सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

Sarojini Naidu Information In Marathi भारताला इंग्रजाच्या पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी पुरुषांबरोबर क्रांतिकारी महिलांनी देखील हातभार लावला. स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्या क्रांतिकारी महिलांमधील एक स्त्री म्हणजे सरोजनी नायडू आहे. त्या स्त्रियांच्या हक्कांसाठी व पुरुषांबरोबर स्त्रियांना समानतेचा दर्जा देण्यासाठी लढल्या. सरोजिनी नायडू अत्यंत हुशार होत्या. लहानपणापासून त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. त्यांच्या विषयी माहिती पाहूया.

Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

जन्म :

सरोजनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी, 1979 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चटोपाध्याय होते व त्यांच्या आईचे नाव वरदा सुंदरी देवी होते. त्यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला. सरोजनी नायडू यांचे वडील वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षा शास्त्री आणि शिक्षक होते. हैदराबाद येथील निआज कॉलेजची स्थापना सरोजनी नायडू यांच्या वडिलांनी केली होती. सरोजिनी नायडू यांना आठ बहीण-भाऊ होते.

सरोजनी नायडू ह्या सर्वात मोठ्या होत्या. वीरेंद्रनाथ उपाध्याय हा त्यांचा भाऊ क्रांतिकारी होता. कमिटीमध्ये वीरेंद्रनाथ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे इंग्रजांनी वीरेंद्रनाथाला 1937 साली मारून टाकले. सरोजिनी नायडू यांचे दुसरे भाऊ कवी कलाकार, कथाकार आणि नाटक सुद्धा लिहीत होते. सरोजिनी नायडू यांची बहिण सूनलीनी देवी ह्या एक अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना होत्या.

शिक्षण :

सरोजिनी नायडू ह्या एक हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांना उर्दू, तेलुगु, इंग्लिश, फारसी, आणि बांग्ला या भाषेचे चांगले ज्ञान होते. मॅट्रिक परीक्षा त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. प्रथम स्थान त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी मिळवले होते. सरोजिनी नायडू यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावे; पण लहानपणापासून सरोजिनी नायडू यांना कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांच्या आईकडून कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली होती.

यांच्या कविता प्रत्येकाला आवडत होत्या आणि त्यातून लोक प्रभावित होत होते. हैदराबादचे निजाम देखील सरोजिनी नायडू यांच्या कवितेने प्रभावित झाले होते. त्यांनी सरोजिनी नायडू यांना विदेशात अध्यापनासाठी शिष्यवृत्ती दिली होती. तेव्हा त्या इंग्लंड येथे वयाच्या सोळाव्या वर्षी गेल्या तेव्हा त्यांनी प्रथम किंग्स कॉलेज लंडन येथे प्रवेश घेतला होता. त्यानंतर केंब्रिज ब्रिटन कॉलेजमधून त्यांनी शिक्षण प्राप्त केले.

वैयक्तिक जीवन :

इंग्लंडमध्ये कवयित्री सरोजिनी नायडू शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांची भेट गोविंद राजुलू नायडू यांच्याशी झाली. त्यावेळीच सरोजनी त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतल्यावर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी आपल्या परिवाराच्या संमतीने गोविंद राजूलू नायडू यांच्याशी विवाह केला. हा विवाह ‘ब्राह्मण मॅरेज ॲक्ट’ अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला होता.

वेगवेगळ्या जाती मध्ये लग्न होणे हे त्या काळी गुन्ह्यापेक्षा कमी समजले जात नव्हते. त्यावेळी भारतीय समाजात आंतरजातीय विवाहांना मान्यता दिली नव्हती. याकरिता त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या वडिलांनी सरोजनीच्या या निर्णयाला समाजाचे चिंता न करता त्यांना सहाय्य केले होते. या सर्व परिस्थितीतून जाऊन त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले. त्यांच्यात खूप काही करण्याची आवड होती.

सरोजिनी नायडू यांनी विवाहानंतर देखील लिखाण सुरू ठेवले होते. विवाहनंतर सरोजनी नायडू यांना चार मुले झाली. जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामनी. पद्मजा या सरोजिनी नायडू सारख्या कवयित्री झाल्या आणि सक्रिय राजकारणात देखील उतरल्या पश्चिम बंगालच्या गव्हर्नर देखील 1961 साली त्या झाल्या.

राजकीय जीवन :

सरोजनी नायडू यांची भेट स्वातंत्र्य सेनानी गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी झाली. तेव्हा त्यांच्या जीवनात अनेक बदल घडत गेले. आपल्या लिखाणाची ताकत स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला गोपाळकृष्ण गोखले यांनी सरोजिनी नायडूना दिला. आपली बुद्धी आणि शिक्षण पूर्णपणे देशाला समर्पित करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सरोजिनी नायडूला सुचविले.

क्रांतिकारी कविता लिहून स्वातंत्र्याच्या लढाईत महान कार्य करण्याचे त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुचविले. गावांमध्ये जाऊन गावांमधील लोकांना प्रोत्साहित करण्याचे कार्य सुचविले. सरोजनी नायडू या महान क्रांतिकारी होत्या. 1905 साली बंगाल विभाजन यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या विभाजनामुळे सरोजिनी नायडू फार व्यथित होत. या पुढे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय सरोजिनी घेतला.

त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरिता सतत प्रयत्न केले. स्वातंत्र्याची ज्योत ठरविण्याकरिता सामान्य जनतेमध्ये संपूर्ण भारत त्यांनी पिंजून काढला होता. देशप्रेमाची भावना लोकांमध्ये वाढीस लावण्यासाठी सरोजनी नायडू यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या प्रेसिडेंट सरोजनी नायडू होत्या आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून निवडून आलेल्या सरोजिनी पहिल्या महिला होत्या. त्यांचा सहभाग भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात होता. भारतीय नाईटिंगेल आणि भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हटले जात होते.

सरोजिनी नायडू यांच्या कवितांमध्ये लहान मुलांच्या देशभक्तीचे, निसर्गाचे, मृत्यूच्या आणि प्रेमाच्या कविता आहेत. सरोजिनी नायडू या जास्तीत जास्त लहान मुलांच्या कविता करण्यात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेमध्ये अधिक तर लोक आपल्या बालपणाच्या आठवणीमध्ये रमून जात असत आणि एक प्रकारचा खोडकरपणा त्यांच्या कवितांमध्ये आढळून येत होता.

देशप्रेमाची भावना त्यांच्या मनात भरली होती. म्हणून त्या महात्मा गांधीसोबत राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सरोजनी नायडू यांनी मिठाच्या सत्याग्रहात देखील महात्मा गांधी सोबत भाग घेतला होता. सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा हिने देखील स्वातंत्र्यसंग्रामात आपला सहभाग नोंदविला होता. त्या भारत छोडो आंदोलनात सुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा जेव्हा भारतातील महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते तेव्हा सर्वात आधी सरोजिनी नायडू यांचे नाव घेतले जाते.

सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, 1903 ते 1917 च्या दरम्यान त्यांचा गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या नात्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा-आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला.

आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोपाल कृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले. महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर-इ-हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले. पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडा च्या निषेधार्थ परत केले.

रौलट कायदा, माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु-मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर भाषण दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.

सरोजनी नायडू यांचा मृत्यू :

महात्मा गांधीजींच्या पहिले शिष्य आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता खूप संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा मृत्यू 2 मार्च 1949 ला झाला. कार्यालयात काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन सरोजनी नायडू यांचा मृत्यू झाला. सरोजिनी नायडू यांनी आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले होते. त्यांनी आपल्या जीवनात खूप सन्मान प्राप्त केला. लोकांकरिता त्या एक प्रेरणादायी ठरल्या आहेत. भारत सरकारने जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी, 1964 ला त्यांच्या सन्मानार्थ 15 पैशांचे तिकीट प्रकाशित केले होते.

“सरोजनी नायडू ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा  :-


सरोजिनी नायडू यांची खासियत काय आहे?

सरोजिनी नायडू (जन्म 13 फेब्रुवारी 1879, हैदराबाद, भारत—मृत्यू 2 मार्च, 1949, लखनौ) राजकीय कार्यकर्त्या, स्त्रीवादी, कवयित्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झालेल्या आणि भारतीय राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला . तिला कधीकधी “भारताची नाइटिंगेल” म्हटले जात असे.


सरोजिनी नायडू यांचे दुसरे नाव काय आहे?

‘ द नाईटिंगेल ऑफ इंडिया ‘ 

1 thought on “सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi”

  1. खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद !

Leave a Comment