंगणात यांचा वेध रिंगणनाट्य या पुस्तकात करण्यात आलेला आहे.

पुरस्कार :

  • समाज गौरव पुरस्कार रोटरी क्लब.
  • दादासाहेब साखवळकर पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार.
  • कबड्डी या खेळासाठी त्यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर कबड्डी खेळण्यासाठी शिवछत्रपती युवा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे.
  • पुणे विद्यापीठाचा साधना जीवन गौरव पुरस्कार हा मरणोत्तर त्यांना प्राप्त झालेले आहे.तसेच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही त्यांना मरणोत्तर प्राप्त झालेला आहे.

मृत्यू :

नरेंद्र दाभोलकर यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. हे दिनांक 20 ऑगस्ट 2013, वार मंगळवार रोजी सकाळी घरून निघाल्यावर यांना शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले असता, पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली.

एक चुकीच्या दिशेने गेली, चार गोळ्या यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोळकर घटनास्थळीच खाली पडले व हल्ला करणारे हल्लेखोर हे दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर हे 25 ते 30 वयोगटातील होते. त्यामध्ये एकाने टोपी घातली होती व दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. ही घटना घडल्यावर रविवार पेठेच्या दिशेने ते हल्लेखोर पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तेथे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शेवटच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले.

“ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा  :-