बीएससी नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती Bsc Nursing Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Bsc Nursing Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मुले एकदा शाळेत जायला लागली व जसे जसे ते पायरीपायरीने पुढे जायला लागली की एक टप्पा असा येतो तो म्हणजे दहावी बारावी!!! दहावी व बारावी झाल्यानंतर प्रत्येक मुलगा हा आपल्या करिअरच्या विषय हा गांभीर्याने घेत असतो. कारण हा क्षण त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कारण येथे त्याला आपल्या भविष्याला अनुसरून योग्य असा निर्णय घ्यायचा असतो. म्हणून तो आपल्याला कोणता कोर्से चांगला? पुढे हा कोर्स केल्यामुळे आपले करियर चांगले घडेल याच्याविषयी विचार करत असतो.

Bsc Nursing Course Information In Marathi

बीएससी नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती Bsc Nursing Course Information In Marathi

तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर करायचे असेल. त्यासाठी बीएससी नर्सिंग हा कोर्स एक चांगला पर्याय आहे. ज्या मुलांना वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये बीएससी नर्सिंग कोर्स हा अत्यंत लोकप्रिय आहे .वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग क्षेत्रात करिअर करणे हा एक चांगला पर्याय आहे.

भारतात नर्सिंग कोर्स म्हणून विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बहुतेक मुलांना वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करायचे असते. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम जसे की MBBS,BDS,MD हे अभ्यासक्रम मध्यमवर्गीय मुलांना परवडणारा नसतो. कारण त्याचा खर्च व फी खूप जास्त असते. म्हणून बीएससी नर्सिंग हा कोर्स मध्यमवर्गीय मुलांना कमी खर्चिक आहे व हा कोर्स केल्यामुळे आपण वैद्यकीय क्षेत्रातही काम करू शकतो.

MBBS,BDS,MD या कोर्स सारखी जास्त गुणवत्ता ठेवणारा बीएससी नर्सिंग हा कोर्स नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्रात नोकरी व करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थितीने गरीब विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उत्तम आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची काळजी घेतात व डॉक्टरांना मदत करतात अशा परिचारिका जे काम करतात त्यांना आपण नर्स असे म्हणतो.

भारतात नर्सिंगसाठी डिप्लोमा आणि पदवी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जीएन एम नर्सिंग ,एएनएम नर्सिंग आणि बीएससी नर्सिंग हे प्रमुख तीन अभ्यासक्रम मानले जातात. आता मी तुम्हाला या बीएससी नर्सिंग पोस्ट मध्ये बीएससी नर्सिंग साठी पात्रता काय आहे?बीएससी नर्सिंग नंतर काय करावे? बीएस सी नर्सिंग कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे उपलब्ध होतील व बीएससी नर्सिंग साठी सर्वोत्तम कॉलेज कोणते आहेत अशा प्रकारची सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे .

बीएससी नर्सिंग चा फुल फॉर्म आहे ‘बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग’ असा आहे. सध्या बीएससी नर्सिंग ला खूप चांगला वाव असून तो भविष्यातही असाच राहील .कारण आरोग्य सेवा क्षेत्रातील हा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात नर्सिंग या स्टाफ ची मागणी जास्त आहे. सध्या या कोरोनाच्या काळात नर्सिंग या स्टाफची मागणी भरपूर प्रमाणात वाढली होती .त्यामुळे बीएससी नर्सिंग या कोर्स ला किती महत्त्व आहे हे आपल्याला कळलेच असेल .

आताच्या काळात भरपूर रुग्णालय, नर्सिंग होम उपलब्ध आहेत. त्यामुळे नर्सिंग या पदवीधारकांसाठी नोकरीच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बीएससी नर्सिंग हा पहिला पदवी पूर्ण अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात नर्सिंग संबंधित शिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे. बीएससी नर्सिंग हा कोर्स केल्यानंतर आपल्याला सरकारी किंवा खासगी रुग्णालयात सहज नोकरी मिळवु शकतो.

या कोर्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला नोकरीसाठी इकडे तिकडे जास्त भटकावे लागत नाही .आपल्याला नर्सिंगचे काम येत असल्यामुळे आपल्याला सहज कोणत्याही रुग्णालयात किंवा खाजगी दवाखान्यात सहज काम मिळते.

या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्याला रूग्णालयात रुग्णाची काळजी घेणे, रुग्णांना मुख्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देणे, नियोजित वेळेनुसार रुग्णांची तपासणी करणे व रुग्णांशी चांगला संवाद साधणे व तसेच प्रॅक्टिकल शिक्षणही असते. तसेच या कोर्स मध्ये पेशंटच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे शिक्षणही दिले जाते.

नर्सिंग मध्ये ANM NURSING व GNM NURSING कोर्स देखील असतात .हे दोन्ही कोर्स सुद्धा पदविका अभ्यासक्रम आहेत. त्यापैकी GNM हा कोर्स फक्त मुलीच करू शकतात. GNM हा कोर्स तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. याचा अभ्यासक्रम सुद्धा B.SC NURSING सारखाच आहे.

यशस्वी परिचारिका होण्यासाठी आपल्या मध्ये काही कौशल्य अत्यंत आवश्यक आहेत.

परिचरिकेच्या कामा मध्ये संभाषण कौशल्य हे अत्यंत आवश्यक आहे. कारण परिचारिका हे पात्र रुग्णांची काळजी घेणारे असल्यामुळे रुग्णांशी योग्य प्रकारे बोलणे व त्यांच्या भावना समजून घेण्याचे कौशल्य परिचारिकेचे मध्ये असले पाहिजे. तसेच कोणत्याही रुग्णा बद्दल माहिती डॉक्टरांना सांगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक परिचारिका म्हणून स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जेणेकरून गंभीर परिस्थिती आली तरी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. आरोग्य सेवा क्षेत्रात सतत नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो जसे की आता आलेला कोरोनाचा काळ त्यामुळे परिचारिके मध्ये सतत काम करण्याची तयारी असली पाहिजे.

परिचारिकेचे काम करताना मुख्यतः तणावपूर्ण वातावरणात काम करावे लागते परंतु त्यांच्यामध्ये शांतता व सहानुभूती असणे आवश्यक आहे. कारण येथे आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडताना आपला सामना वेगवेगळ्या रुग्णांची व कर्मचाऱ्यांची होत असतो म्हणून जे विद्यार्थी बीएससी नर्सिंग हा कोर्स करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ताण व्यवस्थापन असणे महत्त्वाचे आहे.

तसेच परिचारिका म्हणून काम करताना आपल्यामध्ये दयाळूपणा आणि करुणा हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे .कारण परिचारिका हे काम करताना रुग्णाला मानसिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या कसे सात्वन द्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे. कारण परिचारिका ही डॉक्टर व रुग्ण यामधला महत्त्वाचा एक दुवा आहे. तसेच परिचारिका मध्ये टिमवर्क हे कौशल्य सुद्धा महत्वाचे आहे. कारण बहुतेक वेळा आपल्याला एखाद्या टीम मध्ये काम करावे लागते.

आता आपण बीएससी नर्सिंग हा कोर्स कोण करू शकतो हे पाहू यात !!!!

नर्सिंग हा कोर्से विज्ञान या विषयाशी संबंधित असल्यामुळे ज्या विद्यार्थ्याला या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल त्याच्या शालेय शिक्षणात विज्ञान हा विषय असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण होणे व बारावीमध्ये विद्यार्थ्याला विज्ञान हा विषय असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांला बारावी मध्ये 45 ते 60 % गुण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे वय किमान 17 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

विज्ञान या विषयांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही यामधील एकही विषय घेतला नसेल तर तुम्ही बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी अपात्र ठरता म्हणजेच तुम्हाला या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वरील तिन्ही विषय महत्त्वाचे आहेत. आरक्षणाच्या नियमानुसार दिव्यांग उमेदवारांना तीन टक्के आरक्षण मिळते. नर्सिंग कोर्स च्या पात्रतेचे नियम एनटीएन च्या माहितीनुसार इंडियन नर्सिंग कौन्सिल यांच्यातर्फे बनवण्यात आले आहेत.

बीएससी नर्सिंग कोर्स चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टम वर आधारित आहे. बीएससी नर्सिंग या कोर्सचा कालावधी हा चार वर्षाचा असतो. हा कालावधी सहा सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक सेमिस्टर नंतर एक परीक्षा घेतली जाते व ती यशस्वीपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

आता आपण बीएससी नर्सिंग कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी असते हे पाहुयात!!!

एडमिशन साठी आपल्याला NEET एन्ट्रान्स एक्झाम द्यावी लागते .ही एक्झाम देऊन आपण या एक्झाम मध्ये पास होणे आवश्यक आहे. बीएससी नर्सिंग कोर्स हा ऑनलाइन ,ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाद्वारे करता येतो. भारतामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी काही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्याची यादी पुढील प्रमाणे:-

JIPMER, AJEE,AUAT,BHU CET,NEET या प्रवेश परीक्षेची तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. ही परीक्षा 100 गुणांची असते. त्यामध्ये सामान्य ज्ञान यासाठी 10 प्रश्न व त्याला 10 गुण असतात .भौतिक शास्त्राचे 30 प्रश्न त्याला 30 गुण असतात. रसायन शास्त्राचे 30 प्रश्न त्याला 30 गुण असतात व जीवशास्त्र या विषयाचे 30 प्रश्न असून त्याला 30 गुण असतात. अशा प्रमाणे 100 मार्काचा पेपर असतो.

प्रवेश परीक्षेचे गुण व बारावीला मिळालेल्या गुणांवर आपल्याला अंतिम प्रवेश मिळतो. बीएससी नर्सिंग कोर्सची फी ही येथे अनेक महाविद्यालयांमध्ये 600000 पेक्षा ही जास्त असू शकते. तर सरकारी महाविद्यालयांमध्ये हीच फी 50000 पेक्षाही कमी असते. म्हणजेच नर्सिंग कोर्स ची फी ही खाजगी कॉलेजला जास्त असून सरकारी कॉलेजला ही फी कमी प्रमाणात असते.

  • नर्सिंग ट्यूटर,नर्सिंग शिक्षक
  • होम केअर नर्स,नर्सिंग सहाय्यक
  • नर्सरी स्कूल नर्स,नर्स आणि रुग्ण शिक्षक,
  • कनिष्ठ मानसोपचार परिचारिका,
  • परिचारिका व्यवस्थापक,
  • वॉर्ड नर्स आणि इन्फेक्शन कंट्रोल नर्स अशा अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी आपणास बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर उपलब्ध होतात.

बीएससी नर्सिंग वेतन दर महिन्याला 10000 ते 20000 मिळू शकते. जर तुम्ही ही पदवी एका नामांकित शैक्षणिक संस्थेतून घेतली असेल तर त्यामुळे तुमचा पगार हा 25000 किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकतो. अनुभवानुसार त्या पगारात वाढ होऊन प्रति महिना 20000 ते 35000 मिळू शकतो. सरकारी खात्यांमध्ये अशी अनेक अनेक पदे असतात .जिथे दरमहा 50000 पेक्षा ही जास्त पगार मिळू शकतो.

बीएससी नर्सिंग ही पदवी घेतल्यानंतर आपण वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी पुढील अभ्यासक्रम चालू करू शकतो. आपल्याला डॉक्टर व्हायचे असेल तर आपण एमबीबीएस ,बीडीएस किंवा एमडी अशा पदव्यांचा अभ्यास करू शकतो .तसेच बीएससी नर्सिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण क्रिटिकल केअर , कार्डिओ थोरॅसिक नर्सिंग, सायकॅट्रिक नर्सिंग, ऑपरेशन रूम नर्सिंग ,नवजात शिशु नर्सिंग आणि डायलिसिस तंत्रज्ञान या सारख्या अनेक स्पेशलायझेशन निवड करू शकतो.

आता आपण बीएससी नर्सिंग कोर्स देणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजची नावे पाहूयात!!!

  • भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे .
  • डॉ.डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे.
  • गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव .
  • इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई .
  • कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा. ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. महात्मा गांधी नर्सिंग कॉलेज कामोठे.
  • महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वे नगर पुणे .
  • प्रवरा कॉलेज ऑफ नर्सिंग अहमदनगर.
  • सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे.

FAQ :-

बीएससी नर्सिंग चा फुल फॉर्म काय आहे?

'बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग' असा आहे.

बीएससी नर्सिंग कोर्स चा कालावधी किती आहे?

बीएससी नर्सिंग कोर्स कालावधी हा चार वर्ष आहे.

बीएससी नर्सिंग कोर्स प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा असते का?

हो, बीएससी नर्सिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला JIMPER,AJEE,AUAT,BHU CET,NEET प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment