झूम ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Zoom Application Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Zoom Application Information In Marathi मित्रहो झूम हे ऑनलाईन मीटिंग करण्यासाठीचे संकेतस्थळ आहे.  या संकेतस्थळचा वापर करून आपण घरबसल्या ऑनलाईन मीटिंग घेऊ शकतो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरु झालेल्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन टिचिंग मध्ये या संकेतस्थळाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

Zoom Application Information In Marathi

झूम ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Zoom Application Information In Marathi

Zoom बद्दल माहिती आणि Zoom कसे वापरावे ?

या संकेत स्थळाचा वापर करून आज अनेकजण आपल्या कामानिमित्तच्या मीटिंग घरबसल्या घेत आहेत  त्याचप्रमाणे शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी देखील घरूनच या संकेतस्थळाच्या मदतीने शिकत आहेत. मित्रहो तुम्हालाही या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे आणि यातील अनेक पर्याय तुम्हाला समजण्यास अडचण येत आहे तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल.  चला तर मग जाणून घेऊया झूम बद्दल.

झूम ॲप्लिकेशन चे विविध फायदे :-

झूम हे ऑनलाईन मिटिंग करण्याचे संकेतस्थळ आहे ज्यामुळे आपण चांगल्या ऑडियो कॉलिटीमध्ये आणि चांगल्या व्हिडिओकॉलिटी मध्ये मीटिंग घेऊ शकतो.

झूम ॲप्लिकेशन से फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

  1. ऑनलाईन व्हिडिओ वेबिनार घेऊ शकतो.
  2. मेसेज करू शकतो.
  3. खूप छान कॉलिटी चे व्हिडीओ कॉलिंग.
  4. स्क्रीन शेअर करू शकतो.
  5. व्हाईटबोर्ड चा वापर करू शकतो.
  6. खूप छान ऑडिओ कॉलिटी.

Zoom कसे सुरु करावे आणि त्यावर अकाऊंट कसे तयार करावे ?

मित्रहो जर आपण अँड्रॉइड किंवा IOS वापरकर्ते असाल तर आपल्या मोबाईल मध्ये Zoom हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापर करते असेल तर तुम्ही लॅपटॉप मधील ब्राउझर मध्ये जाऊन तेथे सर्च इंजिन मध्ये Zoom meeting असे सर्च करा व प्रथम क्रमांकावर येणाऱ्या लिंक वर क्लिक करा.

Zoom सुरू केल्यानंतर तुम्हाला तेथे अकाउंट तयार करावे लागते.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये झूम मध्ये अकाउंट कसे तयार करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्यूटर मध्ये झूमचे संकेतस्थळ उघडलेल्या नंतर,  तुमच्या समोर Sign up free असे एक पर्याय दिसेल,  त्यावर क्लिक करा.
  2. Sign up free या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर झूम मध्ये साइन अप करण्यासाठी पुढील प्रमाणे तीन पर्याय येतील.

A] ईमेल एड्रेस चा वापर करून.

B]  फेसबुक अकाउंट चा वापर करून.

C]  गुगल अकाउंटचा ओपन करून.

वरील दिलेल्या तीन पर्यायांपैकी आपण कोणत्याही पर्यायचा वापर करून Zoom मध्ये Sign up करू शकता.

३] जर तुम्ही ईमेल एड्रेस चा वापर करून Zoom मध्ये साईन अप करणार आहात तर तेथे ई-मेल ऍड्रेस टाकण्यासाठी असलेल्या  पर्यायावर क्लिक करा व तेथे आपला ईमेल ऍड्रेस टाईप करा.

4] ई-मेल ऍड्रेस टाईप केल्यानंतर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Sign up या पर्यायावर क्लिक करा.

5] Sign up या पर्यायावर क्लिक केल्यावर  तुम्हाला Zoom कडून तुम्ही  दिलेल्या ईमेल एड्रेसवर  अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक मेल पाठवला जाईल,  ज्यामध्ये  अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी पर्याय असेल.

6] ई-मेल अकाउंट उघडा व तेथे झूम कडून आलेल्या मेल वर क्लिक करा,  मेलमध्ये असलेल्या ऍक्टिव्हेट अकाऊंट या पर्यायावर करा.

7] ऍक्टिव्हेट अकाऊंट या पर्यायावर क्लिक केल्यावर  तुम्ही  आपोआप Zoom च्या वेबसाईटवर याल,  तेथे आपले नाव आणि तुम्हाला Zoom  अकाऊंट साठी काय Password ठेवायचे आहे हे विचारले जाईल तिथे आपले नाव टाका आणि पासवर्ड टाका.

८] Password टाकल्यानंतर खाली नारंगी रंगांमध्ये असलेल्या Continue या पर्यायावर क्लिक करा, अशाप्रकारे आपले झूम चे अकाउंट तयार होईल.

अशाप्रकारे मित्रहो आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरत असाल तर Zoom  वर अकाऊंट तयार करू शकता.

जर तुम्ही मोबाइल वापरत असाल तर Zoom अकाऊंट तयार करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले झुमचे एप्लीकेशन उघडा.
  2. झुमचे अप्लीकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर Sign in आणि Sign up  करण्यासाठी पर्याय येईल.
  3. तेथे Sign up या पर्यायावर क्लिक करा व  समोर ई-मेल ऍड्रेस टाकण्यासाठी आलेल्या पर्यायांमध्ये ई-मेल ऍड्रेस टाका.
  4. ईमेल एड्रेस टाकल्यानंतर खालील असणाऱ्या Sign up  या पर्यायावर क्लिक करा.
  5. Sign up या पर्यायावर क्लिक केल्यावर  तुम्ही दिलेल्या तुमच्या इमेल आयडी वर झूम कडून  अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक मेल येईल,  आपल्या इमेल अकाउंट मध्ये जाऊन, ते मेल ओपन करा व तिथे असलेल्या Activate account या पर्यायावर क्लिक करा.
  6. ऍक्टिव्हेट अकाऊंट या पर्यायावर  केल्यावर तुम्ही झूम च्या वेबसाईटवर याल, तेथे तुमचे नाव आणि Zoom वरील अकाउंट साठी पासवर्ड टाईप करा व नंतर खाली असणाऱ्या Continue या  पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण मोबाईल वरील झूम ॲप्लिकेशन वर अकाऊंट तयार करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आपण मोबाईल आणि लॅपटॉप किंव्हा कॉम्पुटर  वापरत असाल तर त्यावर Zoom चे अकाऊंट  बनवू शकतो.

Zoom वर मिटिंग कशी सुरु करावी ?

जर तुम्ही Zoom एप्लीकेशन चे नवीन वापरकरते आहात आणि तुम्हाला मिटिंग Host करायची आहे तर Zoom वर मीटिंग सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप करा.

कम्प्युटर किंवा लॅपटॉप साठी :-

  1. झूमची वेबसाईट ओपन करून तेथे आपले ई-मेल ऍड्रेस टाकून साइन इन करा.
  2. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला Host a meeting असे एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  3. Host a meeting  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या मीटिंगसाठी खाली दिल्याप्रमाणे  कोणते पर्याय  निवडायचे आहे याबद्दल विचारण्यात येईल

A] व्हिडिओ बंद

B] व्हिडिओ चालू

C]  स्क्रीन शेअर फक्त

यावरील पर्याय पैकी तुम्हाला मीटिंगसाठी लागणाऱ्या आवश्यकतेनुसार ज्या पर्यायामधून तुम्हाला मीटिंग सुरू करायची आहे त्या पर्यायावर क्लिक करा.

4] वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यावर आपण Zoom वेबसाईट मधून आपल्या  कॉम्प्युटर मधील ॲप्लिकेशन मध्ये  रीडायरेक्ट  होऊ व मीटिंग सुरू होईल.

5]  मीटिंग सुरू झाल्यानंतर तुमच्यासमोर तेथे मीटिंगसाठीचे विविध प्रकारचे पर्याय असतील त्याचप्रमाणे तेथे मिटिंगला बाकी मेंबर्स invite करण्यासाठी पर्याय असेल, त्यावर क्लिक करून आपल्या मीटिंग मेम्बर्सना इन्व्हिटेशन सेंड करा.

अशाप्रकारे आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये Zoom मीटिंग सुरू करू शकतो.

अँड्रॉइड किंवा IOS मोबाईल साठी :-

  1. आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले Zoom एप्लीकेशन उघडा  व ईमेल आयडी टाकून साइन इन करा.
  2. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या New meeting या पर्यायावर क्लिक करा.
  3. New meeting या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन  पर्याय येथील त्यातील Video on पर्यायावर तुम्हाला तुमच्या मीटिंगसाठी व्हिडिओची गरज असल्यास चालू करा.
  4. व्हिडिओ हा पर्याय चालू केल्यानंतर खालच्या बाजूस नीळ्या रंगात असणाऱ्या Start a Meeting या पर्यायावर क्लिक करा, अशाप्रकारे मीटिंग सुरू होईल.
  5. तुम्हाला खालच्या बाजूस काही पर्याय दिसतील जसे की तुमचे मायक्रोफोन चालू करण्यासाठी माइक चे चिन्ह असेल,  व्हिडिओ चालू करण्यासाठी  कॅमेराचे  चिन्ह असेल,  या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हवे असल्यास ते पर्याय चालू करू शकता.
  6. तुमच्या समोर खालच्या बाजूस Participants असा एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  7. Participants या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील, तिथे खालच्या बाजूस तुम्हाला Invite असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  8. Invite या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला मीटिंग च्या इतर सदस्यांना पुढील दाखवल्याप्रमाणे कोणत्या पर्यायाने इंविटेशन पाठवायचे याबाबतीत विचारण्यात येईल

A] ईमेलने पाठवा Send Email

B] मेसेज करा Send Message

C] Invite contacts

D] इन्व्हाईट लिंक कॉपी करा Copy Invite link

वरील दिलेल्या कोणत्याही पर्यायाने आपल्या मीटिंग मधील सदस्यांना मीटिंग साठी एन्वीटेशन पाठवा.

अशाप्रकारे आपण मोबाईल वर झूम मीटिंग सुरू करून मीटिंग साठी इतर सदस्यांना इनविटेशन पाठवु शकतो.

Zoom वर मीटिंग Shedule कशी करावी ?

मित्रहो आपण Zoom वर मीटिंग शेड्यूल देखील करू शकतो, ज्या  मुले आपण आपली ऑनलाईन मीटिंग झूम वर एखाद्या दिवसाला ठराविक  वेळेवर ठेवू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की zoom  वर मिटिंग कशी  शेड्युल करावी तर  पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

कम्प्युटर किंवा लॅपटॉप साठी :-

  1. आपल्या लॅपटॉप मधील किंवा कॉम्प्युटर मधील Zoom  एप्लीकेशन उघडा व ई-मेल ऍड्रेस टाकून साइन इन करा.
  2. साइन इन केल्यानंतर समोर येणार्‍या नारंगी रंगाचा असलेल्या Schedule या पर्यायावर क्लिक करा व नंतर मीटिंग शेडूल करण्यासाठी विचारले गेलेल्या माहितीला भरा,  जसे की मीटिंग कोणत्या तारखेला असावी, कोणत्या वेळेला असावी, किती वेळेसाठी असावी अशी सर्व माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती भरा.
  3. सर्व माहिती भरून झाल्यानंतर, खालच्या बाजूस असणाऱ्या Schedule या पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर Zoom मीटिंग शेड्यूल करू शकतो.

मोबाईल साठी :-

  1. आपल्या मोबाईल मधील Zoom  एप्लीकेशन उघडा.
  2. Zoom  चे अप्लीकेशन उघडल्यानंतर तेथे आपले ईमेल एड्रेस टाकून Zoom मध्ये साइन इन करा
  3. Zoom मध्ये साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय  दिसतील त्यातील Schedule या पर्यायावर क्लिक करा.
  4. Schedule या पर्यायावर क्लिक  केल्यावर तुमच्यासमोर  पुढील दिल्याप्रमाणे मीटिंग बाबतीत काही माहिती विचारली ती  भरा :-

A]  मीटिंग केव्हा सुरू  करायचे आहे Starts

B]  मिटिंगचा कालावधी काय असावा Duration

C] वेळ क्षेत्र Timezone

D] मीटिंग साठी पासवर्ड हवाय का Require Meeting password

E]  मीटिंगसाठी पासवर्ड काय ठेवावा Password

अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेली सर्व माहिती भरा व उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या Done या पर्यायावर क्लिक करा.

5] Done  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर मीटिंग च्या तारखे बद्दल आणि मीटिंग साठी कोणा कोणाला इन्व्हाईट करायचे आहे याबाबतीत विचारले जाईल, तेथे  ती माहिती भरा.

6]  सर्व माहिती भरल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या Add या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण  मोबाईलवर Zoom मीटिंग शेड्यूल करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात Zoom  बद्दल माहिती सांगितली आहे जी तुम्हाला Zoom वापरण्यात नक्कीच मदत करेल. Zoom  बद्दलचा हा लेख तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या  सवंगड्यांसोबत सोबत शेअर करायला विसरू नका.


झूम ॲप काय आहे आणि ते कसे कार्य करते?

एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहे जे संगणक डेस्कटॉप किंवा मोबाइल ॲपद्वारे वापरले जाऊ शकते आणि वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग, वेबिनार आणि थेट चॅटसाठी ऑनलाइन कनेक्ट करण्याची परवानगी देते . 

झूम म्हणजे काय आणि त्याचे फायदे?

पाहिल्या आणि ऐकल्या जाण्याबरोबरच, झूम मीटिंग्स लाइव्ह चॅट, कंटेंट शेअरिंग, इंटरएक्टिव्ह व्हाईटबोर्डिंग आणि मीटिंगला अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी इतर अनेक वैशिष्ट्ये देखील प्रदान करतात . समोरासमोर बैठकांना पर्याय नसल्याचा अनेकांचा युक्तिवाद असला तरी झूम मीटिंग अशा गोष्टी करू शकतात जे पारंपारिक सभा करू शकत नाहीत.

झूम ॲप कोणाचे आहे?

व्हिडिओ-टेलिफोनी सॉफ्टवेअर कंपनी साम्राज्याच्या आत. झूमच्या प्रमुख खाजगी भागधारकांमध्ये एरिक एस. युआन, एक चिनी-अमेरिकन अब्जाधीश व्यापारी आहे ज्याने झूमची स्थापना केली. डॅन शेनमॅन, बोर्ड सदस्य आणि सुरुवातीपासून झूममधील देवदूत गुंतवणूकदार आणि सँटियागो सुबोटोव्स्की, हे देखील झूममधील प्रारंभिक गुंतवणूकदार आहेत.

झूममध्ये अमर्यादित पीटीओ आहे का?

मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि झूम या सर्वांकडे अमर्यादित पीटीओ धोरणे आहेत .

Leave a Comment