दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Information In Marathi

Diwali Information In Marathi दिवाळी सर्व सणांची राणी आहे असे म्हटले जाते. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचे सर्व सणांमध्ये खूप महत्त्व आपल्याला दिसून येते. भारत देशात दिवाळी आश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

Diwali Information In Marathi

दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Information In Marathi

दिवाळी ही खूप मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व लोक आजही जाणतात. दिवाळीच्या दिवशी सर्व घरातील लोक नवीन कपडे परिधान करतात. तसेच फटाके, फुलझडी, लाइटिंग इत्यादी साधनांनी दिवाळीचे स्वागत करतात. नवनवीन पदार्थ दिवाळी सणानिमित्त प्रत्येकाच्या घरी करत असतात. दिवाळीच्या दिवशी घराबाहेर रांगोळी काढून सुशोभित केले जाते.

पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधी काळातच हा सण येत असतो. दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. असं पुराणानुसार माहिती पडते. या सणाचा प्रारंभ फार प्राचीन काळी करण्याचे वास्तव्य उत्तर ध्रुवप्रदेशात त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्याची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होतात. त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करीत असावेत.

तसेच वैद्य काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आष्विक किंवा आग्रहासारखे केले जात असत ज्याचा समावेश सात पाकयज्ञामध्ये होतो. परंतु धार्मिक आचरणात दिवाळीचे प्राचीन महत्त्व आपल्याकडून येते. काही लोकांची अशी श्रद्धा आहे, की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेस अयोध्येला परत आले. तो ह्याच दिवसात पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्या पेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यशाचा उत्सव मानला जायचा.

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात. घराच्या दारात आकाश दिवे लावतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची कल्पना आपल्याला नाही.

दिवाळीचे महत्त्व:

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दारात तसेच घरावर इमारतीवर दिव्यांनी लख्ख प्रकाश केला जातो. याचाच अर्थ असा की आपल्या अंधारमय जीवनाला प्रकाशमय करावे हेच महत्त्व आपल्याला दिवाळीचे दिसून येते. तसेच दिवाळी हा सण आनंदाचा व उत्साहाचा सण मानला जातो. त्यातूनच आपल्याला जगण्याचे बळ मिळते.

तसेच या दिवशी महालक्ष्मी, सरस्वती व गणपती यांची पूजा होते. आपल्या घरातील धनसंपत्ती हे लक्ष्मी रूपाने सतत आपल्यासोबत असते. सरस्वती म्हणजेच आपली बुद्धी, वाचा नेहमी सरस्वती रूपाने आपल्या जवळ असते व गणपती अनेक संकट हरत असतो. म्हणून या दिवशी या तिघांचीही पूजा केली जाते. तसेच श्री राम प्रभू सीता मातेला घेऊन याच दिवशी आयोध्याला परत आल्याने हा हर्ष व्यक्त केल्या जातो असेही म्हटले जाते.

दिवाळी कशी साजरी करतात:

दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हिंदू धर्मामध्ये पार पाडल्या जातो. दिवाळीला आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेश दाराला लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की रांगोळी हिंदू धर्मानुसार शुभकारक आहे. त्याचबरोबर घराच्या चारही बाजूंना तेलाचे दीपक रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दिपोत्सव म्हणून ओळखली जाते.

या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यता महिला देखील साडी, सोन्याचे दागिने खरेदी करतात. पारंपारिक पद्धतीने आणि तंत्र तज्ञांच्या मते, या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने-चांदी खरेदी करतात.

दिवाळी साजरी करणे म्हणून हे जरी कारण असले, तरी बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण दिसून येते. तर दरवर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू व सेवा भूषणाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य माणूसही यावेळी मनमोकळेपणाने खरेदी करतो. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. हा उत्सव खूपच मनोरंजक असतो. लोक एक-दोन आठवडे आधीच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करतात. त्यामध्ये घराची साफसफाई, रंगरंगोटीचा समावेश आणि कपडे तसेच जरुरी वस्तू खरेदी करतात.

धनत्रयोदशी: दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी असते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने, चांदी तसेच धनाची देवी धन्वंतरीची पूजा करून अभिषेक करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी देवी धन्वंतरी दिवस असतो.

नरक चतुर्थी: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळी म्हणून गणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात. महिला हातांवर मेंदी काढतात, दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो, मुलांना उपहार दिले जातात, त्यानंतर लक्ष्मीपूजन असते.

लक्ष्मीपूजन: या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरिती रिवाजात माता लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देवी देवतांना आमंत्रीत केले जाते. घरात नेहमी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या व तिजोऱ्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.

पूजा रितीरिवाजाप्रमाणे पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणित केले जाते. गोड पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभकामना दिल्या जातात. या दिवशी व्यापारी व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

गोवर्धन पूजा: दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात. ग्रामीण भागातील घरातील पशूंना विशेष गाई, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.

भाऊबीज: दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या अतुट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला दिव्यांच्या आरास मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्याच्या समृद्धी व भरभराटीचे शुभकामना करते. भाऊ बहिणीला छानसे उपहार देऊन खूष करतात व आपल्या नात्याला अधिक मधुर बनविण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनासारखा आहे. तसाच पवित्र मानला जातो.

दिवाळी विषयी पौराणिक कथा:

दिवाळी विषयी अनेक कथा आहेत. एक कथा ती म्हणजे याच दिवशी श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून घरी परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावून घराला तोरणे लावून हा उत्सव साजरा केला गेला.

दुसरी कथा म्हणजे एक दृष्ट व्यक्ती सर्वांना खूप त्रास द्यायचा. त्याचा पराभव झाल्यावर मरतांना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली असता, तेव्हा त्याने त्याची शेवटची इच्छा सांगितली, त्याच्या पृथ्वीवरच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने दिवे लावावेत आणि अज्ञानरुपी अंधकार दूर करून त्याच्या मृत्यूचा उत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने युद्धात त्याला पराजित केले होते. त्याचे नाव नरकासुर असे होते.

नरकासुर खूप शक्तिशाली राक्षस होता. तो जिथे जायचा तेथील लोकांना नरकासारखे कष्ट द्यायचा. कोणताही पुरुष त्याचा सामना करू शकत नव्हता. पण जेव्हा एक महिला त्याच्यासमोर आली तेव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले, त्याने विचार केला. एक स्त्री काय करू शकते? पण खरे तर त्या महिलेने श्रीकृष्णाच्या पत्नीनेच नरकासुराचा वध केला. त्यामागे श्रीकृष्णच होते. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली असता, त्याने म्हटले, “माझ्या मृत्यूने सर्वांच्या जीवनात प्रकाश यावा.” तेव्हापासून सर्व लोकांनी जास्तीत जास्त दिवे प्रज्वलित केले आणि जीवनाचा उत्सव साजरा केला. तेव्हापासून दिवाळी सुरू झाली, अशी ही कथा आहे.

“तुम्हाला आमची दिवाळी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल सुद्धा पहा :-

Leave a Comment