Bhagat Singh Information In Marathi भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सहभागात बऱ्याच क्रांतिकारकांचा समावेश होता. त्यांनी आपल्या जीवनाचे बलिदान हे राष्ट्रासाठी समर्पण केले. या क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम. त्यातीलच भगतसिंग हे एक क्रांतिकारक होते. भगतसिंग यांनी हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढ्यात केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे त्यांच्या वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशीची शिक्षा देण्यात आली.
भगतसिंग यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi
जन्म :
भगतसिंगचा जन्म 1907 साली पंजाब प्रांतातील लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती वडिलांचे नाव किशनसिंग होते. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली. त्याच सुमारास भगतसिंगचा जन्म झाला.
त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले होते. तर काही महाराजा रणजीत सिंगच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये सक्रीय होते. त्यांचे आजोबा अर्जून सिंग हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून, आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे काका व वडील हे कतार सिंग साराभा व हरदयाल यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.
बालपण :
भगतसिंग यांचे बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग होते. मात्र पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना ‘आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असे म्हटले गेले.
विचार :
समाज हा प्रगत असावा प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
समाजाची प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, 84 लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते.
अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो. या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो.
शिक्षण :
प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर भगतसिंग यांना लाहोरमधील डी.ए.व्ही. शाळेत दाखल केले. तेथे तो लाला लाजपत राय आणि अंबा प्रसाद सारख्या देशभक्तांच्या संपर्कात आला. ” रौलटअॅक्ट” च्या विरोधात संपूर्ण भारतभर निदर्शने करण्यात येत होती आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यांच्या वयाचे इतर शिख मुलांसारखे ते लाहोरच्या खालचा हायस्कूलमध्ये गेले नाहीत.
त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारवर ती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांड याच्यानंतर भगतसिंगानी ती जागा पाहिली. 14 वर्षे वय असताना गुरुद्वारात नानकानासाहेब यांच्या अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगचा अहिंसेच्या मार्गा बद्दल भ्रमनिरास झाला.
कार्य :
भगतसिंग युवा क्रांतीकारी चळवळीमध्ये सामील झाले व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचे समर्थक झाले. भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. 1924-25 च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर अर्जुन’, ‘प्रताप’, इत्यादी दैनिकांत काम केले होते.
पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे ‘कीर्ती’, कानपूरचे ‘प्रभा’, दिल्लीचे ‘महारथी’ नि अलाहाबादचे चांद या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद ‘मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम’ हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी चांद च्या फाशी विशेषांकात ‘निर्भय’, ‘बलवंत’, व ‘ब्रिजेश’ या नावाने अनेक लेख लिहिले.
आरोपपत्र :
“वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह 1924 सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ व ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला :
- बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
- हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉम्ब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
- ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलिस वा इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.
- आगगाड्या उडविणे.
- क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.
- तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.
- कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे.
- हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या 17 डिसेंबर, 1928 रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस 23 मार्च, 1931 रोजी फासावर लटकविण्यात आले.
महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून 19 मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली.
ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे 24 मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे 23 मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
समाधी :
भारतातून पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे 1968 मध्ये सरकारतर्फे स्मारक उभारण्यात आले.
“तुम्हाला माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- संत एकनाथ संपूर्ण माहिती
- संत ज्ञानेश्वर संपूर्ण माहिती
- संत जनाबाई संपूर्ण माहिती
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती
- संत तुकाराम संपूर्ण माहिती
भगतसिंग यांना का फाशी देण्यात आली?
१९३१ मध्ये लाहोर शहरात (तेव्हाच्या भारतात) अधिकारी जेपी साँडर्स यांच्या हत्येप्रकरणी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. लाला लजपत राय, प्रभावशाली भारतीय लेखक आणि राजकारणी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलीस प्रमुखाला मारण्याच्या कटाचा एक भाग म्हणून साँडर्सची चुकून हत्या करण्यात आली होती.
भगतसिंग यांनी किती दिवस उपवास केला?
अखेर 116 दिवसांनी भगतसिंग यांनी आपले उपोषण संपवले.
भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली?
भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो.