जिजामाते विषयी संपूर्ण माहिती Jijamata Information In Marathi

Jijamata Information In Marathi हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजेच जिजाबाई भोसले त्यांना आपण जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मासाहेब अशा विविध नावांनी ओळखतो. यांचा जन्म 12 जानेवारी, 1598 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. 1605 मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला.

Jijamata Information In Marathi

जिजामाते विषयी संपूर्ण माहिती Jijamata Information In Marathi

वैवाहिक जीवन :

भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.

जिजामाताना एकुण 8 मुलं झाली, त्यात 6 मुली आणि 2 मुलं. आपल्या दिराच्या नावावरून आपल्या मोठ्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले.  संभाजी महाराज शहाजी राजांजवळ वाढला. जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाबाईंनी स्वीकारली.

शिवाजीराजांना महाभारत, रामायणातील गोष्टी सांगितल्या. शिवाजी आपल्या सवंगड्यां सोबत युद्धकला शिकले. त्यांनी शिवाजीराजांना राजकारणातले धडे शिकवले. संस्कारांमुळे शिवाजीराजे खंडे यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहात असत व न्यायनिवाडे करीत असत.

त्या काळात गरजूंना मदतही करत असत. शिवाजीराजांचे राज्य अभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यावर बारा दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 ला मॉ जिजाऊंचे वृद्धापकाळाने निधन झाले. संभाजी राजे तसेच मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी राजे या दोन शूरवीरांना जन्म दिला.

जन्मभूमी :

जिजाऊ मासाहेबांचा जन्मभूमी कोट राजवाडामध्ये 12 जानेवारी, 1598 साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई, नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वस्तू समोर नगरपालिका निर्मित एक बगीचा देखील आहे. तेथे राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदू राज्याच्या समाधीपेक्षा मोठी आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजेच रंगमहल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वर प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे. तर राजे लखोजीराव जाधव यांनी मंदिराचे पुनर्जीवन खेड्याच्या शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरा समोरच चौकोनी आकारात गडापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर आठव्या आणि दहाव्या शतकातील अतिप्राचीन असे हेमांडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधव यांच्या कार्यकाळात भव्य किल्ल्यांची निर्मितीची सुरुवात झाली होती. त्यातच एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोट अतिभव्य आणि मजबूत अशा काळे कुडाच्या भिंती वीस फूट रुंद आणि तेवढ्याच उंच आहे. त्यासोबतच साखरवाडा नावाचा चाळीस फूट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो. त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता आतमध्ये ही विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत.

तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे. त्याला म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थित आणि त्या काळातील चलन अभियांत्रिकीचा अति उत्कृष्ट नमुना या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून विलोभनीय असा परिसर याला लाभलेला आहे. मोती तलावा बरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधून तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळा बारव आहे.

ही म्हणजे असंच समृद्धी व शिल्पांचा एकत्र वापर करून बनवलेले शिल्पकृती आहे. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे. त्या काळी या विहीरीतून गावी गावांमध्ये पाणीपुरवठा भूमिगत बंदिस्त नाल यांच्याद्वारे केल्या जात होता. त्या विहिरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायर्‍यांची सुविधादेखील केलेली आहे.
खेड-शिवापूर येथे एक वाडा बांधला. तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली. शहाजींच्या राजकारणाचे, धोरणांचे त्यांना ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले.

याविषयींचे अनेकविध उल्लेख तत्कालीन पत्रव्यवहारांतून पहावयास मिळतात. राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंडभैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला. त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता.

त्यावर मातोश्री साहेब जे आश्वासन दिले आहे, तसेच माझेही आश्वासन राहील असे दि. 13 जुलै, 1653 च्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात. शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत. जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत जातीने लक्ष घालीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत.

महाराज आग्राभेटीवर गेले असता त्यांनी सर्व कारभाराचा शिक्का जिजाबाईंच्या हाती सुपुर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते. जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या.

स्वराज्याची स्वप्न:

पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी व मावळ्यांमध्ये ‘स्वराज्य स्थापना’चे बीज रोवून हिंदवी स्वराज्याचे महान स्वप्न पाहण्याचे योगदान देणारी ती माऊली म्हणजे, स्त्री क्षणकालची पत्नी व अनंतकालची माता असते. हे शब्द खरे करून त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वात स्वत:चे योगदान दिले.

स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी बाळगले. तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या. त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब म्हणतात. त्याप्रमाणे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे वाक्य शिवरायासाठी ठरवू शकले.

ते केवळ माँ साहेबांच्या करारी व नि:पक्षपाती स्वभावाचा त्यांच्यात उतरलेला अंश म्हणूनच नेताजी पालकरांचे धर्मातर घडवून ह्या वीराच्या घरी स्वत: जाऊन सांत्वन करण्यात किंवा दूरदृष्टीने कोंढण्याचे स्वराज्यातील महत्व ओळखण्यातच ह्या मातेचे योगदान होते. आग्रा सुटका प्रसंगानंतर बैराग्याच्या वेषात आलेल्या प्रतापराव गुजर ह्यांना सोन्याचे कडे कबूल करून त्या देणा-या राजमाता जिजाऊ होत्या. म्हणूनच हे हिंदवी स्वराज्याचे तारू राज्यभिषेकाच्या काठावर पोहोचले.

पुण्यात राहण्यासाठी आल्यावर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली व जोगेश्वरी आणि केदारेश्वर यांचा जीणोंद्धार केला. जिजाबाई शिवाजीच्या मनावर सतत एक गोष्ट बिंबवीत राहिल्या की, हे राज्य आमचे नाही, इथे लोक कंगाल आहेत, देवळे पाडली जात आहेत. गोरगरिबांना वाली उरलेला नाही. शिवबा, तू मोठा हो, यांचा पालनकर्ता हो.

तत्कालीन राजकारणात आणि समाज कारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत. जाती-जमातीत व घराण्यांन्यायनिवडांच्या बाबतीत त्या नि:पक्षपाती होत्या. संत महंतांचा आणि विद्वानांचा त्या योग्य सल्ला घेत असत. संत तुकाराम यांसारखे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले हा त्यांचाच परिणाम होता.

संभाजी व शिवाजी जगले आणि त्यातील शिवाजीवर हे अफजलखानाचे संकट, पण अशाही स्थितीत मन कठोर करून त्यांनी शिवाजींना आशीर्वाद दिला. पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी स्वतःच युद्धावर निघाल्या होत्या. पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले.

या प्रसंगात त्यांची पुत्र प्रेमाची आर्तता आणि विलक्षण आवेश गोष्टी दिसून येतात. 1664 साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांना अपघात झाला आणि ते मरण पावले. हा वज्राघात झेलून त्या सती जायला निघाल्या होत्या. पण शिवाजी राजांनी विनवणी करून त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते. त्या कर्तबगार सर्व राज्यकारभार त्यांच्या स्वाधीन केला होता.

मृत्यू :

आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकडून पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले होते. महाराज देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जून, 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला. जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.
अशा प्रकारे एका वाघिणीने आपल्या छावाचा बचाव वरून स्वराज्य निर्मिती करून घेतली.

“तुम्हाला आमची माहिती मॉसाहेब जिजाबाई विषयी कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

Leave a Comment