टॅली कोर्सची संपूर्ण माहिती Tally Course Information In Marathi

Tally Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले ही दहावी-बारावी नंतर मोठ्या मोठ्या कोर्सची स्वप्ने पाहत असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे या वेगवेगळ्या कोर्सची फी ,राहण्या-खाण्या चा खर्च हा कधीकधी परवडणारा नसतो. आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मुले या कोर्सकडे दुर्लक्ष करतात. म्हणून एखादा कोर्स करून कोठेतरी नोकरी मिळून पैसा कमवणे असेच त्यांचे भविष्य असते. त्यासाठी मी तुम्हाला आज अशा एका कोर्सची माहिती सांगणार आहे.

Tally Course Information In Marathi

टॅली कोर्सची संपूर्ण माहिती Tally Course Information In Marathi

हा कोर्स केल्यानंतर अकाउंटिंग क्षेत्रात तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते व तेही कमी खर्चात व कमी कालावधीत. या कोर्सचे नाव आहे Tally!!!

Tally हा एक अकाउंटिंग कोर्स आहे .मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला कोणताही कोर्स करून नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही Tally हा कोर्स करू शकता. अल्प कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रमा पैकी एक अभ्यासक्रम आहे.

Tally ERP 9 आजच्या काळात आधुनिक व प्रगत हिशोब अभ्यासक्रम पैकी एक अभ्यासक्रम आहे. आपल्या सर्वांसाठी MS OFFICE जसे सर्व क्षेत्रात उपयोगी आहे. त्याचप्रमाणे Tally सुद्धा सर्व क्षेत्रात महत्त्वाचे आहे .

कोणतेही क्षेत्र असो आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवाव्या लागतात .हा कोर्स केल्यानंतर तुम्ही अकाउंटिंग क्षेत्र,फर्म किंवा कोणत्याही खाजगी कंपनीत सहज नोकरी मिळवू शकता. टॅली ऑपरेटर ,टॅली एक्झिक्यूटिव्ह व अकाउंटंट यांना बाजारात खूप मागणी आहे. त्यामुळे येथे आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन तुम्ही चांगला पगार घेऊन पैसे कमवू शकता व तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हिशोब ,बुककिपिंग, टॅक्सेशन, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, बिलिंग इत्यादी बाबत माहिती व या विषयामध्ये तज्ञ होण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. सर्व देण्याघेण्याचे जे आर्थिक व्यवहार असतात त्याची नोंद ठेवणे .वेगवेगळ्या कंपन्यांसोबत चे रेकॉर्ड बीले ,रिसीट ,जमाखर्च केलेल्या नोंदी ठेवण्यासाठी वापरले जाणारे नावाजलेले सॉफ्टवेअर आहे.

आता आपण Tally म्हणजे काय हे पाहुयात!!!

टॅली याचा फुल फॉर्म Transaction Allowed In a Linear Line Yard

टॅली हा कोर्स एक असून त्याच्या आवृत्या वेगवेगळे आहेत टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टॅली हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. ही कंपनी भारतीय आहे . याचे मुख्यालय कर्नाटक मधील बेंगळुरू येथे आहे कंपनीने सांगितल्याप्रमाणे हे सॉफ्टवेअर 1.8 दशलक्ष हून अधिक ग्राहक वापरतात.

सुरुवातीला रोजच्या व्यवहारातील आकडेमोड व हिशोब व जमाखर्चाची नोंद ठेवण्या पुरतेच मर्यादित कामासाठी हे सॉफ्टवेअर बाजारात आले होते. मात्र त्याच्या अनेक सुधारित आवृत्या निघाल्यानंतर आता हे वित्तीय संस्था ,ट्रस्ट व इतर सोसायटीच्या व बँकांच्या ताळेबंद अहवाल यासाठी वापरले जात आहे.

त्या वापरून आर्थिक वर्षाची हिशोब, जुळवणी, बॅलन्स शीट ,प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इत्यादी अगदी सहज रित्या बनवता येतात. यामुळे या सॉफ्टवेअरमुळे कामाचा वेळ वाचतो .त्यामुळे सीए व अकाऊंट यांना याचा मोठा फायदा झालेला आहे टॅली सोल्युशन्स कंपनीची खालील चार उत्पादने आहेत.

Tally ERP 9
Tally Developer 9
Shopper 9
Tally Server 9

श्याम सुंदर गोयंका आणि त्यांचा मुलगा भारत गोयंका यांनी 1986 मध्ये एक सहकारी संस्था स्थापन केली. 1991 मध्ये श्यामसुंदर गोयंका हे एक कच्चामाल व मशीन पुरवणारी कंपनी चालवत होते. त्यांचा मुलगा भरत गोयंका हे एक गणित पदवीधर होते. त्यांनी त्यांना आपल्या व्यवसायाशि संबंधित आर्थिक व्यवहार चोख व सुरळीत ठेवण्यासाठी एक सॉफ्टवेअर शोधण्यास सांगितले. म्हणजेच एक बिजनेस ॲप्लिकेशन तयार करण्यास सांगितले जे आपल्या व्यवसायासाठी आर्थिक खाती हाताळण्यासाठी उपयोगी पडेल.

त्याला अनुसरून त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले ती आवृत्ती एम एस डॉस या नावाने सॉफ्टवेअर लॉन्च केले. त्यात केवळ मूलभूत लेखाकार्य होते. आणि त्याचे नाव पिट्रॉनिक वित्तीय लेखाकार होते. कंपनीने 1999 मध्ये औपचारिकपणे त्याचे नाव बदलून त्यांनी टॅलीसोल्युशन्स असे ठेवले.

2006 मध्ये त्यांनी टॅली 8.1 ही समांतर बहुभाषिक आवृत्ती सुरु केली आणि त्यांनी टॅली 9 ही सुद्धा आवृत्ती सुरू केली. 2009 मध्ये कंपनीने Tally ERP 9 सुरू केले. 1915 मध्ये आपल्या व्यवसायातील भागीदारांना वर्गीकृत आणि प्रमाणित करण्यासाठी वृद्धि नावाचा एक कार्यक्रम लॉंच केला. 2015 मध्ये टॅली सोल्युशन ने Tally ERP 9 व 0.5 रिलीज करण्याची घोषणा केली.

2016 पर्यंत या कंपनीकडे एक दशलक्ष ग्राहक होते .2017 मध्ये कंपनीने आपले अद्यावत असलेले जीएसटी अनुपालन सॉफ्टवेअर लॉन्च केले. Tally हा कोर्स ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने केला जातो. आपण जर हा कोर्स ऑफलाइन पद्धतीने केला तर तुम्हाला तीन हजार ते सात हजार रुपये शुल्क आकारावे लागते.

जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हा कोर्स करणार असाल तर ही फी कमी किंवा जास्त ही असू शकते. ऑनलाइन मध्ये भरपूर अशा वेबसाइट आहेत .ज्या तुम्हाला हे सॉफ्टवेअर वापरण्यास शिकवतात .परंतु ऑनलाईन कोर्स करण्याआधी आपल्याला सर्टीफिकीट भेटेल का याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

Udemy यांसारख्या वेबसाइटवर तुम्ही 500 ते 1000 रुपये पर्यंत हा कोर्स करू शकतात. Udemy तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टीफिकीट पण देते. Tally हा कोर्स कोणताही विद्यार्थी करू शकतो. प्रथम आपल्या मनातली ही शंका काढून टाका कि कॉमर्स फिल्ड मधलेच विद्यार्थी हे Tally कोर्स करू शकतात .कोणत्याही फिल्ड मधला विद्यार्थी हा कोर्स दहावी व बारावीनंतर करू शकतो.

Tally या कोर्समध्ये डिप्लोमा व प्रमाणपत्र असे दोन अभ्यासक्रम असतात. डिप्लोमा अभ्यासक्रम हा एक ते दोन वर्षाचा असून प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा दोन ते चार महिन्यांचा असतो. दहावी व बारावी मध्ये आपल्याला कमीत कमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Tally हा कोर्स केल्यानंतर आपल्याला होणारा फायदा

तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही कमी कालावधीत Tally हा कोर्स करून नोकरी मिळवू शकता. तसेच स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. आजच्या परिस्थितीत प्रत्येक व्यवसायात आर्थिक देवाण-घेवाण याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक व्यवसायात इन्कम टॅक्स साठी प्रत्येक गोष्टीची रीतसर हिशोब ठेवावा लागतो .त्यामुळे अशा लोकांना Tally माहीत असणाऱ्या व्यक्तींची खूप गरज असते .

त्यामुळे या ज्यांना Tally विषयी ज्ञान आहे. अशा लोकांची मागणी असल्यामुळे तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीत, फर्ममध्ये किंवा मोठ्या व्यवसाय दाराकडे सहज नोकरी मिळेल. तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही स्वतः Tally कोचिंग क्लास सुरू करून त्यात मुलांना शिक्षण देऊन पैसे कमवू शकता.

तुम्ही त्याचे शिक्षण घेतले असेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुमच्या व्यवसायाचा हिशोब तुम्ही स्वतः ठेवू शकता .आज काल Tally अभ्यासक्रमात जीएसटीचे शिक्षण दिले जात आहे .त्यामुळे आपण एखाद्याला जीएसटी भरायचा असेल तर आपण त्यांचा जीएसटी रिटर्न फाईल तयार करून देऊन पैसे कमवू शकता.

Tally या कोर्स मध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे:-

Tally या कोर्स मध्ये जीएसटी ,टीडीएस ,इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, अकाऊंट बँकिंग टॅक्सेशन बिलिंग इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी या विषयांचा अभ्यास केला जातो. व्यवसाय व्यवस्थापन आणि लेखाविषयक मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे .त्यानुसार पुढील अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे.

  • हिशोब हे या अभ्यासक्रमातील प्राथमिक शिक्षण आहे.
  • वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी
  • कंपनीची निर्मिती,ताळेबंद,लेजर
  • बँक सलोखा,पत मर्यादा,
  • कर आकारणीची तत्त्वे,
  • TDS आणि त्याची गणना,
  • डेटा सिंक्रोनाइझेशन, प्रॉफिट अँड लॉस,स्टॉक विश्लेषण आणि हस्तांतरण,
  • व्हॅट आणि उत्पादन शुल्क समजून घेणे.
  • विक्री आणि खरेदी केलेल्या ऑर्डरची प्रक्रिया
  • कॉन्ट्रा, जर्नल आणि मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर

टॅली कोर्स केल्यानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी:-

  • लेखा लिपिक
  • अकाउंटिंग असोसिएट
  • लेखा सहाय्यक
  • लेखा कार्यकारी
  • लेखाधिकारी
  • लेखा पर्यवेक्षक
  • टॅली ऑपरेटर
  • टॅली अकाउंट्स मॅनेजर
  • टॅली अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह
  • Tally सह सेवा समन्वय
  • टॅली कनिष्ठ लेखापाल
  • टॅक्स अकाउंटंट
  • मुनीम
  • गुंतवणूक बँकर

भारतातील शीर्ष महाविद्यालये आहेत जी विद्यार्थ्यांना प्रमाणित टॅली कोर्स ऑफर करत आहेत.

  1. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाउंटंट, मुंबई
  2. मद्रास ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई
  3. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
  4. सेंट तेरेसा कॉलेज, केरळ
  5. भोपाळ स्कूल ऑफ सोशल सायन्स, भोपाळ
  6. महिला ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई
  7. वायएमसीए इन्स्टिट्यूट ऑफ ऑफिस मॅनेजमेंट, नवी दिल्ली

प्रश्न उत्तर

• Tally कोर्सेसाठी पात्रता निकष काय आहे?
– जर तुम्ही पदवीनंतर Tally कोर्से करत असाल आहेत तर तुमचे शिक्षण हे कॉमर्स मध्ये झालेले असावे.

• Tally कोर्से केल्यावर जॉब कुठे भेटू शकतो?
– ह्या प्रश्नाचे उत्तर तेव्हा भेटेल जेव्हा तुम्ही Tally कोर्स कधी करत आहात त्यावर अवलंबून आहे.जर तुम्ही पदवीच्या आधी Tally कोर्से केला तर तुम्हाला जॉब भेटणे थोडे कठीण आहे कारण ते कंपनीच्या धोरणावर अवलंबून असते. तुम्ही तुमचा Tally कोर्से पूर्ण करून इंटर्नशिप करू शकता.

जर तुम्ही पदवीचे शिक्षण घेतलेलेअसेल तर तुम्हाला जॉब भेटणे शक्य आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मधून जॉब भेटू शकतो .

हे सुद्धा अवश्य वाचा :-

2 thoughts on “टॅली कोर्सची संपूर्ण माहिती Tally Course Information In Marathi”

Leave a Comment