Tiger Animal Information In Marathi वाघ हा मासभक्षी प्राणी असून तो हरीण, लांडगा, रानम्हैस या सारख्या जंगली प्राण्यांची शिकार करतो व आपली भूक भागवतो. आपल्या देशात तसेच इतर अनेक देशात वाघाच्या अनेक प्रजाती आढळून येतात. वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना केली जाते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान देखील वाघालाच मिळते. तर चला मग पाहूया वाघ या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
वाघ प्राण्याची संपूर्ण माहिती Tiger Animal Information In Marathi
वाघ हा शब्द संस्कृतमधील व्याघ्र या शब्दावरून घेण्यात आला. इंग्रजीत वाघाला टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात माहिर आहे. 2010 पासून जगभरात 29 जुलै हा ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
वाघाचे वर्णन :
वाघाचा रंग तांबूस पिवळसर असतो. त्यांच्या अंगावर काळे पट्टे असतात. वाघाचे डोळे तपकिरी रंगाचे असून त्यात लालसर छटा असतात. त्यामुळे त्याचे डोळे निखाऱ्यासारखे धगधगीत दिसतात. वाघाला चार पाय, दोन डोळे, दोन छोटे कान व एक शेपटी असते. वाघाचा जबडा मोठा असतो, त्याचे नाक मोठे असते.
नाकाजवळ काटेरी मिश्या असतात. त्याचे शरीर सहा-सात फूट लांब, तर शेपटी तीन-चार फूट लांब असते. त्याच्या पायाला पंजे म्हणतात, पंजाला दणकट असे नखे असतात. त्याचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी करतो. त्याच्या तोंडात सुळे असतात. वाघाचे चे वजन किमान 600 ते 700 पौंड असते.
वाघाच्या प्रजाती :
वाघाच्या अनेक प्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत आहे. वाघाच्या काही प्रजाती खालील प्रमाणे.
इंडोचायनीज वाघ :
इंडोचायनीज वाघाची प्रजाती ही ईशान्य आशियामध्ये आढळते. यात कांबोडिया, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम या देशांत मुख्यतः हा वाघ आढळतो. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन 150 ते 190 किलोपर्यंत भरते. तर माद्यांचे वजन 110 ते 140 किलोपर्यंत असते. या वाघांची संख्या सध्या 1000 ते 1800 पर्यंत आहे तेही यांचे सर्वात जास्त वास्तव्य मलेशियामध्ये असून ते वाघांच्या शिकारीवर कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले.
सुमात्रन वाघ :
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर हे वाघ आढळून येतात व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन 100 ते 130 किलो असून मादीचे वजन फक्त 70 ते 90 किलो असते. हा वाघ लहान असल्यामुळे या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात राहतो.
मलेशियन वाघ :
हे वाघ केवळ मलेशियातील द्वीपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या परिस्थितीत केवळ 600 ते 800 वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
सायबेरियन वाघ :
ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते, हिला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ या नावाने ओळखले जाते. पूर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पूर्व सायबेरियातील प्रांतातच मर्यादित वास्तव्य राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत.
पांढरा वाघ :
ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत.
दक्षिण चिनी वाघ :
दक्षिणचीनी वाघ ही वाघांमध्ये सर्वात चिंताजनक प्रजाती असून वन्य अवस्थेत जवळपास ती नामशेष झालेली आहे. 1983 ते 2007 मध्ये एकही चिनीवाघ दृष्टीस पडलेला नाही.
वाघाचे वैयक्तिक जीवन :
वाघ हा कळपाने किंवा कुटुंबाने एकत्रपणे राहत नाही. ते स्वतंत्र राहतात. वाघाच्या मादीला वाघीण म्हणतात. तर त्याच्या पिलांना बछडे म्हणतात. एक वाघ आपल्या हद्दीत दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही. वाघिणीला एका वेळी दोन ते तीन बछडी होतात. ती लहान अगदी मांजरीच्या पिलांसारखी दिसतात. शिकार कशी शोधायली कशी पकडायची, दबा कसा धरायचा, हल्ला कसा करायचा या सर्व गोष्टी वाघीण आपल्या बछड्यांना शिकविते.
वाघांसाठी व्याघ्र प्रकल्प :
आज वाघाच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वाघ या प्राण्याला संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने अनेक मोहीम राबवल्या आहेत. वाघाच्या शिकारीवर देखील बंधी घालण्यात आलेली आहे. आज पांढऱ्या रंगाचे वाघ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांची प्राणी संग्रालयात वन्य अधिकाऱ्यांच्या नजरेत विशेष काळजी घेतली जाते.
व्याघ्रप्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत.
व्याघ्र प्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. 60 च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. 1990 पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले.
वाघाचे महत्त्व :
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात. मुख्यत्वे हे तृणभक्षक प्राण्यांची शिकार करतात. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे.
वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- प्रतापगड किल्ल्याचा इतिहास
- राजगड किल्ल्याचा इतिहास
- विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
- मालेगाव किल्ल्याचा इतिहास
FAQ
वाघ कोणता प्राणी आहे?
जगातील मांजरींच्या सर्वात मोठ्या प्रजातींपैकी , वाघ हे तीक्ष्ण दात, मजबूत जबडे आणि चपळ शरीर असलेले शक्तिशाली शिकारी आहेत. ते संपूर्ण आशियातील रशियापासून सुमात्रा आणि मुख्य भूप्रदेश दक्षिणपूर्व आशियापर्यंत आहेत. या सुंदर, धोक्यात असलेल्या मांजरींबद्दल संशोधकांना अजून बरेच काही शिकायचे आहे.
वाघ कोणत्या प्राण्याची शिकार करणार आहे?
वाघ दीमक ते हत्तीच्या बछड्यांपर्यंत विविध प्रकारची शिकार खातात. तथापि, त्यांच्या आहाराचा एक अविभाज्य घटक म्हणजे सुमारे 20 किलो (45 पौंड.) किंवा त्याहून अधिक वजनाची मोठ्या शरीराची शिकार जसे की मूस, हरीण प्रजाती, डुक्कर, गाय, घोडे, म्हशी आणि शेळ्या.
वाघांना अद्वितीय काय बनवते?
मांजर कुटुंबातील सर्वात मोठा सदस्य म्हणून, वाघ हे बलवान, शक्तिशाली आणि निसर्गाच्या सर्वात भयंकर शिकारीपैकी एक आहेत. रात्रीच्या वेळी शिकार करताना त्यांचे सुंदर नारिंगी आणि काळे पट्टे असलेले आवरण क्लृप्ती देतात, जेव्हा ते ६५ किमी/तास (~४० mph) वेगाने पोहोचू शकतात.
वाघ त्यांच्या अधिवासाशी कसे जुळवून घेतात?
वाघाचा पट्टे असलेला कोट त्यांना सूर्यप्रकाश झाडाच्या छटामधून जंगलाच्या मजल्यापर्यंत छान मिसळण्यास मदत करतो . वाघांची त्यांच्या सभोवतालची अखंड छलावरण वाढवली जाते कारण पट्ट्यामुळे त्यांच्या शरीराचा आकारही तुटण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांना संशयास्पद शिकार शोधणे कठीण होते.
वाघाचे 5 वर्तनात्मक रूपांतर काय आहेत?
शोधाशोध वृत्ती . निशाचर सवयी, पट्टेदार क्लृप्ती, उत्कृष्ट दृष्टी आणि श्रवणशक्ती, तीक्ष्ण दात आणि पंजे, लवचिक पाठीचा कणा आणि शिकारीवर शांतपणे आणि पटकन झटके मारण्याची क्षमता हे वाघांचे आपल्या ग्रहावर जिवंत राहण्याचे सर्वात मोठे फायदे आहेत.
वाघ कसे झेपावतात?
झपाटणे म्हणजे आपल्या शिकारीवर उडी मारून अचानक हल्ला करणे. वाघ हळू हळू आपल्या भक्ष्यावर डोकावतो आणि नंतर अचानक झपाटतो आणि मारण्यासाठी ताकद जितका वेग वापरतो . सर्व प्राण्यांपैकी, मांजरी हाड मारण्यात सर्वोत्तम आहेत.