सुपरस्टार मानसी नाईक यांचे जीवनचरित्र Mansi Naik Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Mansi Naik Information In Marathi मानसी नाईक ही एक मॉडेल आणि अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त, ती एक चांगली नर्तक आहे आणि ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमध्ये तिच्या अभिनयासाठी चांगली ओळखली जाते. मानसीला मराठी चित्रपटांची डान्सिंग क्वीन देखील म्हटले जाते.  मराठी चित्रपटांमध्ये त्यांचे नृत्य खूप लोकप्रिय आहे.  तर चला मग पाहुया यांच्या विषयी माहिती.

Mansi Naik Information In Marathi

सुपरस्टार मानसी नाईक यांचे जीवनचरित्र Mansi Naik Information In Marathi

मानसी नाईक यांचा जन्म :-

मानसी नाईक यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1987 रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला. त्या पुणे शहर येथील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील एक डॉक्टर आहेत तसेच त्याची आई हाउसवाइफ आहे. मानसी यांना त्यांच्या लहानपणी डॉक्टर व्हायचे होते; परंतु महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेत असे. त्यामुळे तिने आपला कल हा फिल्मी दुनिया कडे नेला. तिला लहानपणापासून नृत्याची फार आवड होती.

मानसी नाईक यांचे शिक्षण :-

तिने आपले शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले. महाविद्यालयात तिच्या काळात, ती सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणारी होती आणि महाविद्यालयीन महोत्सवात अनेक पुरस्कारही जिंकली. ती पुण्याचे असल्यामुळे तिच्या बोलीभाषेमध्ये पुणेरी स्टाईल होती. त्यामुळे ती मराठी चित्रपटांमध्येही फेमस झाली.

मानसी नाईक यांची चित्रपट कारकीर्द :-

ई टीव्ही मराठी या दूरचित्र वाहिनीवरून प्रसारित होणार्‍या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिकेमुळे ती विशेष गाजली. वाट बघतोय रिक्षावाला तसेच बाई वाड्यावर या… या गीतांमुळे प्रेक्षकांनी तिला डोक्यावर उचलून घेतले व तिला विशेष ओळख मिळवून दिली. 2007 मध्ये जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. तिला छोट्या पडद्याच्या दुनियेतून ढोलकीच्या तालावर नावाच्या टीव्ही सीरियलची ऑफर मिळाली आणि त्यानंतर इतरांनी हल्ला बोल आणि मराठी तारका म्हटले.

त्यानंतर 2007 मध्ये तिला महेश कोठारे दिग्दर्शित जबरदस्त नावाच्या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपट केले. यामध्ये एकता- एक पॉवर, कॅपुचिनो, कुटुंब, तीन बायका फजिती आयका, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, मर्डर मेस्त्री, लक्ष्य, ढोलकी, हू तू तू आणि कोनास्थ यांचा समावेश आहे.  अभिनयाव्यतिरिक्त, तिला अनेक टीव्ही आणि चित्रपट पुरस्कार आणि इतर कार्यक्रमांसह स्टेज परफॉर्मन्स आवडतात.

याशिवाय, ती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांच्या काही व्यावसायिक जाहिरातींमध्येही दिसते. मानसी जॉनी लीव्हरला, ज्यांना कॉमेडीचे गुरु म्हटले जाते, ‘माला लगीन कराईचन आये’ या शोमध्ये नाचताना दिसली होती. ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. वाट बघतोय रिक्षावाला तसेच बाई वाड्यावर या, या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

बरेच दिवसांनी चित्रपटात आगमन :-

महाराष्ट्राची डान्सिंग स्टार मानसी नाईक यांनी काही काळानंतर मोठ्या पडद्यावर जोरदार आगमन करण्यासाठी सज्ज झाली होती. नार नवेली, फुल चमेली, ओठ गुलाबी तिची चाल शराबी असे तिचे वर्णन असलेले आना रे….. हे आगामी ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटातील नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

जुईली जोगळेकरचा स्वर लाभलेल्या या आवाजाला सोशल मिडीयावर तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’  या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव आहेत.

एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजना बरोबरच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यासह  यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाला कृणाल देशमुख आणि साहील कुलकर्णी  यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटातील गीतांना आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, जसराज जोशी, हृषीकेश रानडे, सावनी रविंद्र, जुईली जोगळेकर, दिपांशी नागर यांचा स्वर लाभला आहे. चित्रपटाची कथा नितीन उत्तमराव साठे यांची आहे. एका संवेदनशील सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘जवानी झिंदाबाद’ हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

वैयक्तिक जीवन :-

मानसी नाईक यांनी आपला प्रेमी प्रदीप खरेरा यांच्या सोबत लग्न केले आहे हे लग्न मराठी पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये पार पडले. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे एकमेकांना गेल्या वर्षापासून डेट करत होते.

मानसी नाईक मराठी सुपर डांसर व अभिनेत्री आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. प्रदीप खरेरा हा स्पोर्ट्समनसह अभिनय व मॉडलिंग चे काम देखील करतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खुप ॲक्टिव्ह असतो. त्याचे अनेक चाहते आहेत.

मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेन्ट 2018 चा विजेता असलेला प्रदीप खरेरा आणि मराठी सुपरस्टार मानसी नाईक आधी रिलेशनशिप मध्ये होते त्यानंतर त्या दोघांनी जाहीर केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी ऑफिशियल एंगेजमेंट केली होती.

पुण्यामध्ये अगदी मराठमोळ्या पद्धतीने मध्ये मानसी नाईकचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये मानसी नाईक ने डोली मधून एन्ट्री केली. राजेशाही थाटात  डोलीमध्ये बसलेली मानसी नाईक जोधा-अकबरच्या ऐश्वर्या रायच्या जोधालुक राजस्थानी पद्धतीने दागिने व वस्त्रामध्ये एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती.

आपल्या लग्नासाठी मानसीने जोधा लुक क्रिएट केला होता. ज्यामध्ये तिने पिंक कलरचा एक शाही लेहंगा परिधान केला होता. सोबतच तिचा पती प्रदीप खरेरा याने देखील गोल्डन कलर ची शेरवानी परिधान केलेली होती आणि डोक्यावर गुलाबी रंगाचा नवरदेवाचा फेटा घातलेला होता. अगदी थोड्या लोकांमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला.

मानसी व प्रदीप यांचे नातेवाईक, आई-वडील व मोजके फिल्म क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. चुलबुली, नटखट, हसरी असलेली आपली मानसी आता हरियाणाची सून झाली आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने वैदिक पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर पुढचा विवाह ही परंपरा पद्धतीने हरियाणा येथे साजरी झाला.

प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मानसीने आतापर्यंत हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते.

काही चित्रपटांची नावे :-

कुटुंब – 2012, कोंकणस्थ – 2013 आणि मर्डर मेस्त्री -2015 सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. 2017 मध्ये ती वज्रा आणि भविष्याची ऐशी तैशी या चित्रपटांमध्येही काम केले. 2019 मध्ये ‘जवानी जिंदाबाद’ हा चित्रपट रिलीज झाला.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

मानसी नाईक यांचा जन्म कधी झाला ?

मानसी नाईक यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1987 रोजी झाला.

मानसी नाईक यांचा जन्म कुठे झाला ?

मानसी नाईक यांचा जन्म  महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला.

मानसी नाईक काही चित्रपटांची नावे?

कुटुंब - 2012, कोंकणस्थ - 2013 आणि मर्डर मेस्त्री -2015 सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. 2017 मध्ये ती वज्रा आणि भविष्याची ऐशी तैशी या चित्रपटांमध्येही काम केले. 2019 मध्ये 'जवानी जिंदाबाद' हा चित्रपट रिलीज झाला.

मानसी नाईक यांचे शिक्षण काय ?

आपले शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले. महाविद्यालयात तिच्या काळात, ती सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणारी होती आणि महाविद्यालयीन महोत्सवात अनेक पुरस्कारही जिंकली. ती पुण्याचे असल्यामुळे तिच्या बोलीभाषेमध्ये पुणेरी स्टाईल होती. त्यामुळे ती मराठी चित्रपटांमध्येही फेमस झाली.

मानसी नाईक यांचे  खूपच प्रसिद्ध गाणे कोणते ?.

मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते.

Leave a Comment