बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती Balasaheb Thakre Information In Marathi

Balasaheb Thakre Information In Marathi  बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख हिंदूहृदय सम्राट मानल्या जातात. महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनाला त्यांची मोठी महत्त्वाची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे आपल्या चांदीच्या सिंहासनावर बसून विरोधकांना धमक्या द्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व वाघासारखे होते. त्यांनी खूप महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले आहे. त्यांचे नाव जरी घेतले तरी, आपल्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही.

Balasaheb Thakre Information In Marathi

बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती Balasaheb Thakre Information In Marathi

जन्म :

बाळासाहेब ठाकरे जन्म 23 जानेवारी, 1926 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव सीताराम ठाकरे तर आईचे नाव रमाबाई होते. त्यांना एकूण नऊ भाऊ बहीण होते. त्यामध्ये सर्वात मोठे व त्यांचे वडील हे एक सामाजिक कार्यकर्ते होते.

भारत स्वातंत्र्य होण्याच्या कालावधीत भारतात राजेशाही पद्धत घालून संघटित करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले व त्यानुसार प्रत्येक राज्य स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र वेगळ राज्य करण्यासाठी 150 झालेल्या संयुक्त महाराष्ट्र अभियानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे वडील सहभागी होते. त्याच बरोबर मुंबईला भारताच्या एकीकरणात त्यांचा मोठा वाटा होता.

जीवन :

बाळासाहेबांचे लग्न मीना ठाकरे यांच्याशी झाले. त्यांना तीन अपत्ये आहेत. बिंदूमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे. बाळासाहेबांनी उपजिविकेसाठी ‘बॉम्बे फ्री प्रेस’ जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरी केली होती. काही काळानंतर त्यांनी नोकरीतून राजीनामा देऊन भावांसोबत व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केले.

हे साप्ताहिक 1960 मध्ये सुरू केले. साप्ताहिकासाठी बाळासाहेबांना मार्मिक हे नाव वडील प्रबोधनकारांनी सुचवले होते. मराठीतील पहिली व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक हे ठरले. मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत कानेकर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे वडील त्यांच्या काळात समाज सुधारक आणि लेखक होते. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी टायपिंगचे काम करायचे. त्यामुळे त्यांचे डोळे निकामी झाले. मातोश्रीमध्ये राहण्याच्या आधी बाळासाहेब यांचे कुटुंब दादरच्या एका चाळीत राहत होते. त्या चाळीत दक्षिण भारतीय पण राहत होते. त्यावेळी संपूर्ण चाळीवासींसाठी एकच स्नान गृह होते. दक्षिण भारतीय त्यांच्या सवयीनुसार अंगाला तेल लावून मगच आंघोळीला जायचे. बाळासाहेब ठाकरे कुटुंबीय आणि त्यांना या गोष्टीसाठी रोखले.

ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार तेल  लावून अंघोळ केल्याने नंतर जाणारा पाय घसरुन पडू शकतो. पण दक्षिण भारतीयांना ती काही पटत नव्हते. शेवटी वैतागून ठाकरे कुटुंबियांनी त्यांना अद्दल घडविण्याचे स्वतःच्या घराबाहेर मटणाचे तुकडे ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे दक्षिण भारतीय यांचे कुटुंब चिडले, तेव्हा पासून ठाकरे कुटुंबियांना दक्षिण भारतीयांचे द्वेष आहेत.

सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतीय ऑफिसात काम करायचे आणि मराठी वर्ग बेरोजगार होता. मराठी वर्गाला जागृत करण्यासाठी त्यांनी आपल्या मार्मिक साप्ताहिक पत्रिकेत दक्षिण भारतीयांची उत्कृष्ट कारकिर्द करणाऱ्याची नावे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. हे बघून मराठी रोजगार युवकांना संताप झाला.

त्यांना वाटू लागले की, दक्षिण भारतीय आपली नोकरी बळकावून राहत आहेत. त्यांचा परिणाम असा झाला की, तरुण बेरोजगार कार्यालयाच्या बाहेर नोकरीसाठी येऊ लागला. बाळासाहेबांचा कणखर आवाज आणि व्यक्तित्व मराठी तरुणांची मने हादरवून टाकायची.

वृत्तपत्रे :

बाळासाहेबांनी स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट 1960 मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे मार्मिक नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले होते. मार्मिक हे मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले आहे.

त्यानंतर या वक्तृत्वाबरोबरच ठाकरे यांनी भेदक लेखनही सुरू केले. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होते. सामना हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यात संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे अग्रलेख असायचे.

शिवसेना पक्ष :

बाळासाहेबांनी महाराष्ट्रात सकाळी 19 जून 1996 ला नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त 18 माणसांच्या उपस्थित शिवसेना म्हणून कट्टर हिंदू राष्ट्र न्यायालयीन संस्थेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात शिवसेनेला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. परंतु वेळ सरता सरता शिवसेनाही सत्तेत आली. पक्ष स्थापनेच्या चार महिन्यानंतर साहेबांनी आपल्या मार्मिक साप्ताहिक पत्रातून जाहिरात केले की, शिवसेनेची पहिली सभा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे होणार आहे.

सभेसाठी ही जागा योग्य नसल्याचे काहींनी त्यांना सुचवले. पण पहिल्याच सभेत लोकांची अफाट गर्दी झाल्याने शिवाजी पार्क पण कमी पडले. त्यांच्या पहिल्या सभेत जमलेल्या प्रेक्षक वर्गात प्रचंड उत्साह होता. 1995 साली भाजप-शिवसेना युती होऊन महाराष्ट्रात नवीन सरकार आले. बाळासाहेब यांचे उग्र विचार आणि वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेकदा खटले दाखल झाले होते.

बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे वाघासारखे होते. ते आपल्या चांदीच्या सिंहासनावर बसून आपल्या विरोधकांना उघडपणे धमक्या देत होते. त्यांना लोकं भेटावयास त्यांचा निवास्थानी मातोश्रीला जायचे. त्यांचे म्हणणे होते की, ज्यांना मला भेटायच आहे. ते घरी येऊ शकतात. बाळासाहेबांची विशेष गोष्ट म्हणजे तिथे कधीही कोणाला स्वतःहून भेटली नाहीत.

ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे, त्यांनी घरी यावे असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मातोश्री मुंबई येथे त्यांच्या घरी जायचे. बॉलिवूडमधील कलाकार त्यांच्या घरी भेटण्यासाठी यायचे. हिटलर यांचे ते नेहमी कौतुक करायचे.

त्यांच्या हातात सिगारेट किंवा पाईप नेहमी असायचा. गळ्यात रुद्राक्षांची माळ, कणखर आवाज असे त्यांचे वैशिष्ट्य होते. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक नाही लढवली. ते नेहमीच देशाच्या भल्यासाठी लढायचे.

राजकीय कार्य :

बाळासाहेबांनी झुणका-भाकर केंद्रांची योजना वृद्धाश्रमांची साखळी वृद्धांना सवलती झोपडपट्टीवासीयांना घरे ह्या योजना राबविल्या. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मुंबईतील उड्डाणपूल बॉम्बेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही त्यांची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचाच होता.

हिंदुत्ववाद :

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी हृदय सम्राट म्हटले. “गर्व से कहो हम हिंदू है” हे घोषणा ठाकरे यांच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.

मृत्यू :

बाळासाहेबांना 25 जुलै, 2012 रोजी स्वाच्छोसवासाचा त्रासासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 14 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांची तब्येत खालावली डॉक्टरांनी त्यांना घरी मातोश्रीवरच औषधोपचार द्यायला सुरु केले.

पण त्यांच्या हाती यश आले नाही. 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले. शिवाजी मैदान येथे राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्ययात्रेत अफाट जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी एकत्रित झाला होता. असा हिंदू सम्राट पुन्हा येणेच नाही एवढे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व खास होते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली,ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

 

Leave a Comment