CS Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आपण सर्वजण पाहतच आहात की, आजच्या या आधुनिक युगात जगात जवळ जवळ सर्वच देशांमध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. आपल्या देशातही बऱ्याच प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत असताना दिसत आहे. सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिक बदल व नूतनीकरण होतांना आपल्याला दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता सार्वजनिक कंपन्यांच्या तुलनेत खासगी कंपन्याही बाजारात आपला चांगला प्रभाव दाखवत आहेत. बऱ्याच खाजगी कंपन्या भरपूर प्रमाणात बाजारात आपली भूमिका चांगल्या पद्धतीने बजावताना दिसत आहे. अशा औद्योगिक क्षेत्रात एखादी कंपनी सुरळीतपणे चालवणे म्हणजे एकप्रकारचे मोठे आव्हानच!!!
CS कोर्सची संपूर्ण माहिती CS Course Information In Marathi
कंपनी सुरळीतपणे चालण्यासाठी प्रशिक्षित व उच्चशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असते. जसे की प्रत्येक प्रकारच्या कंपनीत वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप कामे असतात व ती कामे व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. जसे की कंपनीमध्ये कुशल कर्मचारी ,मशीनवर काम करणारे कामगार तसेच प्रत्येक कंपनीत जसे सीए ही व्यक्ती जशी महत्त्वाची भूमिका बजावत असते.
तसेच उच्च अधिकारी व कंपन्यांच्या अध्यक्ष स्तरावरील लोकांना खाजगी व सहकारी कंपन्यांमध्ये सचिव सारख्या लोकांची देखील आवश्यकता आहे. प्रत्येक कंपनीत सचिव पद हे खूप महत्त्वाचे असते . कंपनीच्या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी कंपनीमध्ये कंपनी सचिव असणे खूप महत्त्वाचे आहे.कंपनीचे कर परतावे पूर्ण करणे, नोंदी ठेवणे, संचालक मंडळाला सल्ला देणे व कंपनी कायदेशीर व वैज्ञानिक नियमांचे पालन करणे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कंपनी सेक्रेटरी असणे खूप गरजेचे आहे .
जर तुम्हाला एखाद्या कंपनीत सचिव पदावर काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजची ही पोस्ट खूप महत्त्वाची असणार आहे .आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला कंपनी सेक्रेटरी शी संबंधित अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती देणार आहे. हा अभ्यासक्रम कोणता आहे या अभ्यासक्रमात कसे प्रशिक्षण दिले जाते की ज्यामुळे तुम्ही खाजगी क्षेत्रात उच्च अधिकाऱ्याचे सचिव म्हणून काम करण्यास सक्षम करत असतो व मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा भाग बनवण्यासाठी मदत करतो. आता आपण त्या कोर्स विषयी जाणून घेऊयात. तर त्या कोर्सेचे नाव आहे CS !!!
CS याचा लॉंग फॉर्म आहे “कंपनी सेक्रेटरी”CS हो कोर्से केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीत उच्च अधिकाऱ्याचे खाजगी सहकारी म्हणून काम करण्याची एक उत्तम संधी देत आहे. CS या कोर्समध्ये टॅक्स रिटर्न व रेकॉर्ड ठेवण्यासह या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. “इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया कंपनी” (ICSI) सेक्रेटरीज कायदा 1980 च्या अंतर्गत भारतातील कंपनी प्रशिक्षण देऊन त्यांचे नियमन करत असते.
CS हा अभ्यासक्रम वाणिज्य शाखेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. CS साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना CSEET किंवा कंपनी सचिव कार्यकारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते .विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यापैकी विद्यार्थ्याकडे मजबूत व चांगले संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच वेळेचे व्यवस्थापन व मल्टिटास्किंग यांचे कौशल्य सुद्धा गरजेचे आहे. तसेच इंग्रजी भाषा बोलण्याचे व लिहिण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आता आपण CS या अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे आहे हे जाणून घेऊयात!!!
हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला CS हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. ज्या मध्ये पहिला टप्पा असतो तो फाउंडेशन प्रोग्रॅम. दुसऱ्या टप्प्याला कार्यकारी कार्यक्रम असे म्हणतात व तिसरा टप्पा म्हणजे व्यवसायिक / प्रोफेशनल कार्यक्रम आहे.जो या अभ्यासक्रमाचा अंतिम टप्पा आहे.
आपण या अभ्यासक्रमाशी संबंधित प्रत्येक टप्प्याला प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. आता आपण याची विस्तारित माहिती पाहुयात. CS या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे:-
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर झाल्यावरही आपण प्रवेश घेऊ शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेचा विद्यार्थी बारावी उत्तीर्ण या कोर्सला पात्र असतो .म्हणजे आर्टस्, कॉमर्स व सायन्स कोणत्याही शाखेचा विद्यार्थी CS या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
बारावी उत्तीर्ण झाल्यावर सर्वात प्रथम आपल्याला या अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे फाउंडेशन कोर्सला प्रवेश मिळतो. फाउंडेशन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कार्यकारी कार्यक्रमाला प्रवेश मिळतो.कार्यकारी कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटी प्रोफेशनल प्रोग्रॅम ला प्रवेश मिळतो. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सुद्धा विद्यार्थी CS ला प्रवेश घेऊ शकतो .
तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेली असेल तरी चालेल फक्त CS कोर्स करताना विध्यार्थी फाईन आर्ट या शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केलेला नसावा तो विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलेले आहे त्याला फाउंडेशन प्रोग्रॅम ला प्रवेश घेण्याची गरज नसते तो सरळ कार्यकारी कार्यक्रमाला प्रवेश घेऊ शकतो त्याने कार्यकारी कार्यक्रम व प्रोफेशनल कार्यक्रम या दोनही कार्यक्रमांना प्रवेश घेणे गरजेचे आहे गरजेचे आहे.
फाउंडेशन प्रोग्रॅम
फाउंडेशन प्रोग्रॅम ची प्रवेश परीक्षा ही वर्षातून दोन वेळा होते .डिसेंबर व जून मध्ये या परीक्षा होत असतात. ज्यांना डिसेंबर मध्ये प्रवेश परीक्षा द्यायची असते त्यांनी 31 मार्चपर्यंत स्वतःची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे व ज्यांना जून च्या परीक्षेला बसण्याची इच्छा असेल त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत स्वतःची नाव नोंदणी करावी लागते. CS फाउंडेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उद्योजगता ,व्यवस्थापन, व्यवसाय वातावरण ,नैतिकता, लेखा व अर्थशास्त्र यासह विविध क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाते.
फाउंडेशन प्रोग्राम हा आठ महिन्याचा असतो. फाउंडेशन कोर्स ची प्रवेश फी 1200 रुपये असते. ट्यूशन फी 2400 रुपये असते. परीक्षा शुल्क 875 रुपये म्हणजे CS फाउंडेशन कार्यक्रमासाठी एकूण शुल्क रुपये 4500 रुपये आहे.
- फाउंडेशन प्रोग्राम 4 पेपरमध्ये विभागलेला आहे आणि ते असे आहेत
- इंग्रजी आणि व्यवसाय संप्रेषण
- आर्थिक लेखा
- अर्थशास्त्र आणि सांख्यिकी
- व्यवसाय कायदे आणि व्यवस्थापनाचे घटक
प्रत्येक पेपरला शंभर गुण असतात प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला 40 गुण मिळणे आवश्यक आहे.
कार्यकारी प्रोग्राम
कार्यकारी प्रोग्राम हा CS अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा आहे. कार्यकारी अभ्यासक्रम नऊ महिन्याचा असतो. याचा अभ्यासक्रम मॉड्युलच्या स्वरूपात असतो.यामध्ये दोन मॉड्युल्स असतात. दोन्ही मॉड्युल्समध्ये उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्याला 28 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करून डिसेंबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस उपस्थित राहावे लागते. किंवा जूनमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दोन्ही मॉड्युल्ससाठी 31 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी लागते. तसेच विद्यार्थी एका वेळी एका मॉड्युल्स सुद्धा देऊ शकतो. जसे की जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेत एकाच मॉड्युल्स मध्ये उपस्थित राहायचे असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत कार्यकारी प्रोग्रॅम मध्ये स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
कार्यकारी प्रोग्रॅम मध्ये कंपनी कायदा, व्यवसायिक कायदा, कर कायदा, सामान्य कायदा, सिक्युरिटीज कायदा व लेखापरीक्षण सराव यांचा समावेश आहे.
कार्यकारी प्रोग्रम याची नोंदणी शुल्क रुपये 1500
फाउंडेशन परीक्षा सवलत शुल्क 500 रुपये
ट्यूशन फी 5000
तसेच कार्यक्रम प्रोग्राम प्रति मॉड्युल रुपये 900 रुपये
कार्यकारी कार्यक्रम 2 मॉड्युलमध्ये विभागलेला आहे आणि मॉड्युल 1 मध्ये 4 पेपर्स आहेत तर 2ऱ्या मॉड्यूलमध्ये 3 पेपर आहेत.
मॉड्यूल 1:
- कंपनी खाती, खर्च आणि व्यवस्थापन
- सामान्य आणि व्यावसायिक कायदे
- कर कायदे
- हिशोब
मॉड्यूल 2:
- कंपनी कायदा
- सिक्युरिटीज कायदे आणि अनुपालन
- आर्थिक आणि कामगार कायदे
प्रोफेशनल कार्यक्रम
प्रोफेशनल कार्यक्रम हा CS या अभ्यासक्रमाचा अंतिम टप्पा आहे. प्रोफेशनल कार्यक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी फाउंडेशन प्रोग्राम व कार्यकारी प्रोग्रॅम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी हा प्रोफेशनल कार्यक्रमाला पात्र होतो. प्रोफेशनल अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन्ही अभ्यासक्रमापेक्षा जास्त असतो. तो म्हणजे 15 महिने.
प्रोफेशनल कोर्स फी ही सर्वात जास्त असते. पहिल्या दोन कोर्स पेक्षा जास्त असते.
नोंदणी शुल्क 1500
फाउंडेशन सूट व कार्यक्रम परीक्षेतून सूट या दोन्ही साठी पाचशे रुपये एवढे शुल्क भरावे लागते .
ट्युशन फी 9500
व्यवसायिक कार्यक्रम प्रति मॉड्युल रुपये 750
प्रोफेशनल प्रोग्राम 3 मॉड्युलमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक मॉड्युल अंतर्गत येणारे पेपर्स खालील प्रमाणे आहेत.
मॉड्यूल 1:
- प्रशासन, जोखीम व्यवस्थापन, अनुपालन आणि नैतिकता
- प्रगत कर कायदे
- मसुदा, देखावा आणि याचिका
मॉड्यूल 2:
- सचिवीय लेखापरीक्षण
- कॉर्पोरेट पुनर्रचना
- कॉर्पोरेट विवादांचे निराकरण
मॉड्यूल 3:
- स्टॉक एक्सचेंजमध्ये कॉर्पोरेट निधी आणि सूची
- मल्टीडिसिप्लिनरी केस स्टडीज
कोणताही एक विषय खाली दिलेल्या सर्व पर्यायांमधून निवडावा लागतो.
- बँकिंग कायदा आणि सराव
- विमा कायदा आणि सराव
- बौद्धिक संपदा हक्क-कायदे आणि पद्धती
- फॉरेन्सिक ऑडिट
- प्रत्यक्ष कर कायदा आणि सराव
- कामगार कायदे आणि सराव
- मूल्यांकन आणि व्यवसाय मॉडेलिंग
- दिवाळखोरी – कायदा आणि सराव
CS या अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे शीर्ष विद्यापीठ पुढीलप्रमाणे:-
- नवकार इन्स्टिट्यूट – अहमदाबाद
- आई.सी.एस.आई – दिल्ली
- सिद्धार्थ अकादमी – ठाणे
- फिनोवेटिव सोल्युशन – बोरिवली, मुंबई
- ईलाईट आई.आई.टी – बंगलौर
- ए.एस.डी अकादमी – पुणे
- गुड शेफर्ड प्रोफेशनल अकादमी – पुणे
- मास्टर माइंड अकादमी – दिल्ली
- पायल कॉमर्स अकादमी – पुणे
- राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्वविद्यालय – ग्वालियर
- वात्सल्य इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एंड टेक्नोलॉजी – नालगोंडा
- सिक्युरिटी सेक्टर स्किल डेवलपमेंट कौन्सिल- गुडगाव
- गुरुशिखर प्रोफेशनल स्टडीज प्रा.लि – जयपूर
- क्रेस्ट एज्युस्कोर- नई दिल्ली, इत्यादी.
CS कोर्स विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
CS हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय असते?
सीएसटी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी. बारावी झाल्यानंतर विद्यार्थी हा अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा फाउंडेशन प्रोग्राम ला प्रवेश घेऊ शकतो.
CS या अभ्यासक्रमाचे स्वरूप काय ?
CS या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याला तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. पहिला टप्पा फाउंडेशन प्रोग्राम ,दुसरा टप्पा कार्यकारी कार्यक्रम व तिसरा टप्पा व्यवसायिक कार्यक्रम.
CS हा कोर्स केल्यानंतर पुढील नोकरीच्या संधी कोणत्या?
CS हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही लिगर ॲडव्हायझर, कार्पोरेट प्लॅनर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी, कंपनी रजिस्टर ,कार्पोरेट पॉलिसीमेकर, कंपनी सेक्रेटरी इत्यादी काम करू शकता.
CS या कोर्सचा कालावधी किती असतो?
CS या कोर्सचा कालावधी तीन वर्षाचा असतो.