Polytechnic Course Information In Marathi टेक्निकल एज्युकेशन पाहायला गेलो तर काळाची गरज बनली आहे.व बरेचसे विद्यार्थी आजकाल कम्प्युटर सेक्टर कडे वळताना दिसतात.व यासाठी आपल्यासाठी दहावी नंतर दोन पर्याय उरतात ते म्हणजे आय.टी.आय आणि दुसरा म्हणजे पॉलिटेक्निक.म्हणूनच आज पॉलिटेक्निक या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय पात्रता निकष असतो, त्यासाठी असणारी फी व हा कोर्स करण्यासाठी कुठले कॉलेजेस चांगले आहेत हे सर्व आपण ह्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
पॉलिटेक्निक कोर्सची संपूर्ण माहिती Polytechnic Course Information In Marathi
पॉलिटेक्निक कोर्स चालू करण्याचा उद्देश म्हणजे देशाच्या विकासासाठी तांत्रिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या शिक्षण प्रदान करणे. राज्यात पॉलिटेक्निक कोर्सचे शिक्षण हे एम.एस.बी.टी.इ म्हणजेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या संस्थे मार्फत दिले जाते. या संस्थेमार्फत अभ्यासक्रम निश्चित केला जातो व परीक्षा देखील घेतल्या जातात व शिक्षण गुणवत्ता देखील या संस्थेमार्फत पाहिले जाते व वेळोवेळी आवश्यक ते बदल करणे हे देखील या संस्थेच्या हातात असते. आता पाहायला गेलं तर आपल्या राज्यात एकूण शासकीय अनुदानित व तसेच खाजगी अशा सर्व एकत्र मिळून 418 संस्था आहेत ज्यामध्ये आपण पाहतो की 55 अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत.
पॉलिटेक्निक हा कोर्स तीन वर्षाचा असतो.हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे असेल तर डिग्रीला देखील ऍडमिशन घेऊ शकता म्हणजेच तुम्ही बी टेक च्या सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. समजा तुम्ही जर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग केले असेल आणि तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेऊन इच्छित असाल तर तुम्ही बी टेक च्या सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता फक्त बी टेकच नव्हे तर तुम्हाला आवडत असलेल्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता.
पॉलिटेक्निक हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष
पॉलिटेक्निक या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही दहावी बारावी पास असणे फार महत्त्वाचे आहे व तुमची बारावी झाली असेल तर तुम्हाला सायन्स ह्या शाखेतून 35 गुणांनी पास व्हावे लागते व सायन्स,गणित आणि इंग्रजी हे विषय असावेच लागतात.
पॉलिटेक्निक हा कोर्स करण्यासाठी लागणारी प्रवेश परीक्षा
तुम्हाला जर पॉलिटेक्निक हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला सी.ई.टी म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झाम ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला जर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये हा कोर्स करायचा असल्यास तुम्हाला या एक्झामध्ये चांगली गुण मिळवून चांगला रयांक मिळायला हवा तरच तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते नाहीतर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे लागेल ज्याची फी ही 35 ते 50 हजार एवढी असते मात्र तसे पाहायला गेले तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये या कोर्सची ही दहा ते पंधरा हजार एवढी असते. व हा कोर्स करताना सेमिस्टर मध्ये तुम्हाला चांगले मार्क असले तर तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळते.
पॉलिटेक्निक हा कोर्स केल्याचे फायदे
- पॉलिटेक्निक हा कोर्स तुम्हाला डायरेक्ट दहावी किंवा बारावीनंतर करता येतो.
- पॉलिटेक्निक या कोर्स मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते.
- पॉलीटेक्निक हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक चांगला जॉब देखील करू शकता.
- पॉलिटेक्निक हा कोर्स केल्यानंतर तुम्ही इंजीनियरिंगच्या सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता.
पॉलिटेक्निक चे काही प्रसिद्ध कोर्सेस
- आर्किटेक्चरल असिस्टंट
- ऑटोमोबाईल इंजीनियरिंग
- कॉस्मेटोलॉजी अँड हेल्थ
- केमिकल इंजीनियरिंग
- सिविल इंजीनियरिंग
- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
- अप्लाइड आर्ट
- फॅशन डिझाईन
- गारमेंट फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनएबल सर्विसेस अँड मॅनेजमेंट
पॉलिटेक्निक कोर्स ची ऍडमिशन प्रोसेस
तुम्हाला पॉलिटेक्निक या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही दहावी पास केलेली हवी तसेच गणित इंग्लिश व सायन्स हे . व हे तीनही विषय तुम्ही नीट अभ्यासलेले पाहिजे कारण तुम्हाला पेपर मध्ये या तीन विषयांमधून सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बारावी झाल्यानंतर देखील पॉलिटेक्निक हा कोर्स करू शकता किंवा आयटीआय हा कोर्स झाल्यानंतर देखील तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता मात्र दहावीनंतर पॉलिटेक्निक करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
पॉलिटेक्निक कोर्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीईटी म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. व या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवून चांगला रँक मिळवणे हे फार महत्त्वाचे असते तुम्हाला चांगला रँक असल्यास तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते व त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट देखील चांगली मिळू शकते. चांगली प्लेसमेंट मिळाली की तुम्हाला एक चांगला जॉब व चांगली सॅलरी देखील कमावू शकता.
एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर तुम्ही कौन्सिलिंग केलं पाहिजे म्हणजेच कॉलेज निवडले पाहिजे तुम्हाला कुठले कॉलेज पाहिजेत त्या साठी एक ऑनलाईन प्रोसेस असते तुमच्या रयांक प्रमाणे तुम्हाला कॉलेज दिले जाते.
ऍडमिशन प्रोसेस आल्यानंतर तुमचे कॉलेज पूर्ण केले पाहिजे. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही विषय निवडायचे असतात. कॉलेजमध्ये सेमिस्टर पॅटर्न द्वारे परीक्षा घेतल्या जातात या एक्झाम मध्ये तुम्हाला चांगले मार्क असणे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला या एक्झाम्स मध्ये चांगले मार्क असतील तर तुम्हाला एखादी चांगली कंपनी हायर करेल.
पॉलिटेक्निक हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये कंपनी येतात व त्या जॉब ऑफर करतात. जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला इंटरव्यू क्लियर करावा लागतो व तुम्हाला चांगले मार्क असतील तर तुम्ही इंटरव्यू राऊंड क्लिअर करून त्या कंपनीमध्ये तुम्ही इंटर्नशिप केल्यानंतर तुम्ही बी टेक चा सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही जॉब देखील करू शकता.
पॉलिटेक्निक कोर्सचा अभ्यासक्रम
पॉलिटेक्निक कोर्स मध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते. पहिल्या वर्षात तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी व गणित या विषयांमध्ये बेसिक शिकवले जातात व पुढील दोन वर्षांमध्ये तुम्हाला फक्त ब्रांच विषय यांचे नॉलेज दिले जाते. पॉलिटेक्निक या कोर्समध्ये जितका थेरीवर भर दिला जातो तेवढाच भर प्रॅक्टिकल वर देखील दिला जातो.
पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज हे सर्वात जास्त आवश्यक असते. व तुम्हाला सेकंड इयर मध्ये प्रत्येक विषयासाठी एक मायक्रो प्रोजेक्ट दिले जातात त्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल नॉलेज कळते व त्यात वाढ होते. तुमची परीक्षा ही सेमिस्टर पद्धतीने म्हणजेच सामायिक परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये सत्तर मार्काचा पेपर हा थेअरी बेस असतो व तीस मार्क हे इंटर्नल असेसमेंट द्वारे दिले जातात.
पॉलिटेक्निक कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी
तुम्ही पॉलिटेक्निक का कोर्स केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. तुम्हाला सरकारी व खाजगी क्षेत्रात बऱ्याचशा नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
तुम्हाला जर सरकारी नोकरी करायची असल्यास केंद्र सरकार मार्फत असलेल्या शासकीय कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल ,भारत पेट्रोलियम ,हिंदुस्तान पेट्रोलियम ,भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ,रेल्वे आणि एम एस ई बी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड यासारख्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी या सर्वात जास्त असतात.
व तसेच तुम्हाला आर्मी नेव्ही किंवा एअर फोर्स मध्ये देखील नोकरी मिळू शकते तेथील टेक्निकल विंग मध्ये तुम्ही नोकरी करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर इच्छा असेल तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इसरो ,भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर बी.ए.आर.सी ,डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सारख्या काही गौरवशाली संस्थांमध्ये तुम्ही जॉब करू शकता.
शासकीय नोकरी असो किंवा ती खासगी नोकरी असो भरपूर नोकरीच्या दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतात. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. तुमचे पॉलिटेक्निकचे शिक्षण झाल्यानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यामध्ये तुम्ही इंटर्नशिप करू शकता. ज्यामुळे तुम्हाला कामाचा अनुभव येतो व तुम्ही कुठेही जॉब करू शकता व त्यानंतर तुमची इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्हाला जॉब उपलब्ध करून देण्यात येतो.
पॉलिटेक्निक कोर्स करण्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेज–
- गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, मुंबई
- गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, पुणे
- गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नागपूर
- गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, नाशिक
- ठाकूर पॉलिटेक्निक
- एस. व्ही. के. एम. श्री. भागुबाई माफत लाल पॉलीटेक्निक
- वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट
- विद्यालंकार पॉलिटेक्निक
- पीसीपी पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज
- व्ही. एम. पी पॉलिटेक्निक
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
पॉलिटेक्निक हा कोर्स करण्यासाठी किती वर्षे लागतात ?
पॉलिटेक्निक हा कोर्स तीन वर्षाचा असतो.
पॉलिटेक्निक कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय आहे ?
पॉलिटेक्निक हा कोर्स तुम्ही दहावी, बारावी किंवा आयटीआय झाल्यानंतर देखील करू शकता.
पॉलिटेक्निक कोर्सची फी काय आहे ?
पॉलिटेक्निक कोर्सची फी दहा हजार ते पन्नास हजार एवढी आहे.
पॉलिटेक्निक कोर्स करण्यासाठी कुठली प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?
पॉलिटेक्निक हा कोर्स करण्यासाठी एमएचटी-सीईटी ही परीक्षा द्यावी लागते.