भरत जाधव यांची संपूर्ण माहिती Bharat Jadhav Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Bharat Jadhav Information In Marathi :- आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये भरत जाधव यांची गणना केली जाते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. भरत हा अतिशय सामान्य कुटुंबातील असून त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याची पत्नी सरीता जाधव यांच्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

Bharat Jadhav Information In Marathi

भरत जाधव यांची संपूर्ण माहिती Bharat Jadhav Information In Marathi

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता आहे. भरत जाधव हा एक मराठी चित्रपट अभिनेता आहेत. त्याचबरोबर ते एक नाटक कलाकार सुद्धा आहेत. व्यावसायिक मराठी चित्रपटांत भरत एक विनोदी कलाकार आहे. ‘सही रे सही’ हे नाटक त्यांनी केलेल्या नाटकांपैकी एक आहे. तर चला मग पाहुया यांचे विषयी माहिती.

 पूर्ण नाव भरत जाधव
 जन्म तारीख 12 डिसेंबर 1973
 जन्म ठिकाण मुंबई , महाराष्ट्र
 वडिलाचे नाव गणपत जाधव
 धर्म बौद्ध
 पत्नीचे नाव सरिता जाधव
भाषा मराठी

जन्म :-

जाधव यांचा जन्म 12 डिसेंबर 1973 मध्ये एका मराठी बौद्ध कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपत हरी जाधव आहे. गणपत जाधव हे टॅक्सीचालक होते. अत्यंत कष्टातून त्यांनी भरत जाधव यांची कारकीर्द घडवली. विशेष म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या गाडीचे चालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांचे 2017 मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं कोल्हापुरात निधन झाले.

बालपण व शिक्षण :-

लालबाग परळमधील एका चाळीत भरत जाधव यांचे बालपण गेले आहे. त्यांनी शिक्षणात उच्च पदवी प्राप्त केली आहे.

वैयक्तिक जीवन :-

भरत जाधव यांच्या पत्नीचे नाव सरिता असून त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव सुरभी तर मुलाचे नाव आरंभ आहे. भरत जाधव आणि सरिता यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा त्यांनी अशी ही आशिकी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितला होता. भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे.

लव्ह स्टोरी :-

सरीताने सांगितले होते की, भरतचा तिच्या ऑफिसमध्ये फोन आला होता. ते दोघे पहिल्यांदा भेटणार होते. लवकर निघण्यासाठी ती वरिष्ठांची परवानगी मागायला गेली होती तर येशील ना उद्या… असे विचारत तिची टर उडवली होती. त्या दोघांनी पहिल्यांदा खिलाडी हा चित्रपट एकत्र पाहिला होता. हा चित्रपट पाहण्यात नव्हे तर फक्त तिच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात भरतला रस होता, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

चित्रपट कारकीर्द :-

भरत जाधव यांनी 1985 मध्ये शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारापासून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ऑल द बेस्ट ही एकांकिका प्रचंड गाजली. यावर आधारित असलेल्या ऑल द बेस्ट या नाटकाला तर लोकांना खूपच आवडले. त्यामुळे भरत जाधव हे खूप प्रसिद्ध झाले. ‘ऑल द बेस्ट’ या मराठी नाटकातून भरत जाधव यांना खूप प्रसिद्धी मिळाली.  त्यांनी 85 हून अधिक चित्रपट, 8 मालिकामध्ये काम केले आहे आणि 8500 पेक्षा जास्त नाटक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे.

हे निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे जवळचे मित्र मानले जातात. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात 565 प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.

चित्रपटांची यादी :-

माझ्या नवऱ्याची बायको, येड्यांची जत्रा, मस्त चालले आमचा, झिंग चिक झिंग, फक्त लाध म्हना तुकाराम, डावपेच, कलशेखर आहेत का? आटा पिटा, क्षणाभर विश्रांती, टाटा बिर्ला आणी लैला, रिंगा रिंगा, हौन जाउ दे, शिक्षणनाचा आयचा घो, नमस्कार! गंधे सर, जावई बापू जिंदाबाद, झाक मारली बायको केली, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, लग्नाची वरात लंडनच्य घरत, गलगले निघाले, सादे माडे किशोरमदन, गोंद्या मार्टे तांगडा, मुंबाईचा डबेवाला, मुक्कम पोस्ट लंडन,भरत फकडू कांबळे, ह्यंचा काहि नेम नाही, बकुळा नामदेव घोटळे, सरपंच घोटले, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालु नवरा भोळी बायको, जत्रा, खबरदार, डॉन मूर्ख. या व्यतिरिक्त बऱ्याच चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

जीवनातील प्रसंग :-

त्यांनी त्यांच्या जीवनातील वडिलांसोबत घडलेला एक प्रसंग सांगितलेला आहे की, एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासादरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला.

ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते. आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत. या एकाच गोष्टीसाठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खूप रडलो होतो त्या दिवशी सुदैवाने तेव्हा मला 100 रुपये नाईट मिळत होती. त्या दिवसा पासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं.

टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याच एखाद नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक होंडा अकॉर्ड घेतली आणि त्यांना स्टीअरिंग वर बसवलं त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं.

त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या. एमडब्लू,मर्सडीज एस क्लास. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होत ते सगळं सुखं त्यांना देऊ शकलो. अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे. अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय. तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही.

विजय चव्हाण विषयी त्यांचे मत :-

विजय चव्हाण यांच्या विषयी बोलताना त्यांनी एक ट्विट करून त्यांच्या विषयी आपले मत व्यक्त केले आहे. बाप ज्याप्रमाणे बोट धरून आपल्या मुलाला शिकवतो, त्याला घडवतो, तसा माझ्या आयुष्यातील बापमाणूस म्हणजे विजय चव्हाण. आज मी जो काही डाऊन टू अर्थ आहे, नम्र आहे, वेळेच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे ते केवळ विजू मामांमुळे. मी स्वतःला नशिबवान समजतो की करिअरच्या योग्य वळणावर मला विजू मामांसारखी माणसं भेटली. विजू मामांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.

ते एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून ग्रेट होतेच पण त्यांच्याविषयी मला विशेष आत्मियता वाटण्याचं कारण म्हणजे लालबाग- परळ, गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ. आम्ही एकत्र खुप काम केलंय. श्रीमंत दामोदर पंत नाटकात अनेक ठिकाणी दामोदर पंत त्यांच्या मुलावर विजू मामांवर हात उचलतात. एवढा मोठा सिनिअर नट पण त्यांनी कधीही आढेवेढे घेतले नाहीत.

पुरस्कार :-

1) 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता माता सन्मान मराठी पुरस्कार मिळाला.

2) व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला.

हे सुद्धा अवश्य वाचा  :-

FAQ

भरत जाधव यांच जन्म कधी झाला ?

जाधव यांचा जन्म 12 डिसेंबर 1973 मध्ये एका मराठी बौद्ध कुटूंबात झाला.

भरत जाधव यांच  जन्म ठिकाण ?

 मुंबई , महाराष्ट्र

भरत जाधव यांचे नाटकांपैकी कोणते नाटक आहे.

'सही रे सही' हे नाटक त्यांनी केलेल्या नाटकांपैकी एक आहे.

भरत जाधव यांचे पुरस्कार कोणते ?

1) 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता माता सन्मान मराठी पुरस्कार मिळाला.

2) व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला.

कोणत्या  नाटकातून भरत जाधव यांना खूप प्रसिद्धी मिळाली?

'ऑल द बेस्ट' या मराठी नाटकातून भरत जाधव यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 

Leave a Comment