हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची संपूर्ण माहिती Hotel Management Course Information In Marathi

Hotel Management Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बारावीचा निकाल लागला की वेध लागतात ते पुढील अभ्यासक्रमाच्या ऍडमिशन चे कोणता कोर्स घ्यायचा?कोणता अभ्यासक्रम निवडायचा? कोणते कॉलेज चांगले? या सर्व विषयांवर चर्चासत्र सुरू होत असते. प्रत्येक जण वेगवेगळे सल्ले देत असतात. जास्त करून मुले हे इंजिनिअरिंग ,बीएससी ऍग्री, व बी फार्मसी असे वेगवेगळे विषयाच्या अभ्यासाकडे वळले आहेत .परंतु आजच्या काळात एमबीबीएस व हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

Hotel Management Course Information In Marathi

हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची संपूर्ण माहिती Hotel Management Course Information In Marathi

जागतिकीकरणामुळे हॉटेल व्यवस्थापन या उद्योगाने उत्तुंग झेप घेतली आहे .काही मुलां मध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचाऱ्याचे काम पण तसे नाही काही मुलांना हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जायची इच्छा असते परंतु त्यांना या कोर्स बद्दल व्यवस्थित माहिती नसल्यामुळे मुले ही या कोर्स कडे दुर्लक्ष करतात. चला तर आज मी तुम्हाला या हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सची सविस्तर माहिती सांगणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय ?हॉटेल मॅनेजमेंट कोर्स कसा करावा ?हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा प्रक्रिया कशी असते? हॉटेल मॅनेजमेंट केव्हा केला जातो ?हॉटेल मॅनेजमेंट साठी शैक्षणिक योग्यता काय आहे व त्याला आपण पात्र आहोत का? हॉटेल मॅनेजमेंट नंतर काय करायचे? इत्यादी अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आज याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स एक प्रोफेशनल कोर्स आहे .तसेच तो एक डिप्लोमा डिग्री व मास्टर डिग्री कोर्स आहे.मी तुम्हाला एवढेच सांगते की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचारी बनणे असे नसून हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल व्यवस्थापन असा आहे. म्हणजेच हॉटेल ला संपूर्णपणे मॅनेज करणे म्हणजे हॉटेलमधील सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडणे किंवा ते व्यवस्थित चालवणे.

आजच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भारतात परदेशातील लोक पर्यटनासाठी येत असतात व ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .त्या विदेशी लोकांना राहण्यासाठी सोय व्हावी म्हणून हॉटेल्सची आवश्यकता असते. म्हणून दिवसेंदिवस हॉटेल मॅनेजमेंट ची गरज वाढत आहे. आजच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट ही एक इंडस्ट्री बनलेली आहे .प्रत्येक देशामध्ये हॉटेल इंडस्ट्री ही त्या देशाच्या उत्पन्नामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आपल्या भारताच्या उत्पन्नातही हॉटेल मॅनेजमेंट या इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे .या कोर्सचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या ग्राहकांना कसे खुश ठेवता येईल. त्यांच्या गरजेनुसार त्यांना योग्य सर्विस देणे व त्या सर्विस मुळे कस्टमर कसा समाधानी होईल हे असते. आणि याचच प्रशिक्षण या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. तसेच हॉटेलमधील कोणते काम कोणत्या वेळी करायचे व विविध कामांना व्यवस्थितपणे पार पाडण्याची कला ही हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात शिकवले जाते. हॉटेल मध्ये वेगवेगळे विभाग असतात व त्या प्रत्येक विभागाचे काम हे वेगवेगळे असते.

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये भरपूर प्रकारची कामे असतात ती म्हणजे होटेल बुकिंग, कस्टमर सर्विस ,इन्व्हेन्ट बुकिंग याव्यतिरिक्त अनेक प्रकारची भरपूर कामे असतात. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सभ्य आचरण, शिस्त ,जबाबदारी, सर्जनशीलता ,चांगले ऐकण्याचे कौशल्य ,वचनबद्धता, दीर्घकाळ काम करण्याची क्षमता ,चांगले संवाद कौशल्य व प्रभावी व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक आहे.

हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी हा कोणतेही शाखेचा असला तरीही चालतो. कला ,विज्ञान, वाणिज्य या तिन्ही शाखे मधला विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र असतो. हॉटेल मॅनेजमेंट या कोर्स मध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

डिप्लोमा कोर्स ,डिग्री कोर्स ,पदवी कोर्स त्यामुळे प्रत्येक कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे दहावी व बारावीनंतर आपण डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करू शकतो. त्यासाठी आपल्याला दहावी व बारावी मध्ये किमान 50 % गुण असणे अनिवार्य आहे .तसेच हॉटेल मॅनेजमेंट या कोर्स मध्ये ग्रॅज्युएशन लेव्हलचे ही कोर्स आहेत .या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा या द्याव्या लागतात. हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात प्रमाणपत्र, डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो .

प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सहा महिन्यांचा असतो. डिप्लोमा हा एक किंवा दोन वर्षाचा असतो .तर पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षाचा असतो. काही कॉलेजमध्येMHT CET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. खासगी कॉलेजमध्ये स्वतःची प्रवेश परीक्षा घेतली जाते.या परीक्षेमध्ये इंग्रजी, रिझनंगि अबॅलिटी, जनरल नॉलेज, गणितीय क्षमता यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

आता आपण डिप्लोमा व डिग्री सर्टिफिकेट कोर्स यांची नावे व तो कोर्स किती वर्षाचा असतो व त्याची पात्रता काय आहे हे पाहणार आहोत .

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स साधारण एक वर्षाचा किंवा दोन वर्षांचा असतो. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो परंतु हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला खालील प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे.

HMCT, AIMA, UGAT, BVT ,CET डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात आपल्याला डिप्लोमा इन फ्रंट ऑफिसर, डिप्लोमा इन बेकरी ,डिप्लोमा इन फूड डिप्लोमा इन हाउसकीपिंग याचे प्रशिक्षण दिले जाते.

डिप्लोमा कोर्से पुढील प्रमाणे:-

 • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट,
 • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी,
 • डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट,
 • डिप्लोमा इन हाऊसकीपिंग,
 • डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट,
 • मेरिटाइम केटरिंग मधील सर्टिफिकेट कोर्स,
 • हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधील सर्टिफिकेट कोर्स आणि आवडी.
 • ऑफलाइन मोडमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध पदवी,
 • डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांव्यतिरिक्त

अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स हा बारावी झाल्यानंतर चा अभ्यासक्रम आहे.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए इन हॉस्पिटलिटी , ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स तीन वर्षाचा असतो .हा कोर्स करण्यासाठी आपल्याला बारावीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळणे आवश्यक आहे. हा कोर्स करण्यासाठी आपल्याला प्रवेश परीक्षा पास होणे आवश्यक आहेत त्या म्हणजे AIMA,VGAT, PVT, LET,CET DTE HMCT.

अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात पुढील विषय शिकवले जातात.

1) Bachelor of Hospitality station and Management
2) Bachelor Of Hotel Management In Foods
3) Bachelor of Hotel Management

पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट-

पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आपण अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स नंतर करू शकतो. हा कोर्स दोन वर्षाचा असून यात पगार जास्त मिळतो. हा कोर्स करण्यासाठी आपल्याला पुढील प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात
UPSC, MAT, NMAT, GMAT, XAT

पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात आपल्या आवडीनुसार सब्जेक्ट निवडू शकतो.

मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए इन हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमएससी टुरिझम अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, एमबीए हॉस्पिटलिटी.

आता आपण हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सच्या फिस बद्दल माहिती पाहूयात!!!

आपण जर सरकारी कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करत असाल तर आपल्याला 40000 ते 60000 प्रती वर्ष शुल्क लागू शकते. जर हाच कोर्स आपण प्रायव्हेट कॉलेजमधून केला तर आपल्याला हीच फी जवळपास 50000 ते 100000 दरम्यान असू शकते. आपल्यामध्ये असलेले कौशल्य व अनुभवावरून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये आपल्याला पगार दिला जातो. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सुरुवातीला पगार 20000 ते 30000 रुपये इतका दर महा मिळतो.

परंतु जसा जसा आपला कामाचा अनुभव वाढतो तशी तशी पगारात वाढ होते. आपण जर एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये काम केलं तर आपल्याला हा पगार भरपूर प्रमाणात मिळू शकतो. हॉटेल मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, हाउसकीपिंग मॅनेजर,व्यवस्थापक रेस्टॉरंट ,फूड सर्विस मॅनेजर ,मेजवानी व्यवस्थापक, इत्यादी अनेक प्रकारचे नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतात.

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेज ची नावे खाली दिली आहेत-

 1. इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लायड न्युट्रीशन, नवी दिल्ली
 2. इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लायड न्युट्रीशन, दादर, मुंबई
 3. पी. ओ. अल्टो पार्वोरिम बार्देज, गोवा.
 4. इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद
 5. रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई
 6. कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी
 7. डी. वाय. विद्यापीठ मुंबई
 8. जी. डी. आंबेडकर, परेल मुंबई
 9. सिंहगड इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सिंहगड, पुणे
 10. क्वार्टर्स अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, भोपाळ.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment