IBPS परीक्षेची संपूर्ण माहिती IBPS Exam Information In Marathi

IBPS Exam Information In Marathi मित्रांनो IBPS हे भारतातील सर्वात मोठे बँकिंग क्षेत्र आहे जे सर्वात जास्त बँकिंग क्षेत्रात नौकरी देण्याचे काम करते. IBPS द्वारे परिक्षा घेतली जात असते. IBPS चा फुल फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute Of Banking Personal Selection) असा होतो. बँकेचे महत्वपूर्ण पदांसाठी IBPS परीक्षा घेतली जात असते. IBPS परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचं उज्वल भविष्य देण्याचे काम आणि चांगलं पद देण्याचे काम ही परीक्षा करत असते.

Ibps Exam Information In Marathi

IBPS परीक्षेची संपूर्ण माहिती IBPS Exam Information In Marathi

प्रत्येक विद्यार्थ्याचे बँकेमध्ये चांगल्या पदावर काम करण्याचे स्वप्न असते तर यासाठी विद्यार्थ्याला करिअर पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी IBPS परीक्षा हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. जे विद्यार्थी परीक्षा पास करतात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पासून वेगवेगळ्या पदांसाठी भरती केले जाते. IBPS ही संस्था विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याचे काम करून देते. दरवर्षी 10 लाख विद्यार्थी IBPS परीक्षेसाठी अप्लाय करतात IBPS ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात उच्च स्तरावर परीक्षा आयोजित करत असते.

आधी तर उमेदवारांना IBPS परीक्षा बद्दल माहिती नसते आणि ते सरळ या परीक्षेसाठी तयारी करायला लागतात. IBPS परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थ्याला त्यामध्ये संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या परीक्षेबद्दल पूर्ण माहिती घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी करायला पाहिजे.. तर आपण या लेख मध्ये IBPS बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या लेखनाला तुम्ही पूर्ण वाचा.

IBPS परीक्षा काय आहे? What is IBPS exam in Marathi

IBPS ला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणतात. IBPS ची स्थापना 1975 मध्ये झाली होती. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणजेच बँकेमध्ये भरती करण्यासाठी IBPS संस्था परीक्षा घेत असते.

IBPS संस्था सार्वजनिक क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची निवडणूक करण्यासाठी IBPS क्लर्क परीक्षा, IBPS पीओ एक्झाम, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर एक्झाम, IBPS RRB सारखी परीक्षा घेत असते. या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही भारतातील 19 सार्वजनिक बँकांमध्ये अप्लाय करू शकतात.

IBPS द्वारा निवडलेल्या पदाचे परीक्षा खालील प्रमाणे घेतले जातात:

IBPS परीक्षेद्वारे तुम्ही खाली दिलेल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात.

1) Clerk Post
2) PO Post
3) Gramin Bank Officer Scale
4) Special Officer Post
5) Gramin Bank PO Post

IBPS कसे काम करते?

IBPS चे मुख्य काम त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बँकांच्या खाली असलेल्या पदांची माहिती घेणे आणि ती त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून जाहिरात करणे हे त्यांचे काम असते. IBPS परीक्षा ही ऑनलाईन होत असते आणि काही दिवसातच IBPS चा रिझल्ट लागतो.

IBPS ची परीक्षा ही Prelims आणि नंतर Mains परीक्षा घेत असते आणि या दोघेही परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्यू घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होतं त्यांना अपॉइंटमेंट लेटर (appointment letter) दिले जाते. तूम्ही अपॉइंटमेंट लेटर च्या आधारावर post join करू शकतात.

IBPS द्वारे दरवर्षी अनेक भरती घेतल्या जातात त्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन अप्लाय करू शकतो

IBPS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय हवी असते?

IBPS परिक्षेला पात्र होण्यासाठी तुमचा ग्रॅज्युएशन पूर्ण असणे अनिवार्य आहे ते तुम्ही कुठल्याही विषयात केलेले असे

कॉम्प्युटरचं नॉलेज असणे महत्वाचे.

ज्या राज्यातून निवडले आहेत त्याची भाषा येणे अनिवार्य आहे.

IBPS पीओ परीक्षेचा एक्झाम पॅटर्न | IBPS PO Exam Pattern

IBPS तीन स्टेटसवर परीक्षा घेत असते :

1) पूर्व परीक्षा (prelims exam)
2) मुख्य परीक्षा (Mains Exam)
3) मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्यू घेतला जातो.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे जर तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा पास झाले नसाल तर तुम्ही इंटरव्यू देऊ शकत नाही. यासाठी तुम्ही परीक्षा पास असणे अनिवार्य आहे.

IBPS परीक्षेचा सिल्याबस आणि मुख्य विषय:

रीजनिंग (Reasoning), मेकिंग सिरीज (Making series), coding आणि decoding चे नॉलेज, कॉम्प्रेशन रीजनिंग (Comprehension Reasoning) , लॉजिकल रीजनिंग (Logical Reasoning), उतारा आणि निष्कर्ष (Excerpt and conclusion), उपमा (Analogy)।

IBPS PO Exam Syllabus & Main Subject:

इंग्रजी भाषा (English Language): तुम्हाला इंग्रजीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे, यामध्ये तुमच्याकडे व्याकरण आणि शब्दसंग्रह असेल. (Grammar and Vocabulary), रिक्त जागा भरा, वाक्यांश (Word Formation) आणि मुहावरे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, एक-शब्द प्रतिस्थापन, Sentence Arrangement, पूर्ण वाक्य (Sentence Rearrangement), Spelling Section इत्यादी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाते.

General Knowledge: राजकीय, सामाजिक, IBPS साठी भारतीय अर्थव्यवस्था नोट्स, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, व्यवसाय, Marketing, Agriculture , Finance, पुरस्कार, भारतीय राज्यघटना, मीडिया, क्रीडा, RBI संबंधित नोट्स यासारख्या दैनंदिन घडामोडी आणि देशात घडत असलेल्या घटनांबद्दल इथे माहिती विचारली जाते.

Quantitative Ability: येथे तुम्हाला गणिताबद्दल चे प्रश्न विचारले जातात यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स आणि शॉर्टकट वापर करावा लागतो

मुख्य विषय: यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन, अनुक्रम आणि मालिका, गुणोत्तर, द्विघात समीकरणे, संख्या प्रणाली युक्त्या, गुणोत्तर, टक्केवारी आणि सरासरी (simple आणि compound interest), नफा आणि तोटा, दर, उंची आणि अंतर, वेळ आणि अंतर आणि सरलीकरण इ. सारखे विषय असतात.

Computer Aptitude: या टेस्टमध्ये कॉम्प्युटर बद्दल प्रश्न विचारले जातात. यामध्ये कॉम्प्युटर बद्दलचे बेसिक प्रश्न ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनेट बद्दल नॉलेज, प्रोटोकॉल, इनपुट आणि आऊटपुट, डिवाइस नेटवर्किंग, एमएस ऑफिस, एमएस वर्ड, एक्सेल पावर पॉइंट, कॉम्प्युटर शॉर्टकट, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याबद्दल माहिती विचारली जाते.

IBPS परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमचं संपूर्ण स्कोर मध्ये काही प्रश्न चुकलेले असतील तर तुमचे 0.25 marks हे निगेटिव्ह मार्किंग मध्ये गृहीत होत असतात. यामुळे अंदाजे उत्तर द्यायचे नाहीत प्रत्येक उत्तर हे योग्य असले पाहिजे.

IBPS PO प्रिलीअम परीक्षेचा एक्झाम पॅटर्न

IBPS PO परीक्षांमध्ये एकूण तीन विभाग असतात

पहिल्या भागामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतात याचा वेळ हा एक तासाचा असतो. ही परीक्षा ऑनलाईन होत असते आणि यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात Quantitative Aptitude मध्ये 35 प्रश्न रीजनिंग मध्ये सॉल करावे लागतात.

IBPS PO मेन्स परीक्षेचा एक्झाम पॅटर्न.

जे लोक पूर्वपरीक्षा पास करतात ते मुख्य परीक्षा देऊ शकतात IBPS चे मुख्य परीक्षा मध्ये एकूण चार भाग असतात याचे वेळेचा कालावधी तीन तासाचा असतो त्यामध्ये 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असते. या परीक्षेमध्ये कॉम्प्युटर भागाबद्दल 45 प्रश्न विचारले जातात.

डेटा अनालिसिस बद्दल 35 प्रश्न विचारले जातात.
जनरल अवेअरनेस बद्दल 39 प्रश्न आणि इंग्रजी बद्दल 35 प्रश्न विचारले जातात.

IBPS PO परीक्षेचा इंटरव्यू | IBPS PO Interview in Marathi

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सिलेक्ट झालेले कॅंडिडेटचा इंटरव्यू घेतला जातो. इंटरव्यू मध्ये विचारलेले प्रश्नांचे उत्तरे आत्मविश्वासाने योग्य द्यावे लागतात. इंटरव्यू मध्ये तुम्हाला कुठलीही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे नम्र पणे तुम्ही उत्तर द्यावी. इंटरव्यू मध्ये तुमचे क्षमतानुसार तुम्हाला निवडले जाईल

IBPS क्लर्क परीक्षेचा एक्झाम पॅटर्न

ही संस्था परीक्षा 2 भागांमध्ये घेतं असते:

पहिले आहे पूर्व परीक्षा आणि दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा.

IBPS Cleark पूर्व परीक्षा एक्झाम पॅटर्न

IBPS क्लर्क ची पूर्व परीक्षा भागांमध्ये घेतली जाते यामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात याचा वेळ एक तासाचा असतो या परीक्षेमध्ये English एकूण 30 प्रश्न विचारले जातात Numerical Ability Paper मध्ये 35 प्रश्न आणि रीजनिंग मध्ये 35 प्रश्न सोडवावे लागतात.

IBPS क्लर्क मेन्स परीक्षेचा एक्झाम पॅटर्न

पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मेन्स परीक्षा होत असते IBPS क्लर्क मेन्स परीक्षा चार भागांमध्ये होत असते ही परीक्षा ऑनलाईन होते एक चुकीच्या उत्तराला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असते. पहिले टेस्टमध्ये जनरल फायनान्स अवेअरनेस मधून 50 प्रश्न सोडवावे लागतात ज्याचा वेळ पस्तीस मिनिटात असतो. Reasoning Ability And Computer Aptitude मधून 50 प्रश्न सॉल्व करायला लागतात ज्याचा वेळ 45 मिनिटांचा असतो.

Quantitative Aptitude मधून 50 प्रश्न सोडवावे लागतात ज्याचा वेळ 45 मिनिटाचा असतो आणि जनरल इंग्लिश मधून 40 प्रश्न विचारले जातात याचा वेळ 35 मिनिटांचा असतो. ही परीक्षा एकूण 160 मिनिटाची असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

IBPS परीक्षा पात्रता काय आहे?

IBPS PO शैक्षणिक पात्रता. संस्था निर्दिष्ट करते की ज्या उमेदवारांना IBPS PO परीक्षेला बसायचे आहे त्यांनी किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. IBPS PO परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षेचा नवीनतम नमुना आणि अभ्यासक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे.

IBPS परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

IBPS PO प्रीलिम्स परीक्षेत तर्क, परिमाणात्मक योग्यता आणि इंग्रजी भाषा असते तर मुख्य परीक्षेत तर्क आणि संगणक अभियोग्यता, सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता, इंग्रजी भाषा, डेटा विश्लेषण आणि व्याख्या, इंग्रजी भाषा (लेटर राइटिंग आणि ईएस) यांचा समावेश होतो.

 IBPS म्हणजे काय?

IBPS या शब्दाचा दीर्घ फॉर्म हा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सेलेक्शन) असा आहे. IBPS चा अर्थ शुद्घ मराठी बँकिंग कर्मचारी निवड संस्था असा होतो.

IBPS लिपिक चांगली नोकरी आहे का?

होय, बँक क्लर्क असणे ही एक चांगली आणि सन्माननीय नोकरी आहे . ही केवळ एक सन्माननीय नोकरीच नाही तर तुम्हाला चांगला पगार देणारी नोकरी देखील आहे. बँकेत, लिपिकाचे पद महत्त्वाचे असते आणि ते सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेसाठी सर्वात इच्छित पद असते.

IBPS मध्ये कोण काम करते?

IBPS ही एक सरकारी भर्ती एजन्सी आहे जी प्रामुख्याने भारतीय स्टेट बँक (SBI) वगळून, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भरती सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करते. हे प्रोबेशनरी अधिकारी, लिपिक आणि पदवीधर नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करते.

Leave a Comment