Animation Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,लहानपनापासून आपण टॉम अँड जेरी, छोटा भीम असे कार्टून्स टीव्हीवर बघत आलो आहोत. हि कलरफुल चित्र आपल्याला हालताना पळताना व बोलताना दिसतात. तसेच आपण अवेंजर्स किंवा अवतार,बाहुबली हे चित्रपट सुद्धा पाहिले असतील. तसेच वृत्तपत्रांमध्ये ग्राफिक डिझाइन्स थ्रीडी सारखे ॲनिमेशन वापरलेले पाहिले असतील .फोटोशॉप केलेले फोटो हे सुद्धा एक ॲनिमेशनचाच प्रकार आहे. हे जवळपास आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण हे बनवतात कसं ?आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲनिमेशन काय आहे ? तर आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला ॲनिमेशन या कोर्स बद्दल सविस्तर माहिती देणार आहे.
ॲनिमेशन कोर्सची संपूर्ण माहिती Animation Course Information In Marathi
आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला ॲनिमेशन म्हणजे काय? हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय असते? ॲनिमेशन कोर्ससाठी किती फी द्यावी लागते? ॲनिमेशन हा कोर्स केल्यानंतर आपल्याला जॉबच्या संधी कोठे कोठे उपलब्ध आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला देणार आहे.
ॲनिमेशन म्हणजे काय?
साध्या शब्दात सांगायचे म्हणजे काही खऱ्या गोष्टी आणि काही व्हिज्युअल गोष्टी एकत्र करून नवीन गोष्ट बनवणे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमांना एका विशिष्ट पद्धतीने ठेवून त्या प्रतिमा मोशन मध्ये आहेत असा भास समोर असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करणे म्हणजे ॲनिमेशन.
सध्याच्या काळामध्ये ॲनिमेशन वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. भारतामध्ये सुद्धा ॲनिमेशन हा एक नवा ट्रेंडचा विस्तार होताना दिसत आहे. ॲनिमेशन चा मोठ्या प्रमाणात वापर हा टीव्ही, चित्रपट, जाहिरातीत इतकेच नव्हे तर शिक्षणात सुद्धा केला जात आहे.
ॲनिमेशनच्या या वाढत्या विस्तारामुळे या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या दिसत आहे. म्हणूनच ॲनिमेशन हा कोर्स करून आपण एक चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील याकडे एक चांगली करियरची संधी म्हणून बघत आहेत.
ॲनिमेशन ही एक प्रकारची प्रोसेस आहे.ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात. जसे की इमेज डिझायनिंग, ड्रॉईंग लेआउट बनवणे. इमेजेस व फोटोग्राफिक सिक्वेन्स असतात. बऱ्याच क्षेत्रांमध्ये ॲनिमेशनचा सिंहाचा वाटा आहे.
जी व्यक्ती ॲनिमेशन बनवते त्याला आपण ॲनिमेटर असे म्हणतो. आपल्याला स्क्रीनवर जे दिसते ते ॲनिमेशन असते. परंतु या मागचा खरा हिरो असतो तो म्हणजे ॲनिमेटर. ॲनिमेटर हा ॲनिमेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
ॲनिमेशन द्वारे कठीण अशी गोष्ट सहज सोप्या पद्धतीने आपल्या समोर सादर करणे हे ॲनिमेटरचे काम असते. ज्या गोष्टी शक्य नसतात म्हणजे ज्या कल्पना व भास असतात व त्या कल्पना व भास आपल्या समोर ॲनिमेशन द्वारे दाखवन्याचे काम ॲनिमेटर करत असतो.
आपल्याला ॲनिमेशन कोर्स मध्ये कुशल ॲनिमेटर बनण्यासाठी आपल्यात काही गुण असणे आवश्यक आहेत . आपल्या मध्ये चांगले निरीक्षण कौशल्य, सर्जनशीलता, रेखाचित्र व स्केचिंग चे कौशल्य ,संयम व एकाग्रता, संप्रेषण कौशल्य, संगणक आणि सॉफ्टवेअरचा कौशल्य, टीमवर्क कौशल्य. ॲनिमेशन तुम्हाला वाटते तसे सोपे नाही. ॲनिमेशन शिकण्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह असणे पण गरजेचे आहे. क्रिएव्हीटीला आपण ॲनिमेशनचा चा आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही.
ॲनिमेशन कोर्स मध्ये तुम्हाला आणि ॲनिमेशन साठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे शिकवले जाते. यामध्ये तुम्हाला डिझाईन करणे, रंगाचा वापर कसा करायचा, ग्राफिक डिझाईन ,फोटो एडिटिंग यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात.
ॲनिमेशन करणे हे तितके सोपे नसते यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअरचा वापर योग्य रिता करता आला पाहिजे.
- अडोब फोटोशोप
- अडोब अफ्टर इफेक्ट्स
- ऑटोडेस्क माया
- ऑटोडेस्क मोशनबिल्डर
- ऑटोडेस्क मुडबॉक्स
- अडोब क्रिएटिव्ह सूट
वरील सॉफ्टवेअर हे ॲनिमेशन साठी वापरले जातात.
आपल्याला ॲनिमेशन शिकताना वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. त्यासाठी आपल्याला प्राथमिक कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे व ही बाब तितकीच खरी आहे. आपल्याकडे स्वतःचा कॉम्प्युटर असणे ही गरजेचे आहे.
ॲनिमेशन कोर्स हा आपण कॉलेजमधून करू शकतो तसेच प्रायव्हेट इन्स्टिट्यूट किंवा क्लास मधूनही ॲनिमेशन हा कोर्स करू शकतो. तसेच ऑनलाइन द्वारे सुद्धा आपण ॲनिमेशन हा कोर्स करू शकतो. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही घर बसल्या हा कोर्स करू शकता.
Udemy किंवा Coursera यांसारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला ऑनलाईन ॲनिमेशन कोर्स चे प्रशिक्षण देतात.
अॅनिमेशन कोर्स हा चार प्रकारचा असतो-
- डिग्री
- पदविका / डिप्लोमा
- पोस्ट ग्रॅजुएट
- प्रमाणपत्र
डिग्री-
हा कोर्स ३-४ वर्षाच असतो. ह्यासाठी पात्रता निकष हा १० व १२ ही उत्तीर्ण असून ५०% गुण असणे आवश्यक आहे.
डिग्री अभ्यासक्रम-
- ॲनिमेशन आणि मल्टीमीडियामध्ये बी.ए
- बी.एस्सी. ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया मध्ये
- बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स (ॲनिमेशन)
- ॲनिमेशन, ग्राफिक्स आणि वेब डिझाइनमध्ये ललित कला पदवी
- ॲनिमेशन आणि सीजी आर्ट्समध्ये बीए
- ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझाइनमध्ये बी.ए
- डिजिटल फिल्ममेकिंग आणि ॲनिमेशनमध्ये बी.ए
- बी.एस्सी. ॲनिमेशन आणि VFX मध्ये
- बी.एस्सी. ॲनिमेशन आणि गेमिंग मध्ये
डिप्लोमा-
- हा कोर्स दोन एक वर्षाचा असतो व त्यासाठी तुम्ही १० व १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- ॲनिमेशन डिप्लोमा मधील प्रसिद्ध कोर्स खाली दिले आहेत-
- 2D ॲनिमेशन मध्ये डिप्लोमा
- डिप्लोमा इन थ्रीडी ॲनिमेशन
- डिजीटल ॲनिमेशन मध्ये डिप्लोमा
- डिप्लोमा इन सीजी ॲनिमेशन
- ॲनिमेशन आणि फिल्ममेकिंगमध्ये डिप्लोमा
- VFX मध्ये डिप्लोमा
- ॲनिमेशन आणि VFX मध्ये डिप्लोमा
- डिप्लोमा इन ॲनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनची कामे
पोस्ट ग्रॅजुएट-
हा कोर्स दोन वंशचा असून ह्यासाठी तुमचे ग्रॅजुएशन पूर्ण असणे गरजेचे असते.
- मास्टर्स इन ॲनिमेशन चा अभ्यासक्रम-
- ॲनिमेशन प्रिन्सिपल
- ॲनिमेशन ड्रॉईंग स्टोरी डिझाईनिंग अँड डेव्हलपमेंट
- विजुयल लैंग्वेज अँड ऍसिटिक
- लर्निंग लॅब्स
- स्टोरी बोर्डिंग कॅरेक्टर डिझाईन फिल्म अॅप्रिसिएशन
- साऊंड डिझाईन ॲनिमेशन मार्केटिंग अँड मॅनेजमेंट
सर्टिफिकेट कोर्स-
हा आपल्या स्पेशलायझेशन व एक्सपेरिणके वर आधारित एक कोर्स आहे व ३ ते ६ हा ह्या कोर्स चा कालावधी आहे. ह्या कोर्स द्वारे कम्प्युटर ॲनिमेशन, फॉटोशॉप ॲनिमेशन, गेम डेवलपमेंट ह्याचे उच्च प्रशिक्षण दिले जाते.
ह्या कोर्स मधले मूळ विषय म्हणजेच 2D व 3D ॲनिमेशन, डिजिटल ग्राफिक्स, कॅरक्टर स्टडी व ॲनिमेशन, साऊंड ॲनिमेशन, VFX, ई. विषय शहभागी केलेले असतात.ह्या कोर्स साठी पात्रता निकष हा १० व १२ ही किमान ५०% गुण असून उत्तीर्ण असणे आवश्यक असते. व सर्टिफिकेट कोर्स ची प्रवेश प्रक्रिया ही थेट किंवा मिळालेल्या गुणांवर आधारित असते.
ॲनिमेशन केल्या नंतर उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधि-
- ॲनिमेटर
- रायगिंग आर्टिस्ट
- टेक्सचर आर्टिस्ट
- गेम डिझायनर
- 2D / 3D ॲनिमेटर
- रेंडरिंग आर्टिस्ट
- इमेज एडिटर
- लाईटनिंग आर्टिस्ट
- की फ्रेम ॲनिमेटर
- डिजिटल इंक अँड पेंट आर्टिस्ट
- स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट
- कॅरेक्टर ॲनिमेटर
- कंपोझिटर
ॲनिमेशन हा कोर्स आपल्याला तीन प्रकारे करता येतो. हा कोर्स आपल्याला कॉलेजमधून देखील करता येतो प्रायव्हेट इन्स्टिट्यूट किंवा क्लास मधून देखील करता येतो व ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे म्हणजेच युडमी किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे करता येतो.
ॲनिमेशन हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पगार हा 30000 ते 500000 असतो.
ॲनिमेशन हा क्षेत्रातील टॉप हायरिंग कंपनी खाली दिल्या आहेत
- फिल्म प्रोडक्शन हौसेस
- कंप्यूटर अँड मोबाईल गेम डेव्हलपर्स
- मीडिया एजन्सी
- ॲनिमेशन स्टुडिओज
- पोस्ट प्रोडक्शन हौसेस
- ॲडव्हर्टायझिंग एजन्सी
- वेब एन्टाइटिस
बारावी झाल्यानंतर सर्वोत्तम ॲनिमेशन कॉलेजेस
- अमिटी युनिव्हर्सिटी
- डॉक्टर एम जी आर एज्युकेशनल अँड रीसर्च इन्स्टिट्यूट ,तमिळनाडू
- मेयर्स एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन,पुणे
- ब्रेनवर यूनिवर्सिटी,कोलकत्ता
- युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन,गांधीनगर,गुजरात
- रूट्स कॉलेजीएम,हैदराबाद,तेलंगणा
- सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन,पुणे
- देवभूमी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन,देहरादून,उत्तराखंड
- चंदीगड युनिव्हर्सिटी,चंदिगड,पंजाब
- कर्णावती युनिव्हर्सिटी,गांधीनगर,गुजरात
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
ॲनिमेशन कोर्स केल्यानंतर किती पगार मिळतो?
ॲनिमेशन हा कोर्स झाल्यावर जास्तीत जास्त सात लाख हा पगार असतो.
ॲनिमेशन हा कोर्स साठी भारतात काय स्कोप आहे?
ॲनिमेशन ह्या क्षेत्रात आपल्याला मीडिया हाऊसेस व मूवी मेकिंग कंपनीज मुळे बरीच प्रगती पाहायला मिळते.
भारतात विविध सर्टिफिकेट ॲनिमेशन कोर्सेस कोणते?
सर्टिफिकेट इन वी.एफ.एक्स, सर्टिफिकेट इन एडिटिंग,मिक्सिंग अँड पोस्ट प्रोडक्शन वर्क, 2D ॲनिमेशन अँड 3D ॲनिमेशन, सर्टिफिकेट इन सी.जी आर्ट्स हे सर्टिफिकेट कोर्स भारतात उपलब्ध आहेत.
ॲनिमेशन हा कोर्स केल्यानंतर कुठल्या जॉबच्या संधी उपलब्ध असतात?
ॲनिमेशन हा कोर्स केल्यानंतर आपण ॲनिमेटर, टेक्सचर आर्टिस्ट, गेम डिझायनर, टू डी व थ्रीडी ॲनिमेटर हे जॉब करू शकतो.