गुगल मॅप ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Google Map Application Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Google Map Application Information In Marathi मित्रहो गुगल मॅप ही एक गुगलची सुविधा आहे. गुगल मॅपची सुरुवात सोळा वर्षापुर्वी आठ फेब्रुवारी 2005 मध्ये झाली. याचा वापर करून आपण सर्व ठिकाणचे मॅप बघू शकतो,  ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणचे  विविध रस्ते पाहू शकतो, त्याचप्रमाणे गुगल मॅप ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मदत देखील करते.

Google Map Application Information In Marathi

गुगल मॅप ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Google Map Application Information In Marathi

Google Map बद्दल माहिती आणि Google Map कसे वापरावे ?

गुगल मॅप चा वापर करून आपण हरवल्यास आपण कोणत्या ठिकाणी आहोत हे देखील समजते ज्यामुळे आपल्याला आपल्या घरी जाण्यासाठीचा मार्ग समजतो. गुगल मॅप हे एप्लीकेशन मध्ये देखील उपलब्ध आहे.  अँड्रॉइड मोबाइलसाठी गुगल मॅप एप्लीकेशन ची सुरुवात 2008 मध्ये झाली त्याचप्रमाणे IOS मोबाईल साठी गुगल मॅप चे मोबाईल ॲप्लिकेशन 13 डिसेंबर 2012 मध्ये सुरू झाले. चला तर मग जाणून घेऊया गुगल मॅप एप्लीकेशन कसे वापरावे.

Google map कसे सुरू करावे ?

मित्रहो गुगल मॅप वेबसाईट आणि एप्लीकेशन अशा दोन्ही सुविधेमध्ये उपलब्ध आहे,  त्यामुळे जर आपण संगणक किंवा लॅपटॉप  वापर करते असेल तर आपण आपल्या लॅपटॉप मधील ब्राउझर मध्ये जाऊन सर्च इंजिन वर गुगल मॅप असे सर्च करा व येणाऱ्या पहिल्या लिंक वर क्लिक करा.

जर आपण मोबाईल वापरकरते असाल तर, आपल्या मोबाईल मध्ये  ऍप्लिकेशन स्टोर वरून गुगल मॅप नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड आणि ते मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.

अशाप्रकारे आपण  लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल मध्ये गुगल मॅप हे सुरू करू शकतो.

Google map वर एखाद्या ठिकाणचा आपल्यापासूनचा अंतर कसा पाहावा ?

मित्रहो आपण गुगल मॅप चा वापर करून एखाद्या ठिकाणचा आपण जेथे उभे आहेत त्यापासूनचा अचूक अंतर पाहू शकतो.

जर तुम्हाला देखील माहिती करून घ्यायची असेल की गुगल मॅप्स वर एखाद्या ठिकाणचा आपल्यापासूनच अंतर कसं पाहायचं तर पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्स एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल मॅपचे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर मोबाईल स्क्रीनवर   उजव्या बाजूस खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या Go या निळ्या रंगात असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. Go या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर वरच्या बाजूस दोन बॉक्स दिसतील, त्यातील एका बॉक्समध्ये Your location असे असेल आणि दुसऱ्या बॉक्समध्ये Choose destination असे असेल तर तेथे दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Choose destination असे लिहलेलं असणाऱ्या बॉक्स वर क्लिक केल्यावर, तेथे तुम्हाला ज्या ठिकाणापर्यंतच अंतर पहायचं आहे त्या ठिकाणाचे नाव टाका व नंतर आपण टाकलेल्या नावाशी खाली गुगल मॅप कडून तंतोतंत दाखवलेल्या ठिकाणाच्या नावावर क्लिक करा.
  5. ठिकाण निवडल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या पासून त्या ठिकाणचं किती अंतर आहे हे दाखवण्यात येईल,  त्याच प्रमाणे येथे तुम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी विविध वाहनांचा वापर केल्यास किती वेळ लागेल हे देखील दाखवले जाईल.

अशाप्रकारे मित्रहो आपण गुगल मॅप्स अँप्लिकेशनचा  वापर करून एखाद्या ठिकाणाचं आपल्या ठिकाणापासूनच अंतर बघू शकतो.

Google map वर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता कसा पाहावा ?

मित्रहो आपण गुगल मॅप्सचा वापर करून जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे व त्या ठिकाणी जायचा रस्ता आपल्याला माहीत नाही तर आपण गुगल मॅप चा वापर करून त्या ठिकाणी जाण्यासाठी असलेले विविध रस्ते पाहू शकतो,  ज्या मुळे आपल्याला अंदाज येते की कोणचा रस्ता त्या ठिकाणि जाण्यासाठी जवळ पडेल आणि कोणता दूर पडेल.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे कि गूगल मॅपचा वापर करून आपण एखाद्या ठिकाणाकडे जायचे रस्ते कसे पाहायचे तर पुढील स्टेपस करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्स एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल मॅपचे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर मोबाईल स्क्रीनवर   उजव्या बाजूस खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या Go या निळ्या रंगात असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. Go या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर वरच्या बाजूस दोन बॉक्स दिसतील, त्यातील एका बॉक्समध्ये Your location असे असेल आणि दुसऱ्या बॉक्समध्ये Choose destination असे असेल त्यावर क्लिक करा.
  4. Choose destination असे लिहलेलं असणाऱ्या बॉक्स वर क्लिक केल्यावर, तेथे तुम्हाला ज्या ठिकाणि तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणाचे नाव टाका व नंतरआपण टाकलेल्या नावाशी खाली गुगल मॅप कडून  तंतोतंत दाखवलेल्या ठिकाणाच्या नावावर क्लिक करा.
  5. ठिकाण निवडल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या पासून त्या ठिकाणि जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग किंव्हा रस्ता दाखवण्यात येईल.

अशाप्रकारे आपण गूगल मॅप चा वापर करून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील जाण्याचा रस्ता पाहू शकतो.

Google map वर आपले लोकेशन कसे पाहावे ?

 मित्रहो आपण गूगल मॅपच वापर करून, आपण एखाद्या अनोळख्या ठिकाणी आल्यास त्या ठिकाणचे नाव पाहू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे कि गूगल मॅप चा वापर करून आपले लोकेशन कसे पाहावे तर पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील सेटीन्ग्स मधे जाऊन मोबाईलचे Location चालू करा.
  2. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्सचे एप्लीकेशन उघडा.
  3. गुगल मॅपचे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर मोबाईल स्क्रीनवर   उजव्या बाजूस खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या Go या निळ्या रंगात असणाऱ्या पर्यायायाच्या वर सफेद रंगात गोलाकार आकारात असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  4. सफेद रंगात गोलाकार आकारात असणाऱ्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे लोकेशन निळ्या रंगाच्या बिंदुने दिसून येईल.

अशाप्रकारे आपण गूगल मॅप च्या मदतीने आपण एखाद्या अनोळख्या ठिकाणी आल्यास तेथील आपले लोकेशन आणि तेथील पत्ता समजू शकते.

Google map वर एखाद्या रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे हे कसे पाहावे ?

मित्रानो आपण गूगल मॅपचा वापर करून एखाद्या ठिकाणी जाणार असु तर तेथे जाणाऱ्या मार्गावर किती ट्रॅफिक आहे हे पाहू शकतो, ज्यामुळे आपल्याला कोणत्या रस्त्यावरून गेल्यास आपण लवकर पॊहचू हे समजते. गूगल मॅप वर रस्त्यांवरील ट्रॅफिक हा रंगाच्या स्वरूपात दाखवला जातो, जसे कि लाल रंग असेल तर खूप ट्राफिक आहे, भगवा रंग असेल तर मध्यम ट्रॅफिक आहे आणि हिरवा रंग म्हणजे रस्त्यावर काहीच ट्रॅफिक नाही आहे.

जर तुम्हाला देखील माहित करून घ्यायचे असेल कि गूगल मॅप वर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे, तर पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्सचे एप्लीकेशन उघडा.
  2. गूगल मॅप मधील उजव्या बाजूस दोन बॉक्स असणाऱ्या गोलाकार पर्यायावर क्लीक करा.
  3. दोन बॉक्स असणाऱ्या गोलाकार पर्यायावर क्लीक केल्यावर, तुमचा समोर मॅप दिसण्याचे वेगवेगळे पर्याय दिसतील तेथे Traffic या पर्यायावर क्लिक करा व नंतर मॅप वर कुठेहि क्लिक करा.
  4. तुमच्या समोर मोबाईल स्क्रीनवर उजव्या बाजूस खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या Go या निळ्या रंगात असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  5. Go या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर वरच्या बाजूस दोन बॉक्स दिसतील, त्यातील एका बॉक्समध्ये Your location असे असेल आणि दुसऱ्या बॉक्समध्ये Choose destination असे असेल त्यावर क्लिक करा.
  6. Choose destination असे लिहलेलं असणाऱ्या बॉक्स वर क्लिक केल्यावर, तेथे तुम्हाला ज्या ठिकाणि जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच ट्राफिक पाहायचं आहे त्या ठिकाणाचे नाव टाका व नंतर आपण टाकलेल्या नावाशी खाली गुगल मॅप कडून  तंतोतंत दाखवलेल्या ठिकाणाच्या नावावर क्लिक करा.
  7. ठिकाण निवडल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणि जायचं आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या विविध रस्त्यावरच ट्राफिक तुम्हाला दिसेल.

अशाप्रकारे मित्रहो आपण गूगल मॅप वर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील जाणाऱ्या रस्त्यावरचा ट्रॅफिक पाहू शकतो.

Google map वर मॅप ऑफलाईन वापरासाठी कसे डाउनलोड करावे ?

मित्रहो आपण गूगल मॅपच्या मदतीने एखाद्या ठिकाणाचा मॅप डाउनलोड करू शकतो, ज्यामुळे आपल्या मोबाईलला त्या ठिकाणी नेटवर्क नसल्यास देखील त्या ठिकाणी आपण गूगल मॅपचा वापर करू शकतो.

जर तुम्हालाही एखाद्या ठिकाणच मॅप, गूगल मॅप वर ऑफलाईन वापरण्यासाठी कसं डाउनलोड करायचं आहे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टपस करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्सचे एप्लीकेशन उघडा.
  2. गूगल मॅप उघडल्यानन्तर मोबाईल स्क्रीनवरील डाव्याबाजूस असणाऱ्या तीन आढाव्या रेषांवर क्लिक करा.
  3. तीन आढाव्या रेषांवर क्लिक केल्यावर तुमचा समोर काही पर्याय येतील त्यातील Offline maps या पर्यायावर क्लिक करा.
  4. Offline maps या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर SELECT YOUR OWN MAP असं पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
  5. SELECT YOUR OWN MAP या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला ज्या ठिकाणाचं मॅप ऑफलाईन वापरण्यासाठी डाउनलोड करायचं आहे, त्या ठिकाणाला निळ्या रंगाच्या येणाऱ्या बॉक्स मध्ये drag and drop वापरून आणा व नन्तर खाली असणाऱ्या Download या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण गुगल मॅप चा वापर करून एखाद्या ठिकाणाचा मॅप ऑफलाइन वापरण्यासाठी  गुगल मॅप वर डाऊनलोड करू शकतो.

Google map वरून तुमचे लोकेशन एखाद्याला शेअर कसे करावे ?

मित्रांनो आपण गुगल मॅप चा वापर करून आपल्या मित्रास किंवा नातेवाईकास आपले लोकेशन शेअर करू शकतो ज्यामुळे आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना आपल्या पर्यंत पोहोचण्यास मदत होते.

जर तुम्हाला माहिती करायचे असेल की गुगल मॅप वर आपले लोकेशन कसे शेअर करायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गूगल मॅप्सचे एप्लीकेशन उघडा.
  2. गूगल मॅप उघडल्यानंतर मोबाईल स्क्रीनवरील डाव्याबाजूस असणाऱ्या तीन आढाव्या रेषांवर क्लिक करा.
  3. तीन आढाव्या रेषांवर क्लिक केल्यावर तुमचा समोर काही पर्याय येतील त्यातील Location sharing या पर्यायावर क्लिक करा.
  4. Location sharing या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर खालच्या बाजूस Get started असे एक निळ्या रंगात पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
  5. Get started या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुम्हाला तुमचे लोकेशन तुमच्या नातेवाईकास किंवा मित्रास किती वेळासाठी शेअर करायचे आहे हे विचारण्यात येईल तेथे ते अधिक किंवा वजा या असणाऱ्या  पर्यायांचा वापर करून निवडा.
  6. तुम्हाला तुमच्या मित्रास किती वेळेसाठी तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे हे निवडून झाल्यानंतर खालच्या बाजूस तुम्हाला तुमचे लोकेशन तुमच्या मित्रास  कोणत्या माध्यमाचा वापर करून शेअर करायचे आहे ते विचारण्यात येईल जसे कि व्हाट्सअँप, messages, Gmail इत्यादी, तेथे तुम्हाला ज्या माध्यमातून तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे ते निवडा.

अशाप्रकारे आपण गूगल मॅप चा वापर करून आपण आपल्या मित्रास किंवा नातेवाईकास आपले लोकेशन शेअर करू शकतो

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात गुगल मॅप बद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला गुगल मॅप बद्दल समजण्यास आणि गुगल मॅप कसे वापरावे  यासाठी नक्कीच मदत करेल.  आम्ही सांगितलेल्या गुगल मॅप बद्दल माहिती बद्दल तुम्हाला काही डाउट असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.


गुगल मॅप कशासाठी वापरला जातो?



ठिकाणांवर सहज, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळवण्यासाठी, Google Maps ॲप वापरा. नकाशे तुम्हाला दिशानिर्देश दाखवतात आणि तुमच्या गंतव्यस्थानासाठी सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी रीअल-टाइम रहदारी माहिती वापरतात . व्हॉइस नेव्हिगेशनसह, तुम्ही रहदारी सूचना ऐकू शकता, कुठे वळायचे, कोणती लेन वापरायची आणि एखादा चांगला मार्ग असल्यास.


गुगल मॅप वापरण्याचे काय फायदे आहेत?

पारंपारिक रस्त्यांच्या नकाशांव्यतिरिक्त, Google नकाशे अनेक ठिकाणांचे हवाई आणि उपग्रह दृश्ये देतात. काही शहरांमध्ये, Google नकाशे वाहनांमधून घेतलेल्या छायाचित्रांसह रस्त्याची दृश्ये देतात. Google नकाशे मोठ्या वेब अनुप्रयोगाचा भाग म्हणून अनेक सेवा ऑफर करते.

गुगल मॅप्स कसा बनवला जातो?

Google Maps चे उपग्रह दृश्य हे “टॉप-डाउन” किंवा बर्ड्स-आय व्ह्यू आहे; शहरांची बहुतेक उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा 800 ते 1,500 फूट (240 ते 460 मीटर) वर उड्डाण करणार्‍या विमानातून घेतलेली हवाई छायाचित्रण आहे, तर इतर बहुतेक प्रतिमा उपग्रहांमधून आहेत .


गुगल मॅप म्हणजे काय ते कसे कार्य करते?

एक वेब सेवा आहे जी जगभरातील भौगोलिक प्रदेश आणि साइट्सबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते . पारंपारिक रस्त्यांच्या नकाशांव्यतिरिक्त, Google नकाशे अनेक ठिकाणांची हवाई आणि उपग्रह दृश्ये देतात.

Leave a Comment