संत गाडगे महाराज यांची माहिती Sant Gadge Maharaj information in Marathi

Sant Gadge Maharaj information in Marathi गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील कीर्तनकार संत आणि एक समाज सुधारक होते. त्यांनी स्वतःच्या इच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती.

Sant Gadge Maharaj Information In Marathi

संत गाडगे महाराज यांची माहिती Sant Gadge Maharaj information in Marathi

विसाव्या शतकातील समाजसुधारकांची यामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगेबाबा हे आहे. यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेडगाव येथे झाला. संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते.

बालपण व जीवन :

गाडगे महाराज यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेले. गाडगे महाराजांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे श्रमाचा आदर्श ठेवला गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली.

या काळात गाडगे महाराजांनी सेवन करून चिंध्या पांघरून मस्तकी धारण करून देह श्रमाची पराकाष्टा केली. म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज असे म्हणत. लोकजीवन तेजाने उजळण्या -साठी हा तिच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत व ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले गाडगे महाराज चालते-फिरते सामाजिक शिक्षक होते.

गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पंडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संस्थांमधील एक सुधारक आणि सुधारक संत होऊन गेले आहेत. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी, परंपरा यावर ती टीका करत असत आणि लोकांना स्वच्छतेचे तसेच चारित्र्याची शिकवण देऊन त्यांचे महत्त्व पटवून देत होते. गाडगेबाबा म्हणजे चालती फिरती एक पाठशाला होती. ते म्हणायचे देव देवळात नसून देव माणसात आहे. माणसाची पुजा करा देव तुम्हाला आपोआप मिळेल.

गाडगेबाबांची शिकवण :

समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवले आहे. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केलेला आहे. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत, चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका.

असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे. हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपल्या गुरु मानत असत. “मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.” असे ते कायम म्हणत असत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केलेला आहे. देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.

सामाजिक सुधारणा :

गाडगेबाबांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत. हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही.

कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. संत गाडगेबाबा यांच्या सन्मानार्थ  सन २०००-२००१ मध्ये संत गाडगेबाबा गाव स्वच्छता मोहीम सुरु केली. या मोहिमेतून देशातील सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच जनजागृती सुद्धा केली. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कार जाहीर केले.

मृत्यू :

असेच एक दिवस वारकऱ्यां सोबत कीर्तन करीत जात असताना २० डिसेंबर, १९५६ साली अमरावतीत त्यांचे निधन झाले. त्यांनी आपले जीवन समाज सुधारणेत घालविले असे हे महान संत गाडगेबाबा होते. संत गाडगे महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान संत होते. तसेच ते महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारकां पैकी एक होते. ते लोकांचे प्रश्न समजून घेणारे आणि गरीब व गरजू व्यक्तींसाठी झटणारे संत होते.

“तुम्हाला आमची माहिती संत गाडगेबाबा विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.