ATD Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,शैक्षणिक प्रक्रियेमध्ये शिक्षक हे पात्र खूप महत्त्वाचे असते, शिक्षक हा शिक्षण संस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात .शिक्षक ही पदवी घेताना ज्या विषयात त्यांना आवड आहे. त्याच विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. काही शिक्षक हे गणित शिकवतात. तर काही शिक्षक हे विज्ञान शिकवतात. मी आता तुम्हाला ATD या कोर्स बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. हा कोर्स कोणी ,केव्हा, कोठे व कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात!!
ATD कोर्सची संपूर्ण माहिती ATD Course Information In Marathi
प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार विषय घेत असतो. की जेणेकरून आपण घेतलेला विषय मुलांना नीट समजावू शकेल व त्या विषयात मुलांना योग्य प्रकारे ज्ञान दिले जाईल. मी आज तुम्हाला ATD म्हणजेच ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ या कोर्सची सविस्तरपणे माहिती सांगणार आहे .ज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून नोकरी करायची असेल.
त्यांच्यासाठी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. तसेच हा कोर्स केल्यामुळे तुम्ही स्वतःचा आर्ट क्लास सुद्धा सुरू करू शकतात. ATD हा एक डिप्लोमा कोर्स आहे.तसेच ATD हा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहे. हा कोर्स कोणीही करू शकतो या कोर्सला वयाचे बंधन नाही. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा आहे.त्या व्यक्तीमध्ये कलेची आवड असावी लागते.
तसेच ती व्यक्ती कलेत पारंगत असावी लागते. या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या व्यक्तीत असतील तरच या कोर्सचा पूर्णतः फायदा त्याला होतो. सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की आर्ट टीचर हा स्वतः एक चांगला कलाकार असला पाहिजे व त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत शिकवण्याची रुची असली पाहिजे.
या कोर्समध्ये विद्यार्थ्याला थेरी व प्रॅक्टिकल या दोन्हींचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना एक कलाशिक्षक म्हणून खूप गरजेचे आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश ,उर्दू या सर्व भाषेत शिकवला जातो. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी हे अतिशय संवेदनशील असतात.1 ते 16 वयोगटातील मुलांसाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी कला व खेळ या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
या वयोगटातील मुले आपल्या भावना समजून घेण्यासाठी विविध कलांचा सहज व सुंदर वापर करत असतात. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना शब्दांपेक्षा कलेचे माध्यम अधिक जवळचे वाटत असते. या कलेतून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. शालेय शिक्षणाचा उद्देश फक्त चित्रकार व शिल्पकार तयार करणे हा नसून मुलांमध्ये सौंदर्यअभिरुची वाढवणे व त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजवणे, कृती करण्याची व उपक्रम राबवण्याचे कौशल्य निर्माण करणे ही आहे.
एनसीईआरटी ने ही कला हा विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य असून तो प्रशिक्षित कला शिक्षकांकडून शिकवला जावा हे नमूद केलेले आहे .दर वर्षी दहावी विद्यार्थ्यांची एक कल चाचणी घेतली जाते. त्या कलचाचणी भरपूर मुले ही कला या विषयाकडे आकर्षित असल्याचे सिद्ध होते म्हणजेच बहुतांश विद्यार्थ्यांचा कला या शाखेकडे आहे. 1999 चा सुधारित अभ्यासक्रम कार्यान्वित झालेले आहेत. आधुनिक शिक्षण प्रणाली ही कौशल्ये अभ्यासक्रमावर आधारित आहे. चित्रकला व हस्तकला हे विषय मूलतः कौशल्याधिष्ठित आहे.
म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हाच धागा पकडून विद्यार्थी कलाक्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात अशा विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील म्हणजे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत वाढीव गुणांची सवलत दिली आहे. कला शिक्षक प्रशिक्षण या पदवीला सुमारे 80 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. सन 1857 मध्ये मुंबईत पहिल्या कला महाविद्यालयाची स्थापना झाली.
1938 साली या महाविद्यालयाचे अधिष्ठाता पी. एल. धोंड यांनी कलाशिक्षक आणि कला शिक्षणासाठी स्वतंत्र असे टीचर ट्रेनिंग विभाग सुरू केला व हा वर्ग ड्रॉइंग टीचर क्लास या नावाने सुरू झाला. कालांतराने ते त्याचे नाव बदलून आर्ट टीचर डिप्लोमा असे करण्यात आले.
स्वातंत्र्य काळापासून चा चालत आलेला हा अभ्यासक्रम 1964 साली कला संचालन याकडे हस्तांतरित करण्यात आला व त्यानंतर ATD मध्ये काळानुरूप अनेक बदल करण्यात आले. कला संचनालय व महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली ATD चा सुधारित अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यात सुमारे दीडशेहून अधिक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालय आहेत.
ज्या मुलांमध्ये कल्पकता, सर्जनशीलता आणि कलात्मकता अंगी आहे अशा मुलांना चित्रकलेच्या पायाभूत आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाची या कोर्समुळे जोड मिळाली आहे. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमात कलाक्षेत्रात लागणाऱ्या व्यावसायिक संधींना पायाभूत व शास्त्रशुद्ध कौशल्याची साथ मिळाली आहे.
ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन ,ॲनिमेशन डिजिटल प्रिंटिंग अशा अनेक क्षेत्रात पायाभूत ज्ञान असणाऱ्यांना खूप मागणी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेतलेले आहे तो विद्यार्थी इंटरियर डिझाईन व आर्किटेक्चर मध्ये आपली चमक अधिक दाखवू शकतो.
हा कोर्स केल्यामुळे आपण एसएससी, सीबीएससी, आयसीएससी बोर्डाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत कलाशिक्षक म्हणून काम करू शकतो. तसेच फाइन आर्टच्या इंटरमिजिएट ड्रॉइंग आणि पेंटिंग या कोर्सला थेट प्रवेश मिळतो. तसेच बीएफए च्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतो.
ATD या कोर्सला पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहे.
हा कोर्स कोणीही करू शकते. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा कोर्से करू शकतो मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. बारावी मध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या कोर्सला वयाचे बंधन नाही.
परंतु कला शिक्षक म्हणून नोकरीच्या वेळेस शाळेच्या नियमानुसार वयाचे बंधन असते. हा कोर्स करण्यासाठी इंटरमिजिएट या प्रमाणपत्राची गरज असते. या कोर्सला प्रवेश मुख्यतः गुणवत्तेच्या आधारावर दिला जातो .हा डिप्लोमा कोर्स असल्याने प्रवेशासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.ATD हा कोर्स करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:-
- दहावी व बारावी परीक्षेची गुणपत्रिका.
- लिव्हिंग सर्टिफिकेट.
- इंटरमिजिएट सर्टीफिकीट.
- कास्ट सर्टिफिकेट.
ATD या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असतो. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात रेखाचित्र आणि चित्रकला, डिझाईन ड्रॉपिंग,स्मृती आणि कल्पनाशक्ती, ऑब्जेक्ट ड्रॉईंग म्हणजेच मानवनिर्मित आणि निसर्ग, ब्लॅक बोर्ड ड्रॉइंग आणि कॅलिग्राफी, मेमरी ड्रॉईंग, स्टील लाईफ ,कलेचा इतिहास ,स्क्रीन पेन्टिंग, 2D आणि 3D डिझाईन, स्केचींग अँड लँडस्केप इत्यादीबाबत शिक्षण दिले जाते.
FAQ :-
ATD या कोर्सचा लॉंग फॉर्म काय आहे?
'आर्ट टीचर डिप्लोमा' असा आहे.
ATD कोर्स हा कोणत्या क्षेत्रात मध्ये येतो?
ATD हा कोर्स BA या क्षेत्रामध्ये येतो.
ATD कोर्स किती वर्षाचा आहे?
ATD हा कोर्स दोन वर्षाचा आहे.
ATD हा डिप्लोमा आहे की डिग्री कोर्स आहे?
ATD हा एक डिप्लोमा कोर्स आहे.
ATD या कोर्सची पात्रता निकष काय आहे?
हा कोर्स करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी परीक्षा 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंटरमिजिएट हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या कोर्सला वयाचे बंधन नसले तरी शिक्षक म्हणून नोकरी च्या वेळी शाळेच्या नियमानुसार वयाचे बंधन असते. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यायची गरज नसते. आपल्या गुणांच्या आधारावर प्रवेश प्रवेश दिला जातो.