शरद पवार यांची संपूर्ण माहिती Shard Pawar Information In Marathi

Shard Pawar Information In Marathi शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे मोठे राजकीय नेते आहेत तसेच राजकीय क्षेत्राशिवाय शरद पवार यांना  साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातही आपल्याला ते वावरतांना दिसतात. भारतीय राजकारणात शरद पवार यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. शरद पवार यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच राजकारणाची सुरुवात केली. शरद पवार यांनी सर्वात कमी वय असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. चला मग आपण त्यांच्या विषयी माहिती पाहूया.

Shard Pawar Information In Marathi

शरद पवार यांची संपूर्ण माहिती Shard Pawar Information In Marathi

जन्म:

शरद पवार यांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार हे आहेत. यांचा जन्म 12 डिसेंबर, 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव जे सहकारी खरेदी विक्री संघामध्ये काम करत होते. त्यांची आई शारदाबाई पवार ह्या आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा पवार या आहेत. तसेच त्यांना एक मुलगी आहे, तिचे नाव सुप्रिया सुळे असे आहे. यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शरद पवार यांचे धाकटे भाऊ प्रताप पवार प्रभावी मराठी दैनिक सकाळ चालवतात.

शिक्षण :

शरद पवार यांचे नेहमीकरता आदर्श असणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांनी कॉमर्स शाखेत पदवी प्राप्त केलेली आहे.

राजकारणात प्रवेशाचा काळ :

1956 साली शाळेत असताना, त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात या संग्रामाला पाठिंबा दिला होता. महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून ते सक्रिय होते. तेथून त्यांचा राजकीय जीवन प्रवास सुरु झाला. विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमाला त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यांच्या समोर शरद पवारांनी जे भाषण केले. ते भाषण ऐकूण मुख्यमंत्री महोदय फार प्रभावित झाले आणि त्यांनी शरद पवारांना युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. वयाच्या चोविसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. यशवंत चव्हाण वेळोवेळी पवार साहेबांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत.

यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. पवार साहेब 1967 ला बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात यांचा राज्यमंत्री म्हणून वय 29 वर्षे समावेश झाला.

मुख्यमंत्री :

शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा 18 जुलै 1978 रोजी झाला. बरोबर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते. 1980 इंदिरा गांधीचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.

त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. त्यानंतर जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या काँग्रेस पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभा :

सन 1984 लोकसभा निवडणूक पवार साहेबांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून आले. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ पाच जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती जागेचा समावेश होता. मात्र त्यांना राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याचे राजकारणातच राहायचे ठरवले.

त्यानंतर 1985 चे राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकले आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

परत विधानसभा :

1987 साली नऊ वर्षाच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधीच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली.

26 जून 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. तेव्हा त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी जबाबदारी पवार साहेबांवर होती.

आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. जानेवारी इ.स.1991 मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.

चौथी विधानसभा :

शरद पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द खूपच वादग्रस्त ठरली होती. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बाँबस्फोट झाले. त्यांत 257 लोक ठार तर 600 हून अधिक लोक जखमी झाले.

30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा. खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले.

प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचारा विरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला.

23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री यांनी मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात चेंगराचेंगरी होऊन 114 लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला.

राष्ट्रवादी :

त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

2004 मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 22 मे 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली.

29 मे 2009 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला 52 जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.

क्रिकेट :

शरद पवार यांना राजकारणा बरोबरच क्रिकेट हे देखील आवडीचे क्षेत्र आहे. 29 नोव्हेंबर 2005 रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1 जुलै 2010 रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.  जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

“ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा. “

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment