दादाभाई नौरोजी यांची संपूर्ण माहिती Dadabhai Nauroji Information In Marathi

Dadabhai Nauroji Information In Marathi  दादाभाई नवरोजी हे एक समाज सुधारक होते. तसेच त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार नेहमीच केला. दादाभाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. यांच्याविषयी माहिती पाहूया.

Dadabhai Nauroji Information In Marathi

दादाभाई नौरोजी यांची संपूर्ण माहिती Dadabhai Nauroji Information In Marathi

जन्म व बालपण :

दादाभाई नवरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईतील एका गरीब पारशी कुटुंबात झाला. दादाभाई नवरोजी यांच्या वडिलांचे नाव नौरोजी पालनजी दोर्डी हे होते. तर आईचे नाव मानेबाई असे होते. दादाभाई चार वर्षाचे असतानाच, त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांची आई मानेकबाई यांनी केले. वडिलांचा हात डोक्यावरून उठल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांची आई अशिक्षित होती. परंतु त्यांनी आपल्या मुलाला इंग्रजीचे चांगले शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. दादाभाईंना चांगले शिक्षण देण्यात त्यांच्या आईचे विशेष योगदान होते.

शिक्षण :

एलफिस्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय या मधून शिक्षण घेऊन 1845 मध्ये ते पदवीधर झाले. 1850 साली एलफिस्टन महाविद्यालयात दादा भाईची गणित व तत्वज्ञान या विषयाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होते.

जीवन :

वयाच्या अकराव्या वर्षी दादाभाई यांचे लग्न सात वर्षाच्या गुलबाईशी झाले होते. त्यावेळी बालविवाह करण्याची पद्धत भारतात रूढ झाली होती. त्यांना तीन मुले होते. एक मुलगा व दोन मुली असे होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक यांच्या सुवर्णमध्य असणारे नेते होते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते इंग्रजाच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमचे सभासद बनविणारे ते पहिले भारतीय होते.

भारताच्या लुटीच्या सिद्धांताचे जनक सुद्धा तेच होते. 1883 साली ब्रिटिशांकडून त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ हा किताब देण्यात आला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते. रा. गो. भांडारकर यांचे आवडते प्राध्यापक होते. महंमद जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.

लंडन दौरा :

दादाभाई हे 1855-56 या काळात व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले. तेथे त्यांचा मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, कौन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थांशी जवळचा संबंध आला. 1865-66 पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

1865-76 या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईच्या लंडनला अनेकदा वारा झाल्यात 1865 साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्या सोबत दादाभाईंनी लंडन इंडिया सोसायटी ही संस्था स्थापली. 1960 पर्यंत तिचे अध्यक्ष सुद्धा होते. 1862 मध्ये दादाभाई कॉम अंड कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नवरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःची कंपनी उभारली.

1866 मध्ये त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. 1883 मध्ये भारतीय अर्थकारणाचा विषयी नेमलेल्या संसदीय समिती पुढे दादाभाईंनी साक्ष दिली. ही समिती देखील त्याच परिश्रमाचे फलित होते. दादाभाई नवरोजी हे जुलै, 1875 मध्ये मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिके- च्या शहरपरिषदेवर निवडून आले. 1876 मध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. नंतर दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले.

त्यानंतर त्यांनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व पत्करले. या वर्षाच्या अखेरीस दादाभाईंना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापकनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा लाभला 1902 साली दादाभाई लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पक्षांतर्फे सदस्य म्हणून निवडून आले.

कार्य :

दादाभाई नवरोजी हे भारताचे पितामह म्हटले जातात. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचा आहे. दादाभाई नौरोजी यांना भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याचे जनक मानले जाते. परकियांच्या वर्चस्वाखाली भारतातील आर्थिक घटकांच्या विशदीकरनाची नितांत आवश्यकता आहे.

हे त्यांनी आपल्या नंतरच्या अर्थशास्त्रज्ञ यांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. न्यायमूर्ती रानडे व नामदार गोखले आर्थिक विचारवंत यांनी परिपूर्ण चित्रातील काही भाग जरी सुधारले, तरीही त्या चित्राचा मोर्चा आकृतिबंध आढळ राहिला. त्यांनी केलेल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात निरनिराळे मंडळी, समित्या व संस्था यांमधून दिलेली व्याख्याने ‘दादाभाई नौरोजी स्पीचेस अँड रायटिंग’ या शीर्षकाने ग्रंथ झाली आहेत. ‘द राईट ऑफ लेबर’ या शीर्षकाने दादाभाईंनी औद्योगिक आयुक्ताची नेमणूक आणि कामगारांना संरक्षणाचा हक्क या दोन्ही संबंधी एक योजना प्रसिद्ध केली होती.

या योजनेचे अधिनियमात रूपांतर झाले असते तर सर्व वेतन धारकांना न्याय मिळाला असता आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली असती. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या आर्थिक प्रश्नाबाबत दादांनाही कठोर टीका करायचे प्रशासनावर करण्यात येणाऱ्या खर्चाची सुयोग्य वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती.

दुष्काळासारख्या संकटाचे निवारण करण्याच्या अथवा त्याबाबत प्रतिबंधक उपाय योजनाच्या कामासाठी सरकार फार कमी पैसे खर्च करते, असे दादाभाई यांचे मत होते. तसेच आर्थिक स्वयंपूर्णतेवर तसेच कुटीरउद्योगाच्या महत्त्वपूर्ण स्थानावर विश्वास होता. आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योग धंदा वाचून पर्याय नाही.

असे त्यांचे ठाम मत होते. देशातील महत्त्वाचे आणि मूलभूत उद्योगांच्या उभारणीसाठी प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करण्यास त्यांचा विरोध नव्हता. दादाभाई यांनी जमशेट, टाटा यांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्याचा वेळी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचे आवर्जून आवाहन केले होते. परदेशी प्रवासाचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर आणि चरित्रावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिम शिक्षण घेतल्यामुळे दादाभाईंना त्या शिक्षण पद्धतीबद्दल आदर होता.

ब्रिटिशांनी पश्चिमात्य शिक्षण पद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्रजांशी कृतज्ञ राहिले पाहिजे, अशी दादांची भावना होती आणि तिच्या पोटी त्यांनी अनेक हिंदी तरुणांना उच्च शिक्षकणार्थ परदेशी जाण्यास साहाय्य केले होते. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यामध्ये ग्रंथ व मित्र यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते.

दादाभाईंचा एक समाज सुधारक म्हणून नावलौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे हे त्यांना मान्य नव्हते. स्त्री-पुरुष समानता स्त्री शिक्षण यांची त्यांनी सतत पुरस्कार केला. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्यावतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या या समाजकार्याला जगन्नाथ शंकर शेठ यांसारख्यानी मोठा हातभार लावला.

राजकीय जीवन :

दादाभाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नूतनीकरणाला त्यांनी कडाडून विरोध केला. या संदर्भात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारला निवेदनही पाठवले होते. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भाडेपट्ट्याने नूतनीकरण केले होते.

दादाभाई नवरोजी यांचे मत होते की, भारतातील इंग्रजांचे शासन भारतीय लोकांच्या अज्ञानामुळे होते. त्यांच्या शिक्षणासाठी दादाभाईंनी ज्ञान प्रसारक मंडळी स्थापन केली. भारताच्या समस्या सांगण्यासाठी दादाभाईनी राज्यपाल आणि व्हाईस राय यांना अनेक याचिका लिहिल्या.

मृत्यू :

दादाभाई शेवटच्या दिवसांमध्ये इंग्रजांकडून भारतीयांच्या शोषणावर लेख लिहीत असत तसेच या विषयावर भाषणे ही देत असत. भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा पाया दादाभाई नौवरोजी यांनी स्थापित केला. भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी दादाभाई नौवरोजी यांचे निधन 30 जून, 1917 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी झाले.

“आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

या सणाबद्दल जरूर वाचा :

 

Leave a Comment