Gudi Padwa Information In Marathi गुढीपाडवा हा सण हिंदूंचा आहे. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. पुराणा प्रमाणे ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे, तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला साडी किंवा जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुलिंबाची पाने लावून त्यावर तांब्या किंवा लोटा उलटा ठेवला जातो.
गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती Gudi Padwa Information In Marathi
दारासमोर रांगोळी घालून तयार करून गुढी उभी केली जाते. या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याची ही प्रथा आहे, तसेच या दिवशी कडूनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे ही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ मिसळून चटणी तयार केली जाते. याचे भक्षण केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात.
शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते, म्हणून केवळ ह्या दिवशी कडुलिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वतंत्र प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून सवंत्सर, पाडव, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
गुढीपाडव्याचे महत्त्व:
गुढीपाडव्याचे सामाजिक महत्त्व आहे. विविध रोगांवर मात करणारी गुणकारी औषध म्हणजे कडुलिंब असतो आणि या दिवशी त्याचे खूप मोठे महत्त्व आपल्याला दिसून येते. कारण गुढी -पाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचे विविध मिश्रणासह सेवन प्रसाद म्हणून केले जाते. तसेच लोकसंस्कृतीमध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे. लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात कि, गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोळी घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी विविध ठिकाणी पहाटेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद, दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे, पित्तनाशक करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत, असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाणी आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.
बऱ्याच साहित्यात गुढीविषयी माहिती लिहिलेली आहे. बहिणाबाई चौधरी, विष्णुदास नामा, संत एकनाथ चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव यांच्या लोकगीतात गुढीपाडव्याचे वर्णन आपल्याला दिसते. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी बर्याच ठिकाणी मिरवणूक देखील काढली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला पुरुष लहान मुले पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीत सहभागी होतात.
गुढीपाडवा कसा साजरा केला जातो:
गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. उंच बांबूपासुन काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला एखादे वस्त्र किंवा रेशमी वस्त्र, साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या बसविला जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.
तयार केलेली गुडी दारात किंवा उंच गच्चीवर लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षदा, वाहत गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले, वाहून, अक्षता टाकून ही गुढी उतरण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत सर्व हिंदु बांधव नववर्षाचे स्वागत करतात. त्यामध्ये काठी पूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पुजा परंपरा आहे.
‘ईव्हॅल्युएशन ऑफ गॉड’ या ग्रंथातील ग्रँड एलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरियातील सामोइट्स ते दक्षिण आफ्रिकेतील धामारा या जमातींमध्ये काठी पूजेची परंपरा होती.
भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात बास पूजा साजरी करतात. त्रिपुरा आणि मणिपूर राज्यात काठी उत्सव परंपरा दिसून येते. तसेच बलुचिस्थानच्या हिंगलाज देवीची काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्य प्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या जत्रा काठी काठेवाडी नंदीध्वज हे काठी उत्सव साजरे केले जातात.
गुढीपाडवा विषयी पौराणिक कथा:
गुढीपाडवा विषयी विविध पौराणिक कथा आपल्याला दिसून येतात. त्यापैकी ही एक कथा आहे. महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली बांबूची काठी इंद्राच्या जमिनीत खुपसली आणि दुसर्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे हे काठीला वस्त्र लावून ती शृंगार करून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करत होते.
महाभारतातले खिल पर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्यांना इंद्र कोपाची पर्वा न करता, वार्षिक जत्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारतात ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे. तर पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिसलेल्या आहेत.
गुढीपाडवा विषयी आणखी एक कथा प्रचलित आहे. श्री राम अयोध्येला परत आले, प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकापती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तसेच शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्याच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. अशी अख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला असे म्हटले जाते.
प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली. तीच देवी स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराची लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतियेला लग्न झाले.
पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात, यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक केला जातो. कश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेर वाशिंनी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी ती सासरी जाते.
तसेच प्रतिमा विद्याच्या सहाय्याने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फार कमी वाटतात जी वर्णने उपलब्ध आहेत. त्यांच्यातही आपापसात फरक आहे, त्यामध्ये इतर भजन प्रकाराशी सरमिसळ ही केली गेली असल्याचे दिसते. रामायण महाभारत आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्र ध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराचे स्वरूपात आलेली दिसतात, अशी उपमा दिली दिसते. पण युद्धामध्ये धारतिर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकास पण इंद्र ध्वजाची उपमा दिलेली दिसून येते.
श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्यादिवशी अवस्थेत पुन्हा प्रवेश केला. त्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला. अशी पारंपरिक समजूत आहे. आणि तीच परंपरा आजही हिंदू लोकांनी कायम ठेवलेली आहे.
“तुम्हाला आमची माहिती गुढीपाडवा विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
गुढीचे महत्त्व काय?
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे?
पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उटणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधवं. सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरु करावा.
गुढीपाडव्याचे महत्त्व काय?
असेही मानले जाते की गुढी हे भगवान रामाच्या रावणावरील विजयाचे प्रतीक आहे कारण हा सण 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतल्यानंतर रामाच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घराबाहेर गुढीचे झेंडे लावतात.
मराठी नववर्षाची सुरुवात कोणी केली?
महाराष्ट्राचे महान योद्धा, छत्रपती शिवाजी यांनी आपल्या विजयानंतर प्रथम गुढीपाडवा साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक मराठी घरात गुढीपाडवा साजरा केला जातो.
वाह वाह