टीईटी परिक्षेची संपूर्ण माहिती TET Exam Information In Marathi

TET Exam Information In Marathi मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेखा मध्ये टीईटी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती (TET Exam Information in Marathi) जाणून घेणार आहोत.मित्रांनो खूपच लोकांचा स्वप्न असतं की त्यांनी एक सरकारी शिक्षक व्हावं आणि टिचिंग मध्ये त्यांचं भविष्य घडवावं. शिक्षक बनण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस करावे लागतात आणि काही शिक्षक भरतीसाठी सहभाग घेतात. मित्रांनो टीईटी ही एक Teacher एक्झाम असते. TET साठी एक एलजीबीटी टेस्ट असते.

Tet Exam Information In Marathi

टीईटी परिक्षेची संपूर्ण माहिती TET Exam Information In Marathi

TET ही सरकारी शिक्षण भरतीसाठी आयोजित करण्यात येणारी परीक्षा आहे. टीईटी परीक्षेचे आयोजन संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात करण्यात येते. जे उमेदवार टीईटीची परीक्षा पास करून घेतात त्यांना त्यांच्या राज्यात सरकारी नोकरीसाठी आणि टीचर पदासाठी आवेदन करू शकतात.

मित्रांनो जर तुमचे स्वप्न सरकारी शिक्षक होण्याचे असेल तर त्यासाठी TET परीक्षा एकदम बेस्ट आहे. मित्रांनो ज्या लोकांना शिकवण्याच्या छंद असतो. त्याने टीईटी परीक्षा द्यायला पाहिजे . आपण या लेखा मध्ये टीईटी काय आहे टीईटी चा फुल फॉर्म काय आहे? टीईटी परीक्षेसाठी योग्यता काय आहे? आणि टीईटीच्या सिल्याबस काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर तुम्ही या लेखला पूर्णपणे वाचत जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल.

आपल्या देशामध्ये टीईटी परीक्षा ही सरकारी शाळांमधील शिक्षकांची भरती करण्याआधी त्यांची योग्यता तपासण्यासाठी टीईटीची परीक्षा घेण्यात येते. TET परीक्षेत बसण्यासाठी योग्यता भारतातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी एक्झाम पास करणे महत्त्वाचे असते. TET परीक्षा ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारा आयोजित करण्यात येते.

TET एलिजिबिलिटी टेस्टची सुरुवात भारत सरकार द्वारा सन 2011 मध्ये शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी आयोजित करण्यात आले. पहिली ते आठवीपर्यंत सरकारी शिक्षक बनण्यासाठी टीईटीची परीक्षा पास करणे अनिवार्य आहे. टीईटीची परीक्षा द्वारे तुम्ही एक चांगले शिक्षक आणि सरकारी नोकरी मिळवू शकता.

टीईटी काय आहे?

टीईटी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट (Teachers Eligibility Test) आहे. ज्याला मराठी मध्ये शिक्षक पात्रता टेस्ट सुद्धा म्हणता येईल. TET ची भरती ही दरवर्षी सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात येते. शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा आणण्यासाठी सरकार द्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आले.

भारतीय राज्य सरकार द्वारा TET Exam आणि केंद्र सरकार द्वारा CTET Exam आयोजित करण्यात येते. जे उमेदवार टीईटीची परीक्षा पास करतात ते सरकारी शिक्षक होण्यासाठी नियुक्त करण्यात येतात.

टीईटी परीक्षेचे संचालन प्रत्येक स्टेटच्या प्रोफेशनल एक्झाम बोर्ड द्वारे केले जाते. टीईटी परीक्षा पास केल्यानंतर उमेदवाराला 1 ते 5 क्लास पर्यंत प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) आणि 6 ते 8 क्लास पर्यंत उच्च प्राथमिक शिक्षक (Upper Primary Teacher) म्हणून नियुक्त करण्यात येते आणि या सोबतच त्यांना एलजीबिलिटी सर्टिफिकेट (Eligibility Certificate) प्रदान करण्यात येते.

Tet च्या परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात त्यामध्ये पहिला पेपर 1 प्राथमिक शिक्षकासाठी असतो. तर दुसरा उच्च प्राथमिक शिक्षकासाठी असतो. जे उमेदवार टीईटीची परीक्षा पास करतात त्या राज्य सरकार द्वारा सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी निवडले जातात.

टीईटी परीक्षेसाठी एज लिमिट | TET Exam Age Limit in Marathi

टीईटी परीक्षेसाठी उमेदवाराचे वय अठरा वर्ष ते जास्तीत जास्त 35 वर्ष असायला पाहिजे. एससी एसटी ओबीसी कॅटेगिरी साठी तीन ते पाच वर्षाची सवलत मिळते. जे उमेदवार अपंग आहेत त्यांच्यासाठी दहा वर्ष ची सवलत दिली जाते

टीईटी परीक्षेचा सिल्याबस | TET Exam Syllabus in Marathi

TET परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातील त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला हवी असायला पाहिजे तुम्हाला खालील प्रमाणे TET Syllabus दिलेला आहे

बाल विकास आणि आकलनशक्ती – child development and assessment

या विषयात तुम्हाला 6 ते 11 या वयोगटातील मुलांचा विकास आणि बाल मानसशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

भाषा 1 (मराठी) – Marathi

मराठीत तुम्हाला मराठी भाषेशी संबंधित असे प्रश्न विचारले जातील. जे इयत्ता 1-5 वी पर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक आहेत.

भाषा 2 (इंग्रजी) – English

भाषा 2 मध्ये, इंग्रजी/संस्कृत/उर्दू (अर्जदाराने निवडलेले) संबंधित प्रश्न विचारले जातील.

गणित / पर्यावरण शिक्षण – Maths / Environment

असे प्रश्न गणित आणि पर्यावरण विषयातून विचारले जातील जे इयत्ता 1 ते 5 च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परंतु प्रश्नांची काठीण्य पातळी ही लिंकेज इंटरमिजिएटच्या अभ्यासक्रमाच्या पातळीची असेल.

सामाजिक अभ्यास / सामाजिक विज्ञान – Social Practice / Social Science

भूगोल, इतिहास, सामाजिक आणि राजकीय जीवन, शैक्षणिक समस्या ई. विषयांचा पेपर असेल.

महाटीईटी मार्किंग स्कीम | Mahatet Marking Scheme

टीईटीच्या परीक्षेमध्ये तुमच्या प्रत्येक योग्य उत्तराला एक मार्क रिवार्ड म्हणून दिला जातो. टीईटी परीक्षा मध्ये मल्टिपल टाईप असतील. या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत वापरली जात नाही

TET परीक्षेसाठी काय एप्लीकेशन फीज असते?

जर तुमचे सगळे डिटेल बरोबर असेल तेव्हाच तुम्ही एप्लीकेशन प्रोसेस साठी पेमेंट करायचे. सर्वात आधी तुम्ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायची योग्य आहे की नाही तेव्हाच तुम्ही पेमेंट करायची.

जनरल कॅटेगिरी ला पेपर एक साठी 500 रुपये फीस आहे आणि पेपर दोन साठी 800 रुपये फीस आहे.

एससी/एसटी/ओबीसी आणि अपंग असलेल्या उमेदवारांसाठी पहिल्या पेपरची 250 रुपये फीज आहे आणि दुसऱ्या पेपरची 400 रुपये फीस आहे.

उमेदवार हा एप्लीकेशन फी (Application Fees) ऑनलाईन (Online) किंवा ऑफलाईन (Offline) भरू शकतो. जर Online भरायचे असल्यास तर उमेदवार हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नेट, बँकिंग किंवा वॉलेट चा उपयोग करू शकतो जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल तेव्हा त्याची रिसिप्ट तुमच्याजवळ असू द्यावी आणि एप्लीकेशन फॉर्म चा प्रिंट आऊट घेऊन तुमच्याजवळ सांभाळून ठेवावे.

टीईटी परीक्षेला पास होण्यासाठी मार्क | Maha TET Exam Qualifying Marks

TET परीक्षा पास करण्यासाठी जनरल कॅटेगिरी संबंधित असाल तर 60 टक्के मार्क्स आणणे गरजेचे असते आणि जर तुम्ही एससी/एसटी ओबीसी आरक्षित वर्ग मध्ये येत असणार तर तुम्हाला 55% मार्क्स पास होण्यासाठी आणणे गरजेचे असते. पास होण्याच्या मार्किंग मध्ये वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळे बदल असतात.

TET साठी साठी पात्रता काय आहे?

उमेदवारांनी कुठेही मान्य प्राप्त शाळेतून बारावी 45 टक्क्यांसह पास केली पाहिजे

या उमेदवारांना 50 टक्के पेक्षा जास्त ग्रॅज्युएशन मध्ये गुण असायला पाहिजे आणि मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीतून डिग्री घेतली पाहिजे.

प्राथमिक शिक्षणामध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा किंवा 4 वर्षाची ग्रॅज्युएशन डिग्री किंवा बीएड च्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा परीक्षा देऊ शकता.

भारत, नेपाळ आणि भूतान चे उमेदवार सुद्धा टीईटीची परीक्षा देऊ शकतात.

TET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

सर्वात आधी उमेदवारांना महाटीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा नोटिफिकेशन येते तेव्हा जायचे आहे रजिस्टर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Points फॉलो करावे:

1) सर्वात आधी तुम्ही महाटीईटीच्या mahatet.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायच आहे.

2) साइटवर गेल्यानंतर तुम्हाला अवेलेबल बटन वरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वर

3) न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल त्यावर तुमचे नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, लिंग, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी माहिती तुम्हाला भरायची आहे.

4) सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे.

5) सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिस्टम जनरेटेड रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

मित्रांनो जर तुमचे टीईटी बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा.

No schema found.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

3 thoughts on “टीईटी परिक्षेची संपूर्ण माहिती TET Exam Information In Marathi”

  1. ही इन्फॉरमेशन खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वान पर्यंत पोहचव ताय तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद

Leave a Comment