सीएटी परीक्षेची संपूर्ण माहिती CAT Exam Information In Marathi

CAT Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण CAT च्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही येताना किंवा जाताना सीएटी परीक्षेचे बोर्ड पाहिले असतील, जिथे CAT कोचिंग क्लासेस दिलेले असतात आणि खूपच लोकांना प्रश्न पडला असेल की नेमके सीएटी काय आहे?

Cat Exam Information In Marathi

सीएटी परीक्षेची संपूर्ण माहिती CAT Exam Information In Marathi

मित्रांनो आपण या लेख मध्ये CAT बद्दल संपूर्ण माहिती (CAT exam information in Marathi) जाणून घेणार आहोत. की CATचा अभ्यास कसा करावा सीएटी चा फुल फॉर्म काय? आहे त्याचा सिलॅबस काय आहे? आणि सीएटी च्या परीक्षेसाठी काय पात्रता लागते? मित्रांनो तुमच्या या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेख मध्ये दिलेले आहेत तर तुम्ही या लेखला पूर्ण वाचावे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल.

सीएटी काय आहे | CAT Exam Information in Marathi

मित्रांनो सीएटी चा फुल फॉर्म हा कॉमन एडमिशन टेस्ट (Common Admission Test) असा होतो. त्यालाच मराठी मध्ये सामान्य प्रवेश परीक्षा असे म्हटले जाते. मित्रांनो सीएटीचा पेपर हा विद्यार्थ्याची योग्यता तपासण्यासाठी घेतला जातो. विद्यार्थी हा मॅनेजमेंट कोर्सेस घेण्यासाठी पात्र आहे की नाही यासाठी CAT चा Test घेतला जातो.

सीएटी परीक्षा ही भारतातील सर्वात छान आणि सर्वात कठीण Entrance Exam मानली जाते. CAT ची परीक्षा ही प्रमुख जे विद्यार्थी मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये जाणारे असणार त्यांच्यासाठी असते. प्रत्येक एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्याला सीएटी ची एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते. विना CAT Entrance Exam दिल्याने ऍडमिशन भेटू शकत नाही.

सीएटी हा कॉमन ऍडमिशन टेस्ट असतो आणि हा टेस्ट कॉम्प्युटर वर घेतला जातो. हि परीक्षा शेवटच्या रविवारी आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतली जाते. CAT ची परीक्षा ही IIM सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी घेतली जाते.

ऍडमिशन घेण्यासाठी प्रत्येक इन्स्टिट्यूट चा वेगवेगळ्या प्रकारे एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला जो IIM किंवा इतर इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेणार असले तर त्यांना सीएटी ची टेस्ट द्यावी लागते. सीएटी ची परीक्षा ही मोठ्य पॉप्युलर परीक्षेमध्ये येते. यामधून PGP/PGDM/MBA आणि यासारख्या इतर मॅनेजमेंट कोर्सेस साठी IIM किंवा नॉनआयएम भारतातील कॉलेजेस मध्ये CAT ची परीक्षा घेतली जाते. भारतामध्ये एकूण 20 आयआयएम इन्स्टिट्यूट (IIM Institute) आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या मॅनेजमेंट कोर्सेस साठी प्रवेश घेतला जातो.

CAT परीक्षेसाठी काय पात्रता आहे? CAT Exam Eligibility in Marathi

CAT ची परीक्षा पास करण्यासाठी उमेदवाराला खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

1) उमेदवाराचे शिक्षण हे पूर्ण झालेले असले पाहिजे आणि त्याचे Graduation चे तीन वर्ष मध्ये 50% च्या खाली मार्क नसायला पाहिजे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 45% मार्क्स असले तरी ते CAT परीक्षेसाठी पात्र ठरतात.

2) उमेदवाराचे ग्रॅज्युएशन हे नामांकित विद्यापीठातून झालेले असावे जी भारत सरकारच्या अधिनियमाखाली येते.

3) Graduation च्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा उमेदवार हा CAT च्या परिक्षेसाठी apply करू शकतो. ज्या उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल पण रिझल्ट लागला नसेल तरीही तो उमेदवार CAT परीक्षा देऊ शकतो.

4) ज्या विद्यार्थ्यांचे CAT परीक्षा मार्फत सेलेक्शन होण्यात येईल. त्यांच्याजवळ त्यांचे संपूर्ण कागदपत्र असणे अनिवार्य आहे.

CAT परीक्षेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

1) उमेदवाराचे इयत्ता दहावी (10th) आणि बारावी (12th) पास चे मार्कशीट असणे आवश्यक आहे.

2) उमेदवाराचे ग्रॅज्युएशन मार्कशीट किंवा डिप्लोमा केले असल्यास त्याचे मार्कशीट असणे अनिवार्य आहे.

3) जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत. त्यांना कॉलेजमधून Second Year आणि Last Year मार्कशीट द्यावे लागते.

4) जर उमेदवाराला कुठल्याही कामाचा अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र द्यावे

5) एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, सारख्या Category च्या विद्यार्थ्यांना Category चे प्रमाणपत्र स्कॅन करून आणि Pdf च्या स्वरूपात द्यावे लागते.

6) उमेदवाराला सही केलेला फोटो आणि तसेच स्वतःचा पासपोर्ट फोटो अपलोड करावा लागते.

7) उमेदवाराने CAT साठी अप्लाय करताना योग्य फोन नंबर आणि ईमेल आयडी द्यावे.

CAT परीक्षेचा सिल्याबस काय आहे? | CAT Syllabus in Marathi

सीएटीचे परीक्षेचे मुख्यतः तीन भागांमध्ये विभाजित केलेला आहे:

VARC (Verbal Ability & Reading Comprehension) | मौखिक क्षमता आणि वाचन आकलन

यामध्ये रीडिंग कॉम्प्रेशन, ऑड वन आऊट, प्यारा समरी आणि प्यारा जंबल्स यासारखे विषय असतील.

DILR (Data Interpretation & Logical Reasoning) | डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग

बायनरी लॉजिक, टीम फॉर्मेशन अरेंजमेंट, बार ग्राफ, रडार चार्ट, रूट्स अँड नेटवर्क, कॉलम ग्राफ, बबल्स चार्ट, व्हेन डायग्राम, पायी चार्ट टेबल्स, डेटा कैसेलेट्स रीजनिंग ई. सारखे विषय यामध्ये असतील.

QA (Quantitative Ability) | परिमाणात्मक क्षमता

यामध्ये एर्थमॅटिक, नंबर सिस्टीम, मेन्सन्यूरेशन, मॉडर्न मॅथमॅटिक्स, जॉमेट्री ई. सारखे विषय असतात.

सीएटी च्या परीक्षेसाठी काय पात्रता हवी असते?

1) सीएटीचे परीक्षेसाठी विद्यार्थ्याला यूजीसी नामांकित युनिव्हर्सीएटी मधून बॅचलर डिग्री 50% गुणासह पास असणे आणि एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी, डीएसी Category साठी 45% गुणांसह पास असणे अनिवार्य आहे.

2) ज्या उमेदवारांचे (CA/CS/ICWA) सीए, सीएस किंवा आयसीडब्ल्यूए सारखी डिग्री असेल तर, त्यांना कमी मार्कांसह CAT परीक्षा देता येते.

3) ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा उमेदवार CAT ची परीक्षा देऊ शकतो. फक्त त्याला 50% गुण असणे अनिवार्य आहे.

CAT चे परीक्षेसाठी रिझर्वेशन पॉलिसी काय आहे.?

एससी कॅटेगरी साठी परीक्षेमध्ये 15% जागा आरक्षित आहे.

एसटी कॅटेगरी साठी 7.5% जागा आरक्षित आहे.

ओबीसी कॅटेगरी साठी 27% जागा रिझर्वेशन पॉलिसी आहे.

EWS साठी 10% जागा आरक्षित आहे.

मित्रांनो जर तुम्ही एससी, एसटी किंवा ओबीसी कॅटेगरी मध्ये येत असणार तर, तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि इतर अन्य डॉक्युमेंट जवळ असणे अनिवार्य आहे.

CAT च्या परीक्षेसाठी काय वयोमर्यादा लागते? | CAT Exam Age Limit In Marathi

मित्रांनो CAT च्या परीक्षेसाठी काही वयोमर्यादाची आवश्यकता नाही. फक्त यासाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे अनिवार्य आहे.

सीएटी चे परीक्षेसाठी एप्लीकेशन फी किती आहे?

मित्रांनो सीएटी ची एप्लीकेशन फी जेव्हा नोटिफिकेशन येते तेव्हा सांगितली जाते. CAT च्या परीक्षेमध्ये कॅटेगरी वाईस fees लागत असते. Fees बद्दल तुम्हाला खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे.

जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारासाठी 2200 रुपये Fees असते.

एससी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारासाठी 1100 रुपये Fees असते

मित्रांनो एप्लीकेशन फीस ही कमी जास्त होऊ शकते. एप्लीकेशन Fees तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भुगतान करू शकतात. एप्लीकेशन Fees ऑनलाइन Pay करतांना तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग साठी ऑप्शन दिले जातात. जर तुम्ही ऑफलाइन पेमेंट करणारे असला तर तुम्ही डीडी द्वारे एसबीआय बँकेत जाऊन पेमेंट करू शकतात.

सीएटी चे परीक्षेसाठी अप्लाय कसे करायचे? | How to apply cat exam in Marathi

1) मित्रांनो CAT च्या परीक्षेसाठी अप्लाय करताना तुम्हाला iimcat.ac.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचे अकाउंट रजिस्टर करायचे आहे.

2) अकाउंट रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि जनरेटेड पासवर्ड मिळेल. तो तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायचा आहे. जेणेकरून तुम्हाला पुन्हा लागला तर तुम्ही त्याला युज करू शकतात.

3) वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही नवीन नोंदणी ऑप्शन वर क्लिक करायचं.

4) तिथे तुमचा फोन नंबर, ईमेल-आयडी, नाव, जन्मतारीख इ. सारखी महत्त्वाची माहिती तिथे भरायची आहे.

5) सर्व माहिती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तिथून एक ओटीपी मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. तो OTP नंबर तिथे भरायचा आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे.

6) सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथून तुमचा सीएटी चा आयडी मिळून जाईल आणि तुम्ही त्या आयडी द्वारे एप्लीकेशन फॉर्म भरू शकतात.

7) तुम्हाला तिथे तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि तुमचा फोटो आणि सही अपलोड करायचे आहे.

8) सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तिथे तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म भरला जाईल आणि तुम्ही त्याची प्रिंट डाउनलोड करून तुमच्या जवळ जमा असू द्यावी. जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही ते प्रिंट त्यांना दाखवू शकतात.

9) सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितपणे भरायची आहे. नाहीतर तुमचा एप्लीकेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


CAT परीक्षेची पात्रता काय आहे?

इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील 3 वर्षांची बॅचलर पदवी धारण केलेली असावी . सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी IIM CAT परीक्षा पात्रता निकष पदवीमध्ये 50% गुण आणि राखीव श्रेणीसाठी 45% आहे.


CAT परीक्षा कशासाठी आहे?

CAT किंवा कॉमन ॲडमिशन टेस्ट ही एक राष्ट्रीय परीक्षा आहे जी दरवर्षी भारतीय व्यवस्थापन संस्थांद्वारे रोटेशनल आधारावर घेतली जाते. हे व्यवस्थापन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पदवीधरांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या चाचणीद्वारे, तुम्ही आयआयएम आणि भारतातील इतर टॉप बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश करू शकाल

CAT परीक्षा एका वर्षात किती वेळा घेतली जाते?

CAT (सामान्य प्रवेश परीक्षा) परीक्षा भारतात वर्षातून फक्त एकदाच घेतली जाते आणि शीर्ष एमबीए प्रोग्राम्स, विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे.


CAT ची तयारी कधी सुरू करावी?

तुम्ही लवकर तयारी सुरू करू शकता आणि CAT च्या तयारीसाठी स्वतःला किमान 6-8 महिने देऊ शकता. हे तुम्हाला सर्व साहित्यात जाण्यासाठी, सराव प्रश्न आणि मॉक टेस्ट करण्यासाठी आणि तुमच्या कमकुवत क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ देईल. आपण प्रथम एक मजबूत पाया तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Leave a Comment