रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती Rang Panchami Information In Marathi

Rang Panchami Information In Marathi रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. हिंदूंचा हा एक उत्सव आहे, या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी असे नाव पडले आहे. मुले-मुली पुरुष एकमेकांना रंगवण्यासाठी ढपडे घेऊन वाजवत वाजवत गटागटाने एकमेकांच्या घरी जातात व त्यांचा हर्ष उत्साहात साजरा करतात. रंगपंचमी हा सण बरेच काही सांगून जातो.

Rang Panchami Information In Marathi

रंगपंचमी सणाची संपूर्ण माहिती Rang Panchami Information In Marathi

गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात. यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहेत.

परंतु वसंत ऋतु मदन नववर्ष जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातून अर्थ निघू शकतो किंवा या उत्सवाशी निगडीत अर्थ असावा असे मानले जाते. धर्मसिंधु या ग्रंथाच्यामध्ये फाल्गुन वैद्य प्रतिपदेला वसंत आरंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंद सोहळा साजरा केला जातो. हा उत्सव सध्या प्राकृतिक लोक वैद्य पंचमीपर्यंत साजरा करतात. अशी माहिती या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचा एक भाग आहे असेही दिसते.

रंगपंचमीचे महत्व :

रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून देण्याची रीत आहे. देशाच्या काही भागात रंगपंचमीला धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाचे सुरुवात होते.

या दिवशी होळीशी संबंधित लोक गीते गायली जातात. व्रज प्रांतात कृष्णा आणि बळीराम होळीच्या सणाचा आनंद घेत असतात असे मानले जाते. उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्व खूप आहे. ज्याप्रमाणे रंगांचे महत्त्व आपल्याला जाणून येते, त्यामध्ये एक संदेश लपलेला आहे, की सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र राहावे. एकमेकांमध्ये भेदभाव करू नये.

रंगपंचमी खेळताना रासायनिक रंगाचे दुष्परिणाम देखील दिसून येतात. म्हणून रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंदवन होतात. फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाणी, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, हळद पदार्थ पासून रंग तयार करण्याची प्रथा आपल्याला दिसून येते.

रंगपंचमी कशी साजरी करतात:

द्वारपाल युगात गोकुळात बालकुमार, कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यावर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. उन्हाची तलखी कमी करत असेल तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या स्वरूपाने चालू आहे. मध्ययुगात स्थानिक होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत होते. होळी, रंगपंचमी व धुलिवंदन या तिघांची मिळून होळी म्हटले जाते, ही आणखीन एक गंमतच आहे. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते.

फाल्गुन वैद्य पंचमीला तर रंग उडवण्याचा कार्यक्रम असतो. म्हणून ती रंगपंचमी असते, पण याला होळीच म्हटले जाते. होळी मुळात चालू कशी झाली याची पुराणात कथा आहे.

मात्र होळी साजरी करण्याची प्रथा थोडी बदललेली दिसते. होळी साजरी करायची प्रथा नंतर गावागावात वाढली आणि त्यावरून जीवघेणी भांडणे होऊ लागली. दुसऱ्या गावातील लाकडी चोरून आणायची आणि त्यासाठी भांडाभांड करायची यामुळे होळी कलंकित झाली. होळीसाठी वर्गणी काढायची आणि ते पैसे मादक द्रव्य उडवायचे, होळी समोर बोंबा मारायच्या अचकट-विचकट चाळे करायचे अशा पद्धतीने हा सण साजरा होऊ लागला. यामुळे सुसंस्कृत लोकांना अशा सणांचे अप्रूप वाटेनासं झाले आहे.

रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा:

रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा आपल्याला दिसून येतात. पुराण कथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते. त्यानंतर त्यांनी रंगरुपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हा देखील या उत्सवा मागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पूर्ण निवांत मान पुण्याच्या पद्धतीमध्ये होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाचा प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सव असण्याची शक्यता आहे.

जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून, आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे असे हे या आनंद उत्सवातून सूचित केले जाते. लग्नानंतर -च्या पहिल्या वर्षी सासुरवाडी कडून जावयाचे बारा सण साजरे होतात. त्यामध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते.

मराठ्यांच्या कारकिर्दीत सरदार, प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत असे शाहीर वर्णन वरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर  रंग पडल्यामुळे त्यांचे पती पत्नीचे नाते सुचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला. अशी आख्यायिका शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी लाभ घेण्याची पद्धत आहे.

तसेच रंगपंचमी विषयी आणखीन एक कथा प्रचलीत आहे, कि भगवान श्रीकृष्णाने मथुरा वृंदावन येथे गोपिकांचा रंगपंचमी खेळण्याचे प्रमाण आहे. त्यावरचे काव्य आणि चित्रे चांगलीच लोकप्रिय आहेत; पण आज रंगपंचमी तशी भावना राहिलेली नाही. रंगपंचमीच्या १५ दिवस आधीपासून पाण्याने भरलेले फुगे मुली आणि महिला यावर फेकले जातात.

गाडीतून प्रवास करणाऱ्या कितीतरी प्रवाशांना याचा अनुभव आला आहे. यातून काही जन्माचे वैगुण्य आले आहे, त्या विरोधात दंड बनवली गेली, पण ते पुरेसे नाही. आजही सर्रास त्यांना फुगे मारण्याचा त्रास होताना दिसतो. ही एक प्रकारची विकृती म्हणावे लागेल. अगदी शाळेतच या गोष्टीला प्रारंभ करतांना दिसतो. महाविद्यालयीन मुले-मुली आणि झोपडपट्टीतले मुलं यामुळे रंगपंचमीचा रंग बिघडलेला आहे.

तसेच होळी सुरु होण्यामागे पुराणात एक कथा आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याला आपला मुलगा प्रल्हाद याचे नारायण वेड सहन झाले नाही आणि त्यांनी त्याला मारायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या बहिणीला पाचारण केले. तिचे नाव होलिका होते. ती क्रूर होती. प्रल्हादाला मारण्यासाठी होलीकेने एक अग्निकुंड प्रज्वलित केला आणि ती त्यात प्रल्हादाला ढकलायला लागली पण त्या प्रयत्नात ती जळाली त्या वेळी प्रल्हादाच्या पाठीराख्यांनी हर्ष व्यक्त केला.

या होलीके वरून आणि या घटनेवरून होळी सण प्रारंभ झाला. हा सण म्हणजे सृष्टीचा दुष्टांवर विजय होय. आज ही कथा कल्पना जुन्या बुरसटलेल्या समजल्या जातात परंतु हेच वास्तविक आहे.

“तुम्हाला तुमची रंगपंचमी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment