धर्मवीर संभाजी महाराज यांची माहिती Sambhaji Maharaj Information In Marathi

Sambhaji Maharaj Information In Marathi शिवाजीचा छावा, धर्मवीर, स्वराज्यरक्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पंडित अशा अनेक नावानी  छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेज झुंजवले. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजी राजे रणांगणावरचे शेर होते.

Sambhaji Maharaj Information In Marathi

धर्मवीर संभाजी महाराज यांची माहिती Sambhaji Maharaj Information In Marathi

पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
जन्म १४ मे इ.स. १६५७, पुरंदर किल्ला , पुणे
मृत्यू ११ मार्च इ.स. १६८९, तुळापुर
वडील छत्रपती शिवाजी महाराज 
आई सईबाई
पत्नी येसूबाई
राजधानी रायगड
राज्याभिषेक १६ जानेवारी इ.स. १६८१

संभाजी महाराजांचा जन्म व बालपण :

संभाजीराजांचा जन्म १४, मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. राजपुत्र असलेल्या रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराजांची आई महाराणी सईबाईचे निधन महाराज लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कोल्हार गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.

त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले. तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला. तो पर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेज यांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता.

अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले. दरबारातील काही मानकरी संभाजी राजांना महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले होते. हे केवळ अण्णाजी दत्तोच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.

संभाजी राजांचे शिक्षण व तरुणपण:

अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्या विशारद आणि अत्यंत धुरंधर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले. तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल. या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजी राजे नऊ वर्षाचे होते.

संभाजी राजांचे राज्यकारभार :

शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्य प्रथेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रय दायी लेखा सुद्धा कुणावरही सत्ता चालवते असा लेख आहे. संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदर भाव होता. ज्येष्ठ मंत्री कुडाळ ग्राम व निवासी नामदेव भट्ट पुत्र भाकरे शास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्र वरून त्याचा आदर भाव दिसून येतो.

छत्रपती संभाजी महाराजांना राजेपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस ठेवण्याची इच्छेने त्यांनी नामदेव भट्ट पुत्र वाकरे शास्त्री यांना दरसाल १०,००० शाहीहोन देण्याचे संस्कृत दानपत्र करून दिले.

हे दानपत्र संभाजीराजांच्या मंचकारोहण अंतर एका महिन्याने म्हणजेच २४ ऑगस्ट १६८० भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२ रोजी केले आहे. दानपत्र ३०० सेमी लांब आणि २३.५ सेमी रुंद आहे. या दांपत्याच्या सर्वात मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली स्वच्छ अक्षरात संस्कृतमध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजे यांच्या हस्ताक्षरातील आहेत. त्या ओळी म्हणजे

||मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
||छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं ||श्री ||

यात तत्कालीन पत्रलेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना सुरश्रेष्ठ व देव ब्राह्मण प्रतिपालक असे संबोधतात. तर आपल्या आजोबा महाराज शाही शहाजीराजांस निशा युद्ध प्रवीण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात.

आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्या तारुण्यातच त्यांनी याच विषयाची दीक्षा घेतली व अनेक राजांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रम पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेची यथार्थ दर्शन होते.

संभाजी राजे यांची कीर्ती :

छत्रपती शिवराया नंतर शंभू राजे छत्रपती आले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. मोठ्या फौज फाट्यासह मराठी सैन्य ७० महिन्याची मजल मारून एकाएकी भुलांपुर वरून चालून गेले. तीन दिवसांपर्यंत मराठी पुरेल उपस्थित होते.

त्यांना मुबलक लूट मिळाली. त्यांनी जडजवाहीर सोने-नाणे रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. त्यांनी पर्वा केली नाही,भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले वापरलेली वस्तू इत्यादी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले व नंतर ते निघून गेले. पुढील काही महिने त्या वस्तुला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही. या किल्ल्यावर रसद पोहोचविण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्ष झुंजत ठेवला. अशी संभाजी महाराजांची कीर्ती आहे.

संभाजी राजांचे साहित्य:

आजही संभाजी महाराजांचे साहित्य आपल्याला वाचायला मिळते. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे.

अजेय योद्धा :

छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले.

संभाजी राजांचा छळ व मृत्यू :

१६८९ च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच, औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली.

मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून, धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानी कारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला.

“तुम्हाला आमची माहिती धर्मवीर संभाजी महाराज यांची माहिती Sambhaji Maharaj Information In Marathi कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :