जर्नालिझम कोर्सची संपूर्ण माहिती Journalism Course Information In Marathi

Journalism Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भरपूर मुले ही आपल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम घेत असतात. पण काही मुले ही अशी असतात जे समाजात चाललेल्या वाईट गोष्टींविषयी खूप गंभीर असतात. समाजात चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आपण कसा विळखा  घालू शकतो असा विचार करत असतात .त्यामुळे तो असा अभ्यासक्रम बघत असतो की त्याचा उपयोग करून तो समाजात भ्रष्टाचारा बरोबर वाईट गोष्टींविषयी आवाज उठवू शकेल. या गोष्टींचा विचार करत काही मुले ही पोलीस भरती, सोशल वर्क ,पत्रकारिता यांसारखे मार्ग निवडत असतात.

Journalism Course Information In Marathi

जर्नालिझम कोर्सची संपूर्ण माहिती Journalism Course Information In Marathi

मी आज तुम्हाला अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे .जो कोर्स केल्यानंतर तुम्ही समाजात चाललेल्या वाईट गोष्टींबद्दल कडकडून टीका करू शकता व आपल्या लेखनातून लोकांना प्रभावित करू शकता. आता तुम्हाला थोडी लिंक लागली असेल की मी कोणत्या पोस्ट बद्दल सांगत आहे .

मी तुम्हाला ह्या कोर्सची  माहिती सांगणार आहे तो कोर्स म्हणजे पत्रकारिता ज्याला आपण इंग्लिश मध्ये जर्नालिझम असे म्हणतो. पत्रकारांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. 6 जानेवारी हा दिन पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो . पत्रकारिता हे क्षेत्र जितके वाटते तितके सोपे नक्कीच नाही!! सामाजिक भाग, सामाजिक बांधिलकी, ज्ञान व वेळेचे महत्त्व असणे आवश्यक आहे.

लोकशाहीला बळकट बनवण्यासाठी पत्रकारीता ही तेवढीच प्रामाणिक निर्भीड व सर्वात महत्त्वाचे म्हणजे निपक्षपाती असायला हवे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हा ओळखला जातो. आता या पोस्टमध्ये मी तुम्हाला  पत्रकार होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते. पत्रकार म्हणजे कोण? पत्रकार होण्या साठी कोणता कोर्स करावा लागतो. त्याचा कालावधी किती असतो. या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

चांगला पत्रकार होण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये विशेष असे गुण असणे आवश्यक आहेत. या क्षेत्रात काम करण्याचा व्यक्तीकडे चांगले कौशल्य व दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीकडे बहुश्रुतता ,विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, आपले स्वतःचे मत स्पष्ट शब्दात मांडणे ,उत्कृष्ट आकलन क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, कोणताही प्रसंग असो प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी असली पाहिजे .त्या व्यक्ती सामाजिक भान व वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी असली पाहिजे.

इंग्रजी ,हिंदी ,मराठी याच बरोबर शक्य तितक्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे पत्रकारिता करताना त्या व्यक्तीला याचा जेणेकरून उपयोग होईल. पत्रकारिता करण्यासाठी व्यक्तींमध्ये वृत्तपत्र व व्यवसायाची आवड व त्या विषयीचे थोडे ज्ञान असणे गरजेचे आहे .तसेच पत्रकारिता करताना प्रवास व चौफेर ,चौकस बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे. तसेच कष्ट करण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे .

पत्रकार होण्यासाठी बातम्यांचे चांगले स्त्रोत त्यांच्याकडे उपलब्ध असायला हवे कारण रोज समाजात नवीन घटना घडत असतात व या घडामोडींमुळे जनतेपर्यंत पोहोचविण्याची मुख्य भूमिका पत्रकार पार पाडत असतो .तो प्रत्येक क्षेत्रातील घटना व माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो.त्यामुळे पत्रकाराला बातमी मूल्यांचे योग्य ज्ञान असायला हवे .

आता आपण पाहूयात पत्रकार म्हणजे नक्की कोण?

पत्रकार ही अशी एक व्यक्ती असते जी मजकूर, ऑडिओ किंवा चित्राच्या स्वरूपात माहिती संकलित करते व त्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून बातमी तयार करत असते . नंतर ती बातमी लोकांपर्यंत पोहोचते. पत्रकाराने प्रामुख्याने केलेल्या या कार्याला पत्रकारिता असे म्हणतात.

आज आपण पत्रकारिता या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे काय पत्रकार बनण्यासाठी कुठलीही परीक्षा द्यावी लागते मास् कम्युनिकेशन व मास मीडिया याविषयी संपूर्ण कोर्सची माहिती आपण पाहणार आहोत.

प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता काय असते कॉलेजेस कोणती किती कालावधी लागतो हे सर्व आपण जाणून घेऊयात.

जर्नालिझम/ मास कम्युनिकेशन म्हणजे काय?

मास कम्युनिकेशन म्हणजे मोठ्या संख्येने एकाच वेळेस जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी वापरले जाणारे माध्यम.

कम्युनिकेशन मीडिया हे केवळ पत्रकारिता साठी वापरले जात नाही व त्याचबरोबर बातम्या गोळा करणे करता येतात व त्यांचा अहवाल सादर करता येतो चित्रपट दिग्दर्शक व निर्माते देखील याचा वापर करतात. मास मीडियाचा वापर कार्यक्रम व्यवस्थापक व जनसंपर्क तसेच जाहिरात करण्यासाठी या इतर क्षेत्रांमध्ये देखील याचा वापर केला जातो.

काळात मास कम्युनिकेशन व मास मीडिया याचे चित्र हे बरेच बदललेले आपण पाहतो. सध्याच्या काळात मास् कम्युनिकेशन व मीडिया हे जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेले आपण पाहतो. मग ते वर्तमानपत्र असो किंवा आपलं टेलिव्हिजन असो आजकाल स्मार्टफोनमुळे प्रत्येक काम हे सहज होऊ शकतं. इंटरनेट असल्यामुळे आपण हवी ती माहिती हवी तेव्हा मिळवू शकतो आज देखील इंटरनेट मुळेच मास्क कम्युनिकेशन व मास मीडिया हे एक लोकप्रिय माध्यम बनू शकले आहे.

यामुळे युवकांसाठी बऱ्याचशा संधी उपलब्ध झाल्या आहेत नुसती पत्रकारिता नव्हेच तर इतर क्षेत्रात देखील बऱ्याचशा संधी युवकांना उपलब्ध झालेल्या आहेत.

जर्नालिझम या कोर्ससाठी प्रवेश कसा घ्यावा ?

या क्षेत्रात देखील बरेचसे कोर्स उपलब्ध आहेत काही कोर्स हे ग्रॅज्युएशन कोर्स आहेत तर काही कोर्स हे पदवीधर व उच्च शिक्षणासाठी असतात त्याचबरोबर ह्या कोर्समध्ये आपण डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकतो.

डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड मिडिया

डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड मीडिया हा एक दोन वर्षाचा कोर्स असून हा कोर्स आपल्याला बारावी नंतर करता येतो तुम्ही कुठल्याही शाखेतून बारावी पूर्ण करून हा कोर्स करू शकता.

बी.ए इन मास कम्युनिकेशन अँड मीडिया किंवा बीए जर्नालिझम

बी.ए इन मास कम्युनिकेशन मीडिया हा कोर्स तुम्ही बारावीनंतर करू शकता यासाठी तुम्हाला तुमची बारावी कुठल्याही क्षेत्रातून उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

एम.ए इन मास कम्युनिकेशन अँड मिडिया

एम.ए इन मास कम्युनिकेशन अँड मिडिया म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन अँड मिडिया हा कोर्स तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करू शकता त्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे हे अनिवार्य असते.हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला बी.ए इन मास कम्युनिकेशन मीडिया मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागते त्यानंतरच तुम्ही ह्या कोर्सला प्रवेश करू शकता.

काही प्रसिद्ध मास कम्युनिकेशन अँड मीडिया कोर्स ची नावे खाली दिली आहेत

 • बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन
 • बॅचलर ऑफ जर्नालिझम
 • बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन
 • मास्टर ऑफ जर्नालिज्म अँड मास्क कम्युनिकेशन
 • मास्टर ऑफ जर्नालिझम
 • मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन
 • पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन

आता आपण पाहूयात पत्रकारांचे किती प्रकार असतात व ते कोणते असतात

तसे पाहायला गेले तर पत्रकार हा एकच असतो मात्र विविध क्षेत्रांमध्ये तो काम करतो त्यानुसार त्याला विभागले गेलेले असते.

शोध पत्रकार-

शोध पत्रकार म्हणजेच इंग्रजीमध्ये ओळखले जाणारे स्पाय हे कोणत्याही विषयाबद्दल खोल संशोधन करून त्यानंतर त्यावर बातमी तयार करतात व ती वर्तमानपत्रात छापली जाते.

क्रीडा पत्रकार-

साऱ्या जगभर क्रीडा क्षेत्रातील झालेल्या प्रसिद्धीचे कारण क्रीडा पत्रकार असतात आज आपण पाहायला गेलो तर क्रीडा हे क्षेत्र नुसतेच मनोरंजनाचे साधन नव्हे तर आपल्या शारीरिक स्वास्थ्य याचा देखील एक अविभाज्य भाग आहे आणि ह्याच क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी क्रीडा पत्रकाराचा वापर केला जातो.

मनोरंजन क्षेत्रातील पत्रकार-

आपण पाहतो की वर्तमानपत्रात एक पुरवणी मुलांसाठी मजेदार गोष्टी व काही ठिकाणी नट नटी विषयी मनोरंजक माहिती छापली जाते मनोरंजन क्षेत्रातील पत्रकार चित्रपटांचे प्रचार व प्रसार करतात.

आर्थिक पत्रकार-

ज्या पत्रकारांना सेन्सेक्स व शेअर मार्केट या क्षेत्राबद्दल जास्तीत जास्त ज्ञान असते ते पत्रकार आर्थिक पत्रकार म्हणून ओळखले जातात व हे आपल्याला शेअर मार्केटमधील उत्कृष्ट कंपनी कुठली व कोणत्या कंपनीत इन्वेस्ट करावे  याची माहिती देतात.

गुन्हेगारी या क्षेत्रात काम करणारे पत्रकार-

आजच्या युगात होत असणाऱ्या बारा बऱ्याचशा अमान्य घटना म्हणजेच हत्या बलात्कार अपहरण भ्रष्टाचार मर्डर केसेस चोऱ्या मारा व अशा अनेक विषयांबद्दल जनजागृती करणारे पत्रकार व त्याविरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार म्हणजेच गुन्हेगारी विरुद्ध काम करणारे पत्रकार.

बाल पत्रकार-

वर्तमानपत्रांमध्ये आपण बालमित्र ही पुरवणी नक्कीच पाहिली असेल या पुरवणीत लहान मुलांसाठी बऱ्याचशा मजेदार कथा व काही कोडी देखील असतात व तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या संगोपनासाठी काय चांगले व काय वाईट हे देखील त्यात दिलेले असते बालपत्रकार हे आपल्याला ह्या सर्व विषयांबद्दल माहिती देतात.

महिला पत्रकार-

आजच्या युगात महिलांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचार म्हणजेच बलात्कार या विषयांबद्दल महिला पत्रकार ह्या पीडित महिलांच्या आधारासाठी लढण्याचे काम करतात त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे काम हे त्यांचे असते व त्यांच्या विरुद्ध होत असलेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला जातो.

फ्रीलान्स पत्रकार म्हणजे काय फ्रीलान्स पत्रकाराचे काम काय असते ?

फ्रीलान्स पत्रकार म्हणजे स्वतंत्र पत्रकार व कुठल्याही एका न्यूज चॅनल साठी तो पत्रकार काम करत नाही तो कधीही व कुठेही आपली बातमी देऊ शकतो. फ्रीलान्स पत्रकार हा कुठल्याही एका वर्तमानपत्रात व कुठल्याही एका न्यूज चॅनल साठी तो काम करत नाही. न्यूज कंपनी जेव्हा लागेल तेव्हा फ्री लाईन्स पत्रकार यांना हायर करू शकतात.

जर्नलिझम ह्या कोर्सचा अभ्यासक्रम

 • इंट्रोडक्शन टू जर्नालिझम
 • इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन
 • एडिटिंग टेक्निक्स
 • मीडिया लॉस अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन
 • रिपोर्टिंग मेथड
 • मीडिया मॅनेजमेंट
 • ऍडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन
 • हिस्टरी ऑफ जर्नालिझम व असे बरेचसे विषय जर्नलिजन ह्या कोर्स द्वारे आपल्याला शिकवले जातात.

पत्रकारिता साठी आपल्याला नोकरी कशी व कुठून मिळू शकते ?

जर तुम्हाला पत्रकार म्हणून नोकरी करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याचा अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्ही सहा महिने इंटर्नशिप करावी लागते किंवा त्यासंबंधीत एखादा कोर्स पूर्ण असणे हे फार गरजेचे असते त्यानंतर तुम्हाला एखाद्या वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनल वर नोकरीचा अर्ज करता येतो.

पत्रकाराचे वेतन किती असते ?

पत्रकाराचे वेतन हे कधीही एकसारखे नसते ज्या क्षेत्रातील पत्रकार म्हणून तुम्ही कार्यरत आहात त्यानुसार तुमचे वेतन ठरविले असते त्यामुळे फिक्स वेतन सांगणे हे जरा कठीण आहे मात्र सुरुवातीला पंधरा ते वीस हजार हे तुमचे वेतन असेल.

पत्रकाराचे कर्तव्य काय असते ?

समाजात घडत असलेल्या विकृत घडामोडींबद्दल म्हणजेच चोरी लुटमार्ट भ्रष्टाचार हत्या अपहरण बलात्कार व महिलांविषयी घडत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही एका पत्रकाराची जबाबदारी असते. पत्रकारांनी निपक्षपातपणे कोणाचीही बाजू न घेता आपली बाजू मांडली पाहिजे.

भारतातील दहा उत्कृष्ट जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनची कॉलेजेस

 • एशियन कॉलेज ऑफ जर्नलिजम, चेन्नई
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन
 • सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे
 • सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट, पुणे
 • लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन दिल्ली युनिव्हर्सिटी
 • ख्रिस्त युनिव्हर्सिटी, बेंगलुरु
 • मद्रास ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई
 • सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
 • युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई
 • युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली
 • नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी
 • द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अँड ऑस्टिन

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

जर्नालिझम/ मास कम्युनिकेशन म्हणजे काय?

जनसंवाद आणि पत्रकारिता या दोन्हींचे काम संपूर्ण जगासमोर कल्पना मांडणं हे आहे. पत्रकारिता ही बातमी आणि पेपरवर्कशी संबंधित आहे, म्हणजे वर्तमानपत्रं, मासिकं, मासिकं, वर्तमानपत्रं इ. या सर्वांचा पत्रकारितेत समावेश आहे. वृत्तपत्र किंवा न्यूजरूमसाठी रिपोर्टिंग करणं पत्रकारितेच्या अंतर्गत येते.

पत्रकार होण्यासाठी काय करावे?

पत्रकार बनण्यासाठी बारावीनंतर आपण मास कम्युनिकेशन मध्ये तसेच जर्नलिझम (bachelor of mass communication,bachelor of journlism मध्ये पदवी घेणे आवश्यक असते. मग त्यानंतर आपल्याला जर मास्टर करायचे असेल तर आपण मास कम्युनिकेशन मध्ये मास्टरची पदवी(master of journalism देखील घेऊ शकतो.

पत्रकारिता आणि जनसंवाद ही एकच गोष्ट आहे का?

मास कम्युनिकेशन ही एक एकत्रित संज्ञा आहे जी PR, जाहिरात, चित्रपट निर्मिती आणि व्यवस्थापन इत्यादींसह विविध प्रकारच्या पत्रकारितेचा समावेश करते . तर, पत्रकारिता ताज्या बातम्या आणि जागतिक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित करते.

पत्रकार होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

तुमच्याकडे 3/4/5 वर्षांच्या कालावधीची वैध अंडरग्रेजुएट पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेकडून मिळवलेली असणे आवश्यक आहे. सर्व प्रवाह आणि शाखांमधील उमेदवार भारतातील पत्रकारिता संस्थांद्वारे ऑफर केलेल्या पीजी पत्रकारिता अभ्यासक्रमांचा पाठपुरावा करण्यास पात्र आहेत.

पत्रकार होणे कठीण आहे का?

पत्रकारिता हे एक रोमांचक करिअर आहे जे तुम्हाला कथांच्या शोधात जगभर घेऊन जाऊ शकते, परंतु ते कठोर परिश्रम देखील आहे . ज्यांना शिकण्याची आवड आणि संवादाची प्रतिभा आहे अशा व्यक्तींसाठी करिअर योग्य आहे.

Leave a Comment