डीटीपी कोर्सची संपूर्ण माहिती DTP Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

DTP Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजची परिस्थिती बघितली तर बहुतेक मुले ही कॉम्प्युटर संबंधित कोर्स कडे जास्त वळलेली दिसत आहेत .पूर्वी मुले ही आपल्या करिअरचा पर्याय म्हणून एमबीबीएस, इंजीनियरिंग हे पर्याय निवडत असत. परंतु कालांतराने इंजिनिअरिंगच्या भरमसाट ऍडमिशन मुळे हळूहळू इंजिनियर लोकांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या आहेत.

Dtp Course Information In Marathi

डीटीपी कोर्सची संपूर्ण माहिती DTP Course Information In Marathi

आता जगात कॉम्प्युटर शिवाय एकही काम होत नाही अशी परिस्थिती आहे. आताचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जात आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे कॉम्प्युटर शिवाय काम होत नाही. म्हणून संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संगणकाशी संबंधित बरेच अभ्यासक्रम आहेत.

त्यामुळे विद्यार्थी हे संगणकाशी संबंधित अभ्यासक्रम करण्यासाठी वेगळा वेळ घेतात आणि एक किंवा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. की जेणेकरून कमी वेळात त्यांना आपला करिअरचा योग्य मार्ग निवडता येईल .तर मी आज तुम्हाला अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे. जो कोर्स संगणकाशी संबंधित आहे. तो म्हणजे डीटीपी कोर्स!!!

हा अभ्यासक्रम संगणकाशी संबंधित महत्त्वाचा असा अभ्यासक्रम मानला जातो.

डीटीपी चा लॉंग फॉर्म आहे. ‘डेस्कटॉप पब्लिशिंग’.म्हणजेच मराठीत आपण याला डेक्सटॉप प्रकाशन असे म्हणतो. प्रिंटिंग आणि कंपोझिटिंगचे नवीन तंत्रज्ञान म्हणून डीटीपी हा कोर्स ओळखला जातो. हा अभ्यासक्रम तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आहे. डीटीपी या कोर्सेमध्ये तुम्हाला डिझायनिंग, फॉरमॅटींग, एडिटिंग इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. तसेच डीटीपी या कोर्समध्ये विद्यार्थ्याला कॉम्प्युटर बेसिक ,वर्ड प्रोसेसिंग, पेजमेकर ,कॉलर ड्रॉ, फोटोशॉप यांसारखे सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे शिकवले जाते. व या व्हर्जन  वरच डीटीपी हा कोर्स आधारित आहे.

डेस्कटॉप प्रकाशनाचा उपयोग लहान मोठ्या प्रमाणावर पुस्तकाची व मासिक यांची छपाई करण्यासाठी होत असतो. कॉम्प्युटर द्वारे कंपोझिगचे काम करतात त्यामध्ये कॉम्प्युटर टायपिंग द्वारे कंपोसिंग चे काम पूर्ण केल्यानंतर  लेझर प्रिंटर ने पेज प्रिंट केले जाते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशी भरपूर उदाहरणे पाहायला मिळतात तेथे डीटीपी ऑपरेटर चा वापर करण्यात येतो.

तुम्हाला माहिती आहे का ! वाढदिवसाचे बॅनर लावताना ते बॅनर कसे बनवतात? ते ही या डीटीपी कोर्स मध्ये तुम्हाला शिकवले जाते. तसेच पेपर मध्ये खूप बातम्या असतात पण त्या एकदम बरोबर मांडलेल्या असतात. ते असतात केवळ डीटीपी ऑपरेटर मुळे. आजच्या काळात डीटीपी म्हणजे डेस्क टॉप पब्लिशिंग ही कला एक स्वयंरोजगाराचा हमखास मार्ग म्हणून वापरली जाते.

अलीकडच्या काळात डेस्क टॉप पब्लिशिंग चा कोर्स करणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने विस्तृत संधी या क्षेत्रात खुल्या झाल्या आहेत. डीटीपी या अभ्यासक्रमात विविध पैलू बद्दल विस्तृत ज्ञान देखील दिले जाते. प्रकाशकांना ग्राफिक डिझायनर व लेखका बरोबर काम करण्याची संधी मिळते .

त्यामुळे नवीन कलाकृती ,मजकूर तयार करणे, ग्राफिक्स रेखाचित्र डिजिटल प्रतिमान मध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांना स्कॅनरचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते .डीटीपी अभ्यासक्रम पीडीएफ फाईल समजून वृत्तपत्रे तसेच ऑनलाईन आमंत्रणे असे विविध प्रकारचे मजकूर डिझाईन करण्यासाठी शिकवले जाते.

ज्या मुलांना प्रकाशन डिझायनिंग तयार करण्याची आवड आहे त्या मुलांना या क्षेत्रात जाणे हा योग्य पर्याय आहे. ज्या मुलांना संप्रेषणाचे साधन म्हणून डिझाईन चा योग्य वापर करण्याची कला शिकण्याची इच्छा असते ते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. ज्या मुलांना फोटो शॉपी मध्ये रस आहे. प्रतिमा तयार करणे व संपादित करणे हे कौशल्य तुमच्यात असेल तर हा कोर्स केल्यानंतर हे करिअर तुम्हाला या डिटीपी कोर्सेमुळे  जास्त उत्तेजित करू शकेल.

ज्या मुलांना डिझाईन मध्ये आपले करियर बनवायचे आहे अशी इच्छा असेल तर डेक्सटॉप प्रकाशनासाठी प्रिंटिंग आवश्यक आहे व याचे ज्ञान अवगत होण्यासाठी डीटीपी’ चा कोर्स तुम्हाला करावा लागेल. या कोर्समध्ये तुम्हाला लेआऊट, डिझाईन, प्रतिमा एकत्र करणे व ग्राफिक तयार करणे याचे शिक्षण दिले जाते. प्रत्येक कोर्स करण्यासाठी आपल्यामध्ये काही गुण असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तसेच डीटीपी हा कोर्स करण्यासाठी योग्य संवाद कौशल्य असणे ,संगणकाचे प्राथमिक ज्ञान , संस्थापक कौशल्य ,कलेची आवड व ओळख हे गुण असणे महत्त्वाचे आहे.

डीटीपी हा कोर्स करण्यासाठी जास्त काही बंधने नाहीत. कोणीही हा डीटीपी कोर्स करू शकतो .अगदी आठवी पास झालेला विद्यार्थी सुद्धा डीटीपी हा कोर्स करू शकतो. परंतु काही क्लासेस असे असतात की जे दहावी व बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देतात .ही गोष्ट एवढीच महत्त्वाची आहे की, तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंड जितका चांगला असेल तेवढे जास्त जॉब करण्याच्या तुम्हाला संधी भेटतात. त्यामुळे तुम्ही दहावी व बारावी झाल्यानंतरच डीटीपी हा कोर्स करणे योग्य आहे असे मला वाटते. कारण आपण जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी जातो तेव्हा तेथे काही अटी ठेवलेल्या असतात.

जसे की अर्जदार हा दहावी-बारावी उत्तीर्ण असावा व त्याला 60 टक्के पेक्षा जास्त गुण असावे. त्यामुळे चांगले शिक्षण असलेले बरे की वाईट आता हे तुम्हीच ठरवा !!! पण तुम्हाला जर नोकरीपेक्षा स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आठवी पास वरही हा कोर्स करू शकता.डीटीपी या कोर्से मुळे तुम्ही ऑनलाईन सुद्धा पैसे कमवू शकता.

तुम्ही फ्रीलान्सर बनून ऑनलाईन पैसे कमवू शकता. तिथे मात्र तुमचे शिक्षण कोणी विचारात घेत नाही. फक्त तुम्ही किती चांगले काम करता हे पाहिले जाते. जर तुम्हाला डीटीपी हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर हा चालवता आला पाहिजे. कमीत कमी तुम्हाला कॉम्पुटर बेसिक याविषयी पूर्णतः माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर कॉम्प्युटर विषयी ज्ञान अवगत नसेल तर तुम्ही सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे कसे शिकणार. म्हणूनच तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येणे खूप महत्त्वाचे आहे .त्यासाठी तुम्ही डीटीपी हा कोर्स करण्याअगोदर एमएससीआयटी हा कोर्स पूर्ण केला तर त्या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर कसे वापरायचे हे शिकवले जाईल व तुम्ही डीटीपी कोर्स व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल.

भारतामध्ये अशा भरपूर संस्था व क्लासेस आहेत ज्या डीटीपी कोर्स शिकवतात. परंतु प्रत्येक संस्थेमध्ये किंवा क्लासमध्ये एकच सॉफ्टवेअर वापरले जात नाही .यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जाते .त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना कोणते डीटीपी सॉफ्टवेअर शिकवले जाईल याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे डीटीपी साठी सामान्यतः तीन सॉफ्टवेअर जास्त वापरले जातात ते खालील प्रमाणे:-

कोरेल ड्रो :-

कोरेल ड्रो हे एक ग्राफिक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर या कोरेल या कंपनीने 1980 मध्ये तयार केले होते .या सॉफ्टवेअर मुळे कोणत्याही प्रकारचे लोगो, पंपलेट, पोस्टर, बॅनर इत्यादी अगदी सहजपणे तयार करता येतात. म्हणूनच कोरल कंपनीचे हे खास सॉफ्टवेअर मानले जात आहे.

अडोब फोटोशॉप

अडोब फोटोशॉप हे सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण अनेक प्रकारे इमेज डिझाईन करू शकतो. Adobe कंपनी ने बनवलेले हे फोटोशॉप सॉफ्टवेअर आहे .या फोटोशॉप मध्ये अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी सर्वात नवीन आवृत्ती म्हणजे Adobe CC आहे .

अडोब पेजमेकर

अडोब पेजमेकर हे सॉफ्टवेअर Adlus या कंपनीने तयार केले होते .नंतर हे सॉफ्टवेअर Adobe या कंपनीने विकत घेतले व या कंपनीच्या खरेदीनंतर ते आणखीच लोकप्रिय झाले. या पेज मेकर द्वारे विजिटिंग कार्ड, पुस्तके ,बायोडेटा ,न्यूज पेपर इत्यादी छापले जातात।

डीटीपी हा कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने केला जातो. आपण जर ऑफलाइन पद्धतीने हा कोर्स करण्याचे ठरवले तर कोणत्याही कॉलेज किंवा संस्थेला थेट ॲडमिशन घेऊ शकता. त्या कोचिंग क्लास मध्ये आपण नियमित उपस्थित राहून विद्यार्थी गटांमध्ये व्यवहारिक प्रदर्शनासह विद्यार्थ्याला नियमित वर्ग अभ्यासक्रम दिला जातो. तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमानुसार जर आपण या कोर्सला ऍडमिशन घेतले तर ही शिक्षणपद्धती थेट कॉन्फरन्स आणि तज्ञ शिक्षकांद्वारे ऑनलाइन वर्ग आयोजित करुन शिक्षण दिले जाते.

Udemy, Online Education Program,Education Pennfoster Vobium, Vskills यांसारख्या ऑनलाईन वेबसाईट द्वारे विद्यार्थी डेस्क टॉप पब्लिशिंग या कोर्सचा अभ्यास करू शकतात.

डीटीपी या कोर्स मध्ये दोन प्रकार असतात. ते म्हणजे डीटीपी प्रमाणपत्र व डीटीपी डिप्लोमा. डीटीपी प्रमाणपत्राचा कालावधी 3 दिवस ,15 दिवस, 2 महिने असा असतो. तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 3 महिने ते 2 वर्ष असा कालावधी असतो. डीटीपी प्रमाणपत्राचा खर्च 500 ते 2000 पर्यंत येतो. तर डीटीपी डिप्लोमा याचा खर्च 10000 ते 20000 पर्यंत येतो. आपण ज्या क्लासला ऍडमिशन घेणार आहे त्या क्लासवर हा खर्च अवलंबून असतो.

डीटीपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा विशेष करून ऑनलाईन मोडमध्ये उपलब्ध असतात. तसेच काही संस्था विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासक्रम देखील प्रदान करत असतात. हे ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली असते व थेट प्रशिक्षण देखील देतात. या डीटीपी प्रमाणपत्र कोर्समध्ये संगणक ज्ञान व विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरायच्या प्रक्रियेचा अनुभव मिळेल. यामध्ये मजकूर व कलाकृती विद्यार्थ्याला एकत्रितपणे तयार करता येईल.

यामध्ये विद्यार्थ्याला छपाई व वेब प्रकाशन शिकवले जाते तसेच  कोरेल ड्रॉ, स्क्रिबसह ग्राफिक डिझायनिंग आणि डेक्सटॉप प्रकाशन हे शिक्षण दिले जाते.सर्टीफिकीट पब्लिशिंग या कोर्सला विद्यार्थी जास्तकरून प्राधान्य देतात. कारण हा कोर्स कमी कालावधीचा असून वेळेची बचत व खर्चात बचत होते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी लगेचच रोजगार क्षेत्रात स्वतःला झोकून देतात. हा कोर्स केल्यानंतर सुरुवातीला वार्षिक पगार एक ते दोन लाख मिळतो व अनुभवावरून तो वाढूही शकतो.

डेक्सटॉप प्रकाशन डिप्लोमा अभ्यासक्रम

डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम यात भिन्नता असू शकते. डिप्लोमा डेस्कटॉप प्रकाशन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना डेक्सटॉप प्रकाशक,डेस्कटॉप प्रकाशन डिझाइनर, ग्राफिक डिझायनर इत्यादी काम करण्यासाठी प्रगत प्रशिक्षण देण्यात येते. डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वार्षिक पगार तीन ते चार लाख अंदाजे सरासरी प्रारंभिक मिळतो. व अनुभवावरून तो वाढूही शकतो.

डीटीपी हा कोर्स केल्यानंतर आपल्याला डीटीपी ऑपरेटर ,लोगो डिझायनर, ग्राफिक डिझायनर, वेब डिझायनर या इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात तसेच आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


DTP अभ्यासक्रम काय आहे?

अभ्यासक्रम विहंगावलोकन. DTP मधील प्रमाणपत्र हा कौशल्य निर्मितीसाठी एक अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या शब्दांत, हा एक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. संगणक अनुप्रयोग, डीटीपी सॉफ्टवेअर, मुद्रण तंत्रज्ञान, ग्राफिक डिझाइन इत्यादी क्षेत्रांमध्ये.


DTP काम काय आहे?

डेस्कटॉप प्रकाशन (डीटीपी) म्हणजे इंक जेट किंवा लेझर प्रिंटरद्वारे मुद्रित करण्याच्या हेतूने पुस्तके आणि पुस्तिका डिझाइन करण्यासाठी वैयक्तिक संगणकाचा वापर . डेस्कटॉप प्रकाशनाला सपोर्ट करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये WYSIWYG ग्राफिकल यूजर इंटरफेस (GUI) आहे जेणेकरून प्रकाशनासाठी सेट-अप शक्य तितके सोपे होईल.

डीटीपी कोर्समध्ये वाव आहे का?

चांगल्या पगाराच्या पॅकेजसह हे करिअरची मागणी आहे. DTP ऑपरेटर चांगली कमाई करू शकतात आणि चांगले ज्ञान देखील मिळवू शकतात .


डीटीपी ऑपरेटर काय करतो?

DTP ऑपरेटरच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या: मजकूर आणि ग्राफिक प्रतिमा समाविष्ट करणारे उच्च-गुणवत्तेचे संप्रेषण साहित्य तयार करा आणि तयार करा . ग्राफिक्स संपादित करा, जसे की छायाचित्रे किंवा चित्रे, • प्रकाशन सॉफ्टवेअरमध्ये मजकूर आणि ग्राफिक्स आयात करा.

Leave a Comment