सीडीएस परिक्षेची संपूर्ण माहिती Cds Exam Information In Marathi

Cds Exam Information In Marathi | नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लाईफ मध्ये सीडीएस परीक्षेविषयी संपूर्ण माहिती (Cds Exam Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

Cds Exam Information In Marathi

सीडीएस परिक्षेची संपूर्ण माहिती Cds Exam Information In Marathi

मित्रांनो जसे की सगळ्यांना माहीतच आहे की भारतातील प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळे लक्ष असते काहींचा गोल हा डॉक्टर बनण्याचा असतो तर काहींचा इंजिनियर तर काहींना आयएस ऑफिसर बनण्याचा असतो आणि काही लोकांना आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सेनेत भरती होण्याचं स्वप्न असतो. तर मित्रांनो भारतीय सेनेमध्ये भरती होण्यासाठी सीडीएस ची परीक्षा द्यावी लागते.

ही परीक्षा पास करणे उमेदवारासाठी कठीण असते म्हणून या परीक्षेसाठी विद्यार्थी रात्र दिवस मेहनत करतात. काही उमेदवार बारावीपासूनच सेनेच्या भरतीसाठी तयारी करायला लागतात तर मित्रांनो आपण या लेख मध्ये सीडीएस परीक्षा काय आहे? आणि सीडीएस परिक्षेची तयारी कशी करायची? तर याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेख मध्ये आपण जाणून घेणार आहोत.

सीडीएस परीक्षा काय आहे? Cds Exam information in Marathi

मित्रांनो सीडीएस परीक्षेचा फुल फॉर्म कम्बाइन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (Combined Defence Services Examination) असा होतो. ज्या उमेदवारांना भारतीय सेनेमध्ये जायचे असते त्यांच्यासाठी CDS आणि AFCAT सारख्या परीक्षांची त्यांना तयारी करावी लागते. उमेदवाराला या परीक्षेला बसण्यासाठी ग्रॅज्युएशन होणे महत्त्वाचे असते.

मित्रांनो जसे की आपल्याला माहीतच आहे की भारतीय सुरक्षा दलाचे तीन अंग असतात त्यात पहिले म्हणजे वायुसेना स्थलसेना आणि जलसेना असे प्रकार असतात. एक प्रकारची एकत्रित परीक्षा आहे या परीक्षेतल्या माध्यमातून उमेदवार स्थलसेना वायुसेना किंवा जलसेनेमधील एक नोकरीसाठी आवेदन करू शकतो. उमेदवार हा सीडीएस परीक्षेच्या माध्यमातून भारतीय सेनेतील अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतो. मित्रांनो सीडीएस ही परीक्षा यूपीएससी मार्फत एका वर्षात दोन वेळेस घेतली जाते .

मित्रांनो सीडीएस परीक्षेचे दोन स्टेप्स असतात त्यात पहिले म्हणजे उमेदवाराला लिखित स्वरूपाची परीक्षा असते. आणि दुसरी म्हणजे इंटरव्यू असतो. या परीक्षेच्या अंतर्गत उमेदवारांना परीक्षा पास केल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीनंतर उमेदवारांना ट्रेनिंग साठी ट्रेनिंग सेंटर मध्ये पाठवले जाते.

सीडीएस परीक्षेसाठी काय पात्रता असते?

सीडीएस परीक्षेची पात्रता ही 4 भागांमध्ये विभागली गेली आहे-

यामध्ये तुमचं राष्ट्रीयत्व वयोमर्यादा आणि वैवाहिक स्थिती शैक्षणिक पात्रता आणि भौतिक मानके इत्यादी गोष्टी चा समावेश करण्यात आला आहे.

1) राष्ट्रीयत्व – Nationality

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांचे राष्ट्रीयत्व खालीलपैकी कोणतेही एक असावे –

1962 च्या पूर्वी भारतात सेटल झालेले नेपाळ, तिबेट, भूतानचे निर्वासित आहेत. भारतीय वंशाची कोणतीही व्यक्ती जी श्रीलंका, इथिओपिया, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया,पाकिस्तान, मलावी, व्हिएतनाम, झांबिया, युगांडा, पूर्व आफ्रिकन देश केनिया, झैरे या देशातून भारतात कायमचे स्थायिक होण्याच्या उद्देशाने स्थलांतरित झाले आहेत.

Note – नेपाळमधील गोरखा विषय वगळता 2 आणि 3 Category मधील उमेदवारांना भारत सरकारने जारी केलेले पात्रतेचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे.

सीडीएस परीक्षेसाठी वयोमर्यादा आणि वैवाहिक स्थिती : Age Limit & Marriatial Status

IMA म्हणजेच (इंडियन मिलिटरी अकादमी) मध्ये पुरुष उमेदवारांची वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे असावी आणि वैवाहिक स्थिती अविवाहित असायला पाहिजे.

INA म्हणजे (इंडियन नेव्हल अकादमी) मध्ये प्रवेश घेण्यासाठी, पुरुषांची वयोमर्यादा 19 ते 22 वर्षे असावी आणि वैवाहिक स्थिती अविवाहित असायला हवी.

भारतीय AFA (वायुसेना अकादमी) मधील पुरुषांसाठी वयोमर्यादा 19 ते 23 वर्षे असावी लागते.

AFA मध्ये, उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्यास, वैवाहिक स्थिती अविवाहित असणे आवश्यक आहे आणि जर उमेदवाराचे वय हे 25 वर्षांपेक्षा जास्त असेल तर विवाहित पुरुष देखील काम करु शकेल परंतु असा पुरुष आपल्या कुटुंबासह राहू शकत नाही.

AFA मध्ये प्रशिक्षणादरम्यान उमेदवाराने अविवाहित राहणे compulsary आहे.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (एसएससी पुरुष) मधील पुरुष उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे आणि वैवाहिक स्थिती अविवाहित असायला हवी. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (एसएससी वुमन) मधील महिलांचे वय 19 ते 25 वर्षे असावे लागते

OTA मधील महिलांची वैवाहिक स्थिती अविवाहित, विधवा किंवा अविवाहित, घटस्फोटित असावी.

सीडीएस ची परीक्षा ही तीन सेनाच्या भरतीसाठी घेतली जात असते या परीक्षेसाठी पात्रता ही वेगवेगळे असे पात्रता पूर्ण न केल्याशिवाय उमेदवाराला त्याची परीक्षा देता येत नाही. जर उमेदवार या परीक्षेला देतो तर ती मान्य केली जात नाही तर आपण खालील प्रमाणे सीडीएस परीक्षेचे एलिजिबिलिटी जाणून घेणार आहोत.

  1. सीडीएस परीक्षा बसण्यासाठी उमेदवाराची ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे असते. इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. सीडीएस परीक्षेसाठी विद्यार्थी भारतीय असायला पाहिजे. भारतीय नौदल अकादमीमध्ये भरतीसाठी, उमेदवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून Engineering Graduate असणे आवश्यक आहे.
  3. सीडीएस परीक्षेसाठी विद्यार्थी हा जर भारतीय असून श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या इतर देशांमध्ये राहत असेल तर तो तरी सुद्धा सीडीएसची परीक्षा देऊ शकतो.
  4. सीडीएस परीक्षेसाठी नेपाळ व भूतान चे उमेदवार सुद्धा अप्लाय करू शकतात.

सीडीएस परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

वायुसेना अकादमी साठी शैक्षणिक पात्रता – 12 वी भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेउन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अभियंता पद घेऊन उत्तीर्ण झाला असेल. यासाठी वायोमर्यादा – 19 ते 24 वर्षे आहे.

इंडियन मिलिटरी अकादमी साठी शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी घेतलेली असावी. यासाठी वयोमर्यादा – 19 ते 24 वर्षे आहे.

भारतीय नौदल अकादमी साठी शैक्षणिक पात्रता – गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र सारख्या विषयांसह इंजिनियर ची पदवी किंवा B.Sc पदवी असणे आवश्यक आहे.

यासाठी वायोमर्यादा – 19 ते 25 वर्षे आहे.

अधिकारी प्रशिक्षण अकादमी साठी 19 ते 25 वर्षे आहे.

सीडीएस परीक्षेची तयारी कशी करायची?
मित्रांनो तुम्हाला सिरीयस परीक्षेची तयारी करण्यासाठी खालीलपैकी काही महत्त्वपूर्ण टिप्स दिलेल्या आहेत.

1. Positive Attitude (पॉझिटिव्ह एटीट्यूड)

मित्रांनो सीडीएस परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्या जवळ पॉझिटिव्ह एटीट्यूड असायला पाहिजे तयारी करताना नेहमी काही विद्यार्थी घाबरून जातात आणि अभ्यास सोडून देतात कशामध्ये विद्यार्थ्यांना हे विसरायला नको की जे आज सीडीएस ऑफिसर आहेत ते पण एका काडी विद्यार्थी होते. जेव्हा जर ते सीडीएस ची परीक्षा पास करू शकता तर तुम्ही का नाहीत असा पॉझिटिव्ह अटीट्युड परीक्षेची तयारी करताना असायला पाहिजे.

2) Syllabus

सेकंड स्टेप आहे की सिलॅबस हा महत्त्वाचा आहे सीडीएस परीक्षेची तयारी करताना त्याचा सिल्याबस समजून घेणे महत्त्वाचे कोणत्या विषयावर मी कोणत्या टॉपिक वर सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे. ते आधी निश्चित करावे. या व्यतिरिक्त सिल्याबसला छोट्या छोट्या भागांमध्ये वाचण्याचा प्रयत्न करावे त्यामुळे तुमचा गोल लवकरात लवकर तुम्ही मिळू शकतात.

3) Time management

टाईम मॅनेजमेंट हा महत्त्वाचा असतो तो सिरीयस परीक्षेमध्ये असो का जीवनात असो परीक्षेमध्ये खूपच विद्यार्थी ही चूक करतात की सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते जोश जोश मध्ये अभ्यास करायला लागतात आणि जेवणावर आणि झोपेवर जास्त लक्ष देत नाही. अशामध्ये विद्यार्थ्याचे काही दिवसात शरीर खराब होऊन जाते आणि तेव्हा त्याला परीक्षेची तयारी करता येत नाही. यामुळे अभ्यासाची चक्कर मध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमची झोप आणि जेवण हे नेहमीच पणे करायचंय आणि त्यासोबत एक्सरसाइज सुद्धा करायचे आहे.

4) Daily Routine डेली रुटीन

मित्रांनो महत्वाचे टिप्स मध्ये डेली रुटीन हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो. सर्वात आधी तुम्ही पाहून घ्यायचे की सीडीएस परीक्षेच्या अभ्यास साठी तुमच्याजवळ सगळे आवश्यक पुस्तक आणि नोट्स आहेत की नाही. यानंतर कोणत्या विषयावर आणि कोणत्या टॉपिक वर आणि किती रिविजन करायचा आहे त्या गोष्टीवर लक्ष द्यायचे त्यानुसार तुम्ही तुमचा टाईम टेबल बनवून घ्यायचा. बिना लक्ष्याचे सेट केलेलं गोल की तुम्ही किती वाचायचे याशिवाय तुम्ही परीक्षा पास करू शकत नाही.

5) Practice

सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेची प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल त्यासाठी तुम्हाला काही टेस्ट सॉल करावे लागतील. तुम्हाला सीडीएस परीक्षेसाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवावे लागतील. यामुळे तुम्ही सीडीएस परीक्षेचा एक्झाम पॅटर्न समजणार आणि तुमच्या स्पीड सुद्धा वाढेल आणि तुम्हाला हे सुद्धा कळून जाईल की सीडीएस पेपर मध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात सीडीएस पेपरला तुम्ही दोन तासाच्या आत सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा

6) General knowledge

सीडीएस परीक्षेमध्ये जनरल नॉलेज बद्दल खूपच प्रश्न विचारले जातात म्हणून तुमचा जनरल नॉलेज सुद्धा चांगले असणे महत्त्वाचे यामुळे तुम्ही डेली न्यूज पेपर आणि करंट अफेयर्स वाचायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी ची माहिती मिळेल आणि तुमची जनरल नॉलेज वाढेल.

7) Coaching

मित्रांनो जर तुम्ही पहिल्या वेळेस सिरीयस परीक्षेची तयारी करत असणार तर तुम्ही कोचिंग क्लासेस जॉईन करू शकतात कारण जेव्हा तुम्ही self study करतात तेव्हा तुम्हाला सांगणार कोणी नसतो आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही CDS साठी चांगले कोचिंग क्लासेस जॉईन करू शकतात त्यांचे संपर्कामुळे तुमचा अभ्यास सुद्धा चांगला होईल सीडीएस परीक्षेचा अभ्यास साठी तुम्ही ऑनलाईन पेड क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात.

8) Personality development

सीडीएस परीक्षेला पास होण्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ते सुद्धा महत्त्वाचा असतो CDS च्या पेपर वन मध्ये तुमची लेखी स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल पण जे मुख्य स्वरूपाची परीक्षा असते त्यामध्ये तुमचा इंटरव्यू घेतला जातो आणि त्यामध्ये तुमचं खूप महत्त्वाचा रोल असतो. त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी कडे सुद्धा लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

सीडीएससाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

सीडीएससाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. म्हणून, सीडीएस परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी पदवी पूर्ण केलेली असावी किंवा किमान पदवीच्या अंतिम परीक्षेत बसलेले असावे.

सीडीएस कोणते पद आहे?

UPSC CDS वेतन सरकारी नोकरी: संयुक्त संरक्षण सेवा (CDS) भरती परीक्षा दरवर्षी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतली जाते. याद्वारे तिन्ही सैन्यात अधिकारी पदांवर भरती केली जाते. सीडीएसमध्ये निवड झालेल्या तरुणांना पगारासह (यूपीएससी सीडीएस सॅलरी) अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

CDS मध्ये किती पेपर्स आहेत?

UPSC CDS ची लेखी परीक्षा पुढे दोन विभागात विभागली गेली आहे. IMA, INA आणि AFA च्या लेखी परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित हे तीन विभाग असतात. OTA साठी लेखी परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे दोन विभाग असतात.

सीडीएसचे काम काय आहे?

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही सैन्याचे प्रमुख असण्यासोबतच ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहारांशी संबंधित विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. वास्तविक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. लष्कर आणि सरकार यांच्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते.

CDS चा अभ्यासक्रम काय आहे?

इंग्रजी: शब्दसंग्रह, व्याकरण, आकलन आणि त्रुटी शोधणे. सामान्य ज्ञान: चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भारत आणि जगाचे अर्थशास्त्र आणि राजकारण. प्राथमिक गणित: अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती आणि परिमाण.

Leave a Comment