Whatsapp मधील ७ अतिशय उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स Whatsapp Tips And Tricks Information In Marathi

Whatsapp Tips And Tricks Information In Marathi Whatsapp मधील ७ अतिशय उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स  मित्रांनो आज आपण  व्हॉट्सॲप या अप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये  ॲप्लिकेशन इन्स्टॉल असते.  आपण ह्या एप्लीकेशन चा वापर करून एकमेकांस मेसेज पाठवतो, व्हिडिओ शेअर करतो, फोटो शेअर करतो, परंतु मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये या ॲप्लिकेशन मधील ७ टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत जे प्रत्येक व्हॉट्सॲप वापरकरत्यास खूप मदत करतील,  जे तुम्हाला समजल्यास तुम्हाला या टिप्सचा नक्कीच उपयोग होईल. तर मग जाणून घेऊया व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मधील या 10 टिप्स अँड ट्रिक्स.

Whatsapp Tips And Tricks Information In Marathi

Whatsapp मधील ७ अतिशय उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स Whatsapp Tips And Tricks Information In Marathi

टीप १ :-

मित्रहो आपण व्हॉट्सॲप मध्ये अनेक व्यक्तींशी चॅटिंग करतो त्यामुळे व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आपण चॅटिंग केलेल्या व्यक्तींच्या नावांची खूप मोठी लिस्ट दिसते, पण काही वेळेला

काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे या मोठ्या लिस्टमध्ये  शोधणे कठीण जाते आणि काही वेळही लागतो,  अशा वेळेला आपण व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मध्ये महत्त्वाची असणारी कॉन्टॅक्टस समोर आणून ठेवू शकतो ज्यामुळे वेळेला आपल्याला त्या व्यक्तींची नावे लगेच समोर दिसतील व आपण त्या व्यक्तीशी व्हॉट्सॲप वर संवाद साधू शकतो.

जर तुम्हाला माहित करून घ्याचे असेल कि व्हाट्सअँप मध्ये आपल्यासाठी महत्वाचे असणारे किंव्हा आपण त्या व्यक्तीस व्हाट्सअँप वर वारंवार संपर्क करीत असू जसे कि आपले मित्र, कंपनीतील सोबती यांचे कॉन्टॅक्टस व्हाट्सअँप मेसेज लिस्टमध्ये वरती कसे आणायचे तर पुढील प्रमाणे दिल्या गेलेल्या स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाइल मधील व्हाट्सअँपचे अँप्लिकेशन उघडा.
 2. व्हाट्सअँप मध्ये ज्या व्यक्तीचे नाव आपल्या व्हाट्सअँप  मेसेज लिस्ट  मध्ये वरती आणायचे आहे,  त्याच्या नावावर तीन सेकंद क्लिक करून ठेवा,  तुमच्यासमोर वरच्या बाजूस काही पर्याय येतील.
 3. वरच्या बाजूस आलेल्या काही पर्यायांपैकी एक पिनासारखे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. पिनासारखे असणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्ही निवडलेले व्यक्तीचे नाव व्हॉट्सॲप मेसेज लिस्टमध्ये वरती येईल, जे तुम्ही बदलल्याशिवाय खाली जाणार नाही.

अशाप्रकारे आपण व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मध्ये आपण  व्हॉट्सॲप वर वारंवार संपर्क करीत असणार्‍या व्यक्तींची नावे वरती आणून ठेवू शकतो,  ज्यामुळे त्या व्यक्तींची नावे शोधण्यास वेळही वाया जाणार नाही. या पर्यायाचा वापर करून आपण फक्त तीन व्यक्तींची नावे मेसेज लिस्ट मध्ये वरती आणू शकतो.

टीप २ :-

मित्रहो आपण व्हॉट्सॲप वर खूप जणांशी चॅटींग  करीत असतो, खूप काही महत्त्वाचे फोटोज किंवा मेसेज एकमेकांस पाठवत असतो, यावेळेस आपणास भीती असते की हे फोटो डिलीट होणार नाहीत ना तर या वेळेला आपण या व्हॉट्सॲप मधील मॅसेजेस चा डेटा सेव्ह करून ठेवू शकतो यासाठी आपल्याला व्हॉट्सॲप मेसेज चा डेटा गुगल ड्राईव्ह मध्ये घ्यावा लागतो.

आपल्या व्हॉट्सॲप मधील सर्व मेसेज डेटाचा बॅकअप घेण्यासाठी पुढील  स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप चे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. व्हॉट्सॲप ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर,  उजव्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 3. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील,  त्यातील settings  या पर्यायावर क्लिक करा.
 4. settings  या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्यासमोर काही पर्याय येतील त्यातील Chats  या पर्यायावर क्लिक करा.
 5. Chats  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर  तुमच्या व्हॉट्सॲप chatting बद्दलचे काही पर्याय येथील, तेथे Chat backup  हे एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा व  तेथे आपले गुगल अकाउंट चे ईमेल आयडी टाकून Back up या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो तुम्ही व्हॉट्सॲप वर  विविध व्यक्तींशी  केलेल्या  चॅटींगचा डेटा तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये स्टोअर होईल.

टीप ३ :-

मित्रहो काही वेळेला आपल्याला व्हॉट्सॲप मध्ये काही व्यक्तींकडून किंवा ग्रुप कडून सतत मेसेज चालू असतात,  ज्यामुळे आपल्या मोबाइलवर सतत नोटिफिकेशन्स येत असतात, जे खूप कंटाळवाणे असते, अशावेळी आपण या नोटिफिकेशन्स ना बंद करू शकतो.

नोटिफिकेशन्स ना बंद करण्यासाठी पुढील  स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲपचे एप्लीकेशन उघडा.
 2. व्हॉट्सॲपचे अप्लीकेशन उघडल्यानंतर, ज्या व्यक्तीकडून किंवा ग्रुप कडून तुम्हाला सतत मेसेजेस येत आहेत त्या व्यक्तीच्या  किंवा ग्रुपच्या नावावर  तीन सेकंद क्लिक करून ठेवा,  तीन सेकंद क्लिक करून ठेवल्या नंतर तुमच्या समोर व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मध्ये वरच्या बाजूस काही पर्याय येतील,  तेथे स्पीकर सारख्या असणाऱ्या चिन्हावर क्लिक करा.
 3. तेथे स्पीकर सारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीकडून किंवा ग्रुप कडून येणाऱ्या मेसेजेसच्या नोटिफिकेशन्स कितीवेळा साठी सेटिंग बंद करायचे आहे हे विचारण्यात येतील, जसे की आठ तास 8 hours, एक आठवडा 1 week, कायम Always, तेथे तुम्ही त्यातील तुम्हाला हव्या असणाऱ्या कालावधी ला निवडा व नंतर ok या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण आपल्या व्हॉट्सॲप मध्ये ग्रुप कडून किंवा व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मेसेजच्या नोटिफिकेशन्सना बंद करू शकतो.

टीप ४ :-

मित्रांनो आपल्याला व्हॉट्सॲप वर कधीकधी काही महत्वाचे मेसेज येत असतात जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात परंतु व्हॉट्सॲप वर सतत चालू असणाऱ्या मेसेजेस मुळे अशा महत्त्वाच्या मेसेजेस ना शोधन खूप कठीण जातं,  अशा वेळी आपण आपल्या व्हॉट्सॲप वर येणाऱ्या अशा महत्त्वाच्या मेसेज ना सेव्ह करून ठेवू शकतो. जसे आपण ब्राऊजर वापरत असताना तिथे कोणतीही लिंक हवी असल्यास आपण त्या लिंकला बुकमार्क करतो, तसेच आपण व्हॉट्सॲप वर महत्वाचे मेसेज सेव म्हणजेच स्टार करू शकतो.

व्हॉट्सॲप मध्ये  महत्त्वाचे मेसेज सेव करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप चे एप्लीकेशन उघडा.
 2. व्हॉट्सॲप अप्लीकेशन उघडल्यानंतर,  तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पाठवलेले किंवा ग्रुपमधील आलेले महत्वाचे मेसेज ओपन करा.
 3. त्या मेसेज वर 3 सेकंद इतके क्लिक करा,  व्हॉट्सॲप वर वरच्या बाजूस काही पर्याय दिसून येतील.
 4. वरच्या बाजूस आलेल्या काही पर्यायांमध्ये एक स्टार सारखे पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
 5. स्टार या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्ही निवडलेला मेसेज सेव्ह होऊन जाईल,  तुम्हाला ते सेव्ह केलेले महत्वाचे मेसेज कधीही पाहण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप चे एप्लीकेशन उघडा,  उजव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन उभ्‍या बिंदूंवर क्लिक करा,  तेथे तुम्हाला Starred messages असे पर्याय असेल त्यावर क्लिक करा,  तेथे तुम्ही तुम्ही सेव्ह केलेले व्हॉट्सॲप मधील मेसेज पाहू शकता.

अशाप्रकारे आपण व्हॉट्सॲप मध्ये एखाद्या व्यक्तीकडून किंवा ग्रुप मधून आलेले महत्वाचे मेसेज सेव्ह करून ठेवू शकतो.

टीप ५ :-

काही वेळा अनेक जण आपल्या मोबाईल मध्ये आपल्या नोकरीचे कामासाठी आणि आपल्या स्वतःच्या कामासाठी दोन व्हॉट्सॲप वापरत असत त्यातील एक हे व्हॉट्सॲप कंपनीचे ऑफिशियल एप्लीकेशन असते आणि दुसरे third party एप्लीकेशन असते.  परंतु third party  अप्लिकेशन चा वापर करताना आपली व्हॉट्सॲप मधील माहिती चोरी होण्याची शक्यता असते.  अशावेळी आपण व्हॉट्सॲपचे Whatsapp business  हे ऑफिशियल ॲप डाऊनलोड करू शकतो,  ज्यामुळे आपण आपल्या मोबाईल मध्ये दोन  ऑफिशियल असलेल्या व्हॉट्सॲप  एप्लीकेशनचा वापर करू शकतो  व आपली माहिती चोरी जाण्याचीही भीती नसते.

टीप ६ :- 

आपणास व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन वर अनेक व्यक्तींकडून किंवा ग्रुप मधून सतत फोटोज आणि व्हीडिओज येत असतात जे मोबाईल डेटा चालू झाल्यावर आपोआप डाउनलोड होतात,  ज्यामुळे आपल्या मोबाईल मधील स्पेस ही भरत जाते आणि आपल्या मोबाईल मधील इंटरनेटच्या डेटा देखील वेगाने संपत जातो. अशावेळी आपण व्हॉट्सॲप मध्ये काही सेटिंग करून हे फोटोज आणि व्हीडिओज आपणास हवे असल्यास डाऊनलोड करू शकतो ज्यामुळे आपल्या मोबाईल मधील इंटरनेटचा डेटा आणि मोबाईलची स्पेस दोनीही वाचते.

व्हॉट्सॲप मधील आपोआप होणारे डाऊनलोड बंद करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप चे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. व्हॉट्सॲप ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर, उजव्या बाजूला असणाऱ्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 3. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर काही पर्याय येतील,  त्यातील settings  या पर्यायावर क्लिक करा.
 4. settings  या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्यासमोर काही पर्याय येतील त्यातील Storage and data या पर्यायावर क्लिक करा.
 5. Storage and data या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेज बद्दल काही पर्याय येथील तेथे, When using mobile data यावर क्लिक करा.
 6. When using mobile data या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुम्हाला जे जे आपोआप डाऊनलोड होण्यापासून बंद करायचे आहे त्यांना बंद करा जसे की फोटोज, ऑडिओ, व्हिडिओस, डॉक्युमेंट्स,  या सर्व पर्यायांना बंद करा.

अशाप्रकारे आपण व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मध्ये आपोआप डाऊनलोड होणाऱ्या फोटो, व्हिडिओजना बंद करू शकतो.

टीप ७ :-

मित्रांनो आपण व्हॉट्सॲप स्टेटस वर फोटो आणि व्हिडिओ ठेवतो परंतु तुम्हाला माहित आहे का व्हॉट्सॲप मध्ये आपण ठरवू शकतो की हे स्टेटस कोणाकोणाला दिसावे, मित्रानो यासाठी आपल्याला व्हॉट्सॲप स्टेटस बद्दल एक सेटिंग करावी लागते.

जर तुम्हालाही व्हॉट्सॲप स्टेटसची हि सेटिंग करायची असेल तर  पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप चे ॲप्लिकेशन ओपन करा.
 2. व्हॉट्सॲप अप्लीकेशन उघडल्यानंतर Status या मुख्य पर्यायावर क्लिक करा.
 3. Status या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या व्हॉट्सॲपमधील असणार्‍या व्यक्तींचे स्टेटस दिसतील,  तेथे उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या 3 उभ्या बिंदूंवर क्लिक करा.
 4. तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर दोन पर्याय येतील त्यातील Status privacy या पर्यायावर क्लिक करा.
 5. Status privacy या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे स्टेटस कुणाकुणाला दाखवायचे आहे या बाबतीत  विचारण्यात येईल तेथे My contacts except या पर्यायावर क्लिक करा.
 6. My contacts except या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्या व्हॉट्सॲप मधील सर्व कॉन्टॅक्टस ची लिस्ट येईल,  तेथे तुम्हाला कुणाकुणाला स्टेटस दिसन्या पासून थांबवायचे आहे त्या व्यक्तींच्या नावावर टिक मार्क करा व उजव्या बाजूस खालील कोपऱ्यात असणाऱ्या बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन वर आपले स्टेटस कुणा कुणाला दिसले नाही पाहिजे पाहिजे हे ठरऊ शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन मधील विविध टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या ज्या तुम्हाला तुम्ही व्हॉट्सॲप वापरकरते असाल तर तुम्हाला नक्कीच आवडतील.

Whatsapp वर प्रादेशिक भाषेत कसे टाइप करू?

तुम्हाला जी भाषा टाइप करायची आहे ती फक्त जोडा आणि नंतर WhatsApp उघडा. चॅटमधील कीबोर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी, मजकूर इनपुट फील्डवर टॅप करा आणि तळाच्या ओळीत असलेल्या ग्लोब चिन्हावर दीर्घकाळ दाबा. तुम्ही जोडलेल्या भाषांची सूची दिसेल. तुमचा संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला वापरायची असलेली भाषा निवडा आणि तुम्ही तयार आहात!


व्हॉट्सॲपवर तेलुगुमध्ये कसे लिहायचे?

तुम्ही Android फोन वापरत असल्यास, तुम्ही ॲपमधून WhatsApp ची भाषा बदलू शकता. तुम्ही सुरुवातीच्या स्वागत स्क्रीनवर तुमची भाषा निवडू शकता किंवा, तुम्ही आधीपासूनच WhatsApp वापरत असल्यास: 1. टॅप करा > सेटिंग्ज > चॅट्स > ॲप भाषा .

Android वर माझा कीबोर्ड कसा बदलू शकतो?

कीबोर्ड बदलण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा, त्यानंतर “सिस्टम” किंवा “भाषा आणि इनपुट” वर नेव्हिगेट करा (तुमच्या Android आवृत्तीवर अवलंबून). “व्हर्च्युअल कीबोर्ड” किंवा “ऑन-स्क्रीन कीबोर्ड” पहा. तेथून, तुम्ही डीफॉल्ट कीबोर्ड निवडू शकता आणि तुम्ही स्थापित केलेले अतिरिक्त कीबोर्ड व्यवस्थापित करू शकता.

Leave a Comment