संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती Sant Eknath Information In Marathi

Sant Eknath Information In Marathi संत एकनाथ यांनी समाजाच्या उद्धारासाठी नेहमी कार्य केलेले दिसून येते. तसेच त्यांनी अस्पृश्यांच्या चुकलेल्या एका मुलाला कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचविण्याचे कार्य केले. श्राद्धाला ब्राह्मण येईना, तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घातले व गाढवाला गंधक पाजने यासारख्या गळा एकनाथ यांच्या चरित्रातील अख्यायिका वरून त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बांधलेला वेदान्ताचा व्यापक अर्थ आपल्याला दिसून येतो. त्यांनी भारुडे व इतर काव्यरचना केली आहे. त्यांच्या काव्यामध्ये एका जनार्दनी हे त्याने स्वतः साठी उल्लेख केलेला आहे.

Sant Eknath Information In Marathi

संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती Sant Eknath Information In Marathi

संत एकनाथ महाराजांचा जन्म :-

संत एकनाथ महाराज हे नाथपंथी महाराज म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचा जन्म इ.स.१५३० मध्ये पैठण येथे झाला. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले, चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. तसेच संत एकनाथांच्या पणजोबांचे नाव भानुदास होते.

संत एकनाथ महाराजांचे जीवन :-

संत एकनाथांनी तीर्थयात्रा केली. एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे गुरू दरबारी अधिपती होते. ते मूळचे चाळीसगावचे रहिवासी, त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. असे म्हटले जाते की, द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत. एकनाथांनी तीर्थयात्रा केल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारले. त्यांनी पैठण जवळील वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला.

एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरीपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. संत एकनाथांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक भारुडे, बये दार उघड असे म्हणत अभंग रचना, जोगवा, गवळणी, भारुड, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्य द्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते एका जन्म एका जनार्धन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

संत एकनाथांचे साहित्य :-

संत एकनाथांचा, एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. हा एक आदर्श स्कन्दावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत; परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिलेल्या आहेत.

व्यासांनी रचलेले मूळ भागवत बारा सेकंदाचे आहे. नाथ यांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हे ही काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्ताची आरती ही त्यांची आरती गणपतीसमोर गायिली जातात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव, दत्तभक्त, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

चतुश्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना होती. ती त्यांनी १५१५ मध्ये लिहिली. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंध नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. सृष्टीच्या अध्ययन असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरूपण त्यात आढळते. तसेच पंडित वर्गाकडून होणाऱ्या विरोधकांची सुद्धा यामध्ये पडसाद उमटलेले आपल्याला दिसतात.

काही अध्यात्मिक स्वरूपाची स्फूट प्रकरण लीहीली शंकराचार्यांच्या हस्तामलक या १४ लोकांच्या सूत्रांवर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अश्टकं वरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैत भक्ती मार्गातील परमार्थ हे विषय देण्यात आले आहेत. आनंदलहरी १५० ओव्यात आत्मस्थिती -तील आनंदाची उधलन भाग त्यांचे वर्णन आहे. त्यांनी चिरंजीव पद साधकाला उपदेश केलेला आहे.

रुक्मिणी स्वयंवर १५७१ मध्ये हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपरा प्रवर्तक काव्य आहे. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ लोकांचा व हरी वंशातील विष्णू परवाच्या अध्याय ५९-६० च्या आधारे एकनाथांनी त्यांची रचना केली. त्यांची संख्या १७१२ आहे. श्री कृष्ण रुक्मिणीचा विवाह म्हणजे जीवाशी रुपका भोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. कृष्णदयार्णव तर आपल्या हरी वर्धा या रचनेत प्रस्तुत काव्य संपूर्णपणे अंतर्भूत केले. एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना आहे. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावर ही विस्तृत टीका आहे.

या रचनांच्या व्यतिरिक्त बहुजन समाजासाठी एक नाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीत लिहिलेल्या तुळशी महात्म्य व सीता, मंदोदरीची एकात्मता या पुराण कथा संचालकांच्या मनोवृत्तीचा अल्हाददायक व विनोद रम्य आविष्कार करणाऱ्या हळदुलीया, कृष्णदासया, श्रीकृष्ण कथा, कृपण माणसाचे हास्य, जनक स्वभाव, चित्र रेखाटणारे आख्यान ऋग्व, प्रल्हाद, उपमन्यु आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचित्र कथा आणि ही अशी रचना त्यांनी केली आहे. ही पदे मुख्यता श्रीकृष्ण चरित्र पर आहेत. त्यात सुंदर शब्दचित्रे भावपूर्णता, कल्पकता व पदांची वेधता मार्मिक तत्व सूचकता वारियाने कुंडल हाले… असा कसा देवाचा देव बाई ठकडा…. प्रसिद्ध आहेत.

एकनाथांची बरीचशी रचना साडेचार जर्नी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंग रचना ही केली आहे. गुरुभक्ती परमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांचे अभंगाचे मुख्य विषय आहेत. त्यातला नामदेव तुकारामांसारख्या साधका दशेतील भावोत्कट अंतर्गत कलह आढळत नाही. रचना दृष्टीने ही एकनाथ अभंग सैल आहेत. एकनाथांची वांङमयीन सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तव्य त्यांच्या समन्वय आधिक व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक आहेत. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समजदार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली.

जन्मजात स्वभाव या बरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले. शतकाच्या ज्ञानेश्वर उत्तर कालखंडात संत साहित्याची परंपरा खंडित व विस्कळीत झाली होती. एकनाथा णी त्या पूर्व परंपरेचे भान ठेवून वांङमय निर्मिती केली, म्हणूनच ही परंपरा अखंड एकात्म राखण्याचे कार्य आणि यशस्वीपणे ते करू शकले. ज्ञानेश्वर परंपरेतील आणि भाष्यग्रंथ म्हणजे त्याच भागवत होईल, त्यामुळे वामन पंडित शिवकल्याण यांच्यासारख्या कवीने स्थित बैठक लाभली. त्यांच्या भावार्थरामायण यामुळे मुक्तेश्वर सारख्या कवी रामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. रुक्मिणीस्वयंवर काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.

संत एकनाथांची समाधी :-

संत एकनाथ यांनी शके १५२१ (२६ फेब्रुवारी,१५९९) पैठण येथे फाल्गुन वद्य षष्ठी ला आपला देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणूनही ओळखला जातो.

“तुम्हाला आमची माहिती संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती Sant Eknath Information In Marathi बद्दल कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

FAQ

 

संत एकनाथांचे काय प्रसिद्ध आहे?

एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय.

संत एकनाथ यांचा जन्म कुठे झाला?

पैठण

संत एकनाथ यांचा जन्म केव्हा झाला?

संत एकनाथ यांचा जन्म इ.स.१५३० मध्ये पैठण येथे झाला.

संत एकनाथांचे गुरु कोण इन मराठी?

संत एकनाथांचा जन्म १५३३ मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरू मानले.

एकनाथ महाराजांचे आडनाव काय आहे?

त्यांचा जन्म आजच्या महाराष्ट्रातील पैठण येथील सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई यांच्या विश्वामित्र गोत्रातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ते अश्‍वलयन सूत्राचे अनुयायी होते. त्यांच्या वडिलांनी बहुधा कुलकर्णी ही पदवी धारणकरून आर्थिक हिशेब ठेवला. त्यांची कुलदेवता एकवीरा देवी (किंवा रेणुका) आहे.

पैठणमध्ये कोणत्या संताचे वास्तव्य होते?

पैठण हे महान मराठी संत एकनाथांचे मूळ गाव आणि समाधीस्थळ होते; पैठण यात्रेच्या वेळी नाथषष्ठी म्हणून ओळखल्या जाणार्‍या यात्रेच्या वेळी लोक दरवर्षी त्यांच्या मंदिरात येतात.

संत एकनाथांनी 125 विषयावर किती भारूडांची रचना केली?

एकनाथांनी दीडशे विषयांवर अंदाजे साडेतीनशे भारुडे लिहिली आहेत.

Leave a Comment