Diesel Mechanic Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार, आजची परिस्थिती पाहता सगळीकडे रस्त्यांवर भरपूर प्रमाणात गाड्यांची गर्दी दिसत आहे. पूर्वीच्या काळी तुरळक एखादी गाडी रस्त्यावर चालताना दिसत होती. बहुतेक लोक हे सायकलच जास्त प्रमाणात वापरत असत. परंतु आताच्या काळात दळणवळणासाठी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जसे माणसाच्या अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे गाडी ही सुद्धा माणसाची मूलभूत गरज बनली आहे.
डिझेल मेकॅनिक कोर्सची संपूर्ण माहिती Diesel Mechanic Course Information In Marathi
आजकाल बाजारात मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज वाढत आहे. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाहनांचे उत्पादन सुद्धा वाढत आहे. वाहनांचे वाढते उत्पादन पाहता वाहनांच्या दुरुस्तीसाठी व सर्विसिंग साठी मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचाच विचार करून आयटीआय या संस्थेने डिझेल यांत्रिकी हा कोर्स सुरू केला.
आजच्या पोस्टमध्ये आपण डिझेल मेकॅनिक या कोर्सची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. डिझेल मेकॅनिक हा कोर्स एक वर्षाचा डिप्लोमा स्तरावरील व्यवसायिक अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम ऑटोमोबाइल अभ्यास अभियांत्रिकी क्षेत्राच्या अंतर्गत येतो.डिझेल मेकॅनिक कोर्स विद्यार्थ्याला तांत्रिक कौशल्य प्रदान करतो .ज्यामुळे विद्यार्थ्याला व्यावहारिक ज्ञान अवगत होऊन कार्यान्वित होण्यास मदत होते. जे विद्यार्थी डिझेल मेकॅनिक हा अभ्यासक्रम घेतात ते त्या क्षेत्रात पुढील उच्च शिक्षण घेऊ शकतात .
त्या संबंधित क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतात. या कोर्सची माहिती पाहण्यापूर्वी आपण प्रथमतः डिझेल मेकॅनिक म्हणजे काय याची व्याख्या पाहूयात!! जो कामगार साधने ,यंत्रे,उपकरणे इत्यादी वापरण्यात कुशल असतो. मोटर्स, यंत्रसामग्री इत्यादी दुरुस्त आणि देखभाल करणाऱ्या व्यक्तीस डिझेल मेकॅनिक असे म्हणतात.
डिझेल इंजिन आणि पुनर्बांधणी करणे. बसेस ,ट्रक ,जहाजे, ट्रेन आणि इतर वाहने चालवणाऱ्या डिझेल इंजिनांची दुरुस्ती देखभाल आणि पुनर्बांधणी करतात या व्यक्तीला डिझेल मेकॅनिक असे म्हणतात. दरवर्षी 50 ते 60 विद्यार्थी या कोर्सच्या माध्यमा द्वारे आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये काम करतात. काही विद्यार्थी स्वतः चे सर्विसिंग सेंटर ,गॅरेज इत्यादी उद्योग सुरू करतात.
जर तुम्ही हा कोर्स केला तर 1 किंवा 2 वर्षानंतर लवकरच तुम्हाला नोकरी मिळेल. डिझेल मेकॅनिक कोर्स केल्याचे बरेच फायदे आहेत हा कोर्स केल्यामुळे आपल्याला नोकरी शोधणे खूप सोपे असते. या अभ्यासक्रमांमध्ये इतर अभ्यासक्रमा सारखे अधिक अभ्यास करण्याची गरज नसते. बर्याच मुलांना अभ्यासात रुची नसते. या कोर्समध्ये गाड्यांच्या पार्ट विषयी अभ्यास शिकवला जातो. तसेच हा कोर्स कमी खर्चिक व कमी कालावधीत होणारा कोर्स आहे.
दैनंदिन जीवनात हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. आपण स्वतः चे गॅरेज उघडून किंवा गाडीचे वेगवेगळे पार्ट्स त्याचे दुकान उघडून स्वयम रोजगार बनू शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही मेकॅनिक, ऑटो फिटर, वाहन ऑपरेटर, लॅब असिस्टंट ,पंप ऑपरेटर, टूल हॅंडलर इत्यादी बनू शकता.
सर्वप्रथम कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्याआधी आपल्याला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात डिझेल मेकॅनिक घेण्याआधी आपण मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी परीक्षा ही गणित व विज्ञान या विषयांसह उत्तीर्ण असावे म्हणजे तुम्हाला डिझेल मेकॅनिक या कोर्सला पात्र होण्यासाठी गणित व विज्ञान हे विषय अनिवार्य आहेत.
या विषयांचे तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे हा कोर्स करण्यासाठी वयाची अट किमान 14 वर्ष आणि कमाल चाळीस वर्ष इतकी आहे अनुसूचित जाती जमाती साठी वयाच्या निकषात सूट दिली जाते डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमाचा कालावधी हा एक वर्षाचा असतो हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे पहिल्या सेमिस्टरमध्ये हा शैक्षणिक कालावधी असतो तर दुसऱ्या सेमिस्टर मध्ये प्रशिक्षण म्हणजेच प्रॅक्टिकल शिक्षण दिले जाते.
डिझेल इंजिन मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक भागाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते या कोर्स मध्ये मुलांना ऑटोमोबाइल मधील सर्व सिस्टिम माहिती व्हावी यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने सर्व प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रॅक्टिकल शिक्षण देण्याच्या हेतूने संस्थेमध्ये आवश्यक सर्व इंजिन्स, गिअर बॉक्स ,टूल्स व इतर सर्व मशिनरी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांना डिझेल इंजिनचा विविध पैलूंचा अभ्यास करता येईल.
डिझेल मध्ये काम करणाऱ्या उपकरणांच्या तुकड्यांची देखभाल करणे आणि वाहनांमधील दोष दूर करणे हे प्रात्यक्षिक शिकवले जाते .या कोर्स मध्ये डिझेल इंजिनचे अलाइनमेंट कसे फिक्स करायचे व ते कसे समायोजित करायचे मेकॅनिझम संभाळणे याव्यतिरिक्त त्यातील कमतरता कशा जोडाव्यात हे शिकवले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला विविध प्रकारांच्या वाहनांची व त्यांच्या पार्टची माहिती दिली जाते. तसेच ते पार्टस वेगळे करून परत जोडणे याचे शिक्षण दिले जाते. या कोर्स मध्ये आपण बाईक, ट्रक,कार, मोटर्स, ट्रेन ,ट्रॅक्टर इत्यादी दुरुस्त कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.
अनेक विद्यार्थी हे डिझेल मेकॅनिक्स चा अभ्यास करू इच्छितात पण आर्थिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे ते सक्षम देखील नसतात या विद्यार्थ्यांसाठी आता दुरस्त शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे दुरुस्त शिक्षण हे कुठे उपलब्ध आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये अर्ज करत आहात.
तेथेही सुविधा आहे का हे तपासून पहा डिझेल मेकॅनिक चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व तुम्ही दुरस्त शिक्षणासाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही अनुशेषा शिवाय बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले पाहिजे तर काही महाविद्यालय हे दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील ही पदवी देतात.
डिझेल मेकॅनिक अभ्यासक्रमात दोन प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत .ते म्हणजे NCVT व SCVT आता आपण या दोन प्रमाणपत्रं या मध्ये फरक आहे.NCVT म्हणजेच राष्ट्रीय परिषद व्यवसायिक प्रशिक्षण NCVT हे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरीय प्रमाणपत्र आहे .हे प्रमाणपत्र आपण संपूर्ण देशात वापरू शकतो .
म्हणजे या प्रमाणपत्र मुळे आपल्याला संपूर्ण देशात कोठेही काम करता येते. त्यामुळे जर तुम्ही डिझेल मेकॅनिक मध्ये सहभागी होणार असाल तर तुम्ही NCVT प्रमाण पत्र घ्यावे.SCVT म्हणजेच राज्य परिषद व्यवसायिक प्रशिक्षण SCVT हे प्रमाणपत्र राज्यस्तरीय प्रमाणपत्र आहे .हे केवळ राज्यापुरते मर्यादित असते.
जर आपल्याला NCVT प्रमाणपत्र मिळत नसेल तर तुम्ही SCVT हे प्रमाणपत्र घेऊ शकता.
काही विद्यार्थी जे डिझेल मेकॅनिक चे प्रमाणपत्र घेऊ इच्छिता पण काही आर्थिक किंवा वैयक्तिक कारणास्तव ते सक्षम नसल्यामुळे ते या शिक्षणापासून दूर राहतात पण अशा विद्यार्थ्यांसाठी सध्या दुरुस्थ शिक्षणाचा खूप उत्तम पर्याय उपलब्ध आहे. दुरस्त शिक्षणाचा पर्याय शोधण्यासाठी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये अर्ज करत आहात, तेथे दुरुस्थ शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे की नाही हे तपासून पहा.
तसेच सर्टिफिकेट कोर्स हा वैध्य आहे की नाही याची देखील खात्री करून पहा.
डिझेल मेकॅनिक्स सर्टिफिकेट दुरुस्थ शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करण्यासाठी पात्र उमेदवार हा कोणत्याही अनुशेषाशिवाय बारावी विज्ञान शाखेने पूर्ण केलेला असावा. काही कॉलेज तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील स्वीकारतात.
तर काही संस्था या प्रवेश परीक्षा व्यतिरिक्त प्रवेश देतात. डिझेल मेकॅनिक्स प्रमाणपत्र हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून यामध्ये इंजिन मेकॅनिक, मशीन ऑपरेटर, व ऑटोमोबाईल मेकॅनिक अशा बऱ्याच पदांसाठी नोकरी मिळू शकते . डिझेल मेकॅनिक केल्यावर खालील जॉब प्रोफाइल मिळू शकतात.
इंजिन मेकॅनिक ,पंप ऑपरेटर ,ऑटोमोबाईल मेकॅनिक, टूल हॅण्डलर ,मशीन ऑपरेटर ,सहाय्यक व्यवस्थापक, यांत्रिक अभियांत्रिकी ,प्रक्रिया विकास तंत्रज्ञ, विभागप्रमुख ,यांत्रिक अभियांत्रिकी, यांत्रिक अभियंता ,विक्री अभियंता, तंत्रज्ञ ,सहाय्यक प्राध्यापक, अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी, उत्पादन व्यवस्थापक ,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, गुगल, विवो मोबाईल, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, सॅमसंग ,पंप ऑपरेशन ,मशीन ऑपरेशन, महिंद्रा अँड महिंद्रा, फ्लिपकार्ट, सॅमसंग ,बजाज एनटीपीसी ,भेल,
- इंजिन मेकॅनिक चा पगार हा 1.24 ते 1.46 लाख इतका असतो.
- तर मशीन ऑपरेटर चा पगार हा 1.32 ते 1.7 लाखापर्यंत असतो .
- ऑटोमोबाईल मेकॅनिक चा पगार हा 1.54 ते 1.78 लाख इतका असतो. पंप ऑपरेटरचा पगार हा 1.1 ते 1.5 लाख इतका असतो.
डिझेल मेकॅनिक केल्यावर भविष्यात असणाऱ्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील व अनेक पर्याय तुमच्या करिअरसाठी तुम्हाला निवडता येतील.
डिझेल मेकॅनिक्स ही पदवी धारण केलेल्या उमेदवारांना सरकारी व खाजगी या दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतील .सर्टिफिकेट इन डिझेल मेकॅनिक्स या शाखेतून बाहेर पडलेले विद्यार्थी हे तांत्रिकदृष्ट्या खूप पुढारलेले असतात ,त्यामुळे आजच्या आधुनिक जगाला त्यांची खूप गरज भासते त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना ड्रिलिंग, ऑपरेशन आणि देखभाल मूलभूत वीज ,ड्रिलिंग ,वेल्डिंग, उष्णता उपचार ,अशी अनेक कौशल्य देखील शिकवली जातात.
पुढील चार क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी या सहजरीत्या प्राप्त होतात ते म्हणजे असेंबली लाईन ,ऑटोमोबाईल उत्पादन, इंजिन दुरुस्ती आणि पंप ऑपरेशन.
सतत विचारले जाणारे प्रश्न:
डिझेल मेकॅनिक्स हा अभ्यासक्रम अनेक संस्थामध्ये उपलब्ध आहे तर त्यातील सर्वोत्तम संस्था कोणत्या?
या प्रश्नाचे उत्तर सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या पर्यायांचे संशोधन करून तुमचे कॉलेज प्राधान्यक्रम हे सुनिश्चित करा .
या अभ्यासक्रमासाठी निवड प्रक्रिया कशी असते?
या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांनी अनुशेष नसताना बारावीपर्यंतचे शिक्षण सायन्स या शाखेतून पूर्ण केलेले असावे .तर काही संस्था या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील प्रवेश देतात.
सर्टिफिकेट इन डिझेल मेकॅनिक हा किती कालावधीचा कोर्स आहे?
हा कोर्स तब्बल एक वर्षाचा आहे व सहा महिन्यांच्या दोन सेमिस्टर मध्ये हा कोर्स पूर्ण केला जातो .
डिझेल मेकॅनिक्स मधील प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी किती शुल्क आकारला जातो ?
या कोर्सची फी ही सरासरी 5000 ते 18000 पर्यंत जाते. पण हे तुमच्या महाविद्यालयाच्या निवडीवर पण अवलंबून असेल की तुम्ही कुठले महाविद्यालय निवडता.