Mobile Speed Application Information In Marathi मित्रहो आपण जेंव्हा मोबाईल नवीन घेतो तेंव्हा तो खूप छान वेगाने चालत असतो, परंतु काही वेळांनंतर जस जसे आपण त्यात विविध अँप्लिकेशन डाउनलोड करतो, विविध प्रकारच्या फाइल्स save करीत असतो, त्यामुळे आपल्या नवीन मोबाईलची स्पीड कमी होत जाते. मोबाईलची स्पीड कमी झाल्यामुळे मात्र आपलं मोबाईल वरील एकही काम नीट होत नाही, थोड्या थोड्या वेळात मोबाईल हँग होउ लागतो, ज्यामुले आपली चिडचिड होते. या लेखात आपण पाहणार आहोत कि अशा स्लो झालेल्या मोबाईलची स्पीड कशी वाढवावी, चला तर मग जाणून घेऊया.
Mobile ची स्पीड कशी वाढवावी ? Mobile Speed Application Information In Marathi
मित्रहो मोबाईलची स्पीड कमी होण्याची खूप काही कारणे आहेत जसे कि पुढील दिल्याप्रमाणे :-
- मोबाईल सॉफ्टवेअर updated नसल्यामुळे
- रॅम फुल झाल्यामुळे
- Widgets चा वापर केल्यामुळे
- अँप्लिकेशन्स अपडेटेड नसल्यामुळे
- लाइव्ह वॉलपेपर्स चा वापर केल्यामुळे
- खूप सारा Cached डेटा जमा झाल्यामुळे
- अतिरिक्त अँप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे
- मोबाईल स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे
- कमी स्पीड चा मेमरी कार्ड वापरल्यामुळे
मित्रहो वरील दिल्याप्रमाणे कारणे आहेत ज्यामुळे आपले मोबाईल पूर्णपणे स्लो होऊन जाते, चला तर यातील काही बद्दल जाणून घेऊया आणि त्याचप्रमाणे अशा प्रॉब्लेम्सना कसे सोडवून मोबाईल स्पीड कशी वाढवायची हे जाणून घेऊया.
१] मोबाईल सॉफ्टवेअर updated नसल्यामुळे :-
मित्रहो आपण जेंव्हा मोबाईल नवीन घेतो तेंव्हा तो अपडेटेड असतो म्हणजेच त्यात मोबाईल साठी कंपनी कडून आलेले सर्व अपडेट्स मोबाइल मध्ये इंस्टॉलड असतात, परंतु जसजसे आपण मोबाईल वापरत असतो, तसे तसे आपण मोबाईल कंपनी कडून मोबाईल मधील बग्स फिक्स करणासाठी येणाऱ्या अनेक अपडेट्स कडे आपण दुर्लक्ष करतो, ज्यामुळे मोबाईल update होत नाही आणि बग्स च्या प्रॉब्लेम मुले मोबाईल वापरत असताना स्लो होऊन जातो.
जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल कि मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर कसे update मारायचे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील सेटीन्ग्स उघडा.
- Settings उघडल्यानन्तर, मोबाईल स्क्रीनवर स्क्रोल करून खाली असणाऱ्या Software update या पर्यावर क्लिक करा.
- Software update या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुमच्या मोबाईल साठी जे update करायचे आहे त्याचे नाव, त्याची size, त्यामुळे मोबाईल मध्ये कोणत्या नवीन गोष्टी दिसून येतील हि सर्व माहिती तुम्हाला दिसेल.
- तेथे खालच्या बाजूस तुम्हाला Download असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करण्याअगोदर खात्री करून घ्या की आपल्या मोबाईल मध्ये जितकं update चे size आहे त्याहून थोडं अधिक आपलं इंटरनेट डेटा आहे आणि आपल्या मोबाईल ची बॅटरी चार्जे आहे.
- सर्व गोष्टी बघितल्यानन्तर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा व नंतर डाउनलोड झाल्यांनतर मोबाईल रिस्टार्ट करा.
अशाप्रकारे आपण मोबाईल मधील सॉफ्टवेअर update मारून मोबाईलची स्पीड वाढवू शकतो.
२] रॅम फुल झाल्यामुळे :-
मित्रहो प्रत्येक मोबाईल साठी कंपनी कडून एक RAM ठरलेली असते, जसे कि 4 Gb, 6 Gb म्हणजेच आपण इतक्या size पर्यंत अँप्लिकेशन्स इंस्टॉलड करू शकतो, परंतु आपण आपल्या मोबाइल मध्ये अनेक अँप्लिकेशन डाउनलोड करून इंस्टॉलड करतो त्यामुळे मोबाईल RAM भरत जाते, आणि परिणामी मोबाईल स्लो होत जातो.
तर या वर उपाय म्हणजे आपल्याला आपल्या मोबाइल मधील खूप RAM चा वापर करणारे अँप्लिकेशनस आणि त्याचप्रमाणे ज्या अँप्लिकेशनस ची गरज नाही आहे त्यांना uninstall करणे.
कोणते अँप्लिकेशन्स किती RAM चा वापर करीत आहे, हे पाहण्यासाठी आणि ते uninstall करण्यासाठी पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील सेटीन्ग्स उघडा.
- Settings उघडल्यानन्तर मोबाईल स्क्रीनवर स्क्रोल करून खाली असणाऱ्या About phone या पर्यावर क्लिक करा.
- About phone या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही माहिती येईल तेथे Build number या पर्यायावर ५ वेळा पाटोपाट क्लिक करा.
- Build number या पर्यायावर ५ वेळा पाटोपात क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल मधील डेव्हलपर ऑपशन चालू झाल्याचे नोटिफिकेशन येईल, आता मोबाईल वरील सेटीन्ग्स मध्ये पुन्हा या आणि About phone च्या खाली असणाऱ्या System या पर्यायावर क्लिक करा.
- System या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Developer options असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- Developer options या पर्यायावर क्लिक करून तेथे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील RAM किती आहे आणि ती किती वापरण्यात आली आहे ते समजेल, किती वापर झाला आहे, या वर क्लिक करा व माहीत करून घ्या कि कोणते अप्प्प्लिकेशन किती RAM चा वापर करीत आहे, व ते अँप्लिकेशन Uninstall करून टाका.
अशाप्रकारे आपण मोबाईल मध्ये RAM चा वापर करीत असणाऱ्या अँप्लिकशन्स, ज्यांची आपल्याला गरज नाही आहे त्यांना uninstall करू शकतो.
३] Widgets चा वापर केल्यामुळे :-
मित्रहो आपण मोबाईल मध्ये अनेक widgets वापरतो जसे कि weather इंडिकेटर, डेटा यूज्ड, कॉन्टॅक्टस शॉर्टकट्स असे अनेक प्रकारचे widgets वापरत असतो, असे विजेट्स आपल्या मोबाईल मध्ये बॅकग्राऊंड मध्ये देखील कार्य करीत असतात ज्यामुळे आपन मोबाईल वर एखादा अँप्लिकेशन वापरत असताना मोबाईल लोड येऊन स्लो चालू लागतो.
तर अशावेळी आपण आपल्या मोबाईल मधील या विजेट्सना बंद करणे गरजेचे असते. Widgets हे आपल्या मोबाईल होम स्क्रीन वर असतात त्यामुळे, आपल्याला मोबाईल स्क्रीन वर येऊन जे Widgets चालू आहेत त्यांवर ३ सेकंड इतके क्लिक करा, व नंतर remove करण्यासाठी आलेल्या पर्यायावर क्लिक करा.
अशारितीने आपण मोबाईल मधून Widgets ना काढू शकतो.
४] अँप्लिकेशन्स अपडेटेड नसल्यामुळे :-
मित्रहो आपण मोबाइल मध्ये अनेक अँप्लिकेशनचा वापर करीत असतो आणि या अँप्लिकेशन्सना वारंवार बग्स फिक्स करण्यासाठी नवीन अपडेट्स येत असतात, परंतु आपण अँप्लिकेशनच्या अपडेट्स साठी लागणाऱ्या इंटरनेट डेटामुळे आपण या अँप्लिकेशन्सच्या अपडेट्सकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे काहीवेळा असे अँप्लिकेशन्स मोबाईलमध्ये वापर करीत असताना स्लो चालू लागतात.
तर मित्रहो अशा अँप्लिकेशन्सना अपडेट करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील असणाऱ्या अँप्लिकेशन स्टोर मध्ये जाऊन, तेथे सर्व update पेंडिंग असणाऱ्या अँप्लिकेशन्सना update करा व आपले मोबाईल एखादा रिस्टार्ट करा.
अशाप्रकारे आपण मोबाईल मध्ये वापर करीत असणाऱ्या अँप्लिकेशन्स ना update करून मोबाईलची स्पीड वाढवू शकतो.
५] लाइव्ह वॉलपेपर्सचा वापर केल्यामुळे :-
मित्रानो आज अनेक जण मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे लाईव्ह वॉलपेपर्स वापरतात, परंतु अशा लाईव्ह वॉलपेपरचा वापर केल्यामुळे मोबाईलची स्पीड देखील स्लो होते कारण हे वॉलपेपर्स बॅकग्राउंड मध्ये चालू राहतात ज्यामुळे ॲप्लीकेशन वापरताना मोबाईलची स्पीड स्लो होते.
यावर उपाय म्हणजे आपल्या मोबाईल मधील हे लाईव्ह वॉलपेपर्स बंद करून static वॉलपेपर सेट करा, ज्या मुले बॅकग्राऊंड मध्ये कोणते वॉलपेपर्स चालू राहणार नाही व मोबाईलची स्पीड स्लो होणार नाही.
६] खूप सारा Cached डेटा जमा झाल्यामुळे :-
मित्रहो आपण मोबाईल मध्ये अनेक एप्लीकेशन इंस्टॉल करत असतो तर त्यांच्या वापरामुळे मोबाईल मध्ये कॅचेस जमा होत असतात तर अशा कॅचेस ना क्लिअर करणे गरजेचे असते नाहीतर हे जमा झाल्यामुळे आपले मोबाईल चे वापर चालू असताना मोबाईल ची स्पीड स्लो होते.
मोबाईल मधील Cached डेटा क्लिअर करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-
- मोबाईल मधील सेटिंग ओपन करा.
- मोबाईल मधील सेटिंग ओपन केल्यानंतर तेथे तुमच्या समोर अनेक पर्याय येथील त्यातील Storage हे पर्याय शोधा व त्यावर क्लिक करा.
- Storage या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Internal storage असे एक पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
- Internal storage या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Catched data असे एक पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.
- Catched data पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला सर्व एप्लीकेशन साठी Cached डेटा क्लिअर करायचा आहे का, तेथे Ok या पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण मोबाईल मधील सर्व ॲप्लिकेशन चा कॅच डेटा क्लियर करू शकतो आणि आपल्या मोबाईलचा स्पीड वर होणारा परिणाम कमी करू शकतो.
७] अतिरिक्त अँप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे :-
मित्रहो आपण मोबाईल मध्ये अनेक ॲप्लिकेशन्स इंस्टॉल करत असतो परंतु अशा अनेक आणि गरजेचे नसलेल्या एप्लिकेशन्सना इन्स्टॉल केल्यामुळे आपल्या मोबाईल मधील RAM भरत असते ज्यामुळे आपला मोबाईल वापरताना मोबाईलच्या स्पीडवर परिणाम होतो.
म्हणून आपल्या मोबाईल मधून गरजेच्या नसलेल्या ॲप्लिकेशनचा इन्स्टॉल करून RAM भरून देऊ नका, ज्या ॲप्लिकेशन ची गरज नाही त्या एप्लिकेशन्सना अनइन्स्टॉल करा, ज्या मुले मोबाईल मधील RAM देखील फुल होणार नाही व मोबाइलच्या स्पीडवर ही त्याचा परिणाम होणार नाही.
मोबाईल मधील इंस्टॉल एप्लीकेशन अनइन्स्टॉल करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील सेटिंग उघडा.
- मोबाईल मधील सेटिंग वर आल्यानंतर त्याचे अनेक पर्याय दिसतील त्यातील Applications या पर्यायावर क्लिक करा.
- Applications या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेले एप्लीकेशन ची नावे येतील, त्यातील ते ॲप्लिकेशन जे तुम्हाला गरजेचे नाहीत त्यांच्या नावावर क्लिक करा.
- गरजेच्या नसलेल्या एप्लीकेशनच्या नावावर क्लिक केल्यावर समोर तुम्हाला Uninstall असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण ज्या ज्या एप्लीकेशन ची आपणास गरज नाही त्या त्या ॲप्लिकेशनचा नावावर क्लिक करून त्या एप्लिकेशन्सना Uninstall करू शकतो व त्या ॲप्लिकेशनचा आपल्या मोबाईल स्पीड वर होणारा परिणाम कमी करू शकतो.
अशा प्रकारे आम्ही या लेखात मोबाईलची स्पीड कशी वाढवावी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला मोबाईलची स्पीड कमी होण्यामागचे कारण समजण्यास आणि तुमच्या मोबाईलची स्पीड वाढवण्यास नक्कीच मदत करेल.