जाणून घ्या होळी या सणाची संपूर्ण माहिती Holi Information In Marathi

Holi Information In Marathi हिंदू संस्कृतीत अनेक विविध सण येतात. त्या सणांमध्ये होळी हा सण उन्हाळ्यामध्ये येत असतो. विविध फुलांनी नटलेले झाडे त्यामध्ये पळसाची फुले पाहून मन थक्क होते. तसे पाहिले तर हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. इतर सणाप्रमाणे होळी हा सण सुद्धा हिंदूमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच हा सण रंगांचा सण म्हणून देखील ओळखला जातो.

Holi Information In Marathi

 

जाणून घ्या होळी या सणाची संपूर्ण माहिती Holi Information In Marathi

शेवटच्या मराठी महिन्यामध्ये हा सण येत असतो, तो म्हणजे फाल्गुन या महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण येतो. देशभरात विविध ठिकाणी होळी हा सण साजरा करण्याची परंपरा व पद्धत वेगवेगळी आहे. तितकीच सुंदर आणि आकर्षक सुद्धा आहे. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तर कोकणातील शिमगा या नावाने ओळखले जाते.

होळी या सणाचे महत्त्व :

भारतातील शेतकरी वर्गात होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पौराणीक इतिहास पाहता या सणांचे कृष्ण आणि बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते.

नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या सणामागे आजच्या वेळी अनुरूप अशी शिकवण आहे. होळीच्या दिवशी होलिका राक्षसीचा वध झाला. हिरण्यकश्यपूचाही वध झाला. चांगल्या गोष्टीचा विजय झाला. आजच्या जगात भ्रष्टाचार वनव्यासारखा पसरतो, तिथे होळीचा संदेश आपणास आशा देऊन जातो. सरते शेवटी सत्य जिंकणार आहे.

होळी सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा साजरा केला जातो. झाडेझुडपे, कडक उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंताची वाट पाहत असतात. वसंत ऋतूमध्ये नवी पालवी झाडांना फुटते, त्यांची वाढ होते, रंगबिरंगी फुले उमलतात, वातावरण खूप आल्हाददायक असते. माणसाचे आयुष्य हे असेच असते. कधी सुख तर कधी दुःख, कधी आरामात तर कधी मिळतील असा. आपल्याला होळीचे मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे. होळी आपल्याला शिकवते की संकटात टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्यकिरणांची वाट पाहायचे असते.

प्रत्येक रात्र संपल्यानंतर दिवस येतोच. होळी पुरातन काळापासून साजरी केली जाते. पण होळीचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. होळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. होळी कुठल्या एका धर्माची नाही. तर ती सर्व मानवजातीची आहे आणि सर्व लोकांना ती एकच संदेश देते, की शेवटी सत्याचाच विजय होतो. होळी सणाचे महत्त्व म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट गोष्टींचा विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावी, हा या सणामागील उद्देश आहे.

होळी हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो :

होळीचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमी पर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्याची प्रथा आहे. संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. एवढेच नाही तर होळी सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीला “गोवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच” असे लहान मुले म्हणतात. लाकड, गोवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं, गोवऱ्या असतात.

संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवासणी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुन आहे, काळभारी आहे, अमंगल आहे. त्या सर्वांचा जळून नाश करायचा, नव्याने सांगण्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश असतो. यासाठी सर्वांना होळी विषयी माहिती असायलाच हवी. होलिका दहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल आणि विविध रंगाची उधळण करून होळी साजरी केली जाते.

भारतात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, बनारस, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मथुरा, वृंदावन, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड या ठिकाणी होळी हा सण साजरा केला जातो. गावाकडील लहान मुले होळी हा सण येण्याच्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच शेणापासून शिंगोट्या तयार करून त्या वाळवून होळीमध्ये त्यांचा हार करून, होळीला अर्पण करतात.

भारताच्या अन्य प्रांतात होळी कशा प्रकारे साजरी केल्या जाते तर उत्तर भारतातील वजीर भागातील होळीचे विशेष महत्त्व आहे. तेथे कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार पद्धती प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील खेडेगावात होळीचे विशेष महत्त्व आहे. तेथे लाकडे रचून त्याची होळी पेटवली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारस मधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नि वरून चालत जाण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तसेच समस्त समुदाय होळीच्या विधीयुक्त पूजन करतो. गाडीसमोर गऱ्हाने, नवस बोलण्याची परंपरा आहे. तसेच होळीच्या भोवताली रांगोळी सुद्धा काढली जाते. तर ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.

पश्चिम बंगाल मध्ये वैष्णव संप्रदायात गौरव पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्म तिथी म्हणून श्री कृष्ण अष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो. तर गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो. हा सण मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळी विषयी पौराणिक कथा:

होळी विषयी पौराणिक कथा प्रचलित आहेत. होळीच्या तशा खूप कथा आहेत. पण सगळ्यात जास्त प्रचलित कथा ती म्हणजे भक्त प्रल्हाद यांची कथा. हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. त्याला एक मुलगा होता. प्रल्हाद हिरण्यकश्यपला देव आवडत नसे आणि प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. दिवस-रात्र देवाचे नाव प्रल्हाद जपायचा. हिरण्यकश्यप प्रल्हादाच्या भक्तीने संतापात होता. म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याचे ठरवले.

खूप प्रयत्न केले परंतु ते सर्व नाकाम झाले. प्रल्हादाला मारण्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे शेवटी त्याने त्याची होलिका नावाची असुर बहिण होती. तिच्याकडे एक जादुई वस्त्र होते, जे तिला भयानक आगीपासून वाचू शकत होते. होलिका आणि तिचा भाऊ हिरण्यकश्यप यांनी भक्त प्रल्हादला आगीत जाळून मारण्याचा कट केला. ती त्याला घेऊन धगधगत्या चितेवर बसली. हिरण्यकश्यपला वाटले की, आता प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुखरूप आगीतून बाहेर येईल. परंतु तसे झाले नाही आणि भगवान विष्णूच्या कृपेने उलटे झाले.

होलिका आगीमध्ये जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला. याच विजयाच्या स्मरणार्थ होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त करणे होय. हा या कथेचा सारांश आहे. होळी बाबत अशीही एक आख्यायिका आहे की, लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका सारख्या राक्षसीच्या कथांमध्ये या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात.

पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने केलेले प्रयत्न विफल झाले व श्रीविष्णू देवाने तिचा वध केला. होलिकेला एक वर प्राप्त झालेले होते की तिला अग्नी कधीही जळू शकणार नाही. परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने मांडीवर घेऊन प्रवेश केला, तेव्हा प्रल्हाद वाचला पण होलिका दहन झाली. अशी एक प्रचलित आहे. अशाप्रकारे अशा प्रकारे होळी हा सण साजरा केला जातो.

“तुम्हाला आमची होळी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment