हनुमान जयंती विषयी संपूर्ण माहिती Hanuman Jayanti Information In Marathi

Hanuman Jayanti Information In Marathi सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये विविध येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे.

Hanuman Jayanti Information In Marathi

हनुमान जयंती विषयी संपूर्ण माहिती Hanuman Jayanti Information In Marathi

हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म प्राप्त होतो. त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात  हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भागात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल, तसेच रुईची फुले आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे.

मारुतीला नारळ फोडण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला असे पुराणांमध्ये उल्लेख आहे. हनुमान श्रीराम यांची भक्ती करत होते. आणि या भक्तीतून हनुमानाला शक्ती मिळत होती. पुढे हनुमान हा श्रीराम यांचा आवडता परमभक्त झाला. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे. हनुमानाचे वडील केसरी हे होते. लहानपणापासून त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या.

एकदा सूर्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळायला म्हणून हनुमानाने सूर्याकडे कूच केले. इंद्र देवासह सर्व देव भयभीत झाले होते. इंद्रदेवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचविण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले. त्यामुळे हनुमंत मूर्च्छित झाले त्यानंतर पवन देवाने सर्व सृष्टीतील वायू थांबवून घेतला. त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले, त्यानंतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्च्छितेतून  बाहेर आणले व पवन देव शांत होऊन सुरुवाती सारखे वायू पर्यावरणात सोडले. तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशीर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या.

एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषीचा परिहास केला. त्यामुळे त्याला शाप मिळाला तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल. पुढे प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानर सेनेच्या बळावरच श्रीराम यांनी रावणाशी युद्ध केले आणि शेवटी जिंकले देखील.

हनुमान जयंती चे महत्व:

हनुमान जयंतीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यांच्या मागे संकटे किंवा साडेसाती असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. असे अनेक कारणे आपल्याला दिसून येतात. हनुमान चालिसा म्हणणाऱ्याना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे. हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमधे मान्यता आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जात असून भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात.

तसेच शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. हनुमंतामध्ये बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दुरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे. हिंदु मान्यतेनुसार हनुमंताला शक्ति स्फुर्ति आणि ऊर्जेचे प्रतिक मानले जाते. सर्व संकटाचे निवारण करण्याची क्षमता हनुमंता मध्ये आहे. समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर मारूती रायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे.”

रोगमुक्तीसाठी वीर हनुमान मंत्राचा प्रयोग करतात. भूतबाधा झाली असता, त्याला हनुमानाच्या मंदिरात नेतात किंवा हनुमान मंत्र, स्तोत्रे म्हणतात.

स्त्रिया पुत्र प्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्री भिंतीवर शेंदूराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा करते. त्याच्यापुढे चढते-उतरते, कणकेचे दिवे लावते. शनिवारी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडी दवा मीटर पण करते. हनुमानाची उपासना ही मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे, असा लोकांचा विश्वास आहे.

हनुमान जयंती कशी साजरी करतात:

हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंती ही मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला असता यज्ञातून अग्निदेव प्रकट होऊन, त्यांनी दशरथाच्या राण्यासाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस म्हणजेच खीर यज्ञातील हा प्रसाद दिला होता. त्यादिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करतात.

काही पंचांगांच्या मते, हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे. तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. हनुमान जयंतीच्या दिवशी लोक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात.  काही लोक उपवास ठेवतात, समर्पण आणि उत्साहाने त्यांची उपासना करतात.  हनुमानाबद्दल असे म्हटले जाते की, हनुमान ब्रह्मचारी होते, त्यांना जानवे देखील परिधान केले जाते.  हनुमानजीच्या मूर्तींवर सेंदूर आणि चांदीचे काम करण्याची परंपरा आहे.

काही लोकांच्या मते, एकदा रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर सेंदूर लावला होता. म्हणूनच त्याला आणि त्याच्या भक्तांना चोळा असे म्हणतात.  संध्याकाळी दक्षिण मुखी हनुमान मूर्तीसमोर मंत्र, जप आणि जाप करण्यास अत्यंत महत्त्व दिले जाते.   तुलसीदासच्या रामचरित्रमानसमध्ये हनुमानाची माहिती वाढवली दिसते. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व मंदिरात हनुमान चालीसा मजकूराचे वाचन होते.

सर्वत्र भंडाराचे आयोजन केले जाते.  तमिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्या आणि ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा उत्सव चैत्र पौर्णिमेपासून वैशाख महिन्याच्या दहाव्या दिवसापर्यंत साजरा केला जातो.

हनुमान जयंतीविषयी पौराणिक कथा:

हनुमान जयंती विषयी शिवपुराणात एक कथा आहे. ती म्हणजे एकदा महादेवाने विष्णूचे मोहिनी रूप पाहिले त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले. सप्तर्षीनी ते वीर्य पानावर घेऊन कर्णद्वारे गौतामिकांया अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला.

एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी केला. त्या वेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीच्या पदरात टाकला. अंजने तो खिरीचा प्रसाद भक्षण केला आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला.

लक्ष्मण मूर्च्छित पडला असता, हनुमान द्रोनागिरी पर्वत घेऊन जात असताना, त्याला भरतने बाण मारल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर त्याच्या पायांना शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली म्हणून हनुमंताला शेंदूर आणि तेल वाहतात असे म्हटले जाते.

हनुमानाची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिर आहेत. तसेच विदेशातही हनुमानाची मंदिरे प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येतात. अशाप्रकारे हनुमानाचा महिमा वाढत रहावा हा त्यामागचा उद्देश आहे.

“तुम्हाला आमची माहिती हनुमान जयंती विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Leave a Comment

x