Sant Dnyaneshwar Information In Marathi संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अवलक्की प्रतिभा व अद्वितिय व्यक्तिमत्व असणारे सर्वश्रेष्ठ संत होते. ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये, रुक्मिणी बाईच्या पोटी आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते.
संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती Sant Dnyaneshwar Information In Marathi
गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या चौघांना जन्म दिला. त्यावेळच्या समाजाने विठ्ठलपंत तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अतोनात छळ केला. संन्यासाची मुले म्हणून त्यांचा छळ केला. संत ज्ञानेश्वर ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक होते. संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचे परमभक्त होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण :-
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात त्यांनी प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंत यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
तीर्थयात्रा करीत करीत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी किंवा त्यांना वाईट नजरेने पाहत असत. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. ब्राह्मण नावाला कलंक आहे. अशी म्हणून त्यांची अवहेलना केली तसेच त्यांनी ब्राह्मण कुळाला काळा कंठावा लावला असेही म्हटले जायचे.
ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय म्हणून शोधले आणि धर्मशास्त्रज्ञ विचारले. त्यावर केवळ देहदंडाची शिक्षा असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे. यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देह प्रायचित्त केले.
संत ज्ञानेश्वरांचे लेखन साहित्य :-
ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ अद्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरीला ‘भावार्थदीपिका’ असेही म्हणतात. संस्कृत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत आणले. हे लोकांना भुरळ घालते ज्ञानेश्वरीतील सुमारे नऊ हजार ओव्या मधील पंक्तीचा ओलावा आणि विचारांची संपन्नता आली आहे. ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांचा तंत्रज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ अमृतानुभव हा ग्रंथ आहे.
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथात गावकऱ्यांकडून त्यांच्यावर छळ झाला असे दिसत नाही. हे त्यांच्या प्रतिभेची स्तुती करतात व प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न, अभंग हरिपाठ, ज्ञानेश्वरांचा हरिपाठ सर्वोत्कृष्ट साहित्य आहे. ज्ञानदेवांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहिले. संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही रचणेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार नाही. अशा या महान विभूति वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली.
तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून अचंबित होते. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. ग्रंथ ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
आई वडील गेल्यानंतर त्यांचे जीवन :-
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेले आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपला विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. भिक्षा मागून ते आपले जीवन उदरनिर्वाह भागवत असत.
भिक्षा मागणाऱ्या भाऊ-बहिणीची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठण मधील ब्राह्मण दुखी होत असत. त्यांनी विचार केला की आई-वडिलांच्या अपराधाची शिक्षा मुलांना देणे अन्यायपूर्ण आहे. शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात सम्मिलित केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार :-
संत ज्ञानेश्वर हे मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळविण्याकरिता पैठणच्या नाग घाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. या घटनेला 733 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांना भक्त मंडळाच्या वतीने रेड्याच्या मूर्तीस अभिषेक घालून परंपरेनुसार नाग घाटावर वसंत पंचमी उत्सव साजरा केला जातो.
रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच वेदाचे उच्च रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखवण्याचा चमत्कार करून दाखवला. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई ही भावंडे पैठणच्या धर्म पिठाचे अधिकारी मंडळीकडून शुद्धिपत्र घेण्यासाठी नाग घाटावर आले होते. तेव्हा एकाने ज्ञानेश्वरांना म्हटले, “तू जिवाशिवाचे तत्वज्ञान सांगतो, मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव.” असे आव्हान दिले.
तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची वय बारा वर्ष होते. या घटनेने घटाचे महत्व आजही आपल्याला जाणून येते.
चांगदेवाचे गर्वहरण :-
संन्याशाच्या मुलांना भेटण्यासाठी चांगदेव आपल्या वाघावर बसून गेले असताना, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या तिघा भावांसोबत चांगदेवाला भेटण्यासाठी भिंत चालवून नेली. अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या तीर्थावली मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला.
चांगदेव हे एक महान योगी चौदाशे वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेश उपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव -पासष्टी हा ग्रंथ आहे. यात अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम दर्शन आहे. संत नामदेवांच्या समाधीच्या अभंगांमध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात आणि असं त्यांची मानसिक स्थिती त्यांच्या समाजाला झालेले दुःख खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना ज्ञानेश्वराचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिमा समाधीच्या अभंगात आढळते.
जो जे वांछील, तो ते लाहो. असे म्हणत, अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. निर्मिती बरोबर त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला.
भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
समाधीचा काळ:-
संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य केले आणि संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 रोजी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. अशाप्रकारे संत ज्ञानेश्वरांनी सर्वात शेवटी पसायदान देवाकडे मागितले आहे. त्यामध्ये त्यांनी विकृत बुद्धी असणाऱ्या लोकांची विकृत बुद्धी नष्ट होऊ दे असे मागणे मागितले आहे.
“आमची माहिती संत ज्ञानेश्वर विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
FAQ
ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म किती साली झाला?
ज्ञानेश्वरांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री, शके ११९७ मध्ये झाला.
संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे?
संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी आहे.
संत ज्ञानेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहेत?
बी.पी. बहिरट यांच्या मते, ज्ञानेश्वर हे मराठी भाषेत लेखन करणारे पहिले ज्ञात तत्वज्ञानी होते. वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी 1290 मध्ये ज्ञानेश्वरी रचली, जी भगवद्गीतेवरील भाष्य आहे जी नंतर वारकरी संप्रदायाचा मूलभूत ग्रंथ बनली.
संत ज्ञानेश्वरांचा जन्म किती साली झाला?
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ. स. 1275) रोजी झाला.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली?
ज्ञानेश्वर केवळ १६ वर्षांचे असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली.
संत ज्ञानेश्वरांनी काय शिकवले?
नाथ परंपरेतून आलेले असूनही, ज्ञानेश्वरांनी भक्ती योगावर लक्ष केंद्रित करून भगवद्गीता शिकवली. वास्तविक जीवनात त्यांनी ज्ञान आणि कर्मयोगाचा उपयोग त्यांच्या शिकवणीला पूरक म्हणून केला.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कधी सांगितली?
१२१२, अर्थात इ. स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.