संत नामदेव संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi

Sant Namdev Information In Marathi संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत होऊन गेले. नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती असे म्हटले जाते. तथापि त्यांना ती पूर्ण करता आली नाहीत. नामदेवाचे ५०० किंवा ६०० अभंग आज उपलब्ध आहेत. नामदेव गाथेमध्ये असलेले पुष्कळसे अभंग नामदेवाचे वाटत नाहीत. नामदेव गाथेत या विष्णूदास नाम्याचे तसेच नामदेवांचे अभंग ही अंतर्भूत आहे. आपण आज नामदेवांविषयी माहिती पाहणार आहोत.

Sant Namdev Information In Marathi

संत नामदेव संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi

संत नामदेवांचा जन्म:

संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर,१२७० साली झाला. वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेववादी श्रेष्ठ संत कवी पैकी एक होते. त्यांच्या पित्याचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गुनाई असे होते. नरसी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तसेच हे गाव नेमके कोठे याबद्दलही अभ्यासकाला माहिती नाही. कराड जवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे असे त्यांचे मत आहे.

तसेच संत नामदेव नरसी या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोड कल्याणी हेही याच परिसरातले आहे. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली तरी त्याचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवाची नरसी बामणी ही दोन गाव आहे असे मानले जाते. त्यांच्या कुटुंबात पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवाचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवांचे जीवन :

संत नामदेवांना संत शिरोमणी नामदेव महाराज असेही म्हटले जाते. हे महाराष्ट्रातील संत कवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली आहेत. शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबातले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहे.

नामदेवांचा विवाह जाई नावाच्या स्त्रीशी झाला होता आणि तिच्यापासून त्यांना नारायण, महादेव गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले. लिंबाई नावाची एक मुलगी झाली विठ्ठल भक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होत चालले होते. घरातील परिवार मोठा होता. त्यांची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते. विठ्ठल वेडाला त्यांच्या घरातून विरोध होता. नामदेव भक्ती परमार्थाच्या मार्गावरून हलले नाहीत. उलट ते कुटुंबच भक्तिमार्गाची झाले. १२९१ मध्ये नामदेवांची ज्ञानदेवाची भेट झाली.

आपली भक्ती गुरूपदेश यावाचून अपुरी आहे. याची जाणीव या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबाखेचर आन कडून प्रदेश घेतला. त्यांचे शिष्यत्व स्वीकारले अशी आख्यायिका आहे. नामदेव विसोबा यांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. हे दृश्य पाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विश्वाची निर्मिती केली. परंतु विसोबानी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव. असे म्हटल्यावर देवाविना ठाव हे बोलण्याची वाव. हा विचार नामदेवाच्या मनाला भिडला गुरु उपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला.

विशुद्ध भक्तीला व्यक्त बोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले. त्यानंतर श्री ज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि भुतकाळीची तीर्थे पहावी नयनी. अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सर्व सुख आहे मज पांडुरंगी. अशीच नामदेवाची धारणा असल्यामुळे तीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. परंतु अखेर ते ज्ञानदेवा बरोबर निघाले महाराष्ट्रातील अनेक संत या तीर्थयात्रेत सामील झाले होते. भारतातील अनेक तीर्थे त्यांनी पाहिली या तीर्थयात्री होत गेले. परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली.

नामदेव २६ वर्षाचे असताना त्यांनी आपल्या आयुष्याची पुढची उर्वरित वर्षे म्हणजे ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी वेचले. “नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” ही त्यांची भूमिका होती.

संत नामदेवांचे साहित्य :

संत नामदेवांचे अभंग गाथा, २५०० अभंग आहे. अशी प्रसिद्ध आहे त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केलेली आहे. त्यामध्ये १२५ पदे आहेत. त्यातील ६२ अभंग नाम देवजीकी मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये गुरुमुखी लिपीत आहेत.

संत ज्ञानेश्वर यांचे नामदेवांनी समाधी, तीर्थावली या ग्रंथातील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे. संत नामदेव भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत आहे. ज्ञानेश्वरांचे जीवन समाधी नंतर पन्नास वर्ष भागवत धर्माचा त्यांनी प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपलेसे वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात .

पंजाबमधील घुमान येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य आहेत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवांची मंदिर उभारले आहेत. संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरली जाते.

संत नामदेवांविषयी अख्यायिका :

संत नामदेव महाराज हे खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, आज देवाला नैवेद्य घेऊन तू दाखव किंवा प्रसाद तू घेऊन जा. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा हा खाईल त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. आणखीन एक गोष्ट म्हणजे कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ नये म्हणून संत नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेऊन मागे धावू लागले व त्याला म्हणाले की, अरे ती कोरडी भाकरी आहे .

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन करणाऱ्या पुजार्‍यांनी त्यांना विनवले त्यांचे विनंतीस मान ठेवून नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिमाभिमुख केले ते आजतागायत तसेच आहे.

समाधी :

संत नामदेव हे ऐंशी वर्षांचे झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूड आपल्या मस्तकी लावावी. ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ स्थान तयार करण्यात आले आहे.

“तुम्हाला आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :