सीए कोर्सची संपूर्ण माहिती CA Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल करियर करिअर आणि करिअर हेच शब्द नवतरुणांच्या ओठी फिरताना दिसतात. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की, इयत्ता बारावी पर्यंत करिअरच्या बाबतीत फारच थोडी मुले गंभीर असल्याचे दिसतात. इतर बहुतांश मुले बारावीनंतर मिळणाऱ्या मार्गाच्या जोरावर ज्या कोर्सला प्रवेश मिळेल तिथे प्रवेश घेण्यातच धन्यता मानतात.

Ca Course Information In Marathi

सीए कोर्सची संपूर्ण माहिती CA Course Information In Marathi

मित्रांनो शिक्षणानंतरचे उर्वरित आयुष्य खूप मजेत आणि आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न विधीत करावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आपणही अशाच स्वप्नांचा पाठलाग करत असाल तर आपणासाठी सीए अर्थातच चार्टर्ड अकाउंटंट हा अभ्यासक्रम उपयोगी ठरू शकतो. मित्रांनो सी ए बाबतीत थोडक्यात सांगायचे झाल्यास व्यवसाय किंवा व्यवसायिक आणि सीए यांचे नाते अतिशय मोलाचे!!!

सीए हा अभ्यासक्रम कोर्स अकाउंटिंग या क्षेत्रातला सर्वोत्तम कोर्स समजला जातो .सीए कोर्स केल्यानंतर आपण सीए फर्म मध्ये प्रॅक्टिस करू शकता. अथवा स्वतःची देखील एखादी सीए फर्म उभारू शकता. यामध्ये आपणास विविध उद्योग व्यवसाय प्रस्थापना संस्था इत्यादींचे ऑडिट करण्याचे काम असते. ज्या बदल्यात आपण चांगला पैसा देखील कमवू शकता.

आता सीए कोर्सची इतकी मोठी माहिती जाणून घेतल्यानंतर साहजिकच आपल्या मनात एक विचार आला असेल की आज पर्यंत आम्हाला काय याचे कॉलेजेस दिसले नाही .तर याचे उत्तर आहे. सीए ही डिग्री कुठलेही कॉलेज अथवा विद्यापीठ देत नाही. तर ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ आयसीएआय ही संस्था देते.

मित्रांनो सीए बनने आपण समजता इतकेही सोपे नाही. यासाठी तुम्हाला कडक स्पर्धेच्या तीन पायऱ्या पार कराव्या लागतात. यामध्ये सीए फाउंडेशन सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनल या तीन पायऱ्या पार केल्या की तुम्ही हक्काने स्वतःला सीए म्हणून घेऊ शकता .

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या सीए अर्थातच चार्टर्ड अकाउंटंट या कोर्सच्या मनोरंजक प्रवासाविषयी त्यासाठी पुढील पोस्ट शेवटपर्यंत नक्कीच वाचा ज्यामध्ये तुमचे प्रवेशापासून उत्तीर्ण होईपर्यंतचे सर्व डाऊट्स क्लियर होतील.

भारतातील सर्व सीए आयसीए आय चे मेंबर असतात. आता सिए या कोर्सेबद्दल माहिती पाहण्यापूर्वी आपण प्रथम सीए कोण आहे व ते काय करतात हे प्रथम जाणून घेऊयात!!! आर्थिक खाती समजावून घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणे ही सीए ची भूमिका असते. तसेच एक व्यावसायिक सल्लागार म्हणूनही तो आपली भूमिका बजावत असतो.

व्यवसाय खाते, कर आणि वित्त संबंधित लोकांना सल्ला देण्याचेही काम करत असतो. तसेच तुम्ही कितीही पदवी घेतल्यानंतर स्वतंत्रपणे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम करू शकतात. तसेच प्रत्येक कंपनीमध्ये एका सीए ची गरज असते. तेथेही आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सीएची परीक्षा तुम्हाला वाटते तशी सोपी नसून खूप कठीण असते. पण तुम्ही जर कठोर परिश्रम केले तर तुम्ही नक्कीच सीएची परीक्षा पास होऊ शकता.

सीए हा कोर्स करण्यासाठी काही पात्रता निकष ठरवून दिलेल्या असतात ते आता आपण पाहूयात!!

पूर्वी 1970 मध्ये फक्त वाणिज्य शाखेचाच विद्यार्थी हा सीए या परीक्षेस पात्र होत असे. पण आता त्या नियमात बदल करण्यात आला आहे. आजच्या परिस्थितीत भारतामध्ये औद्योगीकरणाची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने सीए या क्षेत्राला भरपूर प्रमाणात  मागणी वाढली आहे म्हणून आता कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा सीए हा कोर्से करू शकतो. दहावी झाल्यानंतर विद्यार्थी सीपीटी साठी नोंदणी करू शकतो. परंतु बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीपीटी ही परीक्षा देण्यास पात्र असतो.

बारावी मध्ये विद्यार्थ्याला 50 टक्के गुण उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे .जर विद्यार्थी हा कॉमर्स या शाखेतून नसेल तर मात्र त्याला 55 % गुणांसह उत्तीर्ण व्हावे लागेल. जर विद्यार्थ्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर तो डायरेक्ट सीए इंटर मध्ये प्रवेश घेऊ शकतो. परंतु त्याला 60 % गुण असणे आवश्यक आहे. सी इंटर परीक्षा देण्याआधी नऊ महिने आर्टिकलशिप पूर्ण करावी लागते. व नंतर तुम्ही सीए इंटर परीक्षा देऊ शकता व नंतरची सर्व प्रोसेस ही बारावीनंतर प्रवेश घेतलेल्या मुलांसारखीच असते.

सीए हा कोर्स करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण सर्टीफिकीट हे रजिस्ट्रेशन साठी खूप महत्त्वाचे  असते.

विद्यार्थी जर दुसर्‍या देशाचा रहिवासी असेल तर त्या देशाचे नागरिकत्व प्रमाणपत्र

विद्यार्थी SC/ST/OBC  यापैकी कोणत्याही जातीचा असेल तर त्याला आपल्या जातीचे प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

आता सीए हा कोर्स करण्यासाठी आपल्याला कोणत्या तीन पायऱ्या पार कराव्या लागतात हे आपण जाणून घेऊयात!!!

सीए होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सीए फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी करावी लागती. फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी प्रक्रिया ही ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर करावी लागते. नोंदणी केल्यानंतर आपल्याला अभ्यासासाठी चार महिन्यांचा वेळ  मिळतो व यानंतर तुमची परीक्षा घेतली जाते. परीक्षेला बसण्याआधी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो व फॉर्म भरल्यानंतर परीक्षेसाठी प्रवेश पत्र मिळते. नोंदणी करणे व परीक्षेसाठी अर्ज करणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. हे प्रथम आपण समजून घेणे गरजेचे आहे.

फाउंडेशन ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होत असते . परीक्षेसाठी नोंदणी डिसेंबर आणि जूनमध्ये करावी लागते.  मे आणि नोव्हेंबर या महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांनी जर वाणिज्य शाखेतून 55% गुण मिळवून उत्तीर्ण असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ची जर पदवी असेल तर विद्यार्थ्याला ही परीक्षा देण्याची गरज नसते .

सीए फाउंडेशन मध्ये तुम्हाला चार पेपर द्यायचे असतात

  • Account 100 marks
  • Business Economic 60 marks
  • Business commercial knowledge 40 marks
  • English 40 marks
  • Math’s 40 marks
  • Statistics 40 marks
  • Reasoning 20 marks

सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरला 0.25 गुण मिळालेल्या गुणातून वजा केले जातात. फाऊंडेशन ही परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येकी 40 गुण असे मिळून चार पेपर चे 200 गुण झाले पाहिजे. फाउंडेशन परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणारे 10 मुलांना ऑल इंडिया रँक यादीत जागा मिळते.

सीए फाउंडेशन कोर्स पेपर चा निकाल जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये जाहीर केला जातो. फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी केल्यानंतर तीन वर्षाच्या आत आपल्याला ही परीक्षा पास होणे आवश्यक असते. आपल्याला जास्तीत जास्त सहा प्रयत्नात ही परीक्षा पास होणे गरजेचे आहे. सहा प्रयत्ना नंतर जर ही परीक्षा पास झाले नाही तर पुन्हा नोंदणी शुल्क भरून नोंदणी करावी लागते.

सीए बनण्याची दुसरी  पायरी म्हणजे सीए इंटर

सीए फाउंडेशन पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला सीए इंटर मध्ये प्रवेश मिळतो .यामध्ये आठ पेपर असतात व हे आठ पेपर दोन ग्रुप मध्ये विभाजन केलेले असतात. इंटर चे पेपर हे लेखी स्वरूपाचे असतात ते पास होण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक ग्रुपमध्ये दोनशे गुण मिळवणे गरजेचे आहे. व प्रत्येक पेपरमध्ये 40 गुण. इंटर परीक्षा पास झाल्यानंतर सीए फायनल ला जाण्याआधी विद्यार्थ्याला तीन वर्ष प्रक्टिकल ट्रेनिंग व आर्टिकल शिप करावी लागते व नंतर तो विद्यार्थी  सीए फायनल मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र होत असतो.

इंटरमिजिएट कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी बारावी नंतर फाउंडेशन कोर्स पास असणे आवश्यक आहे.

पदवीनंतर किंवा पदवीत्तर पदवीनंतर इंटरमिजिएट कोर्ससाठी नोंदणी करता येते व त्यासाठी फाउंडेशन कोर्स पास असणे बंधनकारक नसते.

इंटरमिजिएट कोर्सची मार्च व सप्टेंबर महिन्यामध्ये नोंदणी केली जाते व ही परीक्षा नोव्हेंबर आणि मे महिन्यामध्ये होते.

इंटरमिजिएट या परीक्षेसाठी नोंदणी वैधता ही चार वर्षे असते. म्हणजेच आपल्याकडे एकूण आठ प्रयत्न असतात या आठ प्रयत्नांमधील इंटरमिजिएट परीक्षा पास होणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर आपल्याला अभ्यासासाठी नऊ महिने दिले जातात या नऊ महिन्यांमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो.

इंटरमिजिएट परीक्षेचा पेपर हा दोन विभागांमध्ये असतो पहिल्या गटामध्ये शंभर गुणांसाठी चार विषय असतात .तसेच दुसऱ्या विभागांमध्ये देखील 100 गुणांचे चार विषय असतात.

गट एक

  • पेपर1 अकाउंटिंग 100 गुणांसाठी
  • पेपर 2 कार्पेट लॉज अँड अदर लॉज पार्ट वन कंपनी लो गुणांसाठी पार्ट टू आदर लोटस 40 मार्क
  • पेपर थ्री ई कॉस्ट अंड मॅनेजमेंट अकाऊंट
  • पेपर फोर टॅक्सेशन सेक्शन ए इन्कम टॅक्स लॉ साठ मार्क सेक्शन बी इन डायरेक्ट एक्सेस 40 मार्क.

गट 2

  • पेपर5 ॲडव्हान्स अकाउंटिंग शंभर मार्क
  • पेपर सिक्स ऑडिटिंग अँड अशुरन्स
  • पेपर सेवेन एंटरप्राइज इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट पार्ट वन अँड प्राईस इन्फोर्मेशन सिस्टम पन्नास मार्क पार्ट टू स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पन्नास मार्क
  • पेपर 8 फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स ऑफ फायनान्स शंभर मार्क
  • पार्ट वन फायनान्शियल मॅनेजमेंट पार्ट टू इकॉनॉमिक्स ऑफ फायनान्स

इंटरमिजिएट कोर्ससाठी या दोन्ही ग्रुप ची एकत्र एक्झाम फी 27200 इतकी आहे .ज्यामध्ये नोंदणी शुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी असते. ही परीक्षा पास झाल्यानंतर सीए फायनल किंवा अंतिम ह्या साठी नोंदणी करता येते.

आता सीए बनण्याची शेवटची पायरी सीए अंतिम

इंटरमिजिएट कोर्स झाल्यानंतर आर्टिकलशिप साठी तुम्ही नोंदणी करू शकता .इंटरमिजिएट या कोर्समध्ये दोन्ही पार्ट पैकी एकही पार्ट क्लिअर असेल तरी तुम्ही आर्टिकलशिप साठी नोंदणी करू शकता .आर्टिकलशिप ही तीन वर्षासाठी असते व सीए होण्याचा आर्टिकलशिप हा एक अविभाज्य भाग आहे. आर्टिकलशिप सुरू असताना तुम्हाला विद्या वेतन मिळत असते. आर्टिकलशिप चे अंतिम सहा महिने राहिले असताना तुम्ही अंतिम परीक्षेसाठी नोंदणी देखील करू शकता.

सीए अंतिम यासाठी नोंदणी करण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नसते. मात्र परीक्षा देण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अतिशय आवश्यक असते. फायनल ही अंतिम परीक्षा मे व नोव्हेंबर या महिन्यांमध्ये प्रत्येक वर्षी होत असते. अंतिम परीक्षेसाठी नोंदणी पात्रता पाच वर्षाची असते. सीए फायनल साठी एकूण परीक्षा शुल्क हे 32300 रुपये असते.

सीए अंतिम परीक्षा ही दोन विभागांमध्ये विभागलेली असते ज्यामध्ये तुम्हाला 40 % मार्क प्रत्येक विषयात किंवा एकत्रित 50 % गुण असणे आवश्यक असते व अशा विद्यार्थ्यांना फायनल पास किंवा अंतिम पास समजला जातो.

सीए अंतिम परीक्षा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निकाल जाहीर केला जातो.

  • सीए फायनल या साठी विषयांची यादी
  • पेपर वन फायनान्शिअल रिपोर्टिंग
  • पेपर टू स्टैंडर्ड फायनान्शियल मॅनेजमेंट
  • पेपर 3 ऍडव्हान्स ग्रीटिंग प्रोफेशनल एथिक्स
  • पेपर फॉर कॉर्पोरेट आणि इकॉनोमिक लॉस
  • पेपर फास्टट्रॅक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अंड परफॉर्मन्स एवल्युएशन
  • पेपर सिक्स ए रिस्क मॅनेजमेंट
  • पेपर सिक्स बी फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड कॅपिटल मार्केट्स
  • पेपर सिक्स सी इंटरनॅशनल टॅक्सेशन
  • पेपर सिक्स डी इकॉनोमिक लॉ
  • पेपर सिक्स ई ग्लोबल फायनान्शियल स्टॅंडर्ड
  • पेपर सिक्स एफ मल्टिपल अंड नरी केस स्टडी
  • पेपर सेवेन डायरेक्ट टॅक्स लॉ अंड इंटरनेशनाल टॅक्सेशन
  • पेपर एट इनडायरेक्ट टॅक्स लॉ

सीए होण्याच्या तीन परीक्षांमधून सीए अंतिम ही परीक्षा कठीण मानली जाते. ही परीक्षा पास होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व सरावाची गरज असते.

सीए या कोर्सचा कालावधी तीन ते चार वर्ष असतो.

सीए कोर्स विषयी सतत विचारले जाणारे प्रश्न

सीए या कोर्सचा अभ्यासक्रम कोणा द्वारे चालवला जातो?

“इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया”(ICAI) यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम चालवला जातो.

सीए कोर्स केल्यानंतर पगार किती असतो ?

  • आपल्या देशात सीए चे वेतन हे त्याच्या कौशल्यावर व अनुभवावर अवलंबून असते. चार्टर्ड अकाऊंट वार्षिक 7.25 लाख
  • वित्तीय अधिकारी वार्षिक 3500000
  • सहाय्यक खाते व्यवस्थापक 500000
  • आर्थिक विश्लेषक 600000 आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पगार पात्रतेनुसार 75 लाखांचे पॅकेज सुद्धा दिले जाते.

सीए हा कोर्स केल्यानंतर पुढील अभ्यासक्रम कोणता?

तुम्हाला माहितच आहे की अभ्यास हा कधीच संपत नाही, जर तुम्हाला CA नंतर पुढील अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, वकील, CIMA, CFA करू शकता.

सीए हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कुठे कुठे उपलब्ध होतील?

सीए हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या नावासमोर सीए ही पदवी लागते. आपण कोणत्याही प्रतिष्ठित कंपनीत चार्टर्ड अकाउंट म्हणून काम करू शकतो.तसेच

तुम्ही कन्सल्टन्सीचे काम करू शकता. या व्यतिरिक्त, आपण बँकिंग, कर व्यवस्थापन, लेखापरीक्षण, आर्थिक, लेखा या नोकरीच्या पदांवर करिअर करू शकता.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

सीए होण्यासाठी काय काय करावे लागते?

सीए होण्यासाठी तीन स्तरांतून जावे लागते. प्रथम सीपीटी ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात पास झाल्यास ‘आयपीसीसी’ ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर तीन वर्षे इंटर्नशिप करावी लागते आणि फायनलनंतर सीए होता येते

CA मध्ये किती विषय आहेत?

सीए इंटर परीक्षेच्या अभ्यासक्रमात आठ विषय असतात. ही सीए पातळी दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. परीक्षेच्या पहिल्या गटात एका उमेदवाराला चार पेपर्स आणि दुसऱ्या गटातील चार पेपर्सलाही चार पेपर्सचा सामना करावा लागतो. सीए फायनल लेव्हल देण्यासाठी, सीए उमेदवारांनी इंटरमीडिएट लेव्हल पास करणे आवश्यक आहे.


कॉमर्समध्ये CA म्हणजे काय?

चार्टर्ड अकाउंटंट (CA) हा एक आर्थिक व्यावसायिक असतो जो काही लेखा प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र असतो . हे युनायटेड स्टेट्स व्यतिरिक्त व्यक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूर केलेल्या लेखा पदनामाचा संदर्भ देते.

CA साठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो?

सीए फाऊंडेशन अभ्यासक्रम चार पेपरमध्ये विभागलेला आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमाच्या या स्तरावर पात्र होण्यासाठी चारही पेपर्स पास करावे लागतात. विद्यार्थी सीए फाऊंडेशनच्या अभ्यासक्रमांतर्गत लेखांकन, व्यवसाय कायदे, व्यवसाय गणित आणि व्यवसाय अर्थशास्त्राची तत्त्वे शिकतात.

Leave a Comment