M-Indicator ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती M-Indicator Application Information In Marathi

M-Indicator Application Information In Marathi M-indicator अँप्लिकेशन बद्दल माहिती आणि M-indicator अँप्लिकेशन कसे वापरावे ? मित्रहो आपण या लेखात M – indicator या अँप्लिकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत, M – indicator हे मोबाईल अँप्लिकेशन आहे, याची सुरुवात ११ वर्षांपूर्वी मे २०१० मध्ये झाली. हे अँप्लिकेशन आपल्याला सार्वजनिक वाहतुकींविषयी माहिती देते, जसे कि विविध वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळ, तिचे लोकेशन अशा प्रकारचे अनेक माहिती आपल्याला या अँप्लिकेशनच्या माध्यमातून समजते. M – indicator हे ऍप्लिकेशन आपल्याला मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा तीन शहरांतील वाहतुकीविषयी माहिती देते. चला तर मग जाणून घेऊया M – indicator हे अँप्लिकेशन कसे वापरावे.

M-Indicator Application Information In Marathi

M-Indicator ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती M-Indicator Application Information In Marathi

M – indicator हे अँप्लिकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो M – indicator हे अँप्लिकेशन विविध प्रकारच्या मोबाइल साठी उपलब्ध आहे, जसे कि अँड्रॉइड, IOS, विंडोस, ब्लॅकबेरी इत्यादी. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या अँप्लिकेशन स्टोअर मध्ये जाऊन M – indicator या नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

M – indicator हे अँप्लिकेशन डाउन्लोड केल्यांनतर, ते अँप्लिकेशन उघडा, तुमच्या समोर त्या अँप्लिकेशन मध्ये आलेले New features दाखवण्यात येतील, ते वाचा व खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.

Next पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा समोर तुमच्या जवळ स्टेशन्स बघण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील लोकेशन चालू करण्यासाठी विचारण्यात येईल, तेथे हवे असल्यास चालू करण्यासाठी OK करा व नंतर मोबाइल कडून चालू करण्यासाठी येणाऱ्या परमिशन ला allow करा, किंव्हा जर तुम्हाला सध्या याची गरज नसल्यास अगोदर अँप्लिकेशन कडून विचारण्यात येणाऱ्या पर्यायावर वर Ok क्लिक करा व नंतर मोबाईल कडून चालू करण्यासाठी येणाऱ्या पर्यायावर Deny येथे क्लिक करा.

आता तुमचा समोर तुम्हाला M – indicator हे अँप्लिकेशन कोणत्या भाषेत सुरु करायचे आहे,  मराठी आणि English अशा दोन भाषा दाखवण्यात येतील तेथे तुम्हाला हव्या असणाऱ्या भाषेला निवडा.

अशा प्रकारे आपन मोबाईल मधील M – indicator हे अँप्लिकेशन सुरु करू शकतो.

M – indicator अँप्लिकेशनमध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या लोकल ट्रेन कशा पाहाव्यात ?

मित्रहो आपण M – indicator या अँप्लिकेशनचा वापर करून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किती लोकल ट्रेन उपलब्ध आहेत, ती ट्रेन कोणत्या मार्गाने जाणार आहे आणि त्या ट्रेनची निघण्याची वेळ किती आहे हि सर्व माहिती पाहू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या ट्रेन विषयी माहिती M – indicator या अँप्लिकेशनवर कशी मिळवावी तर पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील M – indicator चे अँप्लिकेशन उघडा.
  2. M – indicator चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमच्या समोर विविध सार्वजनिक वाहनांचे चित्र दिसतील, त्यातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या Local ट्रेन च्या चित्रावर क्लिक करा.
  3. Local ट्रेनच्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही कोणत्या स्टेशन वर आहेत हे विचारण्यात् येईल, तेथे तुम्ही जेथे आहेत तेथील स्टेशनच नाव टाका.
  4. तुम्ही उपस्थित असणाऱ्या स्टेशनचे नाव टाकल्यानन्तर तुम्हाला तेथे त्या स्टेशवरुन निघणाऱ्या विविध ट्रेन्स दाखवण्यात येतील, तेथे तुम्हाला जेथे जायचं आहे तेथील स्टेशनच नाव निवडा.
  5. तुम्हाला जेथे जायचं आहे तेथील स्टेशनच नाव निवडल्यानन्तर तुमचा समोर तुम्ही उपस्थित असणाऱ्या स्टेशनपासून त्या स्टेशन कडे जाणाऱ्या विविध ट्रेन्स दिसतील, त्याचप्रमाणे तेथे ती ट्रेन कोणत्या वेळेस निघणार आहे हे देखील दाखवण्यात येईल.
  6. तेथे समोर येणाऱ्या ट्रेनच्या लिस्ट मध्ये, तुम्हाला निवडायच्या असणाऱ्या ट्रेनच्या नावावर क्लिक करून तुम्ही ती ट्रेन कोणत्या स्टेशनवर किती वाजेपर्यंत पोहचेल हे माहिती करून घेऊ शकता.

अशाप्रकरे आपण M – indicator या अँप्लिकेशन वर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या विविध ट्रेनस आणि तिच्या वेळेची माहिती घेऊ शकतो.

M – indicator अँप्लिकेशन वर आपण MSRTC च्या बसची माहिती कशी मिळवावी ?

मित्रहो आपण M – indicator अँप्लिकेशनचा वापर करून एखाद्या ठिकाणीं जाण्यासाठी कोणत्या MSRTC च्या बस उपलब्द आहेत आणि कोणत्या वेळेत येणार आहेत, या बाबतीत माहिती मिळू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि M – indicator अँप्लिकेशन वर MSRTC च्या बस बद्दल कशी माहिती मिळवावी तर पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील M – indicator चे अँप्लिकेशन उघडा.
  2. M – indicator चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमच्या समोर विविध सार्वजनिक वाहनांचे चित्र दिसतील त्यातील पहिल्या रांगेत असणाऱ्या MSRTC बस च्या चित्रावर क्लिक करा.
  3. MSRTC बस च्या चित्रावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर दोन बॉक्स येतील एका बॉक्स मध्ये SOURCE असे लिहले असले आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये DESTINATON असे लिहले असेल.
  4. तेथे SOURCE हे लिहलेल्या असलेल्या बॉक्स मध्ये तुम्ही कुठे आहेत ते ठिकाण निवडा व DESTINATON हे लिहलेले असणाऱ्या ठिकाणी तुम्ही कोठे जाण्यासाठी MSRTC ची बस शोधत आहेत ते ठिकाण टाका.
  5. SOURCE आणि DESTINATON अशा दोन्ही बॉक्स मध्ये ठिकाण टाकल्यानन्तर खाली लाल रंगात असणाऱ्या Search Buses या पर्यायवर क्लिक करा.
  6. Search Buses या पर्यायवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणाहून तुम्हाला जेथे जायचे आहे त्या ठिकाणा साठी असणाऱ्या बस ची लिस्ट समोर येईल.
  7. समोर येणाऱ्या बस च्या लिस्ट मध्ये ज्या बसने तुम्हाला जायचं आहे त्या बसच्या नावावर क्लिक करून तुम्ही ती बस कोणत्या मार्गाने जाणार आहे हे देखील पाहू शकता.

अशाप्रकारे आपण M – indicator या अँप्लिकेशनचा वापर करून आपल्याला जेथे जायचं आहे तेथे जाण्यासाठी असणाऱ्या बस बद्दल माहिती पाहू शकतो.

M – indicator अँप्लिकेशन चा वापर करून Jobs कसे शोधावेत ?

मित्रहो तुम्हाला माहित आहे का आपण M – indicator या अँप्लिकेशन चा वापर करून आपन केलेल्या शिक्षणानुसार जॉब सुद्धा पाहू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि M – indicator अँप्लिकेशनचा वापर करून जॉब कसे शोधावे तर पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील M – indicator चे अँप्लिकेशन उघडा.
  2. M – indicator चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमच्या समोर विविध सार्वजनिक वाहनांचे चित्र दिसतील त्यातील खालच्या बाजूस असणाऱ्या Jobs या पर्यायावर क्लिक करा.
  3. Jobs या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर विविध भागातील कामासाठी असणाऱ्या जाहिराती समोर येतील, जसे कि फायनान्स. इंजिनीरिंग, मार्केटिंग, ऑफिस इत्यादी.
  4. समोर येणाऱ्या विविध भागातील कामांपैकी, तुमचे जे शिक्षण आहे त्या भागावर क्लिक करा.
  5. शिक्षणानुसार एखाद्या भागावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर त्या भागातील मुंबई, पुणे मधे असणाऱ्या कामाच्या जाहिराती समोर येतील,  तेथे तुम्ही तेथे जाहिराती खाली दिलेल्या फोन नंबर वर कॉल करून विचारू शकता किंव्हा त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडी वर आपलं resume मेल करा, किंव्हा त्यांनी त्यांच्या दिलेल्या वेबसाइट वर जाऊन तेथे apply करा.

अशाप्रकारे आपण M – indicator एप्लीकेशन चा वापर करून घरबसल्या जॉब शोधू शकतो.

M – indicator या अँप्लिकेशनवर ऑटो किंव्हा cab चे चार्जेस कसे बघावे ?

मित्रांनो M – indicator या एप्लीकेशनचा वापर करून आपण मुंबई, पुणे अश्या शहरांमधील चालू ऑटो किंव्हा कॅब चे प्रति किलोमीटर वाहतुकीचे चार्जेस पाहू शकतो, ज्यामुळे आपल्या कडून कॅब ड्राइवर किंव्हा ऑटोड्राइवर जास्त पैसे काढू शकणार नाही.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि M – indicator वर चालू ऑटो किंव्हा कॅब चे प्रति किलोमीटर वाहतुकीचे चार्जेस कसे पाहावे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील M – indicator चे अँप्लिकेशन उघडा.
  2. M – indicator चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमच्या समोर विविध सार्वजनिक वाहनांचे चित्र दिसतील त्यातील खालच्या बाजूस असणाऱ्या Auto किंव्हा Cab या पर्यायावर क्लिक करा.
  3. Auto या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Auto चे सकाळ आणि दिवसाचे असे वेग वेगळे चार्जेस समोर येतील.

अशाप्रकारे आपण M – indicator या अँप्लिकेशन वर Auto किंव्हा कॅब चे चालू दर पाहू शकतो.

M – indicator या अँप्लिकेशनवर मुंबई आणि पुण्यामधील प्रसिद्ध ठिकाणे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स कसे पाहावे ?

मित्रानो आपण M – indicator या अँप्लिकेशनवर मुंबई आणि पुणे या शहरांतील प्रसिद्ध ठिकाणे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स याबद्दल माहिती देखील घेऊ शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि M – indicator या अँप्लिकेशनवर मुंबई आणि पुणे या शहरांतील प्रसिद्ध ठिकाणे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स कसे पाहावेत तर पुढीलप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील M – indicator चे अँप्लिकेशन उघडा.
  2. M – indicator चे अँप्लिकेशन उघडल्यानन्तर तुमच्या समोर विविध सार्वजनिक वाहनांचे चित्र दिसतील, तेथे मोबाइल स्क्रीन वर खाली या व खालचा बाजूस तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसेकी प्रसिद्ध ठिकाणे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स इत्यादी.
  3. समोर दिसणाऱ्या प्रसिद्ध ठिकाणे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स अशा पर्यायमध्ये तुम्हाला ज्या पर्यायाची माहिती घ्यायची आहे त्या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखामध्ये M – indicator या एप्लीकेशन बद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितले जी तुम्हाला हे ॲप्लिकेशन  वापरण्यास आणि समजण्यास नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहिती बद्दल काही शंका असल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.

Leave a Comment