फोटो इडिट करण्यासाठी ५ उत्तम वेबसाइट्स Photo Editing Information In Marathi

Photo Editing Information In Marathi मित्रांनो आज आपण या लेखात ५ अशा वेबसाईट्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला फोटो एडिटिंग करण्यात अत्यंत मोलाची मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या ५ वेबसाइट्स बद्दल.

Photo Editing Information In Marathi

फोटो इडिट करण्यासाठी ५ उत्तम वेबसाइट्स Photo Editingn Information In Marathi

] Removebg :- 

मित्रहो Removebg या वेबसाईटचा वापर करून आपण एखाद्या फोटोचा बॅकग्राऊंड  काढू शकतो,  आपण इंटरनेटवर फोटो मधील बॅकग्राऊंड काढण्यासाठी अनेक वेबसाइट बघतो परंतु कित्येक वेबसाईटवर  काही  भाग फोटोच्या बॅकग्राऊंड मधून काढून टाकण्यापासून राहूनच जातो.  आपण जर Removebg या वेबसाईटचा वापर केल्यास,  येथे आपणास  हवे असल्याप्रमाणे फोटो मधील सर्व बॅकग्राऊंड उत्तम रित्या काढले जाते.

Removebg या वेबसाइटवर आपण आपल्या फोटोमधील बॅकग्राऊंड काढून तेथे दुसरा बॅकग्राऊंड देखील टाकू शकतो, फोटोचे बॅकग्राऊंड मध्ये एखादे निसर्ग किंवा आपल्याच मोबाईल किवा लॅपटॉप मधील एखादे फोटो टाकू शकतो.

Removebg या वेबसाईटचा वापर करून फोटोमधील बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या डिवाइस मधील ब्राउजर उघडा व तेथील सर्च इंजिनमध्ये Removebg असे शोधा.
  2. Removebg असे सर्च इंजिन मध्ये शोधल्यावर येणार्‍या पहिल्या क्रमांकाचे लिंकवर क्लिक करा.
  3. Removebg  या वेबसाईट मध्ये आल्यानंतर तुम्हाला तेथे समोरच तुमचे फोटो अपलोड करण्यासाठी Upload image असे पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Upload image  या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्या डिवाइस मधील  ज्या फोटोचे बॅकग्राऊंड काढायचे आहे ते फोटो सिलेक्ट करा.
  5. फोटो सिलेक्ट केल्यानंतर, लगेचच वेबसाइटवर तुम्ही दिलेले त्या फोटोचे बॅकग्राऊंड रिमुव्ह होऊन ते फोटो समोर येईल.
  6. समोर बॅकग्राऊंड रिमूव होऊन आलेल्या फोटोवर, तुम्ही हवे असल्यास  फोटोवर असणाऱ्या Edit या पर्यायावर क्लिक करून तुमच्या फोटोसाठी  एखाद्या बॅकग्राउंड इमेज ठेवू शकता.
  7. एखादा बॅकग्राउंड इमेज ठेवल्यानंतर तुम्ही अपलोड केलेल्या फोटोच्या खाली असणाऱ्या Download या पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Removebg या वेबसाईटचा वापर करून आपल्या फोटोचे बॅकग्राऊंड उत्तम पणे रिमूव करू शकतो.

] iloveimg :-

मित्रहो iloveimg या वेबसाईटचा वापर करून आपण एखादे फोटो क्रॉप करू शकतो,  जर तुमच्या कडे असणारे फोटो तुम्हाला हवे असणाऱ्या भागात कापायचे आहे तर या वेबसाईटचा वापर करून तुम्ही त्या फोटोला तुम्हाला हवे तसे क्रॉप करू शकता.

iloveimg या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्याकडे असणारे फोटो क्रॉप करायचे असेल तर पुढील प्रमाणे दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपल्या डिवाइस मधील ब्राउजर उघडा व तेथील सर्च इंजिनमध्ये iloveimg crop photo असे शोधा.
  2. iloveimg crop photo असे सर्च इंजिन मध्ये शोधल्यावर येणार्‍या पहिल्या क्रमांकाचे लिंकवर क्लिक करा.
  3. iloveimg ही वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला तुमचे जे फोटो क्रॉप करायचे आहे ते अपलोड करण्यासाठी समोर निळ्या रंगात Select images असे पर्याय असेल,  त्यावर क्लिक करा.
  4. निळ्या रंगात  असणाऱ्या Select images  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधील जे फोटो क्रॉप करायचे आहे  ते निवडायला येईल, तिथे तुमचे फोटो निवडा.
  5. फोटो निवडल्यानंतर तो तुमच्या समोर अपलोड होऊन येईल,  तेथे तुम्ही कर्सर किंवा टचच्या मदतीने फोटो वरील जो भाग क्रॉप करायचा आहे तो भाग निळ्या बॉक्समध्ये निवडा.
  6. फोटो वरील जो भाग क्रॉप करायचा आहे तो भाग निळ्या बॉक्समध्ये आणल्यानंतर खाली असणाऱ्या निळ्या रंगात Crop image या पर्यायावर क्लिक करा.
  7. Crop image या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही निवडलेला फोटो तुम्हाला हवा तसा क्रॉप होऊन जाईल व तिथे तुमच्या समोर फोटो डाऊनलोड करण्यासाठी नीळ्या रंगात Download cropped IMAGE असा एक पर्याय येईल त्यावर क्लिक करा,  फोटो आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल.

अशाप्रकारे आपण iloveIMG या वेबसाईटचा वापर करून आपल्याकडे असणारे फोटो आपल्याला हवे तसे क्रॉप करू शकतो.

] AI Picture Restorer :-

मित्रहो AI Picture Restorer या वेबसाईटचा वापर करून आपल्याकडे असणारे जुने फोटो ज्यावर पांढरे लाइन असतात त्याचप्रमाणे दिसायला ब्लर  असतात अशा फोटोना आपण या वेबसाईटवर अपलोड करून व्यवस्थित बदलू शकतो.  आपल्याकडे आपले लहानपणीचे फोटो असतात जे दिसायला नीट नसतात, त्यावर वेगवेगळे डाग असतात  अशा वेळेला आपण या वेबसाईटचा वापर करून यावर ते फोटो उत्तम रित्या बदलू शकतो, आणि ते डाग काढू शकतो.

AI Picture Restorer या वेबसाईटवर आपले जुने नीट न दिसणारे फोटो कसे बदलायचे यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपल्या डिवाइस मधील ब्राउजर उघडा व तेथील सर्च इंजिनमध्ये AI Picture Restorer असे शोधा.
  2. AI Picture Restorer असे सर्च इंजिन मध्ये शोधल्यावर येणार्‍या पहिल्या क्रमांकाचे लिंकवर क्लिक करा.
  3. AI Picture Restorer ही वेबसाईट उघडल्यावर, तुम्हाला उदाहरण म्हणून एक फोटो चे रूपांतर दाखवलेले असेल आणि त्या खाली फोटो अपलोड करण्यासाठी Upload असे एक पर्याय असेल,  त्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Upload या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधील ज्या फोटो चे डाग काढायचे आहेत किंवा जे फोटो ब्लर आहे ते नीट करायचे आहे ते फोटो निवडा.
  5. फोटो निवडल्यानंतर त्याखाली निळ्या रंगाचा असणाऱ्या Restore या पर्यायावर क्लिक करा.
  6. Restore या पर्यायावर क्लिक तुमच्यासमोर तुमचे फोटो पंधरा ते वीस सेकंदामध्ये नीट होऊन खाली दिसू लागेल.
  7. तुम्ही अपलोड केलेले फोटो रिस्टोअर होऊन समोर आल्यानंतर तेथे तुम्हाला Download असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून फोटो डाऊनलोड करा.

अशा प्रकारे आपण AI Picture Restorer या वेबसाईटचा वापर करून आपल्याकडे जुने नीट न दिसणारे आणि ब्लर असणारे फोटो चांगले करू शकतो.

] AI Picture Colorizer :- 

मित्रहो AI Picture Colorizer या वेबसाईटचा वापर करून आपण  आपल्याकडे असणारे ब्लॅक अँड व्हाईट फोटो कलर मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आपल्याकडे अनेक अगोदरचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतात  अशा फोटो ना आपण या वेबसाईटवर अपलोड केल्यास,  या वेबसाइटवरून त्या फोटोस कलर दिले जाते.

AI Picture Colorizer या वेबसाईटवर ब्लॅक अँड व्हाईट फोटोला कसे कलर फोटोमधे कन्वर्ट करावे यासाठी पुढील दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपल्या डिवाइस मधील ब्राउजर उघडा व तेथील सर्च इंजिनमध्ये AI Picture Colorizer असे शोधा.
  2. AI Picture Colorizer असे सर्च इंजिन मध्ये शोधल्यावर येणार्‍या पहिल्या क्रमांकाचे लिंकवर क्लिक करा.
  3. AI Picture Colorizer ही वेबसाईट उघडल्यावर, तुम्हाला उदाहरण म्हणून एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोचे कलर बदललेल्या फोटोमध्ये रूपांतर दाखवलेले असेल आणि त्या खाली फोटो अपलोड करण्यासाठी Upload असे एक पर्याय असेल,  त्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Upload पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला  तुमच्या डिवाइस मधील ज्या  ब्लॅक अँड व्हाईट फोटोला कलर द्यायचे आहे ते फोटो निवडा.
  5. फोटो निवडल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही निवडलेले फोटो दिसून येईल, तिथे खाली असणाऱ्या Colorize या पर्यायावर क्लिक करा.
  6. Colorize या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही अपलोड केलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो पंधरा ते वीस सेकंद मध्ये कलर मध्ये येईल.
  7. समोर आलेल्या कलर फोटो बाजूला असणाऱ्या Download या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते फोटो डाऊनलोड करू शकता.

अशाप्रकारे आपण AI Picture Colorizer या वेबसाईटचा वापर करून आपल्याकडे असणारे ब्लॅक अँड व्हाईट फोटोना कन्वर्ट करून त्यांना कलर फोटो मध्ये आणू शकतो.

] Tuxpi :- 

मित्रहो Tuxpi या वेबसाईटचा वापर करून आपण आपल्याकडे असणारे कोणतेही फोटो आपल्याला हव्या त्या आकारामध्ये क्रॉप करू शकतो, जसे की त्रीकोणामध्ये, गोलाकार आकारात, स्टारच्या आकारात, चंद्रकोर आकारात, षट्कोनी आकारात अशा विविध 20 आकारामध्ये मध्ये क्रॉप करू शकतो.

Tuxpi या वेबसाईटचा वापर करून तुम्हालाही तुमच्याकडे असणारे फोटो एखाद्या आकारात क्रॉप करायचे असेल तर पुढील दिले गेल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या डिवाइस मधील ब्राउजर उघडा व तेथील सर्च इंजिनमध्ये Tuxpi shape tool असे शोधा.
  2. Tuxpi shape tool असे सर्च इंजिन मध्ये शोधल्यावर येणार्‍या पहिल्या क्रमांकाचे लिंकवर क्लिक करा.
  3. तुमच्या समोर Tuxpi shape tool ही वेबसाइट उघडेल, तेथे तुम्हाला  निळ्या रंगांमध्ये तुम्हाला जे फोटो एखाद्या आकारामध्ये crop करायचे आहे ते फोटो निवडण्यासाठी Start photo Editing असे एक पर्याय येईल त्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Start photo Editing  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या डिवाइस मधील जे फोटो तुम्हाला क्रॉप करायचे आहे ते निवडा.
  5. फोटो निवडल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही अपलोड केलेले फोटो येईल,  तेथे तुम्हाला अनेक पर्याय असतील त्याचप्रमाणे वीस वेगवेगळ्या प्रकारचे शेप दिसतील ज्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो क्रॉप करू शकता.
  6. तुम्हाला हव्या त्या शेप वर क्लिक करून तुमचे फोटो  हव्या त्त्या आकारात क्रॉप करू शकता.
  7. फोटो क्रॉप झाल्यानंतर, असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हे फोटो डाऊनलोड करू शकता.

अशाप्रकारे आपण Tuxpi या वेबसाईटचा वापर करून आपल्याकडे असणारे फोटो आपल्याला हव्या असणाऱ्या आकारामध्ये क्रॉप करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात पाच वेगवेगळ्या वेबसाइट्स बद्दल माहिती सांगितली आहे ज्या तुम्हाला फोटो एडिटिंग करण्यास खूप महत्वाची मदत करतील. जर तुम्हाला आम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल काही शंका असल्यास खाली असलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका.

Leave a Comment