ह्रदयची संपूर्ण माहिती Heart Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Heart Information In Marathi आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून हृदय ओळखले जाते. ज्यादिवशी हृदय बंद पडते, त्यादिवशी मानव मृत घोषित केला जातो. शरीराचे कोणत्याही भागाचे कार्य योग्यरीत्या चालावे याकरिता हृदय खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

 Heart Information In Marathi

ह्रदयची संपूर्ण माहिती Heart Information In Marathi

मात्र केवळ हृदय चालू असून फायदा नाही, तर ते निरोगी देखील असावे लागते. कारण हृदय निरोगी नसेल तर आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या व गुंतागुंती निर्माण व्हायला सुरुवात होते. हृदय हा मानवाच्या शरीरातील एक विना हाडाचा आणि केवळ स्नायूंपासून बनलेला अवयव असून, तो ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सर्व शरीराला पुरवठा करण्याचे कार्य करतो. आणि सोबतच दूषित रक्ताला पुन्हा फुफुसाच्या माध्यमातून शुद्ध करून वापरास मदत करतो.

हृदय हे एक पंपिंग म्हणून कार्य करत असते, जे शरीरातील रक्ताला संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्याबरोबरच शरीरातील दूषित रक्ताला पुन्हा मागे घेत असते. शुद्ध रक्त हे धमण्यांच्या माध्यमातून तर अशुद्ध रक्त हे शिरांच्या माध्यमातून वाहत असते.

आजच्या भागामध्ये आपण हृदयाबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत. चला तर मग या माहितीला सुरुवात करूयात…

नावह्रदय
प्रकारशरीरातील अवयव
कार्यरक्ताभिसरण करणे
स्थितीछातीच्या पिंजऱ्यामध्ये डाव्या बाजूस
आकारहाताच्या मुठी एव्हडा

हृदयाचे कार्य:

हृदय म्हणजे शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग. आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते, मात्र मिळवलेला हा प्राणवायू संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे कार्य हे हृदय रक्ताच्या साह्याने करत असते. ज्यावेळी फुफुसामध्ये प्राणवायू रक्तामध्ये मिसळला जातो, त्यावेळेस हे रक्त संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हृदयाचे असते. जेणेकरून संपूर्ण शरीरातील पेशी आणि उती कार्यरत राहू शकतील.

ऑक्सिजन युक्त रक्त धमन्यांद्वारे शरीराच्या विविध उती आणि पेशीपर्यंत पोहोचवणे, आणि तेथील दूषित झालेले अर्थात कार्बन डाय-ऑक्साइड ने युक्त असणारे रक्त पुन्हा हृदयाकडे घेऊन येणे, आणि त्याचे पुन्हा शुद्धीकरण करणे हे असून या कार्याला हृदय चक्र किंवा हार्ट सायकल असे देखील म्हटले जाते, आणि या संपूर्ण प्रणालीला रक्ताभिसरण प्रणाली किंवा सर्क्युलेटरी सिस्टम असे म्हटले जाते.

मानवी शरीरातील हृदयाचे स्थान:

आपले हृदय हे छातीमध्ये असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून छातीच्या पिंजऱ्यामध्ये किंचित असे डावीकडे आणि छातीच्या मध्यभागी हे हृदय स्थित असते. हे हृदय प्रत्येक मिनिटाला किमान ६० ते कमाल ९० वेळा धडकत असते, मात्र त्याचा धडकण्याचा योग्य अंदाज हा प्रति मिनिट ७२ इतका आहे.

दिवसभराचा विचार केल्यास अंदाजीत एका व्यक्तीचे हृदय दिवसभरात एक लाख वेळा धडकत असते. आणि या प्रत्येक धडकण्याच्या वेळी शरीराला रक्ताचा पुरवठा केला जात असतो. हृदयाला दोन कक्ष असतात, ज्यांना करणीका व विंटरिकल म्हटले जाते.

जे दोन्हीही बाजूला म्हणजेच हृदयाचे उजवीकडे आणि डावीकडे असतात. पुन्हा त्याखाली अजून दोन असे एकूण चार कक्ष असतात. शरीरामध्ये दूषित रक्त हे हृदयाच्या उजव्या बाजूने आत घेतले जाते, आणि तिथून ते पुन्हा फुफुसाकडे पाठवले जाते.

फुफ्फुसांमध्ये प्राणवायू मिसळल्यानंतर ते पुन्हा शुद्ध होते, आणि हृदयाच्या डाव्या बाजूमध्ये परत जाते. तेथून मोठ्या दाबाने ते संपूर्ण शरीराला पोहोचवले जाते. थोडक्यात लक्षात ठेवायचे झाल्यास हृदयामध्ये उजव्या बाजूतून दूषित रक्ताचा पुरवठा मागविला जातो, पुढे त्याला फुफुसाच्या माध्यमातून शुद्ध करून डाव्या भागाच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला पोहोचवले जाते.

हृदयाची रचना:

मला विचाराल सर्वात शक्तिशाली अवयव कोणता तर तो हृदय म्हणून ओळखला जातो. व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरतपणे न थकता आणि न आराम करता हा अवयव कार्यरत असतो. या हृदयाद्वारे दिवसभरात सुमारे ७६ लिटर रक्त शरीरामध्ये पंप केले जाते.

मात्र काही कारणास्तव या अवयवाला इजा पोहोचली जाते. जेणेकरून हृदयाचे कार्य मंदावते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर परिणाम सोसावे लागू शकतात. याकरिता आजकालच्या खानापाण्याच्या विविध सवय आणि बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. मित्रांनो जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर तुम्ही फक्त तुमच्या खानपानाच्या सवयी सुधारल्या तरी देखील पुरेसे ठरू शकेल.

हृदय हे शंकूच्या आकाराचे देखील असल्याचे म्हटले जाते, याचा आकार १८ सेमी बाय ०९ सेमी इतका असतो. फुफुसाच्या अगदीच जवळ असणारे हे हृदय छातीच्या पिंजऱ्याद्वारे संरक्षित केलेले असते.

निष्कर्ष:

आपल्याकडे म्हटले जाते की सर सलामत तो पगडी पचास. मात्र खऱ्या अर्थाने हृदय शाबूत असेल तरच माणूस जिवंत राहत असतो. अशा या सर्वात महत्त्वाच्या अवयवाबद्दल अर्थात हृदयाबद्दल आज आपण माहिती घेतली. ज्यामध्ये तुम्हाला हृदयाच्या कार्याबद्दल माहिती मिळाली, तसेच त्याचे स्थान, रचना, आकार, विविध चेंबर्स बद्दल माहिती, रंग इत्यादी अनेक महत्त्वाची माहिती मिळाली. ही माहिती तुम्हाला प्रत्येकच स्तरावर उपयोगी पडेल.

आयुष्यात काहीही झाले तरीदेखील हृदयाचे आरोग्य उत्तम राखणे अतिशय फायदेशीर ठरते. कारण आपला प्राण हा हृदयातच आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी हृदयावर ताण येतो त्यावेळी तो आपले कार्य काही काळासाठी बंद करतो, त्यावेळी माणसाला हृदयविकाराचा झटका आला असे म्हटले जाते.

आजकालच्या खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. ज्यामुळे सारखे छातीत दुखणे, किंवा कळ येणे यासारखे प्रकार दिसून येतात. याची परिणीती पुढे जाऊन हृदयविकारासारख्या रोगांमध्ये होते, जे खूप मोठे स्वरूप धारण करते. मात्र त्यावेळेस वेळ गेलेली असते. त्यामुळे योग्य आहार विहार आणि व्यायाम या त्रिसूत्रीने आपण आपल्या हृदयाचे आरोग्य अबाधित राखले पाहिजे.

FAQ

हृदयाचा आकार कसा असतो?

मित्रांनो, हृदयाच्या आकाराबद्दल अनेक तर्क वितर्क लढविले जातात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हृदयाचा आकार नाशपती सारखा, तर इतरांच्या म्हणण्यानुसार हृदयाचा आकार हा बदामासारखा असतो. मात्र हार्ट इन्स्टिट्यूट यांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्य प्रौढ व्यक्तीच्या हाताची मूठ घट्ट आवळली असता, जसा आकार निर्माण होतो तो आकार हृदयाचा असतो.

मानवाच्या हृदयाचा रंग कसा असतो?

मित्रांनो, हृदय म्हणजे एक स्नायू किंवा मांस यांच्यापासून तयार झालेला असल्यामुळे अगदी मांसल लाल रंग या हृदयाला प्राप्त झालेला असतो. मात्र काही कारणास्तव हृदयावर चरबी जमा झाल्यास तो रंग पिवळसर दिसू लागतो. अति लठ्ठ लोकांचे हृदय मात्र बऱ्याच अंशी पिवळ्या रंगाची असते.

आपल्या शरीरात हृदयाचे महत्त्व काय आहे?

मित्रांनो, हृदय म्हणजे मानवी शरीराचा प्राण आहे. एक स्नायु युक्त असलेला हा अवयव संपूर्ण शरीराला रक्त पुरवतो. आणि त्यासोबतच आवश्यक असलेला प्राणवायू देखील पुरवत असतो. त्यामुळे ज्यावेळेस हृदयाचे कार्य बंद पडते त्यावेळेस संपूर्ण शरीर मृत होते, म्हणून हृदय हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे.

एका मिनिटांमध्ये हृदय किती वेळा रक्त पंप करते?

एका मिनिटांमध्ये हृदय ७२ वेळा रक्त पंप करत असते, म्हणजेच एका मिनिटात हृदय ७२ वेळा धडकत असते.

संपूर्ण दिवसभराचा हिशोब केल्यास एका दिवसात हृदय किती लिटर रक्त पंप करत असते?

संपूर्ण दिवसाच्या हिशोबानुसार एका दिवसामध्ये हृदय सुमारे ७६ लिटर रक्त पंप करत असते.

आजच्या भागामध्ये आपण आपल्या शरीरातील सर्वात सुप्रीम अर्थात महत्त्वाच्या अवयवाबद्दल म्हणजेच हृदया बद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच या माहितीतून तुम्हाला कुठले ज्ञान मिळाले याबद्दल आमच्यासोबत कमेंट सेक्शन मध्ये दिलखुलास चर्चा करा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीचा भाग होता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…

Leave a Comment