छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj Information In Marathi

Shivaji Maharaj Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक तसेच उत्कृष्ट योद्धा सहिष्णू राजा व सर्वसमावेशक शासनकर्ता आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात वर महत्त्वपूर्ण ज्याचा ठसा उमटलेला आहे ते आदर्श व्यक्तिमत्व आहे.

Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj Information In Marathi

शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमध्ये योग्य असलेल्या गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्याशी ही लढा दिलेला आहे तसेच मराठा साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही महाराष्ट्रात बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार किल्लेदार अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली.

 पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले 
 जन्म १९ फेब्रुवारी १६३०
 वडील शहाजीराजे भोसले
 आई जिजाबाई
 पत्नीसईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई
 जन्म स्थळ शिवनेरी किल्ला, पुणे
 मुलगाछत्रपती संभाजी महाराज
 राज्याभिषेक६ जून १६७४
 चलनहोन, शिवराई
 मृत्यू ३ एप्रिल १६८० , रायगड किल्ला

शिवाजी महाराजांचा जन्म:

शिवाजी महाराजांचा जन्म जिजाबाईंच्या व शहाजीराजांच्या प्रथम पत्नी यांच्या पोटी १९ फेब्रुवारी, १६३० फाल्गुन कृष्ण तृतीया रोजी पुण्यापासून चाळीस मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.

मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ती शहरे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. शहाजीराजें त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या .तुकाबाई आणि शहाजी राजे यांच्या एकोजीराजे भोसले या पुत्राने पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

शिवाजी राजांचे शिक्षण/मार्गदर्शक:

शिवाजी महाराज लोककथा आणि इतिहास यामध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे. परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे आज तरी खूप कठीण असले तरी विविध युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते.

तसेच शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांच्या वडिलांनी दादोजी कोंडदेव यांच्यावर सोडली. त्यांनी शिवाजींना युद्धकला राजनीती-शास्त्राचे शिक्षण दिले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक या नात्याने दादोजी कोंडदेव यांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच संत तुकाराम महाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते. शिवाजी महाराजांना अनेक साधू-संतांचे उपदेश लाभले होते असे म्हटले जाते. तरी स्वामी समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरु-शिष्य नाते वेगळेच मानावे लागेल.

शिवाजी महाराजांचे लढाऊ आयुष्य :

शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त आयुष्य हे लढाया करण्यामध्ये गेलेले होते घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील शिवाजी महाराज हे घोड्यावरच केवळ तीन ते चार तास घेत असत. सुरूवातीचा लढा त्यांचा तो म्हणजे तोरणगडावर विजय आहे. इसवी सन १६४७ मध्ये सतरा वर्षाच्या शिवाजीराजांनी बादशाहच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तो तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले त्याच साली शिवाजी राजांनी कोंढाना म्हणजेच सिंहगड व पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले याशिवाय तोरणा गड समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

शहाजीराजांना अटक:

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली आणि फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजी राजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर यांचा पराभव केला. फत्तेखानची पाठलाग सासवडपर्यंत केला.

सासवडजवळ झालेल्या लढाईत फत्तेखानचा मृत्‍यू झाला. शिवाजी राजांनी त्याच्या दख्खनच्या सुभेदारास पत्र पाठवून शहाजीराजानसकट त्याच्या चाकरी जायची इच्छा प्रगट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजीराजांना बंगळूर शहर कंदरपीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

पश्चिम घाटावर नियंत्रण :

इसवी सन १६५९ नंतर शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळवला होता.

अफझलखान प्रकरण :

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ सारी आदिलशहाने दरबारी शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला आणि मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला.

अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता पण शिवाजीराजांच्या वकिलांनी म्हणजेच पंताजी गोपिनाथ यांनी अफजलखानला गळ घालून प्रताप गडावरच भेट घेण्यास बोलावले भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.

शाहिस्तेखान प्रकरण:

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांचा राज्य विस्ताराला साद घालने या दोन हेतूसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान त्याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात गावात त्याने दहशत पसरवीत जमेल, तेवढा जमेल तेथे विध्वंस करत गेला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.

शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा आणि लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे, अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला आणि त्याचा पराभव केला.

शिवाजी महाराजांचा मृत्यु :

शिवाजी महाराजांचा मृत्यु हे देखिल गुढ बनून राहिले आहे. ३ एप्रिल, १६८० रोजी शिवरायांचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या कारणास्तव ही बातमी गडाच्या बाहेर पडू दिली नाही. पण मुसलमान मुलुखात जालन्याच्या जान मोहम्मद बाबाच्या शापाची अफवा पसरली. त्याचबरोबर स्वराज्यात देखील दबलेल्या आवाजात महाराणी सोयराबाई साहेब आणि मंत्री यांच्या घातपाताच्या चर्चा घडू लागल्या. महाराणी सोयराबाईचे नाव या प्रकरणात येणे ही अत्यंत दुर्दैवी आहे.

त्याच्या निष्कलंक व्यक्तिमत्वाबद्दल दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी बाकरे शास्त्रत म्हटले आहे, “मातोश्री तो स्पटिका होऊनही निर्मळ होत्या.” आपल्या बखरकारांनी महाराणी सोयराबाईंवर आरोप लावले, याचे मनस्वी दुःख होते. नंतर पुढे काही इतिहासकारांनी सुद्धा महाराणी सोयराबाई यांनी घात केल्याचे म्हटलेले दिसते. अशाप्रकारे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते?

हे सांगताना समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, त्याच त्यांच्या गुरु होत्या, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झालीच नव्हती या भूमिकेप्रमाणेच समर्थ रामदास महाराजांचे गुरु होते अशी भूमिका मांडणारे लोकही महाराष्ट्रात आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले किती आहेत?

शिवाजी महाराजांनी एकूण १६० किल्ले जिंकले. एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे?

रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कुठे झाला?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर ‘रायगड’ आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं.