GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

GDCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, आजची परिस्थिती पाहता शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. पूर्वीच्या शिक्षण प्रणालीत व आजच्या शिक्षण प्रणालीत खूप बदल घडून आलेले आहेत. पूर्वी दहावी-बारावी म्हणजे खूप शिक्षण झाले असे म्हणायचे. परंतु आता दहावी बारावी झाली म्हणजे ती बोर्डाची परीक्षा फक्त पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाण्यासाठी त्याचे गुण ग्राह्य धरले जातात एवढेच!!!

Gdca Course Information In Marathi

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi

आपल्याकडे फक्त दहावी-बारावी उत्तीर्ण एवढेच प्रमाणपत्र असेल तर आपल्याला कोणत्याही संस्थेत किंवा एखाद्या कंपनीत काम करायचे म्हटले तरीही आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही व पुरेसा पगारही!!!  कारण आता कुठेही आपण नोकरी करण्यासाठी गेलो की, पहिले आपली शैक्षणिक पात्रता काय आहे? हे पाहिले जाते .आता दहावी व बारावीनंतर बरेच अभ्यासक्रम व वेगवेगळे कोर्स आपल्याला पहावयास मिळतात.

परंतु प्रत्येक मुलगा हा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे खर्चिक अभ्यासक्रम किंवा खर्चिक असे कोर्स करू शकत नाही. म्हणून ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही ती मुले दहावी-बारावी नंतर त्याला जो परवडणारा कोर्स आहे तो करायचे ठरवत असतात. असे काही  कोर्स आहेत ज्यामुळे आपल्या शैक्षणिक पात्रतेत भर पडत असते व त्यामुळे आपल्याला खर्चिक कोर्स केले नाही तरी आपल्याला उत्पन्नाचा व रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. तो कोर्स म्हणजे GDCA !!!

चला तर मग मी आज तुम्हाला या GDCA बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.

GDCA  म्हणजे ‘गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी’.ही एक अशी पदवी आहे जी महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना देत असते. सहकारातील सरकारी डिप्लोमा आणि अकाउंटन्सी चा अभ्यासक्रम आहे .सतत वाढत असलेल्या सहकारी क्षेत्रात पात्र उमेदवार व्यवसायिक प्रदान करण्यासाठी हा अभ्यासक्रम सरकारद्वारे दिला जातो.

याचे फॉर्म जिल्हा उपनिबंधक कार्यालय व  सहकारी संस्था येथे उपलब्ध असतात. ही एक राज्यस्तरीय परीक्षा आहे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. ही एक वर्षाची मान्यताप्राप्त पदवी आहे. विभागीय लेखा ,संयुक्त नोंदणी आणि बॉम्बे नागरी सेवा नियम, शिस्त अपील नियम आणि नोंदणीचे अधिकार यावर या परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते.

GDCA हा कोर्स करण्यासाठी काही पात्रता निष्कष ठरवून दिलेले आहेत ते म्हणजे विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून 50 टक्के गुणांनी  परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.GDCA ही परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण लागते .महाराष्ट्र सरकारी कर्मचारी या GDCA विशिष्ट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

तसेच GDCA ही परीक्षा देण्यासाठी दुसरी महत्त्वाची अट ही असते की, आपण जर एखाद्या गव्हरमेंट सेक्टरमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या को-ऑपरेटिव संस्थेत काम करत असाल तर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर तुला साठी काही अटी असतात त्या म्हणजे बारावी जर झाली असेल तर तीन वर्षाचा कामाचा अनुभव लागेल व दहावी झाली असेल तर पाच वर्षाचा कामाचा अनुभव लागेल तेव्हा तुम्ही जी परीक्षा देण्यास पात्र आहे. GDCA या परीक्षेसाठी  वयाची अट असते. विद्यार्थ्यांचे वय हे 22 ते 31 असणे अनिवार्य आहे.

GDCA ह या परीक्षेची जाहिरात जानेवारी-फेब्रुवारीत प्रसिद्ध होते. व मे महिन्यात परीक्षा घेतली जाते .साधारणपणे ही परीक्षा दरवर्षी मे महिन्याच्या 24, 25 व 26 तारखेला घेतली जाते.

GDCA या परीक्षेच्या अभ्यासक्रमा बद्दल आपण माहिती पाहुयात!!!

GDCA  या परीक्षेसाठी सहा विषय असतात व प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा असतो. एका दिवसाला दोन पेपर घेतले जातात. हे पेपर तीन दिवस चालतात म्हणजे तीन दिवसात सहा पेपर अशी परीक्षेची रचना असते.

GDCA हा अभ्यासक्रम सहकार या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम आहे. सहकार म्हणजे काय? सहकाराची भावना काय ?सहकार व्यवस्थापन म्हणजे काय व ते कसे करायचे? त्याच्यात कोणते कोणते कायदे असतात ?त्या कलमांचा वापर कसा केला जातो? याचे प्रशिक्षण दिले जाते.

GDCA या परीक्षेसाठी पुढील सहा विषय असतात:-

मॅनेजमेंट ऑफ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी. 100 मार्क्स

अकाउंट. 100 मार्क्स

ऑडिटिंग  100 मार्क्स

हिस्ट्री ,प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन. 100 मार्क्स

बँकिंग अँड  क्रेडिट सोसायटीज 100 मार्क्स

GDCA  या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कॉलेजला जाण्याची गरज नसते. आपल्याला ऑनलाईन या परीक्षेचा अभ्यासक्रम असलेली पुस्तके मिळतात. तसेच काही खाजगी कोचिंग क्लासेस या परीक्षेचा अभ्यासक्रम शिकवतात.

GDCA  या अभ्यासक्रमात ठरवून दिलेल्या या सहा विषयांमध्ये

  • बँकिंग.
  • सहकारी ऑडिट आणि सहकारी व्यवस्थापन.
  • सहकार कायदा आणि इतर कायदे.
  • सहकाराचा सिद्धांत आणि इतिहास.
  • सहकार्याची व्याख्या आणि तत्त्वे. इतिहासाचे महत्त्व प्रासंगिकता आणि सहकार्याचे महत्त्व. भारतातील सहकारी चळवळीची वाढ.
  • सहकारी चळवळीचा विकास. सहकारी चळवळीतील संबंधांची भूमिका.
  • जगाच्या आधुनिकीकरण आणि खाजगीकरण हा मध्ये सहकार्याचे स्थान.

तसेच समित्यांच्या मुख्य शिफारसी आणि वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या इतर समित्यांचा अभ्यास त्या म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पत  सर्वेक्षण समिती 1954 .

  • सहकारी पतपुरवठा समिती, मेहता समिती .
  • कृषी पत पुनरावलोकन समिती.
  • सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गरजा आणि पायाभूत सुविधा याच्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ.
  • राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ.
  • खादी आणि ग्रामोद्योग आयोग. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ .
  • राज्य सहकारी संघ.
  • महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद.
  • लेखा तत्वे या विषयात
  • पुस्तक ठेवण्याची तत्वे.
  • त्रुटी सुधारणे.
  • ट्रेडिंग खाते.
  • पावती आणि पेमेंट खाते .
  • नफा आणि तोटा खाते.
  • शिल्लक निखळ.
  • उत्पन्न आणि खर्च खाते.

GDCA  या परीक्षेचा फॉर्म आपण ऑनलाइन भरू शकतो. ऑनलाइन फॉर्म भरताना आपल्याला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतात. आपले हॉल तिकीट व व जेथे परीक्षा होणार आहे ते ठिकाण आपल्याला ऑनलाईन वेबसाईट द्वारे माहिती मिळत असते. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना फॉर्म फि ही आठशे रुपये असते. तर ST किंवा SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फॉर्म पाचशे रुपये असते.

GDCA ही परीक्षा दिल्यानंतर आपण सहकारी गृहनिर्माण किंवा सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यवस्थापक किंवा सल्लागार म्हणून काम करू शकता. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला लेखापरीक्षण क्षेत्रात चांगली  सरकारी स्थिती मिळते. तसेच तुमच्या लेखा आणि लेखापरीक्षण कार्यासाठी पूर्ण परवाना दिला जातो.

तुम्ही सरकारी क्षेत्रात पॅनल ऑडिटर, इंटरनल ऑडिटर किंवा अकाउंटंट म्हणून काम करू शकतात. तुम्ही जर एखाद्या सहकारी बँकेत, प्रायव्हेट बँकेत किंवा सहकारी पतसंस्थेत काम करत असाल तर ही परीक्षा दिल्यामुळे आपल्याला प्रमोशन मिळते. व आपल्याला पगारात इन्क्रिमेंट मिळू शकते. बहुतेकदा बँकेतील कर्मचारी हे प्रमोशन व इन्क्रिमेंट साठी ही GDCA ही परीक्षा देत असतात.

GDCA  या परीक्षेचे मुख्य उद्दिष्ट हे कर्मचारी आणि कार्यालय राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांना विभागीय प्रशिक्षण प्रदान करणे हे असते .हे प्रशिक्षण मुळात सहकार विभागातील संस्थांमध्ये दिले जाते ते खालील प्रमाणे:-

1) धनंजय गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट 2) मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था

2) व्ही.व्ही. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट 4) यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन

GDCA ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात ते पाहूयात!!

  • अकाउंट एक्झिक्युटिव्ह.
  • ट्रेझरी एक्झिक्यूटिव्ह.
  • सोसायटी मॅनेजर.
  • फंड मॅनेजर.
  • सोसायटी ऑडिटर.
  • को-ऑपरेटिव बँक ऑडिटर. असिस्टंट अकाउंट.
  • वर्किंग कॅपिटल एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट.

GDCA चा लॉंग फॉर्म काय आहे?

‘गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी’

GDCA ही परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

विद्यार्थ्याने GDCA परीक्षा देण्यासाठी वाणिज्य शाखेतून 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण असावे ही पहिली अट आहे.दुसरी अट म्हणजे उमेदवार कोणत्याही सहकारी किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये किंवा एखाद्या को-ऑपरेटिव संस्थेत काम करत असेल व त्याला GDCA  ही परीक्षा द्यायची असेल तर त्या उमेदवाराची दहावी झाली असेल तर त्याला कामाचा पाच वर्षाचा अनुभव लागेल व बारावीनंतर परीक्षा द्यायची असेल तर तीन वर्षाचा अनुभव लागेल.

GDCA हि परीक्षा दिल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतात ?

GDCA  ही परीक्षा दिल्यानंतर आपण अकाउंट एक्झिक्युटिव्ह, ट्रेझरी एक्झिक्युटिव्ह, सोसायटी मॅनेजर ,फंड मॅनेजर, सोसायटी ऑडिटर ,को-ऑपरेटिव बँक ऑडिटर, असिस्टंट अकाउंट, वर्किंग कॅपिटल असिस्टंट  किंवा एखाद्या सीए च्या ऑफिसमध्ये सुद्धा जॉब करू शकतो.

GDCA ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला कॉलेजला जावे लागते का?

नाही, GDCA  ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला कॉलेजला जाण्याची गरज नसते.आपल्याला ऑनलाइनही अभ्यासक्रम उपलब्ध असतो. तसेच बाजारात या विषयाची पुस्तकेही उपलब्ध असतात. तसेच काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हा अभ्यासक्रम शिकवतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

GDCA कोर्सचे फायदे काय आहेत?

हा कोर्स सहकारी संस्थांचे व्यवस्थापन (गृहनिर्माण आणि परिसर), कामकाज, प्रशासन आणि लेखा, सोसायटी व्यवस्थापक किंवा नंतर सहकारी संस्थांचे सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम करण्यासाठी इच्छुकांना तयार करण्यासाठी सखोल ज्ञान प्रदान करतो.

GDCA परीक्षा काय आहे?

गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी बोर्ड (GDC & A. बोर्ड), पुणे – गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी (GDC&A) परीक्षा आणि Coop मधील प्रमाणपत्राबाबत अधिसूचना. गृहनिर्माण व्यवस्थापन (CHM) परीक्षा 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी नियोजित आहे.

GDCA आणि CA मध्ये काय फरक आहे?

चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही लेखा आणि वित्त क्षेत्रातील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यावसायिक पात्रता आहे, तर सहकारी संस्था आणि त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणारा गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाउंटन्सी (GDCA) हा एक विशेष डिप्लोमा आहे.

GDCA कोर्सचे फायदे काय आहेत?

या कोर्समध्ये सहकारी संस्थांचे व्यवस्थापन (गृहनिर्माण आणि परिसर), कामकाज, प्रशासन आणि लेखा, सोसायटी व्यवस्थापक किंवा सहकारी संस्थांमध्ये सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम करण्यासाठी उमेदवारांना तयार करणे याविषयी सखोल ज्ञान मिळते.

जीडीसीए योग्यता क्या है?

जीडीसीए परीक्षा (सरकारी डिप्लोमा इन कोऑपरेशन एंड अकाउंटेंसी) एक पेशेवर योग्यता है जो सहकारी प्रबंधन, वित्त और अकाउंटेंसी पर केंद्रित है। इसका उद्देश्य सहकारी संस्थानों को कुशलतापूर्वक प्रबंधित करने में सक्षम कुशल पेशेवरों को विकसित करना है।

8 thoughts on “GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information In Marathi”

  1. मी कर्नाटकची आहे पण माझं 11 वी पासून च शिक्षण महाराष्ट्र इथे शिकत आहे मी आता b.com 2 nd ला आहे तर मग मी हि परीक्षा देऊ शकतो का ?

  2. GDCA exam मराठीत आणि इंग्रजी मध्ये सुद्धा असते. तर मला अस विचारायचं आहे
    कोणत्या language मध्ये exam दिली तर supiror असेल.

  3. Hellow मी आत्ता T.Y B.com ला आहे लास्ट इयरला तर मला ही exam देता येईल का.

  4. हा परीक्षा मी 2023 बॅच ला फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहे.

Leave a Comment