Sant Janabai Information In Marathi संत जनाबाई या
अतिशय सामान्य स्त्री होत्या. पण आयुष्यभर मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या दासीने एक असामान्य काम केलेल आपल्याला दिसून येते. ते म्हणजे तीन काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाईंची ओळख आहे. संत जनाबाई अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाई आहेत.
संत जनाबाई संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi
संत जनाबाईचा जन्म :
संत जनाबाई महाराष्ट्रातील संत कवी होऊन गेल्यात. संत जनाबाई यांचा जन्म व परभणी येथील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि त्यांच्या आईचे नाव कुरुंड, त्यांचे वडील विठ्ठल भक्त होते. जनाबाईच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी होते असे दिसून येते . दोघेही पंढरीची वारी न चुकता करत असत.
तर दोघेही पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त होते जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेवांचे वडील दामाशेटी यांचे पदरात टाकले. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना किंवा काढताना ओव्या गात असत. त्या ओव्या संत जनाबाईंनी आपल्या शब्दांतून व्यक्त केलेली आहेत.
संत जनाबाईचे बालपण :
संत जनाबाईचे बालपण हे परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड या गावी गेले. त्यांच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेटी शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले होते. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत.
संत जनाबाईचे आयुष्य :
संत जनाबाई चे आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेले. परंतु त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी असताना त्या कामांमध्ये त्यांना प्रत्यक्ष विठुरायाने मदत केली. जातं, मडकी, गौऱ्या असं सगळंच जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथे जपून ठेवले. इथे गेल्यानंतर जाते आपल्याला दिसते. संत जनाबाईचे आयुष्य हे नामदेवांच्या सहवासात गेलेले आपल्याला दिसून येते.
तसेच नामदेव हे विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेत असतानाच जनाबाईंनी सुद्धा तोच मार्ग अवलंबिला. ‘दळीता, कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू आहेत. श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा हे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
संत जनाबाई यांच्या नावावर असलेल्या एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहे. त्यांचे अभंग कृष्णजन्म, अलिबाग, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक रचना पण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या व द्रोपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महा कवी मुक्तेश्वर यांना मिळालेले आहे. ते संत एकनाथांची नातू आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर समोर संत नामदेवांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायाचे दर्शन रोज घडायचे. त्यातच नामदेवांच्या घरी विठू भक्तीचा सातत्याने गजर होत असल्याने त्याच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतो. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरू बनले. त्यामुळे ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाचा पाऊलखुणा वरून प्रवास करणारी जनाबाई गुरुची सावली बनून राहिल्या.
अभंग, गवळणी यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यातील घराघरात जिवंत आहे. लाडक्या जनाबाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.
संत जनाबाईचे साहित्य :
‘विठु माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ||’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचा आहे. त्यांनी संत नामदेव यांच्यामुळे सतत संतसंघ घडला होता. संत ज्ञानदेव विषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकी चितारू म्हणे माझा ज्ञानेश्वर असे त्यांनी ज्ञानेश्वर यांविषयी म्हटले आहे. गौऱ्या, शेण वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असतात.
जनाबाईचे ३४० अभंग संत नामदेव गाथेत संकलित करण्यात आले. तिच्या नावावर हरिश्चंद्राख्यान, प्रल्हाद चरित्र ,कृष्ण जन्म, बालक्रीडा, थालीपाक, द्रोपती स्वयंवर इत्यादी काव्यसंग्रह आढळतात. संत जनाबाईने वारकरी संप्रदायाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी…’, ‘भरल्या बाजारी जाईन मी….’ म्हणत तिने आत्मविश्वासाने पंढरीच्या पेठेत भक्तिमार्ग प्रसाराने दुकान मांडले. ‘स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास’ म्हणत तिने अध्यात्मातील योग साधना आत्मसात केली.
तसेच ज्ञानोत्तर भक्तीचा स्वीकार केला. तिची कविता भावकाव्य चरित्र आख्यान उपदेश, भारुड, ओवी पाळणा, आरती अशा अनेक काव्य प्रकारात आढळते. बडव्यांनी तिच्यावर विठ्ठलाचे सोन्याचे पदक चोरल्याचा आळ घेतला व तिला सुळीवर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला अशी आख्यायिका आहे . संत जनाबाईची भावी कथा ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत.
अध्यात्मानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांनी वरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञानेश्वर देवाविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भाव सामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठला विषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.
वात्सल्य, कोमल, ऋजुता सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, नामदेव संत, सोपान संत, गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.
जनाबाईंची समाधी :
इ.स.१३५० मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर संत नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नाम्याच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या. जनाबाई पांडुरंगात विलीन झाल्या असल्या तरी खेड्यापाड्यात पाण्यात आजही जनाबाई जिवंत आहेत. कारण खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या ओठा मध्ये त्यांचे अभंग, ओव्या गवळणी तसेच लाडक्या जनाबाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवले आहेत.
जनाबाईंचे माहेर म्हणजेच परभणीतला गंगाखेड या गावात जनाबाईंचा जन्म झाला. पुढे संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली आहे. जनाबाईला जातं ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती तिथे दिसते. तिच्या सर्व घर कामात मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबीर यांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथे चीत्र साकारण्यात आला आहे.
“तुम्हाला आमची माहिती संत जनाबाई विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
संत जनाबाई चे लग्न झाले होते… किंवा सांसारिक जीवन या विषयी माहिती….उपलब्ध आहे का….?