बीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi

BMS Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आपल्याला तर माहितीच आहे की, अगदी आपल्या घरापासून ते कार्पोरेट जीवनात पर्यंत सगळीकडेच व्यवस्थापनाची म्हणजेच योग्य मॅनेजमेंट ची आवश्यकता असते. प्रत्येक गोष्टीत व प्रत्येक क्षेत्रात मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचे आहे.  काही मुलांना बाकीच्या क्षेत्रापेक्षा उद्योजकीय क्षेत्र जास्त आवडत असते. आज सर्व क्षेत्रांमध्ये मॅनेजमेंट ची गरज भरपूर आहे. आज मी तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये अशा एक कोर्सची माहिती सांगणार आहे. ज्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तो म्हणजे बीएम एस कोर्स!!

Bms Course Information In Marathi

बीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi

आपण जर बीएमएस हा कोर्स केला तर कोणत्याही कंपनीत आपण एचआर आणि मॅनेजर पदासाठी संधी मिळू शकते. बँकिंग, इन्शुरन्स, इंटरनॅशनल फायनान्स कंपन्या ,मार्केट आणि जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये बी एमएस लोकांची मागणी आहे.

बीएमएस चा लॉन्ग फॉर्म “बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज” हा आहे .हा एक 3 वर्षाचा अंडरग्रॅजुएट कोर्स आहे .म्हणजे आपण बारावीनंतर हा कोर्स करू शकतो. हा एक व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मानव संसाधन व्यवस्थापन ,अर्थशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास याचे सखोल ज्ञान दिले जाते.

तसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी सक्षम केले जाते. तसेच या अभ्यासक्रमांमध्ये नवीन व्यवसायिक तंत्र, उद्योजकता, व्यापार, वित्त ,स्टॉक, व्यवस्थापनाचे ज्ञान, जोखीम याचे विस्तृत ज्ञान दिले जाते. विद्यार्थ्यांनी वास्तविक व जागतिक आव्हाने समजून घेण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या अभ्यासक्रमात विविध प्रशिक्षण सत्रे व सह अभ्यासक्रमांच्या उपक्रमांचा समावेश केला जातो.

बीएमएस हा अभ्यासक्रम वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे. कारण बीएमएस हा अभ्यासक्रम केल्याचे भरपूर फायदे आपणास पाहायला मिळत आहेत .कारण बीएमएस हा अभ्यासक्रम एक व्यवसायिक अभ्यासक्रम आहे. त्याला व्यावसायिक जगात खूप महत्त्व आहे .

हा कोर्स केल्या नंतर आपण व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर करू शकतो.तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आपण एक चांगला उद्योजक बनू शकतो व तसेच उच्च शिक्षणासाठी आपण जाऊ शकतो म्हणजे आपल्या पुढच्या प्रगतीसाठी आपण मास्टर डिग्री म्हणजे एमबीए या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो.

तसेच बीएमएस. हा कोर्स “बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” म्हणजेच उत्तम पर्याय आहेत. दोन्ही पदवीचे शिक्षण व संधी तशा पाहिल्या तर समान आहेत .बीएमएस चा अभ्यासक्रम आपण महाविद्यालयात जाऊन सुद्धा घेऊ शकतो व डिस्टन्स लर्निंग द्वारे सुद्धा पूर्ण करू शकतो. आज कार्पोरेट जगामध्ये कठीण स्पर्धा निर्माण झालेली आहे व ज्यांच्याकडे चांगले कौशल्य आहे. तो उमेदवार या कार्पोरेट क्षेत्रात आपली प्रगती करू शकतो.

या कोर्स मध्ये आपल्याला व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचे कौशल्य प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमात फक्त विद्यार्थी नोकऱ्यांसाठी तयार केले जात नाहीत .तर विद्यार्थ्यांना कार्पोरेट संस्कृतीच्या मूलभूत गोष्टींबद्दल माहिती दिली जाते व कोणत्याही संकटाच्या मूळ कारणाचे विश्लेषण करणे व समजून घेणे तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून धोरणात्मक समस्येचे निराकरण करणे शिकवले जाते .त्यांना कॉर्पोरेट जगाशी अत्यंत सुसंगत बनवले जाते.

हा कोर्स केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार होते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला लगेचच नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन तुम्ही चांगल्या पगाराची अपेक्षा करू शकता.

बीएमसी या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी (10 + 12)उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा आर्ट्स ,कॉमर्स किंवा विज्ञान या तिन्ही शाखेपैकी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असला तरीही चालेल. विद्यार्थ्याला बारावी मध्ये 60 % गुण मिळणे आवश्यक आहे.

बीएमएस या कोर्सची प्रवेश प्रक्रिया

बीएमएस या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काही कॉलेज हे बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात. तर काही उच्चतम कॉलेज हे प्रवेश देण्या अगोदर प्रवेश परीक्षा घेतात त्या प्रवेश परीक्षा पुढील प्रमाणे:-

LIGAT

DU JAT

ही प्रवेश परीक्षा दिल्ली विद्यापीठानुसार NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी )द्वारे घेतली जाते.

MUC MET

ही परीक्षा मुंबई विद्यापीठाद्वारे घेतली जाते. कोणत्याही कॉलेजला प्रवेश घेण्याअगोदर त्या कॉलेजच्या शिक्षण पद्धतीची माहिती करून घेणे आवश्यक आहे .बीएमएस  मध्ये प्रॅक्टिकल माहितीला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी अपडेट राहण्यासाठी कॉलेजमधून इंडस्ट्रियल भेटीचे आयोजन केले जाते की नाही तसेच कार्पोरेट क्षेत्रातील तज्ञांची मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित केली जातात की नाही याची माहिती घेणे आवश्यक आहे.

इंडस्ट्री आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा जोडण्याचे काम कॉलेजचे असते. या सर्व गोष्टींची पडताळणी करणे खूप गरजेचे असते. कारण या सर्वच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी नसतील तर बीएमएस हा प्रोफेशनल कोर्स न राहता निव्वळ एक साध्या कोर्ससारखा होऊन जाईल.

बीएमएस या कोर्सचा कालावधी तीन वर्षाचा असतो

तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये  सहा सेमिस्टर असतात व या ६ सेमिस्टरमध्ये एकूण ३८ वेगवेगळे विषय शिकवले जातात. यामध्ये लॉ, मॅथ्स, एक्स्पोर्ट- इम्पोर्ट मॅनेजमेंट, नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रेड, मार्केट, फायनॅन्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मॅनेजमेंटच्या सर्व अंगांचा अभ्यास होतो आणि या अभ्यासाचा आपल्या प्रोफेशनल आयुष्यात खूपच उपयोग होतो.

बीएमएस या अभ्यासक्रमात स्पेशलायझेशन असतात. बीबीए मध्ये जास्त स्पेशलायझेशन असतात तर त्या मानाने बीएमएस. या कोर्समध्ये स्पेशलायझेशन हे कमी असतात. मार्केटिंग ,फायनान्स, ह्यूमन रिसोर्सेस, इकॉनोमिक ,कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अशा प्रकारचे स्पेशलायझेशन या कोर्समध्ये असतात. हे स्पेशलायझेशन काही कॉलेजमध्ये सुरुवातीला किंवा दुसऱ्या वर्षाला विद्यार्थी निवडू शकतो.

बीएमएस या अभ्यासक्रमात पुढील विषय शिकवले जातात

  1. लेखांकन आणि वित्त व्यवस्थापन
  2. व्यवसाय लेखांकन
  3. मॅक्रोइकॉनॉमिक्स
  4. विपणन व्यवस्थापन
  5. व्यवसाय कायदा
  6. व्यवसायासाठी सांख्यिकी
  7. मानव संसाधन व्यवस्थापन
  8. व्यवसाय शोध

बीएमएस कोर्स चे प्रकार

बीएमएस कोर्स चे विविध प्रकार असतात. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार व  वेळेनुसार कोर्सचा पर्याय निवडू शकतो.

पूर्ण वेळ बीएमएस

पूर्ण वेळ बीएमएस हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा आहे. जो देशभरातील सर्व विद्यालयांमध्ये व संस्थेमध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी DUJAT, LIGAT, MUC  MET या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.  बीएमएस हा कोर्स करण्यासाठी सर्वात जास्त टॉप कॉलेजमध्ये सेंट झेवियर्समुंबई, शहीद सुखदेव सिंग कॉलेज दिल्ली ,नरसी मोंजी मुंबई  इ. कॉलेज आहे.

अर्धवेळ बीएमएस

अनेक विद्यालय ही अर्धवेळ बीएमएस अभ्यासक्रम देतात. ज्या विद्यार्थ्यांना नियमित वर्गांना उपस्थित राहता येत नाही. त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.जी मुले नोकरी करतात त्यामुळे ते आपला पूर्णवेळ या अभ्यासक्रमासाठी देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयोगी आहे.

एक वर्ष बीएमएस

काही विद्यालय व काही संस्था या एक वर्षाचा बीएमएस अभ्यासक्रम देत असतात. हा अभ्यासक्रम विशेषतः हा कामगार वर्गासाठी किंवा जे  व्यवसाय करत आहेत त्यांना अधिक ज्ञान  प्राप्त होण्यासाठी व त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.

बीएमएस ऑनलाईन

विद्यार्थ्यांसाठी बीएमएस ऑनलाईन हा अभ्यासक्रम विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुठेही उपलब्ध होत असतात.

बीएमएस हा कोर्स केल्यानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी

बीएमएस कोर्स करून तुम्ही एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, मार्केटिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, मोठ्या सरकारी आणि खाजगी कंपनी किंवा संस्थेमध्ये फायनान्स मॅनेजर बनू शकता. अकाउंट मॅनेजर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर. तुम्ही मार्केट रिसर्च अॅनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस कन्सल्टंट अशा उच्च पदांवर काम करू शकता.

बीएमएस कोर्स केल्यानंतर तुम्ही पदवी स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पदवी हे व्यवसायाचे खूप मोठे क्षेत्र आहे, व्यवसायाशी संबंधित सर्व क्षेत्रातील करिअरसाठी हा अभ्यासक्रम खूप चांगला आहे. बीएमएस कोर्स करून तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करू शकता. एक योग्य उद्योजक बनू शकता.

बीएमएस कोर्स केल्यानंतर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करूनही करिअर करू शकता.

बीएमएस कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला नोकरी करून पुढील शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्ही एमएमएस (मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज), एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) यासारखे मास्टर डिग्री कोर्स करू शकता.

बीएमएस कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेज

  • जामिया हमदर्द, न्यू दिल्ली
  • शाहीर सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज, दिल्ली
  • विल्सन कॉलेज, मुंबई
  • गीतम एच बी एस ,हैदराबाद
  • एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स, मुंबई
  • के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंब नॅशनल अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, मुंबई
  • मिठीबाई कॉलेज, मुंबई
  • जय हिंद कॉलेज, मुंबई
  • डीयू दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली
  • सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकत्ता
  • इंडसर्च, पुणे
  • बी.एम.सी.सी, पुणे
  • नागिन दास खांडवाला कॉलेज, मुंबई
  • शिवनंदन युनिव्हर्सिटी, ग्रेटर नोएडा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बीएमएस चा लॉंग फॉर्म काय आहे?

"बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज"

बीएमएस या अभ्यासक्रमासाठी सरासरी फी किती असते ?

या कोर्ससाठी दरवर्षी एक लाख रुपये असे शुल्क आकारावे लागते व ते शुल्क प्रत्येक कॉलेज नुसार वेगवेगळे असते.

बीएमएस हा कोर्स झाल्यानंतर कुठल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात?

बीएमएस कोर्स करून तुम्ही एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, मार्केटिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, मोठ्या सरकारी आणि खाजगी कंपनी किंवा संस्थेमध्ये फायनान्स मॅनेजर बनू शकता. अकाउंट मॅनेजर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर. तुम्ही मार्केट रिसर्च अॅनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस कन्सल्टंट अशा उच्च पदांवर काम करू शकता.

Leave a Comment