GNM कोर्सची संपूर्ण माहिती GNM Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

GNM Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार ,आजची परिस्थिती पाहता आपण सगळे कोरोना या महामारीतुन सावरलो आहे.कोरोना या महामारी नंतर वैद्यकीय क्षेत्राला अनन्य असे महत्व प्राप्त झालेले आहे. पूर्वी सुद्धा वैद्यकीय क्षेत्राला खूप महत्त्व होते व आत्ता कोरोना नंतर अजून जास्त प्रमाणात वैद्यकीय क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे भरपूर मुले ही दहावी-बारावी नंतर आपले करिअर हे वैद्यकीय क्षेत्रात करण्याचे ठरवतात.  आजच्या पोस्टमध्ये आपण GNM कोर्स विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत!!!

Gnm Course Information In Marathi

GNM कोर्सची संपूर्ण माहिती GNM Course Information In Marathi

वैद्यकीय क्षेत्र भरपूर प्रमाणात विस्तारलेले असल्यामुळे या क्षेत्रात भरपूर कोर्स व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना या काळात नर्सिंग या क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. डॉक्टर प्रमाणेच नर्स ही भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. नर्स म्हणजे परिचारिका. डॉक्टरांच्या गैरहजेरीत रुग्णांची काळजी घेणे हे महत्त्वाचे काम नर्स बजावत असते.नर्स बनण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रात भरपूर कोर्स आहेत. जसे की ANM नर्सिंग, GNM नर्सिंग, B.SC. नर्सिंग.

GNM चा लॉन्ग फॉर्म “जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी” असा होतो.हा एक सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स तीन वर्षाचा आहे. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट दिले जाते .ज्या आधारे तुम्ही एक रजिस्टर नर्स म्हणून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू शकता.

जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल व तुमच्या मध्ये रुग्णांची सेवा करण्याची भावना असेल तर तुम्ही GNM हा कोर्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

GNM या कोर्स मध्ये मातृत्व काळजी, पुनर्वसन केअर, ट्रामा केअर या सर्व गोष्टी विषयी शिक्षण दिले जाते. GNM या कोर्स मध्ये रुग्णांची काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते.

GNM हा कोर्स करण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करावी लागते.

GNM हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो .परंतु बहुतेक विद्यालय ही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असतात. GNM हा कोर्स करण्यासाठी दहावी ,बारावी मान्यता प्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बारावी या अभ्यासक्रमात जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय अनिवार्य असून. इंग्रजी हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. तसेच बारावी मध्ये 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी GNM कोर्स पूर्ण केला आहे. ते देखील GNM या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. फक्त तो विद्यार्थी बारावीमध्ये 40% टक्के गुणांसह उत्तीर्ण असून ANM नोंदणीकृत असावा. तसेच या  GNM या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थी हा वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असावा ही एक महत्त्वाची अट असते. तसेच GNM हा कोर्स करण्यासाठी वयाची अटही ठरवून दिलेली आहे. ही वट किमान वयोमर्यादा  17 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 35 वर्ष आहे.

GNM या कोर्सचा कालावधी

GNM  हा कोर्से 3.5 वर्षाचा एक डिप्लोमा कोर्स आहे. पहिले तीन वर्ष थेअरी व प्रॅक्टिकल याचे शिक्षण दिले जाते व शेवटचे सहा महिने हे इंटर्नशिप साठी असतात.

विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याला GNM  चे डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात येते.

जेनम या अभ्यासक्रमाला प्रवेश हा मुख्यतः बारावीच्या मुलांच्या आधारे दिला जातो काही महाविद्यालय हे गुणवत्ता यादी जाहीर करत असतात परंतु काही विद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमासाठी काही स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात किंवा राज्यस्तरीय डिप्लोमा प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.  ते प्रवेश परीक्षेचे गुण व बारावी बोर्डाचे गुण दोन्हींच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जे उमेदवार प्रवेश परीक्षेत पात्र होतात .त्यांच्यासाठी GNM अभ्यासक्रमा ला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

जी.एन.एम कोर्स साठी प्रवेश परीक्षा

प्रत्येक कॉलेज एक क्रेडिट लिस्ट हे विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षेवर रिलीज करतात. काही विद्यापीठ हे स्वतः कॉलेजमध्ये स्वतःच्या प्रवेश परीक्षा आयोजित करतात तर काही वेळेस राज्यस्तरीय डिप्लोमा प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. व जे विद्यार्थी या प्रवेश परीक्षा पास होतात ते जीएनएम हा कोर्स करू शकतात.

जी.एन.एम हा कोर्स करण्यासाठी काही प्रसिद्ध प्रवेश परीक्षा

  • AIIMS nursing
  • BHU nursing
  • JIPMER nursing
  • PGIMER nursing
  • IGNOU ओपन नेट
  • RUHS नर्सिंग प्रवेश परीक्षा

तुम्हाला जर भारतातील कोणत्याही विद्यापीठांमध्ये जीआरएम कोर्स साठी नोंदणी करायचे असेल तर आय एन सी या संस्थेने सेट केलेले पात्रता निकष पूर्ण करणे हे फार महत्त्वाचे आहे. व तुम्हाला संगणकाची प्राथमिक माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे.

तुमचे वय हे 17 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याने बारावी कोणत्याही प्रवाहातून किमान 40% गुण असणे महत्त्वाचे आहे.मात्र तरीही विज्ञान शाखेला विद्यार्थी जास्त प्राधान्य देतात. तसेच इंग्रजी विषयावर उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. आय एम सी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ए एन एम या परीक्षेत इंग्रजी सह बारावी मध्ये तुम्हाला 40 टक्के गुण मिळणे हे फार आवश्यक आहे.

जी.एन.एम हा कोर्स झाल्यानंतर इंटर्नशिप साठी पाठवल्या जाणाऱ्या जागा

जी.एन.एम हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला क्लिनिक्स मध्ये इंटरशिप साठी पाठवण्यात येते म्हणजेच याचे उद्देश हे तुमचा अनुभव वाढतो

  • मेडिकल सर्जिकल नर्सिंग
  • कम्युनिटी हेल्थ नर्स
  • चाइल्ड हेल्थ नर्सिंग
  • मीडवाइफ्री अँड गायनॅकॉलॉजिकल नर्सिंग
  • मेंटल हेल्थ नर्सिंग

जी.एन.एम नर्सिंग चा अभ्यासक्रम

पहिले वर्ष

  • सायकॉलॉजी
  • मायक्रोबायोलॉजी
  • फर्स्ट एड
  • पर्सनल हायजिन

दुसरे वर्ष

  • फार्मकोलॉजी
  • कम्युनिकेशन
  • ऑर्थोपेडिक
  • नर्सिंग
  • कम्प्युटर एज्युकेशन

तिसरे वर्ष

  • मिडवायफरी अँड गायनॅकॉलॉजी
  • कम्युनिटी हेल्थ नर्सिंग टू
  • पेडियात्रिक नर्सिंग
  • एज्युकेशनल मेथोडस अँड मिडिया फॉर टीचिंग इंप्रॅक्टिस ऑफ नर्सिंग

चौथे वर्ष

चौथ्या वर्षात तुम्हाला सहा महिन्याची इंटर्नशिप दिली जाते त्यामुळे तुमचा अनुभव वाढतो.

जी.एन.एम कोर्स करण्यासाठी भारतातील काही उत्कृष्ट कॉलेजेस

विद्यार्थ्यांना कुठलाही शाखेतून जीएनएम हा कोर्स करता येतो मात्र बरेचसे विद्यार्थी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र हा विषय निवडून हा कोर्स करायचे ठरवतात. खालील दिलेले कॉलेजेस जी एन एम च्या एनआयआरएफ रँकिंग चे सर्वात उत्कृष्ट कॉलेज आहेत

  • ख्रिश्चन मेडिकल कॉले, वेल्लोर
  • सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगलोर
  • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, चंदिगड
  • एस आर एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नई
  • के.आय.आय.टी, भुवनेश्वर

आता जर विद्यार्थ्यांना जी एन एम हा कोर्स परदेशात करायचा असेल तर त्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेज ची नावे खाली दिली आहेत.

  • युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलिया
  • किंग्स कॉलेज लंडन
  • जॉन होपकिन्स युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट्स
  • युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन
  • युनिव्हर्सिटी ऑफ साऊथअम्प्टन
  • याले युनिव्हर्सिटी
  • युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी
  • युनिव्हर्सिटी ऑफ मँकेस्टर
  • युनिव्हर्सिटी ऑफ टरंटो
  • युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना कॅपेल हील

जी.एन.एम हा कोर्स झाल्यानंतर करियर च्या संधी

तुम्ही जी आणि आम्हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तसेच ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी बऱ्याचश्या करिअरच्या संधी उपलब्ध असतात. दवाखाने नर्सिंग होम्स इन जिओ टीचिंग कंपनी हे सर्व कंपनीत तुम्हाला रेक्रूटिंगसाठी घेतात. नर्सिंग या क्षेत्रातील काही उत्कृष्ट करिअर च्या संधी खाली दिले आहेत.

  • नीड वाइफ नर्स
  • क्लीनिकल नर्स
  • इमर्जन्सी केअर नर्स
  • लीगल नर्सिंग कन्सल्टंट
  • मेंटल हेल्थकेअर
  • नर्सिंग एज्युकेटर
  • चाइल्ड नर्स
  • सोशल वर्कर
  • कम्युनिटी नर्स
  • फॉरेन्सिक नर्स
  • हेल्थ प्रोमोशन ऑफिशियल

जी.एन.एम हा कोर्स केल्यानंतर जॉबच्या संधी

तुम्ही जी.एन.एम हा कोर्स पूर्ण केल्यानंतर खालील ठिकाणी जॉब साठी अप्लाय करू शकता

  • रुरल हेल्थकेअर सेंटर
  • गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स
  • एनजीओस
  • ओल्ड एज होम्स
  • गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम्स
  • कम्युनिटी हेल्थ सेंटर
  • गव्हर्नमेंट डिस्पेन्सरीज
  • नर्सिंग होम्स
  • प्रायव्हेट हॉस्पिटल्स

जी.एन.एम नर्सिंग चे टॉप रिक्रुटर्स

  • अपोलो हॉस्पिटल्स, पगार- 40 लाख
  • फोर्टिस हॉस्पिटल्स, पगार- 40 लाख
  • फोर्टीस हेल्थकेअर, पगार- 42 लाख
  • मेडांटा, पगार- चार लाख

FAQ

जी एन एम चा लॉंग फॉर्म काय आहे?

जी एन एम चा लॉंग फॉर्म जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असा आहे.

जी एन एम या कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?

तुम्हाला जर भारतातील कोणत्याही विद्यापीठांमध्ये जीआरएम कोर्स साठी नोंदणी करायचे असेल तर आय एन सी या संस्थेने सेट केलेले पात्रता निकष पूर्ण करणे हे फार महत्त्वाचे आहे. व तुम्हाला संगणकाची प्राथमिक माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे.तुमचे वय हे 17 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्याने बारावी कोणत्याही प्रवाहातून किमान 40% गुण असणे महत्त्वाचे आहे.

जी एन एम या कोर्सचा कालावधी किती असतो?

जी एन एम या कोर्सचा कालावधी साडेतीन वर्ष इतका असतो पहिली तीन वर्ष हे थेरी प्रॅक्टिकल त्याचे शिक्षण दिले जाते व शेवटचे सहा महिने हे इंटर्नशिप साठी असतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment